साहित्यः
१७५ ग्राम बटर (रुम टेंपरेचरला असलेले)
१७५ ग्राम साखर
२०० ग्राम Self-Raising Flour (किंवा २०० ग्राम मैदा+ १ टेस्पून बेकिंग पावडर एकत्र करुन घेणे)
५० ग्राम बदामाची पावडर (मी सालींसकट बदामाची पावडर वापरली आहे)
३ अंडी (रूम टेंपरेचरला असलेली)
दीड टेस्पून लिंबाचे साल किसलेले
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
१/४ वाटी दूध (गरज लागल्यास)
पाकृ:
ओव्हन १७० डिग्री सें वर प्री-हीट करण्यासाठी सेट करावा.
मिक्सींग बाऊलमध्ये साखर व बटर एकत्र करुन ईलेक्ट्रीक बीटर ने हलके व क्रिमी होईपर्यंत फेसावे.
त्यात एक अंडे घालून मिश्रण फेटावे, असे एक-एक करुन बाकीची दोन अंडी घालून फेटत रहावे.
व्हॅनिला एसेन्स व किसलेले लिंबाचे साल घालून एकत्र करावे.
मिश्रणात चाळून घेतलेले Self-Raising Flour व बदामाची पावडर घालून लाकडी चमाच्याने किंवा स्पॅट्यूलाने मिश्रण फोल्ड करावे.
मिश्रण जर घट्ट वाटले तर थोडे-थोडे दूध घालून एकत्र करावे.
साधारण चमच्याने सहज लपका पडेल असे मिश्रण असावे.
केक लोफ-टीनला बेकिंगपेपर लावून घ्यावा.
त्यात मिश्रण ओतून व्यवस्थित पसरवून घ्यावे.
प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १७० डीग्री सें वर ५०-५५ मिनिटे बेक करावे.
केक पूर्ण बेक झाला का स्क्युअरने टोचून पहावे.
केक टीनमध्येच १५ मिनिटे गार होऊ द्यावे.
नंतर बेकिंग पेपर काढून केक कुलिंग रॅकवर पूर्ण गार होण्यासाठी काढून ठेवावा.
केक गार झाल्यावर त्यावर थोडी पिठीसाखर गाळणीने भुरभुरून घ्यावी व स्लाईसेस करावे.
हा केक तुम्ही असाच किंवा व्हिप्ड क्रिम, चॉकलेट सॉस किंवा चहा - कॉफीबरोबर ही सर्व्ह करु शकता.
प्रतिक्रिया
19 May 2013 - 11:36 pm | जेनी...
वॉव !
20 May 2013 - 12:39 am | मोदक
मस्त मस्त...
ओ तुमच्या स्किल चा लै लै हेवा वाटतो राव!!
__/\__
20 May 2013 - 1:11 am | प्यारे१
__/\__
क्या बात, क्या बात, क्या बात!
20 May 2013 - 1:19 am | यशोधरा
सुरेख दिसतो आहे केक.
20 May 2013 - 2:23 am | प्रभाकर पेठकर
व्वा. मस्त आहे केकची पाकृ. शेवटची दोन्ही छायाचित्र अप्रतिम.
20 May 2013 - 2:29 am | अभ्या..
केक तर एक नंबर हाय सानिका. भारीच एकदम.

पण फोर्कचे स्टेन्सील वापरुन केलेल्या साखरकामाबद्दल हे सुपरलेटीव्ह भारी. :)
20 May 2013 - 8:08 am | स्पंदना
धन्यु. मला फाऽऽऽर आवडतो मदेरा केक.
आत्ताच बनवेते.
20 May 2013 - 10:35 am | दिपक.कुवेत
फोटो सुद्धा टेम्टिंग...
20 May 2013 - 10:38 am | अक्षया
पाकृ आणि फोटो मस्तच. :)
20 May 2013 - 10:54 am | पैसा
फस्कल्लास!
20 May 2013 - 12:00 pm | आदूबाळ
सानिकातै, हा स्पॅनिश प्रकार आहे का हो?
20 May 2013 - 12:13 pm | प्रभाकर पेठकर
छे: 'मदिरा' हा शुद्ध भारतिय शब्द आहे. ह्.घे.
20 May 2013 - 12:11 pm | सूड
दिसत नाहीयेत.
