बाइक कुठली घेवू?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
20 Dec 2014 - 11:47 am
गाभा: 

मुलाला नविन बाइक घेवून द्यायची आहे.

मला त्यातले काही समजत नाही.

त्यामुळे नेहमी प्रमाणे "कठीण समय येता, मिपाकर मदत करतात" हा अनुभव असल्याने, विचारणा करत आहे.

बजेट : ७० ते ८० हजार

वापरण्याचा कालावधी : जास्तीत जास्त ५ वर्षे.

मायलेज : जितके जास्त तितके उत्तम

रोजचा प्रवास : जास्तीत जास्त १०-१५ किमी. सलग ५-६ किमी.

वापरणार : आकुर्डी (पुणे)

शक्यतो सेकंड हँड नको आहे, पण कुणा मिपाकराची असली तर नक्कीच प्राधान्य.

प्रतिक्रिया

जेपी's picture

20 Dec 2014 - 11:53 am | जेपी

आपला पास...

( शिडी डॉन प्रेमी) जेपी.

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 11:54 am | मुक्त विहारि

तू पण माझ्या सारखाच दिसतोस...

अद्द्या's picture

20 Dec 2014 - 11:54 am | अद्द्या

मैलेज वाली हवी आहे कि जोरात पळवायला . हे ठरवा .
७० हजार म्हणताय म्हणून म्हटलं .

तरी या बजेट मध्ये सध्या पल्सर (१८० बसेल ७० हजारात , . अवेंजर ८० च्या आसपास ) अपाचे १८० सुद्धा साधारण ८४ पर्यंत येईल .

ह्या बाइक्स आज ब्येष्ट आहेत . .

पिढ्यान पिढ्यांचा हाच वाद...

आता तुम्हीच काहीतरी सुवर्ण-मध्य काढलात तर उत्तम...

तसेही मुलाला एक स्पष्टपणे सांगीतले आहेच की, हेल्मेटशिवाय बाइक चालवतांना दिसलास तर, सायकल घेवून देईन...

अद्द्या's picture

20 Dec 2014 - 12:09 pm | अद्द्या

ह्हाहा . . मी हि हाच वाद घातला होता वडिलांशी . . शेवटी चालवणार तो आहे . त्याला आवडत असेल . आणि हेल्मेट आणि इतर सुरेक्षेचे नियम पाळत असेल . तर बघा मी सांगितलेल्या पैकी एखादी घ्या . ४० - ४५ मैलेज मिळेल . जे शहरात भरपूर आहे . हैवे वर ५५ पर्यंत जाऊ शक्त्म. तुम्ही खुश .
पळवायला जबरदस्त आहे . तो हि खुश . क्या बोलते !!

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 12:16 pm | मुक्त विहारि

अहो,

तरूण रक्त सळसळणारच...किंबहूना तेच नैसर्गिक आहे.

पण स्वसुरक्षा आणि इतरांची सुरक्षा सांभाळत वाहन चालवणे जास्त योग्य.

मुलगा पण पल्सरच म्हणत आहे.

शेवटी बाइक त्याची आणि चालवणार पण तोच.. आम्ही फक्त दमड्या मोजणार.

(नाही म्हटले तरी बाइक ही तरुणांची पहिली प्रेयसी असते. त्याची त्यालाच निवडू देणे इष्ट.)

अद्द्या's picture

20 Dec 2014 - 12:33 pm | अद्द्या

बाइक ही तरुणांची पहिली प्रेयसी असते. त्याची त्यालाच निवडू देणे इष्ट.

^^^^^^^^^^^^^^

अगदी हेच म्हणतो . . फक्त वेळच्या वेळेला गाडीची सर्विसिंग / इन्शुरन्स इत्यादी करवून घ्या . आणि हे त्यालाच करायला लावा . . बाकी काळजी तो घेइलच .

अद्द्या's picture

20 Dec 2014 - 12:34 pm | अद्द्या

बाकी . . "अहो" नका म्हणू . . उगाच मोठं झाल्या सारखं वाटत :P . . आत्ता कुठे २५ लागलंय

तुषार काळभोर's picture

20 Dec 2014 - 11:55 am | तुषार काळभोर

मोटरसायकलः
१०० सीसी: स्प्लेंडर
१२५सीसी: शाईन
१५०सीसी: युनिकॉर्न

स्कूटरः होंडा डिओ (टीव्हीएस ज्युपीटर पण चांगली आहे, असं ऐकलंय. पण जवळपास कोणाकडे वापरताना पाहिलेली नाही)

(उत्तम मायलेज, कमीत कमी मेंटेनन्स, इ.इ.)

