शालेय निबंध लेखन कसे करावे ?

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
5 Oct 2014 - 10:30 am
गाभा: 

निबंधलेखन कसे करावे

---------------------------

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच ssc board च्या दहावी पर्यंतच्या मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या अभ्यासक्रमात निबंध लेखन हा महत्वाचा भाग आहे. आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांकडून सर्वाधीक शोध कशाचा/कशासाठी घेतला जात असेल तर तो निबंध लेखना साठी.

हे खरयं की यातील काही विद्यार्थी नकलवण्यासाठी ही निबंध आंतरजालावर शोधत असतील पण बराच मोठा वर्ग निबंध लेखन शैली आणि निबंधाच्या विषया संदर्भाने मुद्दे गोळा करण्यासही आलेला असतो. अर्थात शालेय विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक आंतरजालावर स्वतः फार कमी लेखन करतात.

आपल्या मध्ये काही जण शालेय विद्यार्थ्याचे पालक असतील, काही जण शिक्षक असू शकतील तर निबंध लेखन कसे करावे ? आणि काही विषयावरील सोदाहरण निबंध लेखन या धाग्याच्या निमीत्ताने मिळू शकल्यास विद्यार्थ्यांचाही फायदा होईल आणि महाराष्ट्रीय विद्यार्थी वर्ग मराठी संकेतस्थळांशी जरासा जोडला जाऊ शकेल असे वाटते म्हणून आपणा सर्वांना निबंध लेखन या बद्दल मार्गदर्शन आणि सहकार्याची विनंती आहे.

*या धाग्यावरील लेखन विकिप्रकल्पांसाठी मुख्यत्वे मराठी विकिबुक्स (पाठ्य) प्रकल्पासाठी वापरला जाण्याची शक्यता असू शकेल म्हणून आपले लेखन प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जाईल.

* शुद्धलेखन विषयक अवांतर चर्चा या धाग्यात टाळून विकिबुक्स प्रकल्पात शुद्धलेखन विषयक लेखन आणि साहाय्य पुरवणे अधिक ऊपयूक्त ठरू शकेल. अनुषंगिक अवांतरा व्यतरीक्त इतर अवांतर चर्चा टाळण्यासाठी धन्यवाद.

* आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

5 Oct 2014 - 11:04 am | पिवळा डांबिस

प्रस्तुत धागाकर्त्याचेच धागे नित्यनियमाने वाचावेत!!!
काय मिपाकरांनो?
:)

आदूबाळ's picture

5 Oct 2014 - 11:42 am | आदूबाळ

;)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Oct 2014 - 11:53 am | माईसाहेब कुरसूंदीकर

नावाचा ड्यांबिस आहेस.

माम्लेदारचा पन्खा's picture

5 Oct 2014 - 12:11 pm | माम्लेदारचा पन्खा

हे धागे हे फक्त शालेय निबंधलेखनाच्याच दर्जाचे आहेत ?

काउबॉय's picture

5 Oct 2014 - 12:14 pm | काउबॉय

निबन्धलिखाणाच्या फोर्म्याट मधे आहे.

माहितगार's picture

5 Oct 2014 - 3:07 pm | माहितगार

विकिपीडिया ज्ञानकोश आहे. निबंध हे ज्ञानकोशीय फॉर्मॅटला जवळ असले तरी संशोधनपर निबंधाचा अपवाद वगळता चित्ताकर्षक, लक्षवेधक, वर्णनात्मक, आलंकारीक, रंजक लेखनासाठी अथवा लालीत्यपूर्ण लेखनाचही स्वातंत्र्य जे ज्ञानकोशीय लेखनात नसते ते निबंध लेखनात खूप आधीक उपलब्ध असते.

संशोधनपर निबंधाचा फॉर्मॅट ज्ञानकोशीय लेखनास सगळ्यात जवळचा मुख्य फरक म्हणजे इतर निबंधा प्रमाणेच संशोधनपर निबंधात व्यक्तीगत निष्कर्षांची/मतांची मांडणी करता येते. ज्ञानकोशीय लेखनात सहसा इतरांच्या लेखनाचे संदर्भ देत मांडणी करावयाची असते आणि स्वतःचे व्यक्तीगत मते अथवा व्यक्तीगत निष्कर्ष शक्यतोवर टाळायचे असतात.

इंग्रजी माध्यमाची मुल इंग्रजी विकिपीडियातून बर्‍याचदा कॉपीपेस्ट मारतात आणि वेळ मारून नेतात; पण विकिपीडियाचा फॉर्मॅट खरे म्हणजे शालेल्य निबंध लेखनाच्या फॉर्मॅटशी पूर्णत्वाने जुळत नाही. शालेय निबंध लेखनात विचार आणि लेखन करण्याचे प्रशिक्षण घेण्याची सर्वोत्तम संधी असते मात्र का कोण जाणे बरेच विद्यार्थी ही संधी केवळ नकला मारून दवडतात असे वाटते. (यात माझ्या पाल्यांचाही समावेश आहे)

पिवळा डांबिस's picture

5 Oct 2014 - 12:14 pm | पिवळा डांबिस

होय.

माहितगार's picture

5 Oct 2014 - 1:02 pm | माहितगार

मिपाबंध आहे

माहितगार's picture

5 Oct 2014 - 1:16 pm | माहितगार

हॉटेलात १२ माणस होती त्यात्यल्या ५ जणांच्ये प्रतिसाद; म्हणजे लय भारी प्रतिसाद रेशो झाला की हा :) सर्वांना मनमोकळ्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

माम्लेदारचा पन्खा's picture

5 Oct 2014 - 1:47 pm | माम्लेदारचा पन्खा

याचिसाठी केला होता अट्टाहास !

शालेय विद्यार्थी मिपाशेतात काही ज्ञानकण टिपण्यास आले आहेत -फारच सुंदर दृष्यकल्पनाविलास.

विकिपीडियावर दिवसागणिक ह्या किंवा त्या निबंधाच्या मागण्या होत असतात तशा मिपावर अद्याप मी तरी पाहिल्या नाहीत. गूगल कुणाला कुठे पाठवेल काय सांगता येते.

धागा लेखकाचा दृष्यकल्पनाविलास 'शालेय विद्यार्थी मिपाशेतात काही ज्ञानकण टिपण्यास आले आहेत' असा मूळीच नै. त्यांचे पालक मिपाशेतात पडीक असल्यास त्यांना त्यांच्या पाल्यांसाठी उपयूक्त उपक्रमात सहभागी करून घेणे हा मुख्य उद्देश.

पैसा's picture

5 Oct 2014 - 4:20 pm | पैसा

म्हणजे ही मुलं तयार निबंध आंतरजालावर शोधत असतात की काय? असे कॉपी पेस्ट केलेले निबंध परीक्षेत कसे उपयोगी पडणार?

