अननसाचा मुरांबा

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
29 Apr 2013 - 3:27 pm

चार दिवसापूर्वीच माहेरी जाणं झालं, आणि तिकडे सुंदर अननस मिळाले. अननस पाहिल्यावर आठवलं, खूप दिवसात मुरांबा केलाच नाही! Ananas
साहित्य: थोडा कमी तयार अननस, साखर, लवंग, वेलची दाणे.
कॄती: अननसाचे साल आणि मधला कडक भाग काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी करून घ्याव्या. अननसाच्या फोडी कुकरला एक शिटी करून वाफवून घ्याव्या. जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर घ्यावी. साखर बुडेल इतके पाणी घालून पाक करण्यास ठेवावा. वाफवलेल्या फोडीना सुट्लेले पाणी पाक करताना त्यात घालावे. पाकाचा थेंब डीशमध्ये टाकून पहावा. ओघळ आला नाही, म्हणजे त्यात वाफवलेल्या अननसाच्या फोडी , लवंग, वेलची दाणे घालून परत मिश्रण आट्वावे. आता आधीप्रमाणेच डीशमध्ये थेंब टाकून पहावा. गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावा.
काचेच्या बरणीत ठेवल्यामुळे मुरांबा चांगला टिकतो, आणि रोज समोर दिसतो सुध्दा!Ananas

प्रतिक्रिया

सानिकास्वप्निल's picture

29 Apr 2013 - 3:44 pm | सानिकास्वप्निल

तोंपासू :)

सूड's picture

29 Apr 2013 - 3:49 pm | सूड

आम्ही हा मुरांबा करताना अननस वाफवत नाही, अननसाचे तुकडे साखरेत तास दोन तास मुरत ठेवतो आणि मग त्याला पाणी सुटलं सरळ कढवायला घेतो. हापूस आंब्याचा अशाच प्रकारे मुरांबा करता येतो.

ढालगज भवानी's picture

29 Apr 2013 - 6:58 pm | ढालगज भवानी

वा!! पद्धत छानच वाटतेय वाचून. हापूसचा मुरंबा मेले!!! काय टेरीफीक लागत असेल!!!

मोदक's picture

29 Apr 2013 - 9:30 pm | मोदक

याच पद्धतीने केलेला स्ट्रॉबेरीचा मुरांबा लै भारी लागतो. :-)

विसोबा खेचर's picture

29 Apr 2013 - 3:55 pm | विसोबा खेचर

मस्त..
जियो...!

गणपा's picture

29 Apr 2013 - 3:59 pm | गणपा

मस्तच,
शिजवून घेणे हा शॉर्ट्कट असावा, त्यामुळे मुरांबा लवकर मुरत असावा.
लोणची मुरांबे हे पदार्थ पारंपारीक पद्धतीने मुरल्यावर त्यांची लज्जत खुलते, असं माझं वैयक्तिक मत आहे.
बाकी लहान असताना या मुरांब्यांनी नाकी नऊ आणले होते. डब्यात काही देण्यारासखं नसलं की मग आई चपात्यांच्या घडीत मुरांबा घालुन देत असे. त्याच्या रसामुळे चपात्या एकदम लीबलीबीत होऊन जात. शिवाय तो रस डब्याच्या बाहेर येउन आमचा गृहपाठ पण तपासत बसायचा. ;)

धनुअमिता's picture

29 Apr 2013 - 4:07 pm | धनुअमिता

आवडला........
कधी केला नाही कि खाल्लासुद्धा नाही.पण नक्की करुन बघणार.

पियुशा's picture

29 Apr 2013 - 4:11 pm | पियुशा

मस्त तो.पा.सु !

बाळ सप्रे's picture

29 Apr 2013 - 4:26 pm | बाळ सप्रे

दिसतोय छानच
पण अननसाचा मुर(आंबा) कसा ? मुरननस म्हणायला हवं ! :-)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2013 - 5:01 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआ http://www.easyfreesmileys.com/smileys/free-tongue-smileys-792.gif

सहीच.. तोंपासु. करुन बघायला पाहिजे.

छान झालाय. फोटू आवडला. कुकरला अननस शिजवून घेण्याची पद्धत आवडली. मी आधी अननसाच्या फोडी व निघणारे ज्यूस यामध्ये लागल्यास अर्धीवाटी पाणी घालून पातेल्यात शिजवून घेत असे. मग पाकात घालणे वगैरे. यापुढे तुमच्या पद्धतीने करून पाहीन.

स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स..... आत्ताच समोर हवाय असं वाटतय :(
दुसरा फोटो तु किती अंतरावरणं काढलायस ग????

