साहित्य रगड्यासाठी:
१ मोठी वाटी पांढरे वाटाणे स्वच्छ धुवून ६-७ तास भिजवून ठेवणे
१/४ टीस्पून हिंग
१/२ टेस्पून हळद
१-१/२ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१ टीस्पून काळा मसाला
मीठ चवीनुसार
१ टीस्पून चिंचेचा कोळ
पाकृ:
पांढरे वाटाणे हिंग व हळद घालून कुकरला मऊसर शिजवून घ्या.
पातेल्यात तेल गरम करुन त्यात शिजवलेले वाटाणे, लाल तिखट, काळा मसाला, मीठ, चिंचेचा कोळा व थोडेच पाणी घालून उकळी आणा.
रगडा नीट शिजला की गॅस बंद करा.
(आवडत असल्यास फोडणीत चमचाभर आले+लसूण पेस्ट परता)
साहित्य पॅटिससाठी:
४-५ बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या म्हणजे पॅटिस करताना गुठळ्या राहणार नाही.
२ टेस्पून आले+ लसूण+ हिरवी मिरची वाटून (तुम्ही पेस्ट वापरु शकता, मला भरडसर वाटलेले आवडते म्हणून तसे घेतले आहे)
१/२ टीस्पून हळद
१/४ टीस्पून चाट मसाला
मीठ चवीनुसार
मैदा बाईंडिंगसाठी
पाकृ:
बटाट्याच्या मिश्रणात वाटलेले आले+ लसूण+ हिरवी मिरची, हळद, चाट मसाला, मीठ व मैदा घालून चांगले मिक्स करावे.
मिश्रणाचे छोटे गोळे घेऊन चपटे करुन पॅटिस तयार करावे.
नॉन-स्टिक तव्यावर तेल घालून पॅटिस दोन्ही बाजूंनी खमंग शॅलो फ्राय करावे.
साहित्य सर्व्हिंगसाठी:
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथींबीर
चाट मसाला
चिंच-खजुराची चटणी
( १ वाटी चिंच गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढून घ्यावा, गरम पाण्यात १/२ वाटी खजूर भिजवून, वाटून घेणे. चिंचेचा कोळ उकळायला ठेवावा, उकळी आली की त्यात गुळ , वाटलेला खजूर, लाल-तिखट, सुंठपूड, जीरे पावडर व मीठ किंवा सैंधव घालावे.)
पुदिन्याची चटणी
( मुठभर कोथिंबीर, मुठभर पुदिना, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, मीठ, जीरे व साखर एकत्र वाटून चटणी बनवणे.)
वरुन घालायला शेव/ फरसाण (इथे शेव सहज मिळत नसल्यामुळे मी फरसाण वापरले आहे तुम्ही भरपुर शेव घालून सर्व्ह करु शकता :) )
सर्व्हिंगः
एका प्लेटमध्ये रगडा घालून घ्या त्यावर तयार पॅटिस ठेवावे.
आता त्यावर पुदिन्याची चटणी व चिंच-खजुराची चटणी घालावी.
वरुन चिरलेला कांदा व कोथींबीर घालावी.
वरुन शेव/ फरसाणने गार्निश करुन सर्व्ह करावे.
रगडा पॅटिस खाण्यासाठी तयार आहे :)
प्रतिक्रिया
8 Apr 2015 - 12:55 am | श्रीरंग_जोशी
वाह खासंच दिसत आहे रगडा पॅटिस. चटपटित पदर्थाची पाकृ आवडली.
8 Apr 2015 - 1:06 am | स्वप्नांची राणी
रगड्याची ती डीश काय जिवघेणी दिसतेय ग!!
8 Apr 2015 - 2:02 am | लॉरी टांगटूंगकर
पाकृ देखके कलेजा खलास होता है....