माहितगार's picture

5 Oct 2014 - 5:31 pm | माहितगार

हम्म... काय करणार ? माझ्या घरात समजा वैज्ञानिकांविषयी पुरेशी पुस्तक आहेत मुल ती पुस्तक वाचतात पण निबंध अथवा प्रॉजेक्टसाठी चक्क आंतरजालाचाच हट्ट असतो. टिचरला इम्प्रेस करण्यासाठी बाह्य डेकोरेशन प्रॉजेक्टला चमकी बॉर्डर हि कामे मन लावून होतात. ज्यांच्या घरी इंटरनेट नाय ती मूल इंटरनेट असलेल्या मित्र मैत्रिणींच साहाय्य बिनधास्त घेत असतात.

अपवादानेच एखादा पालक पुस्तक वाचनाची सवय जोडण्यात यशस्वी होतो. अमुक तमूक विषयाबद्दल निंबंध हवेत हि मराठी विकिपीडियावर मागणी नित्य नेमाने येत असे असते एवढी वर्षे अशा मागण्याही इतर उत्पातांसोबत वगळल्या जात असं हि मागणी विद्यार्थ्यांकडून येते आहे. खास करून ऑगस्ट हा फेवराइट महिना असतो आणि मराठी विकिपीडियावरील निबंध या लेखास हे विद्यार्थी सर्वाधिक पोहोचतात दुर्दैवाने त्या लेखात इंग्रजी विकिपीडियातन डकवलेला एक इंग्रजी लेख आहे. एवढ्या वर्षात निबंध या विषयाच्या लेखास एवढ्या भेटी देऊन एकाही विद्यार्थ्याने लेखात एक वाक्यही लिहिण्याची किंवा लेखातील एखादे वाक्य अनुवादीत करण्याचे जराशी तसदी सुद्धा घेतली नाही.

पैसा's picture

5 Oct 2014 - 6:51 pm | पैसा

आईबापच मुलांना सगळे तयार आणून देण्यासाठी बरेचदा जबाबदार असतात. मुलांना वाचायची सवय लावणे किंवा विचार करायची सवय लावणे यापेक्षा परीक्षेसाठी तयार केले जाते. आंतरजालावर, मुख्यतः फेसबुक आणि ट्विटरवर, लिहिणार्‍या या मुलांचे इंग्रजी/मराठी शुद्धलेखन हा आणखीच मोठ्या चर्चेचा विषय होईल.

जेपी's picture

5 Oct 2014 - 4:51 pm | जेपी

पैसाताई,आता इंग्रजी माध्यमातील मुल निंबंध आणी प्रोजेक्ट रिपोर्टसाठी हमखास गुगलतात किंवा विकीचा वापर करतात.
कहर मंजे हे करण्यासाठी त्यांचे पालकच पुढाकार घेऊन मदत करतात.

पैसा's picture

5 Oct 2014 - 6:48 pm | पैसा

लातूर पॅटर्नबद्दल जास्त वाचायला आवडेल.

लातुर पॅटर्न सध्या तरी संपलाय. आता क्लासेसचे पेव फुटलय.मागील पाचवर्षात पोर कालेजात जाण्यापेक्षा ट्युशन ला हजर राहतात.
सकाळी 7 ते संध्या. 7 शिकवणीत जाणारे पोरपोरी जास्त आहेत.

कंजूस's picture

5 Oct 2014 - 7:24 pm | कंजूस

परीक्षा हे एक तंत्र आहे.तीन तासांत पंधरा गुणांसाठी एक निबंध अर्ध्या तासात लिहायचा असतो.विद्यार्थी दिलेल्या विषयावर विचार करत बसेल तर तो निबंध पूर्ण होणार नाही.
काही संभाव्य विषयांची (१)अगोदर माहिती गोळा करून ठेवणे हाच पर्याय उरतो. नंतर ऐनवेळी विषयाचा रोख(२) पाहून त्याला मध्यवर्ती ठेवून आपल्याकडची माहिती सुसंगत(३) मांडत जायचे हे तंत्र आत्मसात करायचे.

निबंधाचा आराखडा ही एक लेखनाची सर्वमान्य पध्दत स्विकारलेली असते आणि त्याचक्रमाने विदयार्थ्याँनी जावे अशी परिक्षकांची अपेक्षा असते. यात (अ)सुरुवात अथवा मूळ विषयाकडे वाचकाला नेणे.(ब) गाभा अथवा विषयाला धरून माहिती लिहिणे.कमीतकमी तीन मुद्दे असावेत.अगदी कालपरवाच्या एखाद्या घटनेचा उल्लेख करून जिवंतपणा आणावा आणि आपला चौकसपणा दाखवावा.(क)समारोपात पुढील संभाव्य आणि आशावादी मत देऊन इतरांना आवाहन करता येईल.

शैली ही काही एका दिवसात येणारी लेखनकला नाही परंतू नाट्यमय मांडणी,विरोधाभास, उपरोधिक,उपहास,विनोदी,अलंकारिक,संवादात्मक विचार इत्यादी प्रकारांचा काही चांगला वापर करता आला तर करावा.
आत्मप्रौढी मात्र टाळावी.
शुध्दलेखन हवेच.

पैसा's picture

5 Oct 2014 - 7:29 pm | पैसा

एखादा नमुना इथे देऊ शकाल का? किंवा असे स्टॉक निबंध (मराठीत लिहिलेले) आंतरजालावर उपलब्ध आहेत का?

माहितगार's picture

6 Oct 2014 - 12:26 am | माहितगार

श्री. कंजूसजी यांच्या साहाय्याने (खरेतर त्यांच्या उदार अंतःकरणानेच) अत्यंत चांगले काम तडीस जाते आहे. "...मराठीचे लेखन आंतरजालावर वाढले आहे. तिथेही तयार साहित्य असणारच. खरोखर हे उपयोगाचे आहे का? चांगले लेखकच इथे लिहितात असे समजू नये.ही माध्यमे ज्यांना जमली आहेत ते लिहितात असे म्हणता येईल. .......विद्यार्थ्याचे वय आणि विचार त्याच्या लेखनात दिसायला हवेत. तयार निबंधातून ठोकळेवजा बोजड लिखाण लिहिले जाण्याची शक्यता जास्त. पेपरांतून युवा सदर असते त्यातून चांगली माहिती संकलित करावी. तयार निबंध कधीही पाठ करून लिहू नयेत." हे श्री. कंजूसजी यांचे शब्द त्यांच्याच शब्दात मुलांना भावेल असे वाटते.
त्यांचे हे शब्द मी कितीही बदल करून लिहिले तरीही ते असा परिणाम (विद्यार्थ्यांशी संवाद) साधू शकणार नाहीत आणि विकि संबंधीत धाग्यांखाली प्रताधिकार मुक्त होत आहेत हे लिहिण्याचा मुख्य उद्देश हा असा सफल होऊ शकतो.

विद्यार्थ्याचे वय आणि विचार त्याच्या लेखनात दिसायला हवेत.