अवांतरः होंडाच्या १००सीसी बाईक्स्चा कोणाला अनुभव आहे का?)

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 12:05 pm | मुक्त विहारि

http://www.misalpav.com/node/24396

डॉ.खर्‍यांकडे होंडा १०० सीसीचा अनुभव आहे आणि त्यांनी पण त्या बाइकला पहिली पसंती दिली आहे..

http://www.misalpav.com/comment/reply/24396/475555

तुषार काळभोर's picture

20 Dec 2014 - 12:15 pm | तुषार काळभोर

"हीरो होंडा" सीडी १०० एस् एस् मी कॉलेजला वापरली आहे. शेलचं पेट्रोल टाकून अन् ४० ला चालवून ७८चं मायलेज काढलंय.
मला "होंडा"च्या १००सीसी बाईकबद्दल विचारायचं होतं. (ड्रीम युगा/ ड्रीम निओ)

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Dec 2014 - 3:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

युगा आणि निओ ११० सी.सी. च्या आहेत.

विनोद१८'s picture

20 Dec 2014 - 12:02 pm | विनोद१८

सध्या मी वापरीत आहे, 'उत्तम मोटरसायकल', तुमच्या बजेट्मध्ये बसेल. दुसरा पर्याय 'होंडा युनिकोर्न'. शक्यतो सेकंड हँड नकोच.

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 12:07 pm | मुक्त विहारि

मुलाला तुमच्या कडे पाठवतो...

माझा मोबाइल नंबर तुमच्याकडे आहे का?

मी नेमका सौदीत असल्याने आणि सिम कार्ड बलल्याने, तुमचा मोबाइल नंबर माझ्याकडे नाही.

बादवे,

आपण रामदासांना भेटायला ह्याच गाडीवरून गेलो होतो का?

संचित's picture

20 Dec 2014 - 12:59 pm | संचित

मैलेज मध्ये ठीक आणि पळतेही जोरात. हाच काय तो मला सुवर्णमध्य वाटला. बघा तुम्हाला काय जमतेय ते.

भस्सकन कुठुन गर्दी वाढली पाहायला आलतो.
=))

मदनबाण's picture

20 Dec 2014 - 1:08 pm | मदनबाण

मैलेज पटकन वाढले ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजा तू बन जा मेरा दादला... ;) { Vaishali Samant composed by Avadhoot Gupte }

चला एक सल्ला भावाकडे होंडा शाईन आहे.एकदम मस्का आहे.

माझा नंबर व्यनी करतो. त्याला येउदे.

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 12:17 pm | मुक्त विहारि

डन

जेपी's picture

20 Dec 2014 - 12:54 pm | जेपी

इथे जे सल्ले दिले आहेत त्यापेक्षा चांगला सल्ला देईन.पण त्यासाठी मला व्यनी करा.कुठलही चांगली गोष्ट फुकट नसते.

कळावे लोभ असावा.
आपला दोडका..हे चिडका..सॉरी लाडका.
-फायरहिट

ही लाईट स्पोर्टीणी पल्सरणी सुद्धा पहा... मी "मस्त रगडवतो" रोज अगदी भरपुर मनसोक्त ! ;) ६० पर्यंत देते... १२५ सीसी आणि १५० सीसी याचा सुवर्णमध्य असलेली ही १३५ सीसीची आहे. :)
फक्त जमल्यास मागचा टायर ट्युबलेस टाकुन घ्यावा. मी हल्लीच टाकला आहे, कारण पंक्चरचा शॉट डोक्याला बर्‍याच वेळा लागला आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजा तू बन जा मेरा दादला... ;) { Vaishali Samant composed by Avadhoot Gupte }

अनुप ढेरे's picture

20 Dec 2014 - 3:16 pm | अनुप ढेरे

याबद्दलच साण्गणार होतो.

ग्रेटथिंकर's picture

20 Dec 2014 - 2:25 pm | ग्रेटथिंकर

होंडा घ्या कोणतीही, युनिकॉर्न बेस्ट ,युगा पण चांगलीए.

इरसाल's picture

20 Dec 2014 - 3:34 pm | इरसाल

होंडा शाइन मस्त गाडी आहे २००७ पसुन वापरत आहे लै भारी.

