पानकी हा गुजराथी पदार्थ आपल्य मराठमोळ्या पानगी सारखाच आहे. आपण पानगी बनवताना तांदूळाच्या पिठीत चवीपुरते मीठ घालून भाकारीपेक्षा थोडे पातळ पिठ दुध घालून भिजवून घेतो. केळीच्या पानावर थापून, पानासकट तव्यावर टाकून, वरुन दुसरे पान लावून भाजून घेतो. गोडाची पानगी करायची असल्यास पिठात गुळ मिक्स करून वरीलप्रमाणे भाजून घेतो.
गुजराती पानकी तांदळाच्या पिठाची ही बनवतात फक्त पद्धत वेगळी आहे , आपण मुगाच्या डाळीची बनवणार आहोत.
साहित्यः
१ वाटी पिवळी मुगाची डाळ ४-५ ताज भिजवून घेणे
२ टेस्पून बेसन
दीड टेस्पून दही
२-३ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
चवीप्रमाणे मीठ
१/४ टीस्पून हिंग
१ टीस्पून लिंबाचा रस
१ टेस्पून तेल
२ टीस्पून फ्रुट सॉल्ट
बारीक चिरलेली कोथींबीर
केळीची पाने (स्वच्छ धुवून, पुसून घेणे)
पाकृ:
मिक्सरच्या भांड्यात मुगाची डाळ, दही व मिरच्या एकत्र करुन, थोडे पाणी घालून मुलायम वाटून घ्यावे.
वाटलेल्या मिश्रणात हिंग, मीठ, कोथींबीर, तेल व बेसन घालून एकत्र करावे. बेसानाच्या गुठळ्या राहता कामा नये.
त्यात लिंबाचा रस व फ्रुट सॉल्ट घालून हलक्या हाताने एकजीव करावे.
केळीच्या पानाला तेलाने ग्रीज करावे व पान नॉन-स्टीक तव्यावर ठेवावे.
त्यात डावभर मिश्रण घालून पान मधून घडी करावे व अलगद दाबावे.
एका बाजूने पूर्ण भाजले गेले की उलटवून दूसरी बाजू ही भाजून घ्यावी.
हवे असल्यास पानातून पानकी अलगद काढून सर्व्हिंग प्लेटमध्ये ठेवावी किंवा असेच पानासकट ठेवावे.
गरम पानकी पुदिनाच्या चटणी बरोबर किंवा आंब्याच्या लोणच्याबरोबर सर्व्ह करावे.
नाश्त्यासाठी पौष्टीक असा पदार्थ आहे :)
प्रतिक्रिया
12 Aug 2013 - 5:58 pm | भावना कल्लोळ
ए ए ए …. खल्लास, सानिकाचा निषेध असो !! किती ग कॉम्प्लेक्स देशील आम्हाला.घसा कोरडा झाला आता तो. पा. सु करून करून.
12 Aug 2013 - 5:59 pm | त्रिवेणी
नेहमी प्रमाणे मस्त फोटो, पण सध्या खूप गोड खावेसे वाटत असल्याने,मी गोडची पानगी करून खाईन म्हणते.
13 Aug 2013 - 4:44 am | स्पंदना
?????
12 Aug 2013 - 6:07 pm | पैसा
नेहमीची प्रतिक्रिया! सानिका दुष्ट आहे!
12 Aug 2013 - 6:11 pm | दिपक.कुवेत
चला आता केळीची पानं आणायला हवीत....
12 Aug 2013 - 6:12 pm | गणपा
पहिल्या फोटोत उजवीकडे वरच्या कोपर्यातला पदार्थ दिसल्याने योग्यतो परिणाम साधला गेला आहे. ;)
12 Aug 2013 - 6:33 pm | अनन्न्या
पानकी मस्त दिसतेय.
12 Aug 2013 - 8:02 pm | Mrunalini
वा.... मस्तच गं... तुला हि केळीची पाने कुठे मिळाली??? इथे बघायला पण मिळत नाहित.
14 Aug 2013 - 8:23 pm | सानिकास्वप्निल
अगं चायनीज किंवा थाय ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळतात केळीची पाने :)
12 Aug 2013 - 9:04 pm | रमेश आठवले
सानिका यांचे फोटो नेहमी प्रमाणेच खूप छान आहेत.अमदावाद मध्ये law गार्डन जवळच्या स्वाती रेस्टोरन्त मध्ये पानकी हा पदार्थ मेनू मध्ये आहे. तसे या रेस्टोरन्त मधील सर्वच पदार्थ जरा हटके आहेत. तेथे कायम क्यू असतो.
12 Aug 2013 - 9:13 pm | सूड
अंमळ जळजळ झाली.
13 Aug 2013 - 1:46 am | प्रभाकर पेठकर
चला एखाद्या सकाळी नाश्त्याला काय करावे हा प्रश्न मिटला. नक्कीच करून पाहीन.
13 Aug 2013 - 9:41 am | रुमानी
मस्त....!
13 Aug 2013 - 10:03 am | यशोधरा
आम्ही पातोळ्या बनवतो तसेच आहे आहे हे साधारण.
पातोळ्या हा गोडाधोडाचा पदार्थ आहे मात्र.
13 Aug 2013 - 5:58 pm | मुक्त विहारि
खपलो...
13 Aug 2013 - 6:03 pm | सुहास झेले
काय बोलावे !!!! :) :)
14 Aug 2013 - 11:52 am | कवितानागेश
मस्तय पदार्थ. नक्की करुन बघेन.
मूग आणि बेसन दोन्ही घातलय म्हनजे एक खाल्ल्यावरच पोट भरेल.
17 Aug 2013 - 10:28 am | चिंतामणी
नेहमी प्रमाणे
(खात्री आहे. भावना पोहोचल्या असतील)
17 Aug 2013 - 12:05 pm | जागु
वा मस्तच.
19 Aug 2013 - 4:09 pm | मदनबाण
पानकी अगदी पाना सारखी पातळ झालेली दिसत आहेत. :)
19 Aug 2013 - 7:14 pm | भ ट क्या खे ड वा ला
तांदुळाच्या पिठाची दुध गुळाची गोड पानगी ,आणि आंबट ताक ,हिरवी मिरची /फोडणीची मिरची घालून केलेली तिखट पानगी आणि वर लोण्याचा गोळा असा मेनू माहित आहे ,मिळतो अधु न मधून खायला
पण हा प्रकार माहित नव्हता ,नक्की करायला सांगेन आणि मदत हि करीन