8 Apr 2015 - 2:24 am | अत्रुप्त आत्मा
8 Apr 2015 - 7:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
+९०००००
8 Apr 2015 - 9:29 am | नाखु
आज चतुर्थी आहे तेव्हा आजचे काम उद्यावर !!!
10 Apr 2015 - 9:07 pm | प्राची अश्विनी
असे स्मायली कसे टाकतात ? हेल्पा हो!:(
10 Apr 2015 - 9:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ही घ्या लिंक. कोणाला सांगु नका.

-दिलीप बिरुटे
13 Apr 2015 - 8:58 am | प्राची अश्विनी
बेसीक मे राडा आहे , लिंक कॉपी पेस्ट होतच नाहीय!
8 Apr 2015 - 2:43 am | रुपी
मागच्या आठवड्यातच केले होते त्यामुळे फार जळजळ झाली नाही!
8 Apr 2015 - 3:20 am | खटपट्या
अरारारा !!
8 Apr 2015 - 5:08 am | जुइ
एकदम झक्कास दिसत आहे!!
8 Apr 2015 - 5:09 am | अत्रन्गि पाउस
लोक रात्री अपरात्री हे वाचून अस्वस्थ होताहेत ...आमचे बरे आहे कि पहाटे पहाटे हे वाचतोय ...
खड्ड्यात गेला तो चहा ...
एक ४ प्लेट पाठवून द्या हो कुणीतरी ...आणि हो ..वाटीभर आंबट दही मिळाले तर बघा बरे लागेल ह्या सगळ्यावर ...
सानिका ताई ..लैच भारी बर्रका
8 Apr 2015 - 6:12 am | मुक्त विहारि
गोरेगावला एक पाणी वाली बाई होती.
एका सिनेमात कलमवाली बाई पण येवून गेली.
आता ह्या मिपावर पण, पाणीवाली(आनंदाश्रू)+फोटोवाली+कलमवाली बाई आहेच.
जावू दे...
मुवि म्हणे, वाखूसा करावे आणि गप्प बसावे.
8 Apr 2015 - 7:42 am | अत्रुप्त आत्मा
@ आता ह्या मिपावर पण, पाणीवाली
(आनंदाश्रू)+फोटोवाली+कलमवाली बाई आहेच.
जावू दे...>> +++१११
समांतर:- पुन्हा पुन्हा यायला होतय या धाग्यावर! :-\
मिपा खाद्यसंम्मेलन झालच पायजे!
चराळ कमिटि.. खफगाव.
8 Apr 2015 - 6:54 am | मदनबाण
स का ळी. . . स का ळी. . . हा धागा उघडुन डोकवण्याची चूक मी का केली ? ;)
{पाणीपुरी प्रेमी } ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }
8 Apr 2015 - 8:56 am | अजो
वा मस्त
8 Apr 2015 - 9:25 am | विशाखा पाटील
कसं काय जमतं बुवा हे सगळे जिन्नस असे व्यवस्थित वेगवेगळ्या द्रोणात, लहानमोठ्या बाऊलमध्ये, झालंच तर चमच्यांमध्ये व्यवस्थित भरायचे, त्याचे असे छान छान फोटू काढायचे...
8 Apr 2015 - 9:40 am | कविता१९७८
मस्तच ग , नक्की करुन पाहीन
8 Apr 2015 - 9:52 am | पियुशा
वर विशाखा म्हणतेय तसच्च कस ग कस जमत तुला ?का? मी हा धागा पाहीला का ?
8 Apr 2015 - 10:20 am | hitesh
छान
8 Apr 2015 - 10:23 am | Mrunalini
अरे वा... मस्त दिसतय रगडा पॅटिस... आता इकडे पाठवुन दे थोडे. ;)
8 Apr 2015 - 11:03 am | स्मिता श्रीपाद
तोंडाला पाणी सुटलं...सकाळी सकाळी अशी डीश पाहिली आता दिवसभर सुचणार नाही काही...किती हा छळ म्हणते मी...