या कसोटीवर आमच्या पाल्याचे अलिकडे काही मार्क शाळा शिक्षकांनी कापून आमचे या विषयाकडे लक्ष वेधले. अवांतर वाचन कमी पडत असावे हे एक कारण असू शकेल पण विद्यार्थ्याचे वय आणि विचार त्याच्या लेखनात दिसताहेत अथवा नाही हे पालकांना कसे ताडता येईल आणि पालक या संदर्भाने अधिक काय काय करू शकतील असेही मार्गदर्शन मिळाल्यास आनंद होईल.

सोबतच पै ताई म्हणतात तसे अगदीच जसाच्या तसा निबंध तर स्वागत असेल, सोबतच मराठी संकेतस्थळे किंवा ब्लॉगवरील शालेय विद्यार्थ्यांनी निबंधांच्या दृष्टीने दखल घेण्या जोगे काही निबंध वजा लेखन आढळल्यास अशा दुव्यांकडेही
लक्ष वेधता आल्यास आभारी असेन.

विकिबुक्सवर श्री कंजूसजी यांच्या प्रतिसादाचा संदर्भ देऊन निबंध लेखन कसे करावे ? लेख चालू केला आहे. संदर्भ देताना सहसा लेखकाचे नाव/टोपण नाव ही नमूद करण्याची प्रथा असते पण विद्यार्थ्यांचे मुख्य विषयाकडून लक्ष विचलीत होण्याची शक्यता तूर्तास नको म्हणून तूर्तास आपले (कंजूसजींचे) टोपण नाव विकिबुक्सवरील संदर्भात नमूद करणे टाळत आहे. गैरसमज नसावा हि विनंती.

लेखनसाहित्य आणि विस्तार.निबंध लिहिण्यासाठी काय हवे आहे त्या विषयी आता एकेक मुद्दा पाहू.

पुस्तकांच्या दुकानांत निबंधांची वेगळी पुस्तके मिळतात काही निबंध 'गाइड'मध्येही असतात.मराठीचे लेखन आंतरजालावर वाढले आहे.तिथेही तयार साहित्य असणारच.खरोखर हे उपयोगाचे आहे का?चांगले लेखकच इथे लिहितात असे समजू नये.ही माध्यमे ज्यांना जमली आहेत ते लिहितात असे म्हणता येईल.प्रसार माध्यमांत वर्तमानपत्रांचा क्रमांक वरचा आहे.इथेच सापडतील निबंधांचे संभाव्य विषय आणि माहिती.

१)आजचे खेळाचे स्वरूप,
२)निवडणूका,
३)लैंगिक शिक्षण असावे का?
४)वाढता दहशतवाद,
५)पर्यावरणाची जबाबदारी,
६)प्रसारमाध्यमे आणि करमणूक,
हे विषय दहावीसाठी असले तरी आठवीपर्यँत त्यांचा रोख बदलेल.माझा आवडता खेळ,चित्रपट,सण ,विस्मरणिय सहल,आमचे शहर इत्यादी.

विद्यार्थ्याचे वय आणि विचार त्याच्या लेखनात दिसायला हवेत.तयार निबंधातून ठोकळेवजा बोजड लिखाण लिहिले जाण्याची शक्यता जास्त.पेपरांतून युवा सदर असते त्यातून चांगली माहिती संकलित करावी.तयार निबंध कधीही पाठ करून लिहू नयेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Oct 2014 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. नि+बन्ध+ बांधणे असा अर्थ विचराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते,

निबंध म्हण्जे नियमांनी बद्ध असणारा लेख, मोठा लेख, नीटपणे मांडलेला विचार, वेगवेगळ्या परिच्छदातून विविध बाजू निबंधात मांडलेला असतात. निबंध हा लिहिण्याचा प्रयत्न असतो तेव्हा व्यवस्थित सुरुवात प्रयत्नपूर्वक विषय मांडणे हाच निबंधाचा उद्देश असतो. निबंधाचे दोन प्रकार १) माह्तीवजा निबंध आणि २) प्रबोधनासाठी लिहिलेले निबंध.

पहिल्या प्रकारातील निबंध शालेय पातळीवरचा माहितीवजा निबंध असतो तर दुस-या प्रकारचा निबंध हा शिक्षित व्यक्तींना बहुश्रुत करण्यासाठी लिहिला गेलेला निबंध असतो.

निबंध या शब्दाचा अर्थ सांगतांना मो.रा.वाळंबे म्हणतात ''निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, असा आहे.निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणार्‍या विचारांची. एखाद विषय निबंधलेखनाला दिला, की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात, पण ते सारेच विचार दुसर्‍याला सांगण्यासारखे असतात असे नाही, शिवाय सुचणारे विचार खुप विस्कळीत असतात, हे असे सुचणारे विचार आपण एकत्रीत करतो.''

निबंधाचे स्थूलमानाने पाच प्रकार मानल्या जातात. १) वर्णनात्मक, २)कथनात्मक,३) चिंतनात्मक, ४)कल्पनात्मक, ५) चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक.

असो, सर्व प्रकारात मुलांना प्रत्येक निबंधात काय करायचं आहे ते सांगितलं पाहिजे. आकर्षक सुरुवात. व्यवस्थित मांडणी, भाषा, वाचकांना लावणारी उत्सुकता निबंधात असली पाहिजे, उत्तम सुरुवात, विषयाची मांडणी आणि योग्य समारोप तुमचा निबंध उत्तम ठरवतो.

-दिलीप बिरुटे

तुम्ही आठवण करुन दिली राव ,मी १ ली ते १२ वी एकाही पेपरमध्ये शाळेत कधी निबंधच लिहिला नाही,साला पहिलाच पेपर मराठीचा लिहुन लिहुन हात इतका दुखायला सुरवात करायचा की परत २-३ पानांचा निबंध लिहिण्याचा विचारच करु शकलो नाही.हा तरी पण १२ वीला मराठीला ८५ मार्कांचे लिहुन ७२ पडले,अगदीच वाईट नव्हते.
असो माझ्या लेकीही माझ्या पेक्षा अवली असल्याने त्याही शाळेत या विषयाच काय करतील हे फारस अपेक्षित नाही.

पाटील साहेब आपल्या मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभारी आहे. बिरुटे सर वगैरे शिक्षण क्षेत्रातच काम करणार्‍या व्यक्तींचा दृष्टीकोण माहीत नाही तो ते मांडतीलच.

