मक्याचा उपमा
साहित्य -मक्याची ४ कणसे, चांगले तूप २ चमचे ,जीर चवीनुसार ,२ हिरव्या मिरच्या ,थोडी कोथिम्बिर,दुध १ कप .मीठ चवीनुसार , (वाफवलेले मटार ,गाजर ,फ्लावर ई . घालू शकतो).
कृती -मक्याची कणस किसणीवर किसून घेणे . मिरची बारीक चिरू नये ,तिखट लागल्यास काढून टाकता येते . कोथिंबीर बारीक चिरणे ,gas on करून ,कढइत तूप जीर व मिरच्या घालून या फोडणीत किसलेला मका घाला व उलथल्याने नीट परतवून घ्या,मका शिजत असतांना एक कप दुध घालावे ,चवी नुसार मीठ घालावे ,नीट परतत रहावे ,एक ताटली ठेवून वाफ आणावी . gas बंद करावा व serve करावे .
ही कृती ४ झणांसाठी आहे.
प्रतिक्रिया
4 Sep 2013 - 10:40 am | आदूबाळ
फो टो ओ
4 Sep 2013 - 11:23 am | पैसा
मिपावर स्वागत आहे. पाकृ चांगली लागत असावी. फोटो दिला असतात तर नक्की कशी दिसते त्याचा अंदाज आला असता.
4 Sep 2013 - 12:03 pm | रुमानी
आपले स्वागत...!
पाकृ छान. ...फोटो कुठेय हो ? :(
हा उपमा मि पण करते पण मिळुनयेण्या करीता थोडे चनाडाळ भिजवुन जाड्सर वाटुन त्या सोबत वाफवते. :)
4 Sep 2013 - 12:29 pm | मदनबाण
फोटो ?
फोटो नसेल तर प्रतिक्रिता देताना मी कंजुषपणा करतो ! ;)
4 Sep 2013 - 6:35 pm | कवितानागेश
छान लागेल.
पण फोटो हवाच.
4 Sep 2013 - 9:04 pm | मुक्त विहारि
झक्कास..
4 Sep 2013 - 9:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाककृचा फोटो पाहिल्याशिवाय आम्ही काहीही बोलत नाही. क्षमस्व.
-दिलीप बिरुटे
5 Sep 2013 - 5:22 am | स्पंदना
अरेच्या त्यात दुध आणी कशाकरता? मक्याच्या कणसांन बरच दुध असतं. कणस किसत असताना सगळ चिकचिक होतं ना?
आम्हे करतो हा उपमा अन अश्याच फोडणीचा पण मक्याचे दाणे काढुन,भाजुन, हलकेच झेझरुन आम्ही उसळ्ही बनवतो. मस्त लागते.
आता कॉर्न आणने आलं.
5 Sep 2013 - 8:32 am | निवेदिता-ताई
मस्त लागतो हा उपमा....पण त्यात दुध नाही घालत आम्ही.
6 Sep 2013 - 2:34 pm | त्रिवेणी
मिपावर आपले स्वागत.