मी रहात असेलेल्या उत्तम नगर भागात डिसेंबर महिना सुरु झाल्या बरोबर भाज्या स्वस्त होऊ लागतात. ४-५ किलोमीटर दूर एक मोठी सब्जीमंडी आहे व दिल्लीचा ग्रामीण भाग ही जवळ आहे. शिवाय येथे दररोज जवळपास (किलोमीटर आतच कुठे न कुठे साप्ताहिक बाजार लागतोच). गेल्या सोमवारच्या बाजारात सर्वच भाज्या पालक, बाथू, सरसों, मुळा, गाजर इत्यादी १० किलो होत्या. फुलगोभी ही १० रुपये किलो आणि कोथिंबीर ५ रुपये पाव, त्यामुळे ३५ रुपये किलो असलेले मटार घेणे परवडण्यासारखे. (मुंबई वाल्यांना जळण तर नाही होत आहे)
दररोज संध्याकाळी घरी (७-७/३० मध्ये)पोहचल्या वर चहा बरोबर नाष्टा हा असतोच. उशीर झाला तर सरळ रात्रीचे जेवण (नऊच्या आत). आज २५ डिसेंबरची सुट्टी असली तरी कामानिमित्त कार्यालयात जावे लागले. संध्याकाळी ५ वाजता घरी पोहचलो. सौ. म्हणाली फुलगोभी घालून मटार पोहे चालतील का? माझा आवडता पदार्थ, हेच खाण्यासाठी हिवाळा केंव्हा सुरु होतो याची वाट बघत असतो. (शिवाय बटाटे घालून कांदे पोहे खाण्यापेक्षा मटार पोहे केंव्हाही आवडणारच). मुलीचे लग्न झाल्या पासून घरात आम्हीतीन माणसेच. तसा मुलगाही भयंकर खादाडखाऊ आहे. तीन प्राण्यांसाठीच कृती देत आहे.
साहित्य: पोहे ४ वाटी, १ वाटी बारीक चिरलेली गोभी, ३/४ वाटी मटार, १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची १. फोडणी साठी मोहरी व तेल. हळद (१/२ चमचे) तिखट/मीठ (आवडीनुसार), चाट मसाला(एम डी एच) स्वाद वाढविण्यासाठी (१ चमचा), (साखर १ चमचा), लिंबू एक किंवा आमचूर पावडर (१ चमचा).
कृती: पोहे भिजवून घ्या (पोहे व्यवस्थित भिजलेले पाहिजे, पण जास्त पाणी ही नको व कमी ही नको पोहे भिजविणे पण एक कलाच आहे), कढई गॅसवर ठेवून तेल गरम झाल्यावर मोहरी फुटल्यावर हिरवी मिरची, मटार आणि फुलगोभी टाकून, कढई वर झाकण ठेवून ३-४ मिनटे पर्यंत या भाज्या शिजू ध्या.
२-३ मिनिटात पोहे पाणी पिऊन घेतात. हातानी पोहे पसरतात आहे, हे बघून हातानीच पोह्यात हातानेच तिखट, हळद, चाट मसाला, मीठ साखर सर्व बाजूनी टाकावी. चिरलेली कोथिंबीर ही अशीच टाकावी व नंतर लिंबू पिळावा. हलक्या हातानी पोह्यात वरील सर्व साहित्य व्यवस्थित मिसळावे. गोळे न पडण्याची खबरदारी घेणे गरजेचे. ३-४ मिनिटात मटार गोभी शिजली वाटतच पोहे कढईत टाकून परतावे व झाकण ठेऊन १-२ मिनटे वाफ काढावी.
वरून थोडी कोथिंबीर घालून गरमा-गरम पोहे, लिंबाच्या लोणच्या बरोबर अप्रतिम लागतात. (शिवाय लिंबाचे लोणचे ही आमच्या मेव्हुणीच्या घरच्या लिंबाच्या झाडाच्या लिम्बांचे आहे.)
प्रतिक्रिया
25 Dec 2013 - 7:22 pm | चित्रगुप्त
मस्त पोहे.
त्यावर रतलामी वा उज्जैनची शेव, आणि जीरावन (चाट मसाल्यात बहुतेक हेच असावे) टाकून अहाहा....
25 Dec 2013 - 7:24 pm | विनटूविन
फुलगोभी म्हणजे फ्लॉवर कि कोबी? मराठमोळा प्रश्न [फ्लॉवर असावा]
25 Dec 2013 - 7:28 pm | पिंगू
फ्लॉवर हो..
25 Dec 2013 - 8:37 pm | प्रभाकर पेठकर
'फुलगोभी' म्हणजे कॉली फ्लॉवर.
कोबीला 'बंदगोभी' म्हणतात.
25 Dec 2013 - 7:36 pm | पिंगू
मटार पोहे एकदा मित्राकडे खाल्ले होते. आठवण झाली..
25 Dec 2013 - 8:30 pm | दिपक.कुवेत
आणि आवडतातहि. त्यावर तळलेला पोह्याचा पापड चुरुन खाणे म्हणजे अहाहा......पण वरील पोह्यात अॅडवलेला फ्लॉवर कसा लागेल ह्या विचारात आहे.
25 Dec 2013 - 8:38 pm | प्रभाकर पेठकर
मटार पोहे नेहमीच केले जातात, आता फ्लॉवरसुद्धा आणावा म्हणतो.
25 Dec 2013 - 8:48 pm | मुक्त विहारि
झक्कास...
मस्त...
26 Dec 2013 - 2:11 am | रेवती
छान.
