साहित्यः एक वाटी सुकवलेल्या कैरीच्या फोडी, एक वाटी गूळ, पाव वाटी मोहरी, एक चमचा मेथी, मीठ चवीनुसार, तिखट दोन चमचे, पाणी, तेल पाव वाटी, हिंग, मोहरी, हळद फोडणीसाठी.
कृती: प्रथम दोन-तीन वाट्या पाणी उकळावे. गॅस बंद करून या पाण्यात कैरीच्या फोडी घालून दहा मिनिटे झाकून ठेवावे.दहा मिनिटांनी फोडी पाण्यातून काढून चाळणीवर टाकाव्या. गूळ एका पातेल्यात घेऊन पाऊण वाटी पाणी घालून पाक करावा. गूळ विरघळला की गॅस बंद करावा. मोहरी पाणी घालून मिक्सरवर फेसून घ्यावी. मेथी तळून पावडर करावी. पाव वाटी तेलाची मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करावी. फोडणीत अर्धा चमचा तिखट घालावे, त्यामुळे छान रंग येतो. गुळाच्या पा़कात फेसलेली मोहरी, मेथी पावडर, तिखट, मीठ आणि तयार फोडणी मिसळावी. आता तयार मिश्रणात कैरीच्या फोडी मिसळाव्यात.
दोन दिवसात लोणचे मस्त मुरते. चवीला एकदम तोंपासु!
प्रतिक्रिया
21 Dec 2013 - 2:10 pm | यशोधरा
तोंपासु!
21 Dec 2013 - 2:11 pm | जेपी
लय भारी .
21 Dec 2013 - 2:30 pm | पैसा
आवडती वस्तू!!
21 Dec 2013 - 2:38 pm | प्यारे१
लाळेरे लाळेरे लाळेरे... आणा रे कुणी... लाळेरे लाळेरे लाळेरे
21 Dec 2013 - 3:06 pm | अजया
तोंपासु......हिवाळ्यातल्या कैर्या वापरल्या तर टिकेल का?
21 Dec 2013 - 6:42 pm | अनन्न्या
फक्त या सुकवलेल्या फोडी आहेत, ताज्या कैय्रा वापरून हे लोणचे केलेले नाही कधी! आमच्याकडे हापूस आंबे काढताना काही आंबे खाली पडतात. ह्या पडीच्या आंब्याच्या फोडी मीठ लावून वाळवून ठेवल्या जातात. पहिले ताज्या आंब्याचे लोणचे संपले की ही आंबोशी उपयोगी येते. याचा आमचुरही करून ठेवता येतो.
21 Dec 2013 - 3:09 pm | अत्रुप्त आत्मा
21 Dec 2013 - 7:37 pm | मितान
वा ! फोटो बघून तोंडाला पाणी सुटले !!!
21 Dec 2013 - 8:35 pm | साती
मस्तंच लागतं हे लोणचं.
पाकृबद्दल धन्यवाद.
23 Dec 2013 - 9:11 am | त्रिवेणी
मस्तच गं.
23 Dec 2013 - 11:55 am | मदनबाण
हे आपल्याला लयं आवडते बघा...
23 Dec 2013 - 12:18 pm | आंबट चिंच
होय अनन्या यांनी सांगितल्या प्रमाणे आम्हीही कोकणात पडलेल्या आंब्याचे असेच लोणचे करतो. पण याला आम्च्याकडे उसरीचे लोणचे म्हणतात.
24 Dec 2013 - 12:55 pm | दिपक.कुवेत
चला आता ईथे आंब्याच्या फोडि सुकवणे आले.