माझ्या दृष्टीने निबंध लेखन हि केवळ लेखन कौशल्याचीच परिक्षा नाही तर व्यक्तीच्या परिपक्वतेचा संबंध बहुश्रूततेशी असावा त्याचीही परिक्षा या निमीत्ताने होत असते. प्रत्यक्ष व्यक्तीगत कारकिर्द पारपाडताना खासकरून निर्णयक्षमतेचा वापरकरण्यासाठी बहुश्रूतता असंख्य क्षेत्रात अवश्यंभावी असते. प्रत्यक्ष नसला तरी करिअरच्या प्रगतीतील काही भागावर बहुश्रूतता असणे आणि नसणे याने, तसेच लेखन आणि संवाद, स्वतःस व्यक्त होण्यासाठी या कौशल्याने फरक पडतो.
महाविद्यालयीन स्तरावर खास करून संशोधन करताना लागणार्‍या प्रबंध लेखनातही विद्यार्थी मागे पडावयास लागतात.

मराठी संस्थळावर अनेक लोक व्यवस्थीत आपली मते वेळे मांडू शकत नाहीत वाचणार्‍यांच्या आणि लिहिणार्‍यांच्या संख्येत पडणार्‍या फरका मागे हे एक कारण शक्य आहे. त्या शिवाय समस्यांबद्दल आणि न पटलेल्या गोष्टींबाबत वेळीच सुविहीत पद्धतीने संवाद पार न पडल्यास केवळ लेखन कौशल्याच्या अभावाने राग मनात अधिक काळ खदखदतो आणि तो अभिप्रेत नसलेया पद्धतीनेही उद्रेकीत होताना दिसतो. त्यामुळे सामाजिक दृष्ट्याही लेखन कौशल्य मह्त्वाचे असे माझे व्यक्तीगत मत आहे. .

काही अंशी काही कौशल्ये व्यक्तीत अंगभूत असतात पण सुयोग्य प्रशिक्षणाची साथ असेल तर ती निखरून उठू शकतात असे वाटते आणि म्हणून निबंध लेखनाच्या कौशल्याच्या विकासाबाबत दुर्लक्ष असो अथवा टाळा टाळ पुरेसे श्रेयस्कर वाटत नाही.

मनमोकळ्या प्रतिसादासाठी पुनश्च धन्यवाद

माहितगार's picture

6 Oct 2014 - 2:50 pm | माहितगार

आंतरजाल चाळतोय राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुद्धा निबंध लेखन हा महत्वाचा भाग असावा असे दिसते. संदर्भ

निबंध फार फार महत्वाचा आहे किंवा त्यावरच तुमची निवड अवंबुन असते,कारण येथे स्कोर केला की अर्धे काम होवुन जाते. इव्हन तुम्ही इतर ठिकाणी जेथे संभाषन कौशल्य अपेक्षित आहे तिथेही निबंधाचाच वैचारिक पाया गरजेचा असतो.अन्यथा त्या संभाषणाची पोपटपंची होते.

कंजूस's picture

6 Oct 2014 - 8:51 pm | कंजूस

ब्रिटिशकाळांत या अधिकारीवर्गाँस धोरण ठरवण्याचे आणि अमलात आणण्याचे पूर्ण समर्थ्य होते ते आता कुठे आहे ?यांनी निबंधात लिहिलेल्या मुद्यांचे निरूपण आणि स्पष्टीकरणाची मागणी मुलाखतीत कशाला करतात ?उदा० महाराष्ट्रपर्यटन खात्याचा चांगला आराखडा निबंधात मांडला आहे .प्रत्यक्षात तो परिक्षार्थी अधिकारी झाल्यावर यातली एकतरी गोष्ट स्वतंत्रपणे करू शकेल का?

लेखनसाहित्य संकलन (पुढे)

वर्तमानपत्रांत रोज एकातरी विषयावर लेख येत असतो तो उपयोगी वाटल्यास कात्रण ठेवा.१५ ऑगस्ट,२६ जानेवारी,निवडणुकांच्या निकाला नंतर,मंगळयान मोहीम,खेळांच्या वल्ड कप, फिफा इत्यादी मोठ्या स्पर्धा झाल्यावर खूप लेख येतात. या दिवशींची वर्तमानपत्रे जमवावीत या सर्वाँतून भरपूर लेखनसाहित्य जमा होईल.बऱ्याच शहरांत मेट्रो येणार आहे त्याबद्दल तरुणांच्या प्रतिक्रिया आल्या त्याही हव्यात.प्रसिध्द सिध्दहस्त लेखकांच्या पुस्तकांतील घोटीव लिखाणापेक्षाही ही कात्रणेच अधिक उपयोगी पडतील.

तुम्हाला क्रिकेटची आवड असली तरी थोडीफार फुटबॉल आणि प्रोकबड्डीचीही माहिती हाताशी ठेवावी लागेल. 'आजच्या खेळाचे बदलते स्वरूप' असा विषय आला तर फक्त क्रिकेटवर लिहिल्यास विषयाचा रोख समजला नाही असे वाटेल.निवडणुकांविषयी लेख जमा कराल त्याचवेळी 'मी पंतप्रधान झालो तर' असा काल्पनिक वळणाच्या विषयाला उचित असेही साहित्य तयार ठेवा.आंतरजालावर मंगळयानाची संपूर्ण माहिती मिळेल परंतू 'विज्ञानाच्या प्रगतीवर भारत' यासाठी गावातला तरूण कुठे आहे हेसुध्दा लिहावे लागेल.थोडक्यात माहिती गोळा करण्यात व्यापकता हवी.

कंजूस's picture

6 Oct 2014 - 6:50 pm | कंजूस

सुसंगत मांडणी

आता आपल्याकडे विषयानुरूप सर्व लेखनसाहित्य आहे आणि ते निबंधाच्या आराखड्यात वेळेत लिहून पूर्ण करायचे आहे.ते कसे ते पाहू.पंधरा गुणांसाठी पंचेचाळीस ओळी लिखाण अपेक्षित असेल.सात आठ ओळींचा परिच्छेद धरल्यास सुरुवातीचा आणि समारोपाचा एकेक सोडून मुख्य विषयाच्या विस्ताराकरता चार परिच्छेद होतील.

सरावासाठी प्रथम प्रत्येक परिच्छेदांत काय लिहायचे ते मांडून घ्या.एकदा लिहिण्यास सुरुवात केल्यावर खाडाखोड करता येत नाही आणि क्रम चुकल्यास सुसंगतपणा जातो .पाचसहा निबंधांचा अगोदर सराव करावा. परिक्षेच्यावेळी उत्तरपत्रिकेवरच एका ठिकाणी पेन्सलने क्रम लिहून घ्या.निबंध पूर्ण झाल्यावर खोडून टाका.एकूण सहा प्रश्नांपैकी निबंधाला दुसरे अथवा पाचवे स्थान देणे योग्य ठरेल असे वाटते.

निबंधलेखनाचे जे वैचारिक,विश्लेषणात्मक,वर्णन,काल्पनिक,माहितीपर वगैरे पाच सहा प्रकार आहेत त्यापैकी एक आपला प्रत्येकाचा सोपा आणि आवडीचा असतो तर इतर अवघड वाटतील.कधी निबंधाचा विस्तार करणे तर कधी तो आटोक्यात ठेवणे कठीण वाटेल.दोन्हीँचे तंत्र साध्य करायचे आहे.