खरच कसं काय जमतं ग तुला असं सगळ आधी मांडामांड करुन छान छान फोटो काढ्त काढत स्वयंपाक करायला....
ग्रेट आहेस गं...
नमस्कार तुला _/\_
8 Apr 2015 - 11:07 am | जेपी
मस्त ......
वाखु साठ्वतो
8 Apr 2015 - 11:16 am | सस्नेह
भीषोण शुंदर फोटो आणि मरवा गयो पाकृ !
8 Apr 2015 - 11:24 am | त्रिवेणी
सानिका दुष्त आहे.
हे तीन शब्दच मी बोलणार.
आता नटराज ला जावे लागणार.
8 Apr 2015 - 11:37 am | आदूबाळ
अरे अय.
हा धागा पाहिलाच नाही. मिपा अजून सुरूच झालं नाही.
8 Apr 2015 - 11:40 am | विजय पिंपळापुरे
काळ्या मसाल्या बरोबर धणे जिरा पावडर पण टाकवी छान चव लागते.
8 Apr 2015 - 11:46 am | अजया
करावे लागणार!
8 Apr 2015 - 11:50 am | चैत्रबन
फारच खास...
8 Apr 2015 - 12:18 pm | अनिता ठाकूर
माझ्या गुजराथी शेजारणीने मला रगड्यासाठी खास मसाल्याची कृती दिली होती. ती पुढीलप्रमाणे:-
धणे अर्धा किलो
काळी मिरी अर्ध्या वाटीपेक्षा थोडी कमी
जीरे अर्धी वाटी
लवंग १० - १२
बडी वेलची ५० ग्रॅम
दालचीनी १० ग्रॅम
तमालपत्र १० ग्रॅम
बडीशेप अर्धी वाटी
हळकुंड १
बडीशेप नुसतीच थोडी भाजून घेणे. बाकीचे जिन्नस थोड्या (१ - १ चमचा ) तेलावर वेगवेगळे भाजून घेणे. दळून घेणे.
8 Apr 2015 - 12:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे यार यांचं कै तरी करा राव. कुठे तरी कोणत्या तरी विषयावर भांडन करावं लागतं यांच्याशी मिपावर.
म्हणजे राग येऊन मिपावर तरी येणार तरी नै या... :/
-दिलीप बिरुटे
8 Apr 2015 - 1:29 pm | मी_आहे_ना
कुठून जेवणाचा डबा उघडण्या-आधी हा धागा उघडला असं झालंय :(
सानिकाताई ... अप्रतीम सादरीकरण, पोटातल्या कावळ्यांचे निर्वाण झाले आहे!
समोर असं रगडा पॅटिस आल्या-शिवाय परत भूक लागू देणार नाही म्हणून गेलेत...
8 Apr 2015 - 2:51 pm | सूड
मी धागा उघडलाच नाही.
8 Apr 2015 - 3:13 pm | स्वाती राजेश
व्वा क्या बात है.... मस्त..
आता ट्रेन पकडुन तुझ्याकडे येउ का ?
फोटो अन पाककृती मस्त... :)
8 Apr 2015 - 7:14 pm | सुहास झेले
खल्लास... खपलो ... वारलो इत्यादी इत्यादी !!!
9 Apr 2015 - 12:43 pm | मनिमौ
शनिवार चा मेनु मिळाला आहे. नेहमी प्रमाणेच मस्त सुंदर
9 Apr 2015 - 12:56 pm | स्पंदना
भोजनाच्या देवा हिला माफ कर!!
ती काय करते आहे ते तिला माहित नाही.
9 Apr 2015 - 3:28 pm | दिपक.कुवेत
अगं का? छ्या आता करावेच लागणार. पॅटिस मधे बाईंडिंग साठि मैदा घालतात हे नव्याने समजले. मी ब्रेड ओला करुन घालतो.
10 Apr 2015 - 5:13 pm | निवेदिता-ताई
झक्कास
12 Apr 2015 - 9:23 pm | पैसा
जीवघेणे!
