कथा-कॉलेज कट्टा भाग १

चेतन677's picture
चेतन677 in जनातलं, मनातलं
21 Dec 2014 - 8:07 pm

या कथेतील घटनाक्रम हा पुर्णतः काल्पनिक आहे.

तो अमावस्येचा दिवस होता.मध्यरात्रीचे बारा वाजत आले होते.थंडीचे दिवस होते.पुण्यातल्या शनिवार वाड्याजवळ दोन भिकार्यांचा संवाद चालु होता.
" यार तुला झोपायला दुसरी जागा नाही सापडली का?" पहिल्याने विचारले.
"का रे काय झालं? असं का विचारत आहेस?" दुसरा.
" माहित असुन काहीही माहीत नाही असे दाखवु नकोस." पहिला आता चिडला होता.
" अरे....काय तु पण कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवतोस.हेच म्हणायचयं ना तुला की इथे शनिवार वाड्यात अमावस्येच्या रात्री काका मला वाचवा असा आवाज येत असतो!!!" तो हसत म्हणाला.
" हो अगदी बरोबर म्हणुन तर इथे आजच्या दिवशी कुणी झोपत नाही." दुसरा भिकारी.
" अरे तु कधी हुशार होणार एक तर पुण्यात आपल्या सारख्यांना झोपायला जागा नाहीये.आज निवांत झोपायची संधी मिळतीये आणि तु?? अरे अफवा आहेत सगळ्या भुत वगेरे सगळं खोट असंत.काय तर म्हणे काका मला वाचवा असा आवाज येतो कधी ऐकलाय का असा आवाज?" पहील्याने समजुत घातली.
" वाचवा..वाचवा" या आवाजाकडे पहिल्याचे लक्ष गेले.
" अरे आता मला घाबरावयाचा प्रयत्न नको करुस हा.." पहिला वैतागुन म्हणाला.
"अरे पण मी काही म्हणालोच नाही." दुसरा घाबरत म्हणाला.
इतक्यात दोघांना कुणितरी त्यांच्याच बाजुने धावत येत असल्याचे दिसले.
" भुत भुत" असे ओरडत दोघेही पळुन गेले.
शनिवार वाड्याजवळ कुणाच्या तरी बुटांचा आवाज येत होता.तो माणुस घामाने संपुर्ण भिजला होता. आणि मोठ्याने वाचवा वाचवा असे ओरडत होता.अचानक तोल जाऊन तो खाली पड्ला.तो एक पोलिस इंस्पेक्टर होता.
तोच त्याचा पाठ्लाग करत असलेले तिघेजण तिथे येऊन थबकले.
" भाई,खुप पळवलं यार या इंस्पेक्टरने." त्यातला एकजण म्हणाला.
"पक्या काय यार तु पण..अरे जेवढे जास्त कष्ट तेवढी जास्त मजा.हो ना भाई!!बरोबर बोललो ना मी."
त्या दोघांच्या बोलण्यावर त्यांच्यामधला तरुण काहीही बोलला नाही.त्याच्या हातात एक ब्रेसलेट होतं.तो हात तसाच खिशात घालत त्या तरुणाने पिस्तुल काढले.आणि त्या इंस्पेक्टरवर रोखले.
"प्लीज मला माफ करा.का मारताय मला आणि कोण आहात तुम्ही?" तो इंस्पेक्टर तिघांकडे कटाक्ष टाकत म्हणाला.
" काय रे तु आमच्या भाईला ओळखत नाही?तुला माहीतिये का?"
"सुनिल आणि पक्या शांत रहा ना आता." त्या तरुणाने दोघांना शांत बसविले.आणि आपली नजर त्या खाकीवाल्याकडे वळविली.
" यार सगळ्या पोलिस खात्यात मी तुलाच का निवडलं हा विचार नाही केलास ना तु.कारण तु खुप प्रामाणिक आहेस ना.जरा आठव तु काल काय केलंस ते?" तो तरुण आता चिडला होता.
यावर पोलिस काही बोलणार त्या आधीच त्या तरुणाने पोलिसावर गोळी झाडली आणि शनिवार वाड्याजवळची शांतता भंग पावली.
"चला मित्रांनो झोपुया आता खुप उशीर झालाय" दोघांच्या खांद्यावर हात ठेवत तो तरुण म्हणाला.
" भाई पार्टी पाहीजे आज हाफ सेंट्युरी मारलीस ना तु!!!" पक्या आनंदात म्हणाला.