अनन्न्या's picture

29 Apr 2013 - 7:46 pm | अनन्न्या

फोटोबद्द्द्ल विचारू नको, मला त्यातले काहीच समजत नाही. माझ्या मोबाइलला हा असा बय्रापैकी येतो फोटो! मला कॅमेय्राचे सेटींग काही समजत नाही. आता शिकते आहे, शेवटी मिपावर फोटो पोस्ट करायचे म्हणजे सगळा अभ्यास पाहिजेच!

अनन्न्या's picture

29 Apr 2013 - 6:54 pm | अनन्न्या

पण फोडी सुरवातीपासून साखरेबरोबर शिजवल्या तर त्या थोड्या कडक होतात, आणि मी त्या पध्दतीने केला की साखर पडते बय्राचदा! अर्थात मला त्याचे टायमिंग बरोबर कळत नसेल. माझी आई साखर मिसळूनच शिजवते, सूडनी सांगितलेल्या पध्द्तीने!

ढालगज भवानी's picture

29 Apr 2013 - 6:59 pm | ढालगज भवानी

सुरेख फोटो!!

सुहास झेले's picture

29 Apr 2013 - 8:17 pm | सुहास झेले

लई भारी.... :) :)

प्यारे१'s picture

29 Apr 2013 - 8:32 pm | प्यारे१

अनन्याने केलेला हा 'मुर-अनन्यास' नावाचा अन्याय आम्ही अन्योक्ति न करता आवडला असे अधिकृतपणे जाहीर करतो.

अनन्न्या's picture

29 Apr 2013 - 9:09 pm | अनन्न्या

कॄतीचे अनुकरण करून मनसोक्त हादडून तॄप्त व्हा असे अधिकृतपणे जाहीर करते.

इन्दुसुता's picture

30 Apr 2013 - 8:32 am | इन्दुसुता

उत्कृष्ट ... पाकृ अतिशय आवडली. १५ दिवसात लहान भाचा येणार आहे सुट्टीला .. त्याच्यासाठी करणार.

दिपक.कुवेत's picture

30 Apr 2013 - 11:19 am | दिपक.कुवेत

शेवटचा फोटो तोंपासु :)

दीपा माने's picture

30 Apr 2013 - 11:43 am | दीपा माने

कधी पाहीला/खाल्ला नाही पण खुपच छान दिसतोय.

पाककृती आहे होय. मला वाटलं विडंबन.

मस्त आहे मुरांबा... :)

आता कुठे फोटोसह धागे पोस्ट करता यायला लागलेत. इथे विडंबन टाकायचे म्हणजे आपले विडंबन होणार नाही याची काळ्जी घेता आली पाहिजे.

प्रभाकर पेठकर's picture

1 May 2013 - 10:07 am | प्रभाकर पेठकर

अतिंम पदार्थ (मोरंबा) फारच आकर्षक दिसतो आहे.

ह्यावर, पातळ केलेले, साजूक तुप घालून खाण्यास अधिक मजा येते.

पैसा's picture

1 May 2013 - 6:45 pm | पैसा

रंग पण खासच आलाय!

अजितजी's picture

1 May 2013 - 7:12 pm | अजितजी

कधी कधी पाहुणे येणार असतील तर, वाटीभर दही , त्यात खोबर कोथिंबीर , हिरवी मिरची , मीठ आणि ह्या अननसाच्या फोडी घालून रायते करता येते....अप्रतिम लागते!

अजो's picture

1 May 2013 - 7:19 pm | अजो

घरात अननस होतेच. आज करून पाहिले. पहिल्यांदाच केले म्हणून अगदी थोड्या प्रमाणात केले. एकदम छान झाले आहे. खुप खुप धन्यवाद्.

प्रकाश जनार्दन तेरडे's picture

4 May 2013 - 11:46 am | प्रकाश जनार्दन तेरडे

च्छान आहे!!!!!!!!!!

श्रिया's picture

4 May 2013 - 12:56 pm | श्रिया

छान आहे पाकृ आणि फोटोतला मुरांबासुद्धा!

कच्ची कैरी's picture

6 May 2013 - 1:29 pm | कच्ची कैरी

मला नक्किच आवडेल हा मुरंबा .

इन्दुसुता's picture

7 Jul 2013 - 10:33 am | इन्दुसुता

मुरांबा करून पाहिला. लहान मोठ्या सर्वांनाच खूप आवडला.

मुरांबा छानच आहे. पारंपारिक पद्धतीने केल्यास उत्तम चव लागेल.