अनेकदिवसापासून नवरा मागे लागलेला की तू तुझी रेसिपी मिसळपाव वर लिही.पण लिखाण आणि वाचन याची मला फार आवड नसल्याने मी टाळाटाळ करत होते.पण त्यांच्या आग्रहाखातर ही माझी पहिली रेसिपी तुमच्यासाठी.
'Burrito Bowl' ही एक Mexican dish आहे. बाहेर गेल्यावर आमच्यासारख्या शाकाहारी लोकांसाठी एक मस्त पदार्थ आहे हा.
साहित्य:- १वाटी भात, १ वाटी black beans ( मीठ घालून उकडलेले ), १/२ सिमला मिरची , १कांदा, १टोमॅटो,१ वाटी स्वीट कॉर्न,१ लिंबू, १ avocado,lettuce, तिखट, मिरपूड,मीठ,चीज़ (मी healthy बनवायचे म्हणून नाही घातले),कोथिंबीर, थोडेसे तेल, sour cream.
कृती :- प्रथम सिमलामीरची आणि १/२ कांदा उभा चिरुन घ्या.
टोमॅटो आणि कांदा बारीक चिरुन घ्या.
avocado स्मॅश करून घ्या.
आता avocado मधे १/२ टोमॅटो,थोडा बारीक चिरलेला कांदा,मिरपूड, मीठ आणि १/२ लिंबू घालून
एकत्र करून घ्या.याला 'Guacamole' असे म्हणतात.
एका भांडयात १/२ टोमॅटो ,कांदा, थोडी कोथींबर,लिंबू,मीठ,मिरपूड, तिखट(optional) एकत्र करून ठेवा.
हा झाला salsa.
एका भांडयात कॉर्न,मीठ आणि मिरपूड घालून microwave मध्ये एक मिनिट गरम करा.
आता उभे चिरलेले कांदा आणि सिमलमीरची मीठ घालून कढई मधे थोड्या तेलात परतून घ्या.
एका कढई मधे तेल गरम करून त्यात कोथिंबीर घाला.
आत हे तेल भातावर घालून थोडी मिरपूड,लिंबू घालून एकत्र करावे.
ही झाली तयारी.
आता एका bowl मधे भात घ्या.त्यावर black beans,lettuce,कॉर्न,salsa,guacamole, सिमलामीरची
आणि कांदा घाला. वरुन sour cream आणि चीज़ घालून खायला द्या.
( भात मीठ घालून शिजवावा. Mexican dish मध्ये तिखठाच्या एवजी मिरपूड आणि jalapeno मिरची
जास्त वापरतात.)
English शब्दांचा वापर जास्त केला आहे पण त्यांना मराठीत काय म्हणतात ते मला माहीत नाहीए.
त्यामुळे क्षमस्व.
प्रतिक्रिया
7 Dec 2013 - 9:10 am | लॉरी टांगटूंगकर
झक्कास!!!!!!!!! , बरितो आवडला..
मागच्या वेळेला बरितो म्हणून काहीतरी भलतंच प्रकरण खाल्लेलं दिसतंय मी.
आणि मिपावर स्वागत.
7 Dec 2013 - 9:17 am | wrushali kulkarni
धन्यवाद!!!
7 Dec 2013 - 9:20 am | मदनबाण
अरे वा...बर्याच दिवसांनी हटके प्रकार वाचला आणि पाहिला. :)
7 Dec 2013 - 1:03 pm | आदूबाळ
ब्लॅक बीन्स म्हणजे काय? राजमा का?
7 Dec 2013 - 2:53 pm | प्रभाकर पेठकर
'ब्लॅक बीन्स' भारतात पाहिल्या नाहीत. 'ब्लॅक बीन्स' म्हणजे राजमा नाही पण 'काळा राजमा' ही 'ब्लॅक बीन्स'ला पर्याय म्हणून वापरता येईल.
'ब्लॅक ग्रॅम्स' म्हणजेच 'आख्खे उडीद' हा पर्यायही वापरण्यास हरकत नसावी.
7 Dec 2013 - 9:18 pm | wrushali kulkarni
राजमा म्हणू शकता कारण चव थोडीफार तशीच लागते.
7 Dec 2013 - 1:22 pm | उद्दाम
छान . वेज बिर्यानीचा मेक्सिकन भाऊ दिसतो आहे.
7 Dec 2013 - 3:04 pm | प्रभाकर पेठकर
इजिप्शियन 'कोशरी' ह्या पदार्थाच्या जवळ जाणारी पाककृती दिसते आहे.
7 Dec 2013 - 9:28 pm | wrushali kulkarni
पाहायला हवी.
7 Dec 2013 - 8:18 pm | चाणक्य
वेगळीच डिश
7 Dec 2013 - 8:27 pm | पैसा
हेल्दी आणि पोटभरीचं आहे. हे ब्लॅक बीन्स गोव्यात मिळतात. त्यांना स्थानिक "आवरां" असं नाव आहे. चवळी वर्गातला.
7 Dec 2013 - 9:25 pm | wrushali kulkarni
वा!!! ही नवीन माहिती मिळाली. आणि भारतात मिळत असतील ब्लॅक बीन्स माझ्यामते.
7 Dec 2013 - 9:52 pm | रेवती
मस्त!
8 Dec 2013 - 12:07 am | मुक्त विहारि
मस्त!
8 Dec 2013 - 12:39 am | अविकुमार
स्स्स्स्स...मस्तच...'चिपोटले'च्या 'बरिटो बोल' ची आठवण झाली. अगदी सेम टू सेम. चव तर अशी भन्नाट की आठवूनच तोंपासू. ऊसगावातले अर्धे दिवस तर हाच पदार्थ लंच म्ह्णून रोज खाल्ला होता, विशेष म्हणजे मांसाहाराचे वावडे नसतानाही..किंबहुना आवडच असूनही... हा व्हेज पदार्थ नेहमीच त्या आवडीवर मात करत असे.
नक्कीच घरी बनवणार! सार क्रीम आणि ब्लॅक बिन्सचं तेवढं जमवावं लागेल. पुण्यात शोधाशोध करतोच आता.
8 Dec 2013 - 5:44 am | wrushali kulkarni
अगदी बरोबर 'चिपोटलेच' तीच रेसिपी करायचा प्रयत्न केला आहे. जवळ जवळ जमली आहे. पण चिपोटले ची चव भन्नाटच असते.
8 Dec 2013 - 10:00 am | सोत्रि
असे वाटणे सहाजिकच आहे. कारण ह्या डिशच्या नावात जरी बरितो असले तरीही हा बरितोचा एक उपप्रकार आहे.
बरितो म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या 'तॉर्तिला' मध्ये बीन्स, बफ/चिकन्/पोर्क, रेड सॉस ह्याचे स्ट्फिंग करून बनवलेला रोल.
'बरितो बाउल' ह्या व्हेरिएशन प्रकारात मुख्य बरितोमधील स्ट्फिंग भाताच्या बेसवर पसरवून सर्व्ह केले जाते. ह्यात तॉर्तिला वापरला जात नाही. हा प्रकार 'टेक्स-मेक्स' ह्या अमेरिकन-मेक्सिकन प्रकारात मोडतो म्हणजे मेक्सिकन खाद्यपदार्थावर 'अमेरिकन संस्कार' कारण मेक्सिकोत बरितो मध्ये भात वापरत नाहीत.
-(खादाड) सोकाजी
8 Dec 2013 - 10:19 am | अर्धवटराव
वापरतात बहुतेक. बिन भाताचं स्टफींग म्हणजे टॅकॉ (पापडी किंवा पोळी वापरुन) किंवा एंचीलादाचे प्रकार.
9 Dec 2013 - 3:58 am | wrushali kulkarni
हो तुमचे बरोबर आहे. हा फोटो burrito wrap चा आहे. आणि हा तोर्टिया गव्हाच्या पिठाचा नाही तर मकाच्या पिठाचा असतो आणि भात असतोच .पापडी मध्ये जे असते त्याला 'टॅको बेल' म्हणतात.त्यात भात नसतो.
9 Dec 2013 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सगळं माहितीपूर्ण आहे, फोटो झकास.
-दिलीप बिरुटे
9 Dec 2013 - 11:19 am | दिपक.कुवेत
आणि चविष्ट पाकॄ दिसतेय. ब्लॅक बीन्स एवजी राजमा वापरुन करुन बघीन.