विनायक प्रभू's picture

6 Oct 2014 - 10:19 pm | विनायक प्रभू

"मी बिरुटे सार असतो तर"
असा निबंध गुगलुन मिळेल ़काय?

हरकाम्या's picture

6 Oct 2014 - 11:42 pm | हरकाम्या

शालेय निबन्धात दोन बाबींचा अन्तर्भाव केला तर निबन्ध हमखास वाचनीय होतो व जास्त गूणही पदरात पडतात.
निबन्धात एखादे " सुभाषित " किंवा " कवितेचे कडवे " टाकले तर निबन्ध हा उत्तम होतो.मी शाळेत असताना
याच पध्दतीने निबन्ध लिहित असे . माझे निबन्ध शाळेच्या नोटीसबोर्डावर लावले जात.

कंजूस's picture

8 Oct 2014 - 12:24 am | कंजूस

शीर्षक आणि प्रस्तावना.

तुमच्या निबंधात तुम्ही कोणते विचार मांडणार आहात त्याची एक झलक दिसेल असे शिर्षक असावे.ते एखादे वाक्य अथवा प्रश्नार्थकही देऊ शकता.फार लांबलचक नको.अगदी लगेच वरच्या ओळीत ते पेन्सलने लिहा.निबंध पूर्ण लिहिल्यावर एखादे अधिक चांगले शीर्षक सुचल्यास ते बदलता येईल.

प्रस्तावना: विषयाची तोंड ओळख अथवा परिचय
वाचकास पहिल्या परिच्छेदातून करून द्यायचा आहे.पर्यावरणासाठीचा विषय असेल तर पहिल्या वाक्यापासूनच आकडेवारी देणे योग्य ठरणार नाही.
रेल्वेतून प्रवासाला जात होतो.प्रवाशांनी चहाचे प्लास्टिकचे कप खिडकीतून बाहेर फेकलेले पाहिले आणि पर्यावरणाचे विचार सुचत गेले अशी सुरुवात करून पुढे निबंध वाढवता येईल.
खेळाचा विषय असेल तर अमुक दिवशी वर्गात शिक्षक शिकवत होते पण त्यांच्या बोलण्याकडे तुमचे लक्ष लागत नव्हते कारण संध्याकाळी टिव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या वल्डकपचीच उत्सुकता होती.असे निरनिराळे प्रसंग अथवा घटनांचे वर्णन करून तुम्ही वाचकांस निबंधाच्या मूळ विषयाकडे वळवू शकता.
मासिके,साप्ताहिके आणि शनिवार -रविवारच्या वर्तमानपत्रांच्या लेखांतून बरीच चांगली उदाहरणे मिळतील.

कंजूस's picture

8 Oct 2014 - 12:31 am | कंजूस

निबंधाचा गाभा:

इथे तुम्हाला चार परिच्छेदांत माहिती,वर्णन,मुद्दे मांडता येतात.निबंध कसा लिहावा आणि त्याहीपेक्षा कसा लिहू नये यासाठीच्या सर्वाधिक सूचना याच विभागासाठी असतात.
तुमच्या भाषाविषयक ज्ञानाची खरी कसोटी इथे लागते.पाठ करून निबंध लिहिला असेल तर तो चांगला लिहिला गेलेला असतो परंतू परिक्षकाला एक गोष्ट लगेच जाणवते ती म्हणजे तुमच्या इतर उत्तरांत आणि निबंधात भाषा वेगळी वाटू लागते.ती तुमची वाटत नाही.एकूण उत्तरे यथातथाच असतील तर अशा निबंधासही चांगले गुण देण्याचा कल राहतो.परंतू तुमचे गुण ८५ च्या वर जात असतीलतर परिक्षक नकारात्मक विचार करून बारा गुण द्यावेसे वाटत असले तरीही काही चुका काढून अकराच देईल. अशा काही चुका टाळायच्या आहेत.
लागोपाठच्या दोन वाक्यात एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊ न देता त्याच अर्थाचा दुसरा शब्द येऊ द्या.म्हणी आणि वाक् -प्रचारांचा अतिरेक नको.आक्षेपार्ह टीकाटिप्पणी नको.माहिती देतांना एकसूरीपणा टाळण्यासाठी उद्गारवाचक अथवा प्रश्नार्थक वाक्ये लिहा.इंग्रजी शब्दही टाळावेत अथवा संवादात वापरावेत.एखादा श्लोक,कवितेची ओळ उधृत करा.

कंजूस's picture

8 Oct 2014 - 6:53 am | कंजूस

समारोप

आपण मुख्य निबंधात तीन चार मुद्दे आणि एखाददुसरे विरोधी वैयक्तिक मत मांडून लिहिले आहे.वाचकास विषयाबद्दल आस्था उत्पन्न केली आहे.अजून काही घडणाऱ्या वाईट गोष्टींची खोच,खंत त्या दूर झाल्या तर बरे वाटेल ती इथे थोडा आशावादी दृष्टिकोन ठेवून व्यक्त करता येईल.क्रिकेटच्या खेळातले होणारे मैच-फिक्सिँग बंद होऊन त्यातला आनंद कसा वाढेल, फुटबॉलमधली मुख्य खेळाडूला होणारी धक्काबुक्की याविषयी लिहिता येईल.
आणखी एक मुद्दा इथे आवर्जून येऊ शकतो तो म्हणजे वाचकास महत्त्व देऊन केलेले आवाहन.मी इथे लिहिलेले अंतिम नसून तुमच्याकडेही बरेच काही असल्याचा विश्वास व्यक्त करायचा,त्याला सहभागी करून घ्यायचे.यातून आपण एक साखळीक्रिया सुरू करायला चालना देतो.पर्यावरण,पर्यटन,स्त्रियांची सुरक्षितता,सार्वजनिक स्वच्छता,संस्कृतिची जपणूक यांविषयी वाचकास काही करता येण्यासारख्या गोष्टी इथे लिहिता येतील.
निबंधलेखनाच्या दोनदिवसांतल्या घटनांची,उदाहरणार्थ एखाद्या अपघातातले मदतकार्य वगैरेची चर्चा करून तुम्ही तो ठोकळेबाज जड वाटणारा निबंधसुध्दा एका क्षणांत 'तुमचा' करू शकता आणि परिक्षकाला 'तुमचा'च निबंध हवा आहे.

