सासव - आंब्याचं अफलातून रायतं

ललिता's picture
ललिता in पाककृती
16 Oct 2008 - 2:26 am

आंब्याच्या दिवसांत सारस्वत घराघरातून सासव ओरपलं जातं. रायत्यापेक्षा मोठ्या प्रमाणांत बनवतात कारण चार माणसांसाठी प्रत्येकी कमीत कमी दोन असे आठ आंबे हवेतच.

१० रायवळ आंबे (आंबट गोड असावेत)
एक नारळ किसून
१ चहाचा चमचा लाल तिखट किंवा ६ लाल सुक्या मिरच्या
मीठ व गूळ चवीप्रमाणे (आंबे गोड असतील तर गूळ कमी घालावा)
अर्धा चमचा मोहरी

मोहरी सुकीच (तेल/तूप अजिबात घालू नये) तव्यावर तडतडेपर्यंत भाजून ग्राईंडरमधून पावडर करून घ्या
आंबे धुऊन त्यांची सालं एका भांड्यात जमवा..... बटाटयासारखी सालं नाही काढायची तर केळ्याप्रमाणे आंबे सोलून घ्या.
सालांच्या भांड्यात थोडं पाणी घालून आंब्याच्या सालींचा कुस्करून रस काढा व सालींचा चोथा फेकून द्या.
सोललेल्या आंब्यांवर हा रस ओतून ठेवा.
खोबरं व लाल तिखट/मिरच्या मिक्सरमधून चटणीप्रमाणे वाटून घ्या.
शेवटी मिक्सरमध्येच किसलेला गूळ व मीठ घालून चटणी मिक्सरमध्ये नीट वाटा.
ही चटणी व राईची पावडर आंब्यावर घालून हलक्या हाताने चमच्याने मिश्रण नीट ढवळून "सासव" बनवा.

कोकणी भाषेत मोहरी म्हणजे सासव. राई लावतात म्हणून या रायत्याला सासव म्हणत असतील.
यातले आंबे सासवाच्या रसात घोळवून चोखून खायचे असतात... येत्या आंब्याच्या सिझनमध्ये बनवूनच पहा!

प्रतिक्रिया

धनंजय's picture

16 Oct 2008 - 3:13 am | धनंजय

मस्त पाकृ

आता बाजारात कैर्‍या येत नाहीत तर तुम्ही वर्णनाने आमचा छळ चालवला आहे. :-)

बेसनलाडू's picture

16 Oct 2008 - 3:18 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू
निदान फोटो तरी टाका. पाककृतींच्या सदरात फोटो कम्पल्सरी करावा का तात्या?
(हावरट)बेसनलाडू

चित्रा's picture

16 Oct 2008 - 6:49 pm | चित्रा

आता कैर्‍या मिळेपर्यंत वाट पहावी लागणार!

रेवती's picture

16 Oct 2008 - 4:53 am | रेवती

शाकाहारी पाकृबद्दल धन्यवाद.
आता पुढच्या सिझन ची वाट पहावी लागणार.

रेवती

पिवळा डांबिस's picture

16 Oct 2008 - 7:48 am | पिवळा डांबिस

आमच्या डोळ्यात पाणी आणायचंच ठरवलंय काय?
अहो, माझ्या आजीची आठवण झाली हो!
काय जबरदस्त सासव करायची माझी आज्जी....
माझ्या आईलाही कधी जमलं नाही तसलं.....
आम्ही आईला सासवावरून नेहमी चिडवायचो, की तुला तुझ्या आईने स्वयंपाक नीट शिकवलेला दिसत नाही...
(आणि मग आईच्या चिक्कार शिव्या खायचो.....)
सासवाच्या आठवणीने हळवा झालेला....

अस्सल सारस्वत,
डांबिसकाका

ललिता's picture

16 Oct 2008 - 12:33 pm | ललिता

बेसनलाडू, फोटो कसा टाकू? आंबे कुठे आहेत?
मी जिथे राहाते तिथे सासव बनवता येतच नाही हो... तर फोटो कुठून पैदा करायचा!