नांदेडीअन's picture

20 Dec 2014 - 7:27 pm | नांदेडीअन

गेल्या महिन्याभरापासून मीसुद्धा हाच विचार करतोय.
लहान भावासाठी घ्यायची आहे.

Suzuki Gixxer चा बराच बोलबाला सुरू आहे सध्या.
या रेंजमध्ये असलेली Yamaha FZS ची मक्तेदारी मोडून काढली आहे Gixxer ने.

गेल्या आठवड्यात दोन नवीन गाड्या लॉंच झाल्यात.
Hero Xtreme Sports आणि Honda Unicorn 160
दोन्ही गाड्या चांगल्या आहेत.

महिनाभर गुगलवर रिसर्च करून सध्या Gixxer आणि Unicorn वर येऊन गाडी अडकली आहे.

Unicorn चे मायलेज थोडेसे जास्त आहे Gixxer पेक्षा.
पण बाकी सगळ्या बाबतीत Gixxer वरचढ आहे.

श्रीरंग_जोशी's picture

20 Dec 2014 - 8:18 pm | श्रीरंग_जोशी

नऊ वर्षांपूर्वी मी माझी पहिली बाइक विकत घेतली होती - होंडा युनिकॉर्न. अजूनही व्यवस्थित चालत आहे सव्वा लाख किमीहून अधिक चालली असावी.

अवांतर - भारतातील दुचाकी ड्रायव्हिंग या प्रकारात बेदरकारपणे गाडी चालवण्याला रूढ करण्यामागे बजाज पल्सरचा सिंहाचा वाटा आहे असे माझे निरीक्षण आहे.

अवतार's picture

20 Dec 2014 - 11:19 pm | अवतार

बेदरकारपणे गाडी चालवण्याला रूढ करण्यामागे बजाज पल्सरचा सिंहाचा वाटा आहे

सत्यवचन ! माझ्या पल्सरवाल्या मित्रांचेच जास्त अपघात झाले आहेत.

टवाळ कार्टा's picture

21 Dec 2014 - 11:58 am | टवाळ कार्टा

अपघात चालवणार्यांच्या चुकीने होतात बाईकमुळे नाही

खटपट्या's picture

21 Dec 2014 - 2:22 pm | खटपट्या

हे बरोबरे !!

---गेली १० वर्षे पल्सर चालवणारा

धर्मराजमुटके's picture

20 Dec 2014 - 10:19 pm | धर्मराजमुटके

ह्या ! ह्या ! आमी सांगणार, आणि ते तुम्ही ऐकणार ? आणि तुम्ही ऐकलं तरी तुमचा मुलगा तुमचं ऐकणार ? मुवी तुस्सी ग्रेट हो ! :)
या जगात कोणी सांगून शिकवून शहाणा होत नसतो. शिवाय जेव्हा दिल आ गया गधी पे तो परी क्या चीज है म्हणत झक मारत मुलगा सांगतो तीच बाईक तुम्ही त्याला घेऊन देणार.
बाईक घेतल्यावर नक्की कळवा.

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 11:00 pm | मुक्त विहारि

"मुलगा सांगतो तीच बाईक तुम्ही त्याला घेऊन देणार."
सहमत...

बाइक आणि बायको, ज्याची त्याने निवडावी....

आणि खरं सांगायचे म्हणजे माझा, माझ्या दोन्ही मुलांच्या निर्णय क्षमतेवर विश्र्वास आहे.

काळा पहाड's picture

20 Dec 2014 - 11:13 pm | काळा पहाड

सुझूकी जी एस १५० आर.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Dec 2014 - 11:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

युनिकॉर्न घेउन टाका. पॉवर, मायलेज, स्पीड आणि रिलायबलिटी साठी अतिउत्तम. माझ्याकडे स्वतःकडे आहे (व्हायब्रंट स्पोर्टस ४५,००० कि.मी.) आणि गाडी अजुनही मक्खन आहे. बर्‍याच लांब लांब सहली केल्यात ह्या गाडीवर. मला सिटीमधे ५५ आणि हायवे ला ५७-६२ पर्यंत आरामात देते. शेल चं पेट्रोल टाकुन बघायचयं एकदा.
बजाज ची गाडी शक्यतो नको. नवीन असेपर्यंत चांगल्या चालतात. एकदा २-३ वर्ष झाली की गाडीचा खुळखुळा होतो (वापरण्यावर अवलंबुन आहे काही मित्रांच्या अजुन चांगल्या आहेत पण होंडा एवढ्या कंडीशन ला नाही).