पैसा's picture

8 Oct 2014 - 10:16 am | पैसा

कंजूस यांचे सर्व प्रतिसाद आवडले. शाळेत असेच शिकवले होते. आकर्षक सुरुवात, विषयाची योग्य मांडणी आणि चांगला समारोप. शुद्धलेखन महत्त्वाचे आहेच. शिवाय कल्पना विस्तार किती शब्दात करणे आवश्यक आहे याचाही अंदाज घेऊन लिहिले पाहिजे. पण तेव्हा भाषा विषयात ८०-८५ मार्क्स म्हणजे खूप वाटायचे. आता मुलांना मराठी आणि इंग्लिशमधेही ९०-९५ गुण सहज मिळताना पाहून आश्चर्य वाटते. माझ्या ओळखीच्या सेंट्रल बोर्डाच्या शाळेत शिकणार्‍या काही मुलांना अगदी १२ वीत गणित आणि शास्त्रात ६५-७० गुण असताना हिंदी इंग्लिशमधे ९५ गुण मिळालेले पाहिले त्यामुळे जरा जास्तच आश्चर्य वाटलं. आता पेपर पॅटर्न बदलले असतीलच. पण निबंध तपासताना जरा सैल हाताने गुण दिले जातात का?

आता गुण काय, गुरुजी आणी विद्यार्थ्यांचे नातेच सैल झालय.

पूर्वी 'बोर्डात' मराठीत अधिक गुण मिळवणारी मुले दापोली अथवा वसईची असत. सविस्तर उत्तरे अपेक्षित असत. आता प्रश्नांची पध्दत कॉपी करण्यासाठी सुगम अशी करण्यात आली आहे. 'गाडी फलाटाला लावली' की दोन गुण द्यावेच लागतात.

आणखी एक नमुना: एक न पाहिलेला 'वेचा' /उतारा असायचा. त्याखाली चांगलेच अवघड प्रश्न असायचे. चौफेर वाचन, समज, जाण आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असल्याशिवाय इथे अर्धे गुण मिळवणेही दुरापास्त होते. अशी प्रश्नपत्रिका खिडकीतून बाहेर बसलेल्या 'तय्यार टीम'कडे पाठवली तरी वेळेत उत्तरे मिळणार नाहीत. पण आता 'मुलान्ला' 'त्रास' होतो म्हणून पाठ्यपुस्तकातलाच वेचा ? देतात. अशा संभाव्य वेच्यांची संभाव्य उत्तरे घेऊन टीम तयारच असते.
जाऊ द्या. दिवाळी अंकानंतर यावर एक धागाच काढू. उडु द्या धुरळा बोर्डाच्या परीक्षेपर्यंत.

अनन्न्या's picture

9 Oct 2014 - 5:05 pm | अनन्न्या

मी दहावीची पालक असल्याने यातील माहितीचा खूप चांगला उपयोग होईल. निबंध लेखनाचे साधारणपणे विषय पाठ्यपुस्तकातील पाठांशी निगडीत असू शकतात, असे गृहित धरून त्या आधारे मी मुलाशी विषयाबद्दल चर्चा करते. प्रत्येक विषयाशी निगडीत एखादी ताजी घटना त्याला सांगते. अशा माहितीचा उपयोग करून आपला मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडता येईल. वाचन कमी आहेच त्यामुळे शब्दांचा तुटवडा जाणवतो. पण अजून दोन-तीन महिने बाकी आहेत, या सुट्टीत मराठीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

माहितगार's picture

9 Oct 2014 - 5:48 pm | माहितगार

सोबतच निबंध लेखन कसे करावे ? हा लेख मराठी विकिबुक्स वर सुद्धा पाहून घ्यावा असे सुचवावेसे वाटते. त्यात ऐसी अक्षरे मधील धाग्यातील सुद्धा ऊपयूक्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः ऐसी वरील धनंजय यांनी निबंध सरावा साठी एक दोन उदाहरणे उपलब्ध केली आहेत त्यात मार्गदर्शक टिपा आहेत पण पूर्ण निबंध नाही.

अजून एक चांगली गोष्ट मिपा आणि ऐसी दोन्हीवरील मार्गदर्शकांनी अजून काही शंका असल्यास त्यांच्या निरसनाची सुद्धा तयारी ठेवली आहे. अर्थात प्रयत्न करणे आणि शंका विचारणे पाल्यांचे काम.

वाचन कमी आहेच त्यामुळे शब्दांचा तुटवडा जाणवतो

सहमत हे सर्वत्र आहे

माहितगार's picture

9 Oct 2014 - 5:52 pm | माहितगार

मराठी संकेतस्थळांनी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेतल्यास कितपत रिस्पॉन्स मिळेल असे वाटते ? खरे म्हणजे दहावीच्या ICT मध्ये मराठी युनिकोड टायपिंगची प्रात्यक्षीकाचे मार्क/किंवा ग्रेड सुद्धा आहेत त्यासाठी त्यांना जरासा फायदा ही होईल.

गूगल ट्रेंड्सच्या साहाय्याने मागे औरंगाबद, चिंचवड आणि मुंबईच्या लोकांना शिकायचय मराठी ! या मिपा धाग्यात लोक Learn Marathi चा शोध घेताहेत आणि कुठून घेताहेत इत्यादीची चर्चा केली होती.

आत्ता Marathi Essay हि टर्म गूगल ट्रेंड्सच्या साहाय्याने तपासली आणि त्याचेही रिझल्ट रोचक आहेत. संदर्भ: गूगल ट्रेंड्स १ एक तर गेली पाच वर्षे Marathi Essay शोध वाढतो आहे. खास करून जुलै, सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यात हा शोध वाढताना दिसतो. हा शोध जास्त करून उल्हासनगर, येथून सर्वाधिक त्या खालोखाल कोल्हापूर आणि औरंगाबाद त्या नंतर नागपूर चिंचवड मुंबई पुणे असा क्रम लागतो आहे. एकदम मायनर सर्च अहमदाबाद बेंगलोर दिल्ली येथूनही आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर शहरातून Marathi Essay चा शोध घेतला जाताना दिसत नाहीए. (इंग्रजी शाळा आणि मातृभाषा मराठी नसलेल्यांच्या टक्क्या नुसार हे शोध येत असतील ?) गूगल ट्रेंड्स २ पहा २०१३ म्हणजे मागच्या वर्षा पासून Marathi Essay चा शोध Learn Marathi च्या शोधा पेक्षा अधीक घेतला जातो आहे. गूगल ट्रेंड्स ३ पूर्ण भारतात मिळून English essay या टर्मचा शोध Marathi Essay च्या केवळ दुप्पट आहे आणि जगभरात मिळून English essay टर्मचा शोध Marathi Essay शोधाच्या केवळ पाचपट (अंदाजे) आहे

अनन्न्या's picture

10 Oct 2014 - 12:27 pm | अनन्न्या

सध्या परीक्षा चालू आहे पण नंतर लेकाला वाचायला सांगते. दहावीच्या वर्षी बेस्ट फाइव्ह अशी मार्क विभागणी असल्याने आधी मराठी विषय लेकाने बाजूलाच ठेवला होता, आता सहा महिन्यात चित्र बदललेय, त्याला मराठीची गोडी वाटू लागलीय आणि माझे प्रयत्न साध्य झाले. आपली मातृभाषा मुलांनी दूर सारू नये असे वाटते.
शिकवणारे शिक्षक यात फार मोठी भुमिका बजावतात, शिक्षक जर विषयाची गोडी निर्माण करू शकले तर मुले स्वतःच प्रयत्न करतात. अजूनतरी रत्नागिरीला शाळा व्यवस्थित मेहनत करून घेतात, प्रायव्हेट क्लासेससाठी मुलांची फार दमछाक होत नाही.

