पौष्टिक पदार्थ (१) बीटच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
22 Dec 2013 - 11:45 am

लहान मुलांच्या आवडी-नावडी फार असतात. बहुतेक पदार्थ आणि भाज्या आई-वडिलांना आवडत नाही पण पोरांच्या नावाने बोंब मारायला मोकळे होतात आमच्या मुलांना हे आवडत नाही किंवा ते आवडत नाही. . केवळ बटाटा, अरबी आणि भिंडी शिवाय दुसरी भाजी न आवडणारे, पुष्कळ मुलें बघितली आहे. आमच्या सौ ला न आवडणाऱ्या भाज्या मुलांच्या पोटात कसं पोहचवायचं ही कला चांगलीच अवगत आहे. तिने खाऊ घातलेले मुलांना आणि मला, पदार्थ आपल्या पर्यंत पोहचवीत आहे. माजी मुले सर्व भाज्या आनंदाने खातात त्याचे श्रेय सौ लाच. बीट आयरन युक्त अत्यंत पौष्टिक कंद आहे. पुरी आणि बटाट्याची भाजी मुलांना आवडतेच.

बीटच्या पुऱ्या
साहित्य: कणिक तीन वाटी, बेसन :१ वाटी (आवश्यक नाही, आवडत असेल तरच) , बीट: १ (१०० ग्राम) जीरा आणि ओव्याची पावडर (प्रत्येकी अर्धा चमचा) व मीठ स्वादानुसार व तेल तळण्यासाठी.

कृती: बीटला सोलून, कापून, थोड पाणी घालून ४-५ मिनटे गॅसवर ठेवा. नंतर मिक्सित घालून पेस्ट बनवून घ्या. कणिक, बेसन एकत्र करून त्यात बीटची पेस्ट, जीरा, ओवा पावडर, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून पुरीचे पीठ मळून घ्या. कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घालून, पुऱ्या तळून घ्या.

बटाट्याची भाजी: बटाट्याची भाजी सर्वच बनवितात पण तरी ही कृती खाली देत आहे.

साहित्य: उकळलेले बटाटे (१/२ किलो) , हिरव्या मिरच्या २-३, अदरक -लहान तुकडा (मिरची आणि अदरक ची पेस्ट करून घ्या), टोमाटो २-३ (१०० ग्राम) बारीक चिरलेले , हळद, मोहरी, हिंग,जिरे (१/२ चमचे) गरम मसाला (१/२ चमचा), धनिया पावडर (१ चमचा) व तेल (३-४ चमचे –जास्त ही चालेल) व कोथिंबीर (भरपूर) . (कांदे लहसून खाणारे, कांदे लहसून ही घालू शकतात शकतात).

कृती: कढई गॅसवर ठेवा त्यात तेल ओता. तेल गरम झाल्या वर मोहरी घाला. मोहरी तडकल्यावर त्यात हिंग, जिरे घाला मग बारीक चिरलेले टोमाटो त्यात घाला. ३-४ मिनटे झाल्या वर तेल सुटू लागेल मग त्यात अदरक मिरची ची पेस्ट घाला, थोड थांबून हळदी, धनिया पावडर, गरम मसाला घाला. नंतर १ गिलास पाणी व स्वादानुसार मीठ घालून एक उकळी येऊ ध्या. मग उकळलेले बटाटे कुस्करून त्यात घाला (चिरलेल्या पेक्षा कुस्करून बटाटे घातल्यास स्वाद जास्ती चांगले येतोझ). पुन्हा १-२ मिनटे उकळी आल्या वर कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

बीटची पुरी आणि बटाट्याची भाजी लहान मूले आनंदाने खातील.

ह्याच प्रमाणे पालकाची पुरी सुद्धा बनविता येते. पालकाला बारीक चिरून, ३-४ मिनटे गॅस वर ठेऊन. नंतर मिक्सित घालून पेस्ट तैयार करून, बीटच्या पुरी प्रमाणे पालकाची पुरी तैयार करता येईल.

चित्र पाहाण्यासाठी: http://vivekpatait.blogspot.in/2013/12/blog-post_22.html

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

22 Dec 2013 - 2:40 pm | मुक्त विहारि

झक्कास..

पैसा's picture

22 Dec 2013 - 4:47 pm | पैसा

दोन्ही पदार्थांना रंग अगदी मस्त आला आहे. यापूर्वी मिमराठीवर तुमच्याकडून काही पारंपरिक अनवट पाककृती वाचल्याचे आठवत आहे. आणखी येऊ द्या आणि तुमच्या सौं.ना धन्यवाद सांगा.

Atul Thakur's picture

22 Dec 2013 - 5:04 pm | Atul Thakur

मस्त पटाईतसाहेब :)

प्रभाकर पेठकर's picture

22 Dec 2013 - 5:45 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर रंगसंगती. चवही मस्तं असणार ह्यात शंका नाही. करून पाहिली पाहिजेच.

मितान's picture

22 Dec 2013 - 6:34 pm | मितान

चवदार रेसिपी !

माझ्या लेकीला बीटचा पराठा फार आवडतो. तिला या पुर्‍या करून देईन आता.

त्रिवेणी's picture

23 Dec 2013 - 9:02 am | त्रिवेणी

बटाट्याची भाजी नक्की करून बघेन.
बाकी फोटो मस्तच. अजुन पाकृ येऊ द्या.

छान दिसताहेत पुर्‍या .. मी पण करून बघणार .

मृत्युन्जय's picture

23 Dec 2013 - 11:33 am | मृत्युन्जय

पुर्‍यांचा रंग काय कातिल आहे हो. मस्तच.

सुहास झेले's picture

23 Dec 2013 - 2:26 pm | सुहास झेले

भारीच... पाककृती आवडली :)

गणपा's picture

23 Dec 2013 - 2:33 pm | गणपा

भुकेल्या पोटी असे फोटोप पहाणे शिक्षाच आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2013 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह

भुक चाळवली... जबरा पाकृ.

पाकॄ छान आहे,उद्देश पण छान. :)

दिपक.कुवेत's picture

24 Dec 2013 - 1:11 pm | दिपक.कुवेत

नेत्रसुखद आहे तितक्याच खायला पण चविष्ट असणार ह्यात शंका नाहि. चला उद्या डब्याचा मेनु फिक्स!

प्यारे१'s picture

24 Dec 2013 - 4:22 pm | प्यारे१

मस्तच!
पालकाची पुरी खाल्लीये. बीटाची खाऊन पाहिल्या जाईल.