पानगी आणि मिरचीच्या लोणच्याची चर्चा वाचली आणि मिरचीच्या लोणच्याची कृती लिहावी वाटले. आजच मी चकली वर हीच रेसिपी टाकली होती.
साहित्य:
१ ते सव्वा कप हिरव्या मिरचीचे तुकडे (१ सेमी)
३ टेस्पून मिठ किंवा चवीनुसार
१/३ कप मोहोरी पावडर (लाल मोहोरी)
१/२ टेस्पून हिंग
फोडणी: १/४ कप तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद
१०-१२ मेथी दाणे
कृती:
१) मिरचीला आधी मिठ, हिंग लावून ठेवावे.
२) तेल तापवावे. त्यात आधी मेथीदाणे तळून घ्यावेत. बाहेर काढून कुटावेत आणि मिरचीमध्ये घालावेत.
३) त्याच तेलात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. हि फोडणी थंड होवू द्यावी.
४) फोडणी थंड झाली कि मिरचीमध्ये ओतावी, मोहोरी पावडर घालावी. सर्व निट मिक्स करून घ्यावे.
५) स्वच्छ व कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीत हि मिरची भरून ठेवावी. ८ ते १० दिवस मुरू द्यावी.
सर्व्ह करताना आयत्यावेळी लिंबाचा रस घालावा.
प्रतिक्रिया
10 Sep 2008 - 1:02 am | प्राजु
तोंडाला इतकं पाणी सुटलं आहे की बस्स!!
सह्ही फोटो. चकलीताई इतका सह्ही फोटो टाकला आहेस ना की लगेच मिरचीचा तुकडा उअच्लून तोंडात टाकावा असे वाटते आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Sep 2008 - 1:02 am | धनंजय
असेच म्हणतो.
10 Sep 2008 - 1:04 am | चतुरंग
कळफलक ओला झाला! =P~
चतुरंग
10 Sep 2008 - 3:09 am | रेवती
काय हे चकलीताई? भयंकर अस्वस्थपणा आलाय. हे लोणचे मुरल्यावर दहीपोह्यांबरोबर किंचित तोंडी लावायला मस्त! दडपे पोहे तर धन्यं होतात ह्या लोणच्याच्या स्पर्शाने!
रेवती
10 Sep 2008 - 2:24 pm | पद्मश्री चित