13 Apr 2015 - 11:14 am | मोनू
अप्रतिम...तोंडाला पाणी सुटले.
13 Apr 2015 - 4:21 pm | शशिका॑त गराडे
ताव मारावा असे वाटतेय
14 Apr 2015 - 8:10 am | मनुराणी
मस्तच. लवकरच करुन बघण्यात येईल.
14 Apr 2015 - 1:54 pm | मनीषा
छान आहे पाककॄती ..
सगळं साहित्यं जमलं, की नक्की करणार !
14 Apr 2015 - 3:44 pm | कविता१९७८
सानिका,
आज साहीत्य आणलंय, तुझ्या सारखी सुगरण नाहीये मी पण प्रयत्न नक्की करणार आहे.
15 Apr 2015 - 1:34 am | सानिकास्वप्निल
ए काही काय चांगलेच बनवशील तू नक्की :)
15 Apr 2015 - 7:45 am | इशा१२३
लगेच उचलावीशी वाटतेय प्लेट्...धन्यवाद!
15 Apr 2015 - 2:49 pm | अक्षया
अप्रतिम !
:)
15 Apr 2015 - 4:27 pm | रेवती
नेहमीप्रमाणेच छान पाकृ व जलजले फोटू.
मीही असाच करते हा पदार्थ.
अख्खे वाटाणे भिजवून शिजवताना टरफलामुळे अख्खेच राहतात किंवा अगदी गाळ होत नाहीत पण माझ्याकडे बीनसालाची वाटाण्याची डाळ आहे. त्याने हा पदार्थ करायला गेल्यास अगदी गिचका होतो. आता ती डाळ कशी संपवावी याबद्दल काही आयड्या आहेत का? (ती डाळ नवर्याने चुकून हरभरा डाळ म्हणून दुकानातून आणली होती)
15 Apr 2015 - 4:57 pm | सूड
वाटाण्याची डाळ फार वापरलेली नाही, पण वाफेवर शिजवून भाजी वैगरे करता येईल ना?
15 Apr 2015 - 5:40 pm | रेवती
अरे ती जरा वाफवली की शिजून गाळच होतीये. काहीतरी नवा पदार्थ तयार करावा लागणार बहुतेक! ही डाळ महाराष्ट्रीय पदार्थांमध्ये फारशी वापरल्याचे ऐकीवात नाही.
15 Apr 2015 - 6:45 pm | दिपक.कुवेत
डाळ वडे ट्राय करता येतील का? अजून पाहिली नाहिये. प्रत्यक्ष पाहिली तर काहि सुचु शकेल.
15 Apr 2015 - 9:28 pm | सानिकास्वप्निल
अगदिच गरगट होतेय का? मग लेंटिल सूपप्रमाणे सूप करता येईल असे वाटते.
15 Apr 2015 - 7:56 pm | आदूबाळ
नवर्याला हरभर्याची उसळ म्हणून खपवता येईल का?
16 Apr 2015 - 2:44 am | रेवती
अरे थांबा, थांबा! यातील काहीही होणार नाहीये.
सूप एरवी पाचक म्हणून घेतात. या डाळीचे सूप पोट बिघडवणारे असेल अशी शंका येतीये.
आता अगदी कमी पाण्यात शिजवून वडे ट्राय करते.
अदूबाळ, तुम्ही ग्रोसरीतून चुकीचा पदार्थ आणल्यास अर्धांगिनी काय करते हे तिला व्यनि करून विचारते. ;)
28 Apr 2015 - 12:45 pm | लालगरूड
www.sherv.net/spaghetti-emoticon-1184.html
रगडा रगडा .....
4 Jun 2015 - 9:06 pm | रॉजरमूर
खूप छान .....!
आजच केले रगडा पॅटिस छान झाले ......
सादरीकरण नेहमीप्रमाणे अप्रतिम