'अजूनतरी रत्नागिरीला--' खरं आहे.

कोचिंग क्लासची तयार उत्तरे म्हणजे बांधलेली शिदोरी. लेखनसाहित्य जमवून ते समोर ठेवूनच त्यातून वेचक वाक्ये लिहून तंत्र जमले की आत्मविश्वास निर्माण होईल. कोणत्याही भाषेत सोपे लिहिणे सर्वात अवघड असते. शिवाय मराठी दुय्यम भाषा म्हणून निवडली असेल (हेच विद्यार्थी गुगल आणि विकिवर शोध घेत असावेत असा माझा कयास आहे) तर त्यांना केवळ निबंधाचे तंत्र सांगून उपयोगी नाही. त्यांच्यासाठी छान सोपी वाक्ये हाताशी असणे गरजेचे आहे. ही वर्तमानपत्रांतल्या युवा सदरांतून मिळणार आहेत.

माझाही मुलगा दहावीला आहे पण त्याला पाच विषय असल्याने मराठी विषय नाही.हिंदी आणि इंग्रजी या मुख्य भाषा.पण वरच्या कंजुस काकांच्या प्रतिसादांचा आणि इतर लिंक्सचा या दोन भाषांसाठीही नक्की होईल.(आम्हीही बिगर क्लासवाले!घरी अभ्यास करणारे!!) छान मार्गदर्शन केलंय.धन्यवाद.

विशाखा पाटील's picture

29 Oct 2014 - 11:18 pm | विशाखा पाटील

निबंध हा विषय अभ्यासण्याचा नाही, असा आपल्याकडे एक गैरसमज आहे. त्यातूनच copy-paste उद्भवलंय.
निबंध लेखनाविषयी थोडसं मांडते (बरेचसे शब्द इंग्रजीत असतील, कृपया त्यासाठीचे मराठी शब्द सुचवावे)
१. निबंध लिहिण्यापूर्वी brain-storming, free-writing, clustering असं करावं. त्यातून विषयाची मांडणी कशी करावी आणि कोणते मुद्दे महत्वाचे आहेत हे लक्षात येतं.
२. निबंध लेखनापूर्वी मुळात परिच्छेद कसा लिहावा, ह्याचं शिक्षण द्यायला हवं. निबंधातले मधले परिच्छेद लिहिण्याचं एक तंत्र असत. सुरुवातीला topic sentence आणि नंतर supporting sentences असं सर्वसाधारणपणे स्वरूप असत.
३. पहिला आणि शेवटचा परिच्छेद लिहिण्यातही काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. पहिल्या परिच्छेदात निबंधाचा गाभा मांडणारं thesis statement असावंच लागतं.
४. निबंधाच्या प्रकारानुसार काही बदल होतात. प्रत्येक प्रकाराची इथे ओळख करून देणं शक्य नाही.

अर्थात, आत्ता ह्यापैकी आपल्याकडे काय शिकवलं जातं, हे मला ठाऊक नाही. मी शाळेत असताना मोठा निबंध लिहिला, एकदोन सुविचार, म्हणी ह्यांचा वापर केला की छाप पडते, असा चुकीचा समज होता. परदेशात ह्या विषयावर शिकवू लागल्यावर मी शिकले.

(नितीन प्रकाशनातर्फे प्रकाशित Improve Your English Writing ह्या माझ्या पुस्तकात मी ह्या विषयावर विस्तृत लिहिलं आहे.)

अलिकडे गेल्या आठवड्याभरात काही बांग्लादेशी मंडळींनी मराठी विकिपीडियावर गूगल ट्रांसलेटरच्या मदतीने एका हिंदी टिव्ही अ‍ॅक्टर बद्दल स्वतःच लेख लिहिला होता आणि इतर बांग्लादेशी मंडळी त्यातील मजकुर काढण्याचे प्रयत्न करत होती. ते तसे मराठी विकिपीडियावर येऊन का करत आहेत हे समजले नाही पण सध्या त्यांच्या बंदोबस्तासाही बारीक नजर ठेऊन आहे. आत्ता मराठी विकिपीडियावरील संपादनांची रुटीन चेकींग करत होतो त्यातील एका संपादनाच्या आढाव्यात "if there would not be any mirror in world" असे वाक्य दिसले. प्रथम दर्शनी कुणातरी अमराठी संपादकाचा उपद्व्याप आहे असे समजून बंदोबस्ताची कारवाई करावी म्हणून संपादन तपासले. ते खालील चित्रातल्या प्रमाणे दिसले.

maraathi wikipedia edit example

संपादन करणार्‍या महाशयाने आमच्या आदरणीय बिरुटे सरांबद्दलच्या संदर्भाशी छेडछाड केली म्हणल्यावर नाह म्हटले तरी मनात नेहमि पेक्षा जास्तच खटकले. संपादन करणार्‍याला पुन्हा हे कसे करता येणार नाही याचा बंदोबस्त कसा सक्तीने केला पाहीजे वगैरे विचार मनात येऊन गेले, काही तयारीही केली.

पण पुन्हा एकदा संपादनातील फरकाकडे लक्ष गेले 'मराठी' हा शब्द भाषा= शब्दा समोरुन कट करून 'शीर्षक = शालेय निबंध समोरील इतर मजकुर कट करून, शीर्षक = शालेय निबंध = मराठी असा लिहिलेला दिसला. बदलातील आढाव्यातील इंग्रजी वाक्या कडे आधी नीटसे लक्ष गेले नव्हते. ते वाक्य पुन्हा पाहीले. "if there would not be any mirror in world" मग हे प्रकरण अशा पद्धतीने काय करू पहात आहे हे जरासे लक्षात आले. महाशयांना "जगात आरसे नसतील तर" या विषयावरील मराठीतून तयार निबंध हवा असावा, पण मराठी टाईप करता येत नसल्याने अथवा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी असल्याने त्याने विषय इंग्रजीत लिहिला. मराठी शब्द दुसर्‍या वाक्यातून कट करून शीर्षक = शालेय निबंध = मराठी असे मराठीतून निबंध हवा आहे हे कळवण्यासाठी करुन संपादन जतन केले. ज्या गोष्टीला मी फारच सिरीयसली घेतलं तो तर आपला मराठी टाईप न करता येणारा मराठी भाबडा मराठी विद्यार्थी मित्र आहे हे लक्षात आल्या नंतर माझच मला हसू आलं.