" पक्या आता कोणता बार चालु असंतो यार बारा वाजत आलेत?" सुनिलने सवाल केला.
"अरे तुम्ही चला तर!!!" पक्या अतिशय उत्साहात म्हणाला.
थोड्याच वेळात ते तिघे त्या ठरलेल्या बारजवळ आले.पण तो बंद झाला होता.
पक्या आणि सुनिल हताश झाले.
" अरे असं काय चेहरे पाडलेत तुम्ही??जर पुढचा दरवाजा बंद झाला असेल तर मागचा दरवाजा चेक करायचा असतो!!!" तो तरुण म्हणाला.
" म्हणजे??" पक्या आणि सुनिल दोघेही ओरडले.
त्यावर काहीच न बोलता त्या तरुणाने दोघांना मागच्या बाजुने नेले. तिथलं दृष्य पाहिल्यावर पक्याच्या डोळ्यांवर विश्वासच राहीला नाही. कारण तो बार अजुन चालु होता.
" यार भाई काय सरप्राइज दिलंस.मस्त आपल्याला आवडलं" सुनिल.
" यार भाई तुमच्यामुळे आम्हाला बिझनेस मध्ये खुप फायदा झालाय." बारचा
" हो का रे असं काय झालंय नेमकं?" सुनिल.
" आधी तुम्ही बसा तर आणि काय ऑर्डर आहे तुमची??" त्या बारच्या मालकाने विचारले.
" वोड्का" तिघेही एका सुरात ओरडले.
अर्धा तास झाला.पक्याने टी.व्ही चालु करायला सांगितला.
आजतक वर न्युज चालु होती.
"अतिशय कर्तव्यदक्ष असलेले इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप साठे यांची अज्ञात इसमांनी गोळी घालुन हत्या करण्यात आली आहे.हा पोलिसांसाठी एक जबरदस्त धक्का आहे.तपास चालु आहे."
"बरं झालं मेला एकदाचा" बारचा मालक त्याच्याजवळ येत म्हणाला.
"बिल किती झालं?" पक्या म्हणाला.
"अरे भाई कडुन कसंलं बिल घ्यायचं? आजची पार्टी माझ्याकडुन." मालक हसत म्हणाला.
" अरे काय यार आज आमच्या भाईवर एवढे मेहबान का?" पक्याला आता पुर्ण चढली होती.
" अरे आधी गिर्हाईकांची सारखी तक्रार यायची की ऑर्डर वेळेवर येत नाही.पण भाईने मला जस्ट-इन-टाइम आणि ५ S संकल्पना सांगितली.आणि काय गेल्या पंधरा दिवसांपासुन कुणाची काहीही तक्रार नाही.नफाच नफा झालाय.सगळ्यांना वेळेवर ऑर्डर मिळते.काय रे पक्या भाईच काय इंजिनिअरींग वगेरे झालंय की काय??" तो मालक हसत हसत म्हणाला.
त्यावर भाई काहीच बोलला नाही.घरी गेल्यावर पक्या आणि सुनिल लगेच झोपी गेले.पण चार पेग कोरे पिऊनही भाई जागा होता.त्याच्या डोळ्यांत पाणी होते.त्याला त्या बार मालकाचे शब्द आठवत होते. आणि त्याला आता आपला भुतकाळ आठवत होता.कोण होता हा भाई.त्याचं खरं नाव काय होतं? इंजिनिअरींगचे ज्ञान आणि हुशार असुनही हा गुन्हेगारीच्या या जगात काय करत होता? कदाचित याचे उत्तर फक्त त्या तरुणाकडे होते.

कथा

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

21 Dec 2014 - 10:21 pm | किसन शिंदे

खाली क्रमश लिहायचं राहिलेय का?

खटपट्या's picture

22 Dec 2014 - 12:39 am | खटपट्या

मस्त सुरवात !!
पु,भा.प्र.

मुक्त विहारि's picture

22 Dec 2014 - 12:46 am | मुक्त विहारि

पुभाप्र.

इरसाल's picture

22 Dec 2014 - 10:02 am | इरसाल

याचाच अर्थ असा की "कुंपणीमदे" ५ एस नी तत्सम कामं करणारे रि"काम" टेकडे असतात. :))

आताच कोणतेही अनुमान लावू नका.कथेच्या शेवटी खुप मोठा सस्पेंस आहे...