मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रगडा पॅटिस

सानिकास्वप्निल · · पाककृती
. साहित्य रगड्यासाठी: १ मोठी वाटी पांढरे वाटाणे स्वच्छ धुवून ६-७ तास भिजवून ठेवणे १/४ टीस्पून हिंग १/२ टेस्पून हळद १-१/२ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १ टीस्पून काळा मसाला मीठ चवीनुसार १ टीस्पून चिंचेचा कोळ . पाकृ: पांढरे वाटाणे हिंग व हळद घालून कुकरला मऊसर शिजवून घ्या. पातेल्यात तेल गरम करुन त्यात शिजवलेले वाटाणे, लाल तिखट, काळा मसाला, मीठ, चिंचेचा कोळा व थोडेच पाणी घालून उकळी आणा. रगडा नीट शिजला की गॅस बंद करा. (आवडत असल्यास फोडणीत चमचाभर आले+लसूण पेस्ट परता) . साहित्य पॅटिससाठी: ४-५ बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या म्हणजे पॅटिस करताना गुठळ्या राहणार नाही. २ टेस्पून आले+ लसूण+ हिरवी मिरची वाटून (तुम्ही पेस्ट वापरु शकता, मला भरडसर वाटलेले आवडते म्हणून तसे घेतले आहे) १/२ टीस्पून हळद १/४ टीस्पून चाट मसाला मीठ चवीनुसार मैदा बाईंडिंगसाठी . पाकृ: बटाट्याच्या मिश्रणात वाटलेले आले+ लसूण+ हिरवी मिरची, हळद, चाट मसाला, मीठ व मैदा घालून चांगले मिक्स करावे. मिश्रणाचे छोटे गोळे घेऊन चपटे करुन पॅटिस तयार करावे. नॉन-स्टिक तव्यावर तेल घालून पॅटिस दोन्ही बाजूंनी खमंग शॅलो फ्राय करावे. . साहित्य सर्व्हिंगसाठी: बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथींबीर चाट मसाला चिंच-खजुराची चटणी ( १ वाटी चिंच गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढून घ्यावा, गरम पाण्यात १/२ वाटी खजूर भिजवून, वाटून घेणे. चिंचेचा कोळ उकळायला ठेवावा, उकळी आली की त्यात गुळ , वाटलेला खजूर, लाल-तिखट, सुंठपूड, जीरे पावडर व मीठ किंवा सैंधव घालावे.) पुदिन्याची चटणी ( मुठभर कोथिंबीर, मुठभर पुदिना, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, मीठ, जीरे व साखर एकत्र वाटून चटणी बनवणे.) वरुन घालायला शेव/ फरसाण (इथे शेव सहज मिळत नसल्यामुळे मी फरसाण वापरले आहे तुम्ही भरपुर शेव घालून सर्व्ह करु शकता :) ) . सर्व्हिंगः एका प्लेटमध्ये रगडा घालून घ्या त्यावर तयार पॅटिस ठेवावे. आता त्यावर पुदिन्याची चटणी व चिंच-खजुराची चटणी घालावी. वरुन चिरलेला कांदा व कोथींबीर घालावी. वरुन शेव/ फरसाणने गार्निश करुन सर्व्ह करावे. . रगडा पॅटिस खाण्यासाठी तयार आहे :) .

वाचन 25269 प्रतिक्रिया 58