या निमीत्ताने मराठी विकिपीडियाच्या निबंध लेखावरच्या हिट्सची संख्या तपासली ती बरोबर ३ मार्च पासून निम्म्याने घटली आहे. मला वाटते ३-४ मार्चच्या आसपास दहावी एसएससी बोर्डाच्या परिक्षा चालू झाल्या असाव्यात म्हणजे निबंध विषय शोधणारी निम्म्याच्या आसपास मंडळी दहावीची असावीत.

मराठी विकिपीडियावर या अशा संपदनांचा बंदोबस्त करणे हि कठीण गोष्ट नाही. दहावीला इन्फरमेशन टेकनॉलॉजी विषयाच्या माध्यमातून मराठी टायपींगची माहिती दिली जाते पण विद्यार्थ्यांना निटसे प्रशिक्षण देण्यात शिक्षकांकडूनही हयगय होत असणार. दुसरे निबंधासारखी गोष्ट ऐन परिक्षेच्या कालावधीत आंतरजालावर पूर्ण आयती शोधणार्‍या मुलांना काय म्हणावे ? असा प्रश्न मनात येऊन गेला !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2015 - 7:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोण छेडछाड़ करतय आमच्या निबंध या विश्याबद्द्ल. माहितगार मला नेहमी वाटलं आहे, शालेय आणि महाविद्यालयीन मुलांच्या साठी थेट विविध विषयावर निबंध लिहावेत म्हणून पण मुलं हल्ली परीक्षेत मोबाईल परीक्षा हॉल मधे आणतात आणि सर्च करून प्रश्नाची उत्तर मिळवितात सालं माझा उत्साहच मावळुन जातो.

खुप दिवस झाले विकि वर काय लिहिलं नाही आज संध्याकाळी तासभर बसून काही उचक-पाचक नक्की.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

16 Mar 2015 - 11:21 pm | माहितगार

परीक्षेत मोबाईल परीक्षा हॉल मधे आणतात

गरज ही शोधाची जननी असेल तर चोर नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचे अभिनव उपयोग अमलात आणतील यात नवल नाही :) यावर नियंत्रण आणण खरच शक्य नसेल तर परिक्षा कालावधी तेवढाच ठेऊन प्रश्नांची संख्या वाढवणे, डिस्क्रीप्टीव प्रश्नांचे प्रमाण वाढवणे. सध्याच्या दहावी इंग्रजी माध्यमाचा इंग्रजीचा पेपर मधील कंसेप्ट चांगली आहे. पुस्तकातला उतारा चक्क प्रश्न पत्रिकेतच असत आणि विद्यार्थ्यांना तुमच स्वतःच ओपीनीयन किंवा रिस्पॉन्स द्या म्हणून सांगितल जात हि आयडीया बरी वाटली विद्यार्थ्याच्या स्वतःच्या भाषा आकलन सर्वच कौशल्याची कसोटी लागते.

अजून एक मार्ग किमान विद्यापीठीय स्तरावर राबवता येऊ शकेल तो म्हणजे ऑनलाईन परिक्षेचा आंतर्भाव करणे ज्यात विद्यार्थ्यांना युनिकोडातून लिहावे लागेल. मजकुर युनिकोडात असेल तर तो आंतरजालावरून कोठूनही चोरला असल्यास आजकालच्या संगणक प्रणाली त्या सहज शोधून देऊ शकतील आणि अशा विद्यार्थ्यांना बाद करता येऊ शकेल असे वाटते.

माहितगार's picture

16 Mar 2015 - 11:32 pm | माहितगार

शालेय आणि महाविद्यालयीन मुलांच्या साठी थेट विविध विषयावर निबंध लिहावेत

परिक्षा केंद्रात नियंत्रण कस आणायच अथवा अभिप्रेत नसलेल्या वर्तणूकीस नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तोंड कस द्यायचे आणि आपली इतर व्यावसायिकता हे स्वतंत्र मुद्दे आहेत. आंतरजालावर हिट्सची संख्या पाहून या विषयासाठी मार्केट चांगले आहे असे वाटते. या विषयाकडे सरळ व्यावसायिक भूमीकेतून बघून लेखन करावे असे सुचवावेसे वाटते. कदाचित निबंधासाठी मुद्दे, काव्य पंक्ती, वाक्पचार सुचवणारी अ‍ॅप डेव्हेलप केल्यास खासच मार्केट मिळेल. आणि अ‍ॅप बिनधास्त डेव्हेलप करा औरंगाबादच्या आयटीच्या मुलांना चांगला प्रॉजेक्ट केल्याचे समाधान मिळेल :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Mar 2015 - 8:10 am | कैलासवासी सोन्याबापु

पाल्यांस अवांतर वाचनाची सवय लावा (लॉंग टर्म इलाज) निबंध आपोआप उत्कृष्ट होतील अथवा

विषय समजवुन द्या निबंध हा फोडल्यास

१. विषय ओळख (इंट्रोडक्शन)
२. मुख्य अंग (मेन बॉडी)
३. निष्कर्ष/स्वमत/इलाज इत्यादी शेवटी मांडा

माहितगार's picture

17 Mar 2015 - 9:03 am | माहितगार

पाल्यांस अवांतर वाचनाची सवय लावा (लॉंग टर्म इलाज) निबंध आपोआप उत्कृष्ट होतील

बरोबर, पण प्रॅक्टीकली कस करणार ? खास करून मराठी पालकांची इंग्रजी माध्यमात जाणारी मुलं यांचा शब्दसंग्रह इंग्रजी आणि मराठी दोन्ही अवांतर वाचनासाठी कितपत पुरेसा असतो ? इंग्रजी शाळांमध्ये त्यावर्षीचे विशीष्ट विषय कव्हर करण्यासाठी लागणार्‍या सो कॉल्ड इंग्रजी हार्डवर्ड्स पलिकडे शब्द संग्रह वाढवण्यासाठी काय मेहनत घेतली जाते या बद्दल शंकाच आहे. दुसरे घरी पाल्यांचे शाळेतून येण्यासच लागणारा १ दिडतास उशीर नंतर एक अभ्यासाचा एक खेळाचा तास अवांतर वाचनाची क्षमता आणि वेळ कुठे उरतो. अलरेडी शाळेतून बाहेर पडलेली तरुण पिढी चार ओळींच्या पुढे काही वाचावे लागले तर लगेच वैतागते लेखन कुणाचही कितीही ग्रेट अथवा महत्वाच असू द्या.

दुसरे वाचनालयांची उपलब्धता कमी होत चाललेली आहे. तर आंतरजाल हाताशी आले आहे पण छपील पुस्तकातील सर्व साहित्य आंतरजालावर आले आहे अशीही स्थिती नाही. खूपच गरज भासलीतर मुलं आंतरजालावर जाऊन गूगल वापरून कामा पुरता मामा करतात झाले.

पालकांनी काय केल्यास मुलांना अवांतर वाचनाची आवड लागेल ? पालकांकडे काही टिप्स असतील तर अवश्य द्याव्यात.