26 Dec 2013 - 2:33 am | प्यारे१
कोबीचा उग्र वास घालवायला काय करावं?
(दोन्ही प्रकारच्या 'गोबींना' फुल गोबी, पत्ता गोबी. सज्जनगडावर कांदा लसूण चालत नाही. तिथं कोबीपोहे खाल्लेत पण उग्र वास येतो ! )
27 Dec 2013 - 9:11 am | प्रभाकर पेठकर
मेहुणीच्या घरच्या लिंबाच्या झाडाच्या लिंबांच्या लोणच्या बरोबर खावे.
27 Dec 2013 - 5:53 pm | सूड
म्हणजे नावडतीचं मीठ अळणी मेव्हणीघरची लिंबंसुद्धा गोड ! ;)
27 Dec 2013 - 8:55 am | वासु
जर का फुलगोभी म्हणजे फ्लॉवर असेल तर फ्लॉवर अगोदर उकडुन घ्यावा लागतो..
19 Jan 2014 - 3:26 pm | विवेकपटाईत
फुल गोभी उकडन्याची गरज नाही तेलात मस्त परतली जाते. स्वाद ही चांगला येतो.
27 Dec 2013 - 10:32 am | पैसा
वेगळा प्रकार.
27 Dec 2013 - 6:40 pm | अनिरुद्ध प
पा क्रु आवडली करुन बघण्यात येईल.
27 Dec 2013 - 11:43 pm | रेवती
आजच केले होते. नेहमी कांदेपोहे, बटाटा, मटार पोहे केले जातात. माझ्या आजेसासूबै जोपर्यंत त्यांना जमत असे तोपर्यंत पोह्यांचे वेगळाले प्रकार करत असत. त्यात फ्लावर मटार पोहे, वांगी पोहे करायच्या. नंतर ते विसरल्यासारखे झाले होते. तुम्ही आठवण करून दिल्याबरोबर केले.
28 Dec 2013 - 12:35 pm | कुंदन
हेच पोहे मिसळ मध्ये पण टाकतात का काही ठिकाणी?
1 Jan 2014 - 5:02 pm | प्रिती
मटार पोहे नेहमीच करते आता फुलगोभि टाकुन बघेन
18 Jan 2014 - 7:51 pm | आयुर्हित
जबरदस्त कल्पना आहे हो आपली.
ह्या पाककृतीत बटाटा टाळून मटार व फुलकोबी घातल्याने एक नवीनच चव येईल हो.
चांगला प्रकार आहे. नक्कीच करून पाहीन.
आपला मिपास्नेही : आयुर्हीत
20 Jan 2014 - 12:15 am | नेहा_ग
वेगळा प्रकार
22 Jan 2014 - 5:51 pm | सुहास झेले
मटार पोहे आवडतातच...हे पण ट्राय करायला हरकत नाय :)
22 Jan 2014 - 6:48 pm | Atul Thakur
मस्त पटाईतसाहेब :)
23 Jan 2014 - 10:36 am | भ ट क्या खे ड वा ला
वरील दोन्ही भाज्या या हिवाळ्यात चांगल्या मिळतात. हिवाळ्य मध्ये यांचे पिक चांगले होते.
हिवाळ्यातील पिकाला कमी खते .पाणी लागते भरपूर उत्पन्नामुळे भाव हि कमी असतो.
बारा महिने अमुक एक भाजी मिळाली पाहिजे या आग्रहामुळे( मार्केट डिमांड ) शेतकरी जास्ती खते , पाणी ,कीटक /बुरशी नाशके वापरून या भाज्या पिकवतात. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत या भाज्यांना उग्र वास नसतो.
हे करून पहा - मे च्या अखेरच्या आठवड्यात फ्लॉवर चा गड्डा मिठाच्या पाण्यात टाका
किडे थोड्याच वेळात तरंगताना दिसतील.
काही वर्षे भाजीपाला ,शेती यात रमलेला .....
भ ट क्या खे ड वा ला
23 Jan 2014 - 11:00 am | भ ट क्या खे ड वा ला
याची भजी सुद्धा छान होतात.
हिवाळ्यातील स्वत आणि मस्त फ्लॉवर चा तुकतुकीत पांढरा गड्डा आणावा.
एवढा कशाला आणलात असे सौ ने विचारावे. तुला भाजी ला किती लागेल तेव्हढा ठेव , बाकीच्याचे मी काय ते करतो असे सांगून स्वयंपाक घरावर अतिक्रमण करावे. अतिक्रमण पूर्वनियोजित असेल तर बेसन सुद्धा आधीच आणावे. ( कधी कधी बेसन संपत आलंय असली कारणे देऊन बेत हाणून पडायचा संभव असतो )
फ्लॉवर ची फुले खुडून घ्यावीत ,धुवावीत. बेसन ,तिखट मीठ यांचे मिश्रण थोडे पाणी टाकून करावे चवीपुरते आमचूर टाकावे फुले त्यात भिजवून घ्यावीत. (देठ कमीतकमी ठेवावा फुलांचा)
कढईत तेल गरम करत ठेवावे चांगले तापले कि फुले त्यात सोडावीत मस्त तळून घ्यावीत , पहिला घाणा स्वयंपाक घराच्या मालकिणीला पेश करावा
आता अचानक आक्रमण रद्द करून विजय झाल्याच्या थाटात तो साजरा करायची तयारी करावी
.
.
.
आपोआप आपल्या डिश मध्ये गरमागरम फ्लॉवर ची भजी येतात
आपण युद्धभूमी वर केलेल्या पसार्या बद्दल काही ऐकू येऊ नये या साठी छानसे संगीत लावावे