गझलसम्राट सुरेश भटांची माफी मागून "थट्टीफस" निमित्त:
झिंगूनी गुत्त्यात सार्या मी हो नाही बेवडा
दाबले जरी चिकनचिली मज वाटे ते घेवडा
कोण जाणे कोठुनी हे नवे दोस्त आले पुढे
मी असा की जमे "असा" मित्रमेळा एव्हढा
असे ही खिशात माझ्या चपटी औषधापरी
हे कंट्रीचे प्रेम माझे देशभक्त मी हो केव्हढा
कोणत्या इयत्तेत कळेना मी प्यावयास लागलो
अन् कुठे मित्र गेले पुढे मी विकत राहीलो वडा
सांगती गुण माझे सारखे बायको अन् चार पोरे
नवरा माझा दारुडया अन् बाप आमचा बेवडा
न पिणार्यांच्या मध्यरात्री झिंगणारा स्वच्छंदी मी
त्रास नको घरच्यांना म्हणून बाहेर राहतो एव्हढा
प्रतिक्रिया
31 Dec 2013 - 9:47 am | मुक्त विहारि
ठ्ठो..
मस्तच..
31 Dec 2013 - 9:48 am | प्रकाश घाटपांडे
वा वा धन्या क्या बात है! थट्टी फस ला अगदी 'शास्त्रापुरती' घ्यावी
(आता उरलो शास्त्रापुरता)
31 Dec 2013 - 9:58 am | प्रचेतस
=))
काय बे धन्या आँ....
लैच सौम्य व्हर्जन टाकलंस म्हणायचं. ;)
31 Dec 2013 - 10:05 am | धन्या
अनाहितासारखं काही गण्याहिता वगैरे असतं तर तिकडे टाकलं असतं वर्जिनल व्हर्जन :D
31 Dec 2013 - 10:08 am | प्रचेतस
हाहाहा. =))
31 Dec 2013 - 10:10 am | लॉरी टांगटूंगकर
वर्जिनल व्हर्जन व्यनि कर.
हे पण जमलेलं आहे, आता वर्जिनल व्हर्जनबद्दल उत्सुकता वाढली :D
31 Dec 2013 - 12:32 pm | बॅटमॅन
ठ्ठो =))
बाकी इडंबन फारच खलास जमले आहे धनाजीराव!!!!! मंडळ कचकून आभारी आहे.
31 Dec 2013 - 9:44 pm | प्यारे१
अनाहितासारखं काही गण्याहिता वगैरे असतं तर
गण्याहिता ऐवजी धन्याहिता चालेल का?
31 Dec 2013 - 11:06 am | अत्रुप्त आत्मा
@लैच सौम्य व्हर्जन टाकलंस म्हणायचं.>>> =)) +१ टू अगोबा हत्ती =))
पण..
झिंगूनी गुत्त्यात सार्या मी हो नाही बेवडा
दाबले जरी चिकनचिली मज वाटे ते घेवडा =)) हे लै खत्तरनाक! =))
31 Dec 2013 - 11:23 am | अभ्या..
शेवटी वडा येणारे लै यमक सुचले असतील न गुरजी? ;-)
धनाजीराव (ऑन द ) रोक्स :-D
31 Dec 2013 - 11:27 am | नाखु
बाहेरच्या फुट्कळ गिर्हाईकांना साधा "सपक" माल आणि "पेशल" फकस्त "अट्ट्लंना"*
*अट्ट्लःअगदी टल्ली होणारे.
वरिजनल माल शोकेस मध्ये बघीतलेला.
"विंडो शॅआपर"
31 Dec 2013 - 11:28 am | सूड
मीटर हुकलंय !!
31 Dec 2013 - 12:03 pm | कवितानागेश
पण तरीही विडंबन छान झालय.
स्वगतः शी बाबा. हल्ली रोजच या सूडक्याशी सहमत व्हायची वेळ येतेय. ;)
31 Dec 2013 - 12:39 pm | धन्या
म्हणजे काय? "भुजंगप्रयाती य ये चार वेळा" वगैरे काही आहे का?
31 Dec 2013 - 1:30 pm | सूड
>>म्हणजे काय?
जाऊ द्या मग !! ;)
31 Dec 2013 - 12:08 pm | अमोल केळकर
मस्त :)
अमोल केळकर
31 Dec 2013 - 12:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
लै भारी. आज थर्टी फस्स् हाय. जमूया वाड्यावं, कस? :)
31 Dec 2013 - 12:33 pm | राजेश घासकडवी
मजा नाही आली. सूडने म्हटल्याप्रमाणे मीटर हुकलेलं आहे. त्याहीपेक्षा, विडंबन करायचं म्हणजे कवितेत जे आहे त्याऐवजी दारू, ग्लास वगैरे टाकायचं हे इतकं घिसंपिटं झालेलं आहे की आता कंटाळा आलेला आहे. तुमच्याकडून यापेक्षा अधिक मोठी अपेक्षा होती. (आठवा, सखूची पिशवी...)
डांबुनी वीडंबनांना दारु-ग्लासी-पेग ला
गुंतुनी गुत्त्यात राही. भाव का ना वेगळा?
31 Dec 2013 - 12:52 pm | धन्या
तुमच्या मतांशी सहमत आहे. हे खुपच सपक विडंबन आहे. वर काहींनी म्हटल्याप्रमाणे मुळ विडंबन धारदार होतं, अगदी सखूची पिशवी फाडून टाकेल असं.
काही कारणास्तव मी ते इथे देऊ शकत नाही. :)
31 Dec 2013 - 6:26 pm | हाडक्या
मंग ते अस्सल झणझणीत वर्जन व्यनि करण्याची कृपा कराल काय हो, धन्याभौ?
31 Dec 2013 - 6:34 pm | तिमा
अन, मला पन पाठवा हो भाऊ !
31 Dec 2013 - 6:52 pm | बॅटमॅन
मना पन!!!
31 Dec 2013 - 9:10 pm | राजेश घासकडवी
व्यनितून न पाठवता नुसतंच असं लिहायचं ही सरासर नाइन्साफी आहे. पाठवून द्या.
31 Dec 2013 - 12:41 pm | दिपक.कुवेत
होउन जौदे आज ३१ आहे......
31 Dec 2013 - 12:42 pm | जेपी
भारी :-)
31 Dec 2013 - 1:55 pm | सुहास..
=))
31 Dec 2013 - 7:04 pm | मूकवाचक
=))