मुक्त विहारि's picture

21 Dec 2014 - 1:50 am | मुक्त विहारि

ह्या https://www.youtube.com/watch?v=9PrvxCr1Vi0

बाइकच्या प्रेमात पडला आहे...

बादवे...

नविन होंडा युनिकॉर्न १६० सी.सी. कशी आहे?खाली लिंक देत आहे.

http://auto.ndtv.com/news/new-honda-unicorn-160cc-launching-on-december-...

विनोद१८'s picture

21 Dec 2014 - 8:09 am | विनोद१८

..होंडा युनिकोर्न १६० नक्कीच चांगली त्यापेक्षा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Dec 2014 - 9:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

युनिकॉर्न डोळे बंद करुन घ्या. पण गाडीला वेटींग असेल ह्या.

मुक्त विहारि's picture

21 Dec 2014 - 9:58 am | मुक्त विहारि

मुलाचा निर्णय अंतिम...

आणि तशीही अशा गोष्टीत घाई करण्यात जास्त अर्थ पण नसतो...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Dec 2014 - 10:21 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी खरं. त्याला आवडत असेल तर २०० पल्सर एन.एस. घेतलीत तरी चालेल. पण लाईफ लाँगॅटीव्हिटी आणि रिसेल व्हॅल्यु इल्ले!!!

मुलाला एखादी बुलेट चालवुन बघायला सांगा तसेच बुलेट ही पहिली प्रेयसी तर मागे बसणार्या अनेक मिळतील हेही सांगा. जरा पैसे जास्त लागतील पण मागे बसणार्यांची आयुष्यभराची बेगमी होईल. बघा विचार करुन !

टवाळ कार्टा's picture

21 Dec 2014 - 2:03 pm | टवाळ कार्टा

तो जमाना गेला...आजकालच्या पाखरांना बुलेट नाय पसंद

सुबोध खरे's picture

21 Dec 2014 - 10:35 pm | सुबोध खरे

माझ्याकडे युनिकोर्न आहे सात वर्षे जुनी. पहिली ब्याटरी आत्ता बदलली. सकाळी चालू व्हायला त्रास नाही. एकंदर ३ वेळा किक मारलेली आहे. दोन वेळा किक कशी ते चालते पाहण्यासाठी आणि एकदा ब्याटरी गेल्यामुळे. टफ अप तयार असल्याने सहजासहजी पंक्चर होत नाही. गाडी अतिशय उत्तम चालते. कोणताही झगमगाट नाही पण अजिबात कोणतीही कटकट न करता चालते.
सर्व्हिसिंग वर्षात एकदा जवळच्या तंत्रज्ञाकडेच करतो. पहिल्या फुकट सर्व्हीसिंग नंतर कंपनीकडे गेलो नाही. मुलाला माझ्याकडे पाठवा. त्याला गाडी चालवून पाहु द्या. आवडली तर निश्शंकपणे विकत घ्या.सात वर्षे जुनी गाडी जवळ जवळ कोणतीही देखभाल न करता गाडी कशी चालते ते पहा. १५ वर्षे विना तक्रार चालेल. फेब्रुवारी नंतर मुलाला द्यावी लागणार आहे( १८ वर्षाचा होतो आहे). अगोदर cd १०० होती १५ वर्षे आणि १. लाख च्या वर चालवून झाली. होंडा कंपनीची सर्व्हिस सेंटर भारतभर बेकार आहेत. पण मूळ वस्तू उत्तम आहे म्हणू निश्शंक पणे घ्या. इंजिनबद्दल होन्डाचा हात कोणीही धरू शकणार नाही. होंडा पसंत नसेल तर यामाहा घ्या
जी गाडी पसंत आहे ती पाचसात वर्षे जुनी गाडी चालवून पहा म्हणजे गाडी टिकायला आणि चालायला कशी आहे ते लक्षात येईल.

मुक्त विहारि's picture

21 Dec 2014 - 10:47 pm | मुक्त विहारि

"जी गाडी पसंत आहे ती पाचसात वर्षे जुनी गाडी चालवून पहा म्हणजे गाडी टिकायला आणि चालायला कशी आहे ते लक्षात येईल."

हा महत्वाचा मुद्दा लक्षांत आणून दिल्याबद्दल धन्यवाद..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Dec 2014 - 11:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१०००

सतिश गावडे's picture

21 Dec 2014 - 11:03 pm | सतिश गावडे

मग काय ठरलं? :)

मुक्त विहारि's picture

22 Dec 2014 - 12:23 am | मुक्त विहारि

बाइक त्यांची तेच निवडणार.आम्ही दिडक्या मोजणार.

तरूण रक्त पल्सरच्या मागे तर अनुभवी माणसे होंडाला प्राधान्य देत आहेत.

माझा कल पण होंडाकडेच आहे.

आणि मुलाचा कल पल्सरकडे आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Dec 2014 - 1:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तरुण आणि अनुभवी अशी एक कॉमन कॅटेगरी टाका ओ...उगीच अनुभवी म्हणल्यावर डोक्यावर चंदेरी छटा आल्याचा आणि छप्पर अर्धवट उडाल्याचा भास झाला =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Dec 2014 - 1:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तरुण आणि अनुभवी अशी एक कॉमन कॅटेगरी टाका ओ...उगीच अनुभवी म्हणल्यावर डोक्यावर चंदेरी छटा आल्याचा आणि छप्पर अर्धवट उडाल्याचा भास झाला =))

मदनबाण's picture

22 Dec 2014 - 1:52 pm | मदनबाण

गीच अनुभवी म्हणल्यावर डोक्यावर चंदेरी छटा आल्याचा आणि छप्पर अर्धवट उडाल्याचा भास झाला
याचा मला समजलेला अर्थ जर डोक्यावर चंद्र म्हणजे डोक्यावरचे उडलेले केस असा असेल तर... पाखरामच्या कोड-वर्ड भाषेत या स्थितीला "चिवड्यात लाडू" असे संबोधले जाते. { इति पाखरु गुजगोष्टी शब्दकोष व्हर्जन १.०१ विथ अपडेट } ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 1:55 pm | टवाळ कार्टा

+१११११११११

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Dec 2014 - 4:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=)) =))

श्रीरंग_जोशी's picture

22 Dec 2014 - 6:52 pm | श्रीरंग_जोशी

पहिली गाडी (युनिकॉर्न) २३व्या वर्षी घेतलेला...

--(अनुभवी) रंगा

मदनबाण's picture

22 Dec 2014 - 11:09 am | मदनबाण

मुलाचा कल पल्सरकडे आहे.
असणारच ! कारण पल्सरचा फिलच तसा आहे ! ;) आणि परफॉर्मन्स सुद्धा. २०० सीसी बाईक ३०-३५ च्या पुढे अ‍ॅव्हरेज देणार नाही हे मात्र लक्षात असुध्या.
रिसेल व्हॅलू होंडाला अधीक आहे...मात्र सध्या मुलांचा कल हा पल्सर आणि यामाहाच्या एफझी आणि त्या श्रेणीतल्या बाईक कडेच असलेला दिसतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

योगेश पाडेकर's picture

22 Dec 2014 - 12:14 pm | योगेश पाडेकर

दिसायलाही छान आणि पळायलाही...

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Dec 2014 - 3:26 pm | राजेंद्र मेहेंदळे

बजाज डिस्कवर१२५ टी १ वर्षापासुन वापरतोय. ६०+ अ‍ॅव्हरेज मिळतेय. साधारण १ रुपया किलोमीटर (सध्याच्या भावाने)
त्या आधी १२ वर्षे ४एस चँपियन वापरलीये.

तुषार काळभोर's picture

22 Dec 2014 - 5:51 pm | तुषार काळभोर

की तुम्ही डीझेलवर गाडी नाही चालवत?
७२-७३ रु प्रती लिटर पेट्रोलचा भाव आहे. ६०-६२च्या अ‍ॅवरेजने अंदाजे १.२०रु/किमी इंधनाचा खर्च होईल.

(हलके घ्या.इथे २०% फरक आहे. वरती १०%च्या फरकाने ड्रीम युगा/निओ या १००सीसी क्याटेगरीतल्या नसल्याचा दाखला तुम्ही दिला होता, म्हणून फक्त....)

योगेश पाडेकर's picture

23 Dec 2014 - 11:15 am | योगेश पाडेकर

डिसकवर ऑ़़के आहे

पल्सर वैग्रे देखावाच जास्ती आहे. पर्फॉर्मन्स जबर्‍या पाहिजे तर आमची एकशृंगिणी अर्थात युनिकॉर्नच सर्वांत बेष्ट.

गेले चार एक वर्ष वापरतोय.. ऐसपैस.. लांबसडक.. उंच असेल मुलगा तर मस्तच.. सगळ्याच बाबतीत उत्तम.. (फक्त एकच उणीव.. सीट जास्तच मोठी आहे.. चिकटून बसणे अवघड.. ) ;)
चालवून पाहायची असेल तर व्यनि करुन केव्हाही पाषाण/ बाणेरला या..
सेकंडहँड अगदी ओळखीच्यात असल्याशिवाय घेऊ नका (अपघात असल्याशिवाय शक्यतो कुणी युनिकॉर्न विकत नाही असा अनुभव) पण एखादा ऑनसाईटला जात असेल असा मिळाला तर आयटी कंपन्यांच्या नोटीसबोर्डवर बघता येईल..
काळीभोर किंवा चंदेरी रंगातली (चांदी) युनिकॉर्न लयी भारी..
- चांदीच्या प्रेमातला (उपास)

बापू नारू's picture

22 Dec 2014 - 12:40 pm | बापू नारू

Avenger नको ,
Average ३०-३५ आणि maintenance जास्त आहे..
गाडी सामान्यांना न परवडणारी आहे..

कपिलमुनी's picture

22 Dec 2014 - 1:24 pm | कपिलमुनी

१५० सीसी सेगमेंट - ७० - ८० ,०००

१. युनिकॉर्न
२. सीबीझी अक्सट्रीम
३. सुझुकी गी एस आर
४. यामाहा एस झेड
५. पल्सर
६.अपाचे १६०
---------------------
१८० ते २२५ सीसी

१. करीझ्मा ( नवीन लूक बर्याच जणांना आवडला नाहिये , पण इंजिनच्या बाबतीत अजुनही करीझ्मा) ..९०,०००-९५०००
२. पल्सर २२० - ९०,०००

३. पल्सर २०० एन एस - थेरॉटॅकली खुप चांगली पण टीम बीएचपी, एक्स बीच्पी कडून आणी इतर चालवणर्‍यांकडून ठीक ठीक असेच रीव्यू आहेत. जास्त फायबरचा वापर आणि हाय मेंतनन्न्स !

४. अपाचे १८० . : कमी उंची हा मोठा ड्रॉबॅक आहे
५. पल्सर १८० : मस्त गाडी पण आता जुनी मॉडेल , कॉमन वाटते म्हणून बरेच जण टाळतात.
०------------------------------------------------------------------------------०

वेल्लाभट's picture

22 Dec 2014 - 2:58 pm | वेल्लाभट

जेपी म्हणाल्याप्रमाणे होन्डा शाईन.... नो नॉनसेन्स.
किंवा योगेश म्हणाल्याप्रमाणे बजाज डिस्कवर.... पुन्हा नो नॉनसेन्स.
सेन्सिबल नॉनसेन्स हवा असेल तर टिव्हीएस अपाची/चे काय म्हणतात ते. किंवा पल्सर अथवा युनिकॉर्न.
बाकी सुझुकी जीएस१५०, जिक्सर, यामाहा एफझी वगैरे आहेत. जिसकी जैसी पसंद !

आणखी एक सत्यनारायण /उद्यापन होणार असं दिसतंय.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Dec 2014 - 3:30 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बजाजची घ्यावीस.
(जाड चष्मा असल्याने बाईक मधला 'क' चुकुन वाचयचा राहिला."रोजचा प्रवास'वाचल्याने मग कळले).

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 3:34 pm | टवाळ कार्टा

चायला "विषय" कुठल्या कुठे घेउन गेला =))

जाड चष्मा असल्याने बाईक मधला 'क' चुकुन वाचयचा राहिला."रोजचा प्रवास'वाचल्याने मग कळले
हो का.... तो पर्यंत माई तुमचा पल्स रेट सुद्धा वाढला असेल नै ? :P

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Dec 2014 - 5:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

सातबारा's picture

22 Dec 2014 - 5:05 pm | सातबारा

१५० सीसी युनिकॉर्न चेच इंजिन, फक्त डबल शॉकॉब्स्रर्बर ची, पॉवर इ. टकाटक. फारशी प्रचलित नाही म्हणून कोणाला माहीत नाही.

सायकलची माहिती असलेला धागा कोनता ?