सारस्वत डांबिसकाका, बायकोला शिकवा नं हवं तसं सासव करायला! पाकृ दिली आहेच :)

टीपः मी स्वतःच २० वर्षांत सासव चाखलेलं नाही...... :(

नंदन's picture

16 Oct 2008 - 12:39 pm | नंदन

खरंच अफलातून पाकृ. अजून सासव कधी चाखलं नाही, पण यंदाच्या मेच्या सुटीत ओरपलेलं रायतं आठवून गेलं :(

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

यशोधरा's picture

16 Oct 2008 - 1:10 pm | यशोधरा

ललिता ताई, तू कोकणी उलयतां वें? :)

ललिता's picture

16 Oct 2008 - 1:44 pm | ललिता

हाव कोकणी उलयता गो यशोधरा... मगेली मातृभाषा कारवारची कोकणी! :)

यशोधरा's picture

16 Oct 2008 - 4:31 pm | यशोधरा

अय्यो, ललिताताई तूऽऽऽऽऽऽ?? :) माका दिश्शील्लेच तूच उरतलें म्हण!! :)
जरा कामां आस गे हांव, तुका मागिर व्यनि करता :)

ललिता's picture

16 Oct 2008 - 4:50 pm | ललिता

कळलें तू कोण म्हण आता, तुवें बरेल्ल्यावैल्यान! शैलजा?

यशोधरा's picture

16 Oct 2008 - 5:01 pm | यशोधरा

:)

विसोबा खेचर's picture

17 Oct 2008 - 1:11 pm | विसोबा खेचर

क्या केहेने....!

चकली's picture

17 Oct 2008 - 10:30 pm | चकली

अशाच "authentic" सारस्वत पाकृ येउ द्यात. सध्यातरी "१० रायवळ आंबे" आंबे मिळणे कठिण आहे...तेव्हा नुसतीच कल्पना करून समाधान करून घेतले!

चकली
http://chakali.blogspot.com

baba's picture

18 Oct 2008 - 5:09 am | baba

:)

...बाबा

वा! पाकृ काही अनवटच वाटतेय. करुन पाहीन.

यात आंब्याप्रमाणेच सगळी फळे घालुन रसदार बनवण्यासाठी दही घालतात.
म्स्त लागतं. आंब्याला रस असल्याने दही घातल नसावं.

पैसा's picture

24 Apr 2014 - 9:18 am | पैसा

दही घालायचं नाही. दही घातलं तर ते रायतं/कोशिंबीर झाली. सासव हा खास कोंकणी पदार्थ आहे. आंबट-गोड फळे जसे की आंबे, अंबाडे, अननस इ. चे असे सासव करतात. आणि माझ्या गोव्यातल्या मैत्रिणी करतात त्या मिरची पावडर/सुक्या लाल मिरच्या सढळ हाताने घालतात, खरं तर रंग लाल झाला पाहिजे.

"१० रायवळ आंबे" म्हणजे काय? कैरी का?

क्या आप रायवळ आंबे नही जानते? (क्या आपके टूथेपेस्ट में नमक हय च्या चालीवर वाचावे)

हम, रायवळ शब्द नही जानत है....

राघु आम्बा का??

पैसा's picture

24 Apr 2014 - 3:08 pm | पैसा

आज केलं होतं, त्यातलं एवढंच उरलंय.

sasav

त्रिवेणी's picture

24 Apr 2014 - 3:24 pm | त्रिवेणी

ज्यो तै हे कशा बरोबर खायच?
हापुस आंब्याच केल तर चालेल का? आताच पाण्यात टाकुन ठेवले संध्याकाळसाठी आता अस करुन बघेन.

पैसा's picture

24 Apr 2014 - 3:32 pm | पैसा

डाळ भाताबरोबर किंवा चपातीबरोबर, कसेही चालेल. हापूस आंब्याचे नको करू. कारण त्याचा गर घट्ट असतो आणि आंबे खूप गोड असतात. हे रायवळ आंबे जरासे आंबटसर असले की मजा येते.

त्रिवेणी's picture

24 Apr 2014 - 3:46 pm | त्रिवेणी

ओके.
आता रायवळ आंबे शोधणे आले.