सिंहगड व्हॅली

Primary tabs

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in भटकंती
18 Jan 2015 - 12:18 am

पुण्यातल्या पक्षी निरीक्षकांचे नंदनवन म्हणजे सिंहगड व्हॅली !

व्हॅलीमध्ये पक्ष्यांच्या नानाविध जाती बघायला मिळत असल्या, तरी इथला आकर्षणाचा केंद्रबिंदू स्वर्गीय नर्तक आहे. (Asian Paradise Flycatcher)
या स्वर्गीय नर्तकाचा केवळ एक चांगला फोटो मिळावा यासाठी अनेक हौशी फोटोग्राफर तासनतास एकाच जागी चित्त लावून बसलेले असतात.
सहसा दर्शन न देणारे अनेक रानपक्षी या व्हॅलीमध्ये हिवाळ्यात मात्र सहजपणे पाहायला मिळू शकतात.
त्यातल्या त्यात वेगवेगळे, अत्यंत देखणे फ्लायकॅचर पक्षी पाहायला मिळाले तर क्या कहने !
हवेत सूर मारून किडे-कीटकांना पकडण्याच्या त्यांच्या कलेमुळे त्यांना फ्लायकॅचर म्हणतात.

तुम्हाला पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठीच व्हॅलीला जायचे असेल तर एक काळजी घ्यावी लागेल.
सकाळी जमेल तितक्या लवकर व्हॅलीला जाऊन ओढ्याजवळ मोक्याची जागा पकडून बसावे लागेल, कारण अनेक फोटोग्राफर त्यांच्या बझुका लेन्सेस घेऊन सकाळी ६ वाजल्यापासूनच तिथे ठाण मांडून बसलेले असतात.
चांगला फोटो मिळवण्याच्या भानगडीत पक्ष्यांना त्रास होईल असे मात्र वागू नका.
कारण त्यामुळे तुम्हाला तर चांगल्या फोटो मिळणार नाहीतच, शिवाय बिचारे घाबरलेले पक्षीसुद्धा पुन्हा दिवसभरात त्या ओढ्याकडे फिरकणार नाहीत.

पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटा, फोटो काढा, पायवाटेने व्हॅलीच्या आतल्या भागात एक चक्कर टाका.
फिरून फिरून भूक लागल्यानंतर गडावर जाऊन मस्त कांदा भजी, पिठलं भाकर आणि वांग्याच्या भरीतावर ताव मारा.

:: व्हॅलीला जायचे कसे ? ::

- वरच्या स्क्रिनशॉटमध्ये पिवळ्या रंगाने जो रस्ता दाखवलाय, तो खडकवासल्याकडून (पुणे शहर) येणारा रस्ता आहे.
- लाल रंगाने दर्शवलेला रस्ता सरळ गडावर जाण्यासाठी आहे. ज्यांना ट्रेकिंग न करता गाडीने गडावर जायचे आहे, ते हा मार्ग वापरतात.
- हिरव्या रंगाने जो रस्ता दाखवलाय, तो अतकरवाडी गावातून गडाच्या पायथ्याला जातो.
हा रस्ता जिथे संपतो, तिथे चैत्राली नावाचे एक छोटेसे टपरीवजा हॉटेल आहे.
दुचाकी किंवा चारचाकी गाड्या इथपर्यंत येतात.
इथून डावीकडे जाणारा रस्ता तुम्हाला व्हॅलीमध्ये घेऊन जातो, आणि उजवीकडे जाणारा रस्ता गडावर. (ट्रेकिंगचा मार्ग)

1) स्वर्गीय नर्तक (Asian Paradise Flycatcher-Male)


2) स्वर्गीय नर्तक (Asian Paradise Flycatcher-Female)

3) कोतवाल (Black Drongo)

4) कोतवाल (Black Drongo)

5) शैल कस्तूर (Blue Headed Rock Thrush-Female)

6) रान खाटीक (Common WoodShrike)

7) चिरक (Indian Robin - Male)

८) जंगली सातभाई (Jungle Babbler)

9) डोमकावळा (Jungle Crow)

10) तांबुल (Red Breasted Flycatcher-Male)

11) तांबुल (Red Breasted Flycatcher-Male)

12) तांबुल (Red Breasted Flycatcher-Female)

13) लालगाल्या बुलबुल (Red Whiskered Bulbul)

14) ठिपकेवाला कवडा (Spotted Dove)

15) निलिमा (Tickell's blue flycatcher)

16) वृक्ष तिरचिमणी (Tree Pipit)

17) श्वेतभुवईवाला गड्द निळा माशीमार (Ultramarine Flycatcher-Male)

18) नाचरा (White Spotted Fantail)

19) नाचरा (White Spotted Fantail)

20) ब्राम्हणी घार (Brahminy Kite)

21) वारकरी/चांदवा (Common Coot) पक्षी जांभळ्या पाणकोंबडीला (Purple Swamphen) हुसकावून लावतोय.

२२) छोटा पाणकावळा (Little Cormorant)

२३) खंड्या (white throated kingfisher)

शेवटच्या ४ फोटो खडकवासल्याला काढल्या आहेत.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 Jan 2015 - 12:31 am | प्रचेतस

क्या बात है....!!!!!!!११
मस्तच.

मुक्त विहारि's picture

18 Jan 2015 - 12:37 am | मुक्त विहारि

पक्ष्यांचे फोटो काढणे हे संयमाचे काम...

क्र १० ,१५ फारच छान मोनार्क आणि व्ह॰ फ्लाईकैचर नव्हते का ?लोणावळा लायन पॉइंट ते अॅम्बिव्हैली रोडच्या डाव्या बाजूला हे पक्षी दिवसभर सहज दिसतात.

नांदेडीअन's picture

18 Jan 2015 - 9:30 am | नांदेडीअन

नीलमणी (Black Naped Monarch) दिसला होता, पण त्याने फोटो नाही काढू दिला.
Verditer Flycatcher मात्र अजून भेटला नाही. :(

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jan 2015 - 8:17 am | अत्रुप्त आत्मा

जब्बरदस्त! :HAPPY:

नांदेडीअन's picture

18 Jan 2015 - 9:24 am | नांदेडीअन

@ वल्ली, मुक्त विहारी, अत्रुप्त आत्मा

धन्यवाद. :)

जातवेद's picture

18 Jan 2015 - 10:05 am | जातवेद

पुण्याजवळ कावडी-पाटला पण असेच बरेच पक्षी हिवाळ्यात बघायल मिळतात. त्यातले बरेच स्थलांतरीत असतात असे ऐकून आहे.

नांदेडीअन's picture

18 Jan 2015 - 10:52 am | नांदेडीअन
जातवेद's picture

18 Jan 2015 - 11:29 am | जातवेद

छानच!

चौकटराजा's picture

18 Jan 2015 - 10:53 am | चौकटराजा

लालगाल्या बुलबुल - आपल्या कॅमेर्‍यातील डी ओ एफ चा खास उपयोग, पक्षाच्या सर्व भागातील तपशील छान दिसणे, क्लास रिम लाईट्स , फांदीचा भाग त्यावरचा प्रकाशाचा भाग सर्व गोष्टी लक्षवेधक.

सर्वसाक्षी's picture

18 Jan 2015 - 3:54 pm | सर्वसाक्षी

चित्रे अतिशय सुरेख. सगळी एकाच खेपेते टिपली की वेगवेगळ्या वेळी टिपली आहेत?
कॅमेरा व लेन्सचाही तपशिल द्या.

नांदेडीअन's picture

18 Jan 2015 - 4:08 pm | नांदेडीअन

@ चौकटराजा
धन्यवाद :)

@ सर्वसाक्षी
धन्यवाद :)
एकाच ट्रिपमध्ये काढलेले फोटो आहेत सगळे.
कॅमेरा निकॉन ५१०० आणि लेन्स ५५-३००.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2015 - 1:05 am | डॉ सुहास म्हात्रे

भारी !

गणेशा's picture

19 Jan 2015 - 6:09 pm | गणेशा

एक नंबर !
पहातच बसावे असा धागा ..

प्रसाद१९७१'s picture

19 Jan 2015 - 6:12 pm | प्रसाद१९७१

खासच. धन्यवाद नांदेडीयन

सूड's picture

19 Jan 2015 - 6:53 pm | सूड

मस्तच!!

किल्लेदार's picture

19 Jan 2015 - 7:04 pm | किल्लेदार

मला फक्त स्वर्गीय नर्तक आणि जंगली सातभाई दिसला होता.

नांदेडीअन's picture

19 Jan 2015 - 11:40 pm | नांदेडीअन

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ! :)

वेल्लाभट's picture

20 Jan 2015 - 7:27 am | वेल्लाभट

सहीच्च्च्च्च्च !

अनुप कोहळे's picture

20 Jan 2015 - 10:21 pm | अनुप कोहळे

मागील रवीवारी कवडेपाट ल गेलो होतो. पुढिल विकांत ला कुणी येणार का सिंहगड व्हॅली मधे?

फोटो येथे बघता येतील https://www.flickr.com/photos/88982369@N00/tags/kavadipat/

अनुप कोहळे's picture

20 Jan 2015 - 10:23 pm | अनुप कोहळे
नांदेडीअन's picture

21 Jan 2015 - 1:04 am | नांदेडीअन

मस्त आल्यात फोटो. :)
विकेंडला नका जाऊ व्हॅलीला.
फार गर्दी असते.

पैसा's picture

20 Jan 2015 - 10:32 pm | पैसा

जबरदस्तच आलेत फोटो सगळेच!!

नांदेडीअन's picture

21 Jan 2015 - 1:06 am | नांदेडीअन

@ पैसा आणि वेल्ला भट

धन्यवाद. :)