20 May 2013 - 12:18 pm | ५० फक्त
तुमच्याकडं स्वयंपाक आणि तुमच्या नव-याकडं फुड फोटोग्राफी शिकायला यावं म्हणतो, गुरुकुलात अॅडमिशन कधी सुरु होतात.
घरात पाणी भरणे (पंप सुरु करणे),रुम हिटर चालु बंद करणे,अशी मेहनतीची कामं करायची तयारी आहे माझी.
फॉर्म पाठवुन द्यावा ही नम्र विनंती.
20 May 2013 - 12:29 pm | स्पंदना
नको!!
तुम्ही तिची सगळी भांडी अन चमचे पळवाल. :-/
%)
20 May 2013 - 3:15 pm | ५० फक्त
नाही हो, आमच्या एका चमच्यावर समाधान आहे.
चमच्यांना नसते दु:ख, चमच्यांना सुखही नसते|
ते वाहतात जे सारे, ते तुमचे ओझे असते ||
21 May 2013 - 5:48 am | स्पंदना
:-)) :-))
चमच्यांना नसतो चटका, चमच्यांना चवही नसते
ते वाहतात जे घास, ते तुमचे माझे असती.
20 May 2013 - 3:20 pm | सानिकास्वप्निल
तुम्ही केव्हाही या ओ त्यासाठी कुठल्या घरगुती मेहनतीची कामं करायची गरज नाही ...
आणी हो पदार्थांचे फोटो मीच काढते ओ ५० फक्त कधीतरी तुम्ही ह्याचे क्रेडिट मला द्या ;)
20 May 2013 - 6:05 pm | ५० फक्त
अरे मला माहित नव्हतं फोटोंचं, मला वाटलं तसं लिहिलं की प्रतिसाद कसा स्त्री पुरुष समानतेच्या बाजुने सुद्धा संतुलित होईल, म्हणुन तसं लिहिलं.
'कुठल्या घरगुती मेहनतीची कामं करायची गरज नाही ..'' म्हणजे, बागेत गवत कापायला नाहीतर जंगलात ससे किंवा हत्ती पकडायला पाठवणार मला बहुतेक. नाहीतर त्या एका शिष्योत्तमासारखं तु नदी आडवुन धर आम्ही मासे पकडतो म्हणाल.
20 May 2013 - 6:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
असे कसा विचार करता हो तुम्ही ५० फक्त...
अहो या निमित्ताने मस्त एका फी मधे दोन कोर्सची (पाकॄ आणि फोटोग्राफी) डब्बल बेनिफिट स्कीम मागायची सोडून स्वयंपीडनाच्या आयडिया स्वतःहून सुचवताय ! ;)
21 May 2013 - 10:41 am | मोदक
कृपया पाककृतींच्या धाग्यावर (त्यातही सानिकाच्या) ससे वगैरे 'टेस्टी' प्राण्यांचा विषय काढू नये.
५० - तुम्हाला लै शंका ब्वा..
20 May 2013 - 12:26 pm | सौंदाळा
मस्त!!
मी मधात बुडवुन / मध लावुन खाणार:)
20 May 2013 - 12:33 pm | त्रिवेणी
मला पार्सल करा ना प्लीज
20 May 2013 - 1:12 pm | निवेदिता-ताई
मस्तच
20 May 2013 - 1:19 pm | सुहास झेले
...... !!!!
_/\_ _/\_ _/\_
20 May 2013 - 3:43 pm | रेवती
यापुढं सानिकेच्या पाकृंना प्रतिसाद देणं बंद करायला हवं. कौतुक तरी किती करायचं? ;)
20 May 2013 - 4:01 pm | भावना कल्लोळ
सानिका तेवढा ५% रकमेचा धनादेश पाठवून दयाला विसरू नकोस हो… :)
20 May 2013 - 5:16 pm | धनुअमिता
खुप छान.
केक हा आवडीचा प्रकार आहे.
21 May 2013 - 9:02 am | मॄदुला देसाई
फोटो आणि पाकृ जबरदस्त...मला आणि माझ्या पिल्लुला हा केक खुप आवडतो त्यामुळे नक्की करणार :)
21 May 2013 - 9:11 am | अत्रुप्त आत्मा
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआआअ...............
मे..................लो!!!!
खला...............स!!!!!
21 May 2013 - 10:38 am | nishant
फोटो आणि पाकृ आवडली :)
21 May 2013 - 12:09 pm | कच्ची कैरी
मस्त !! मस्त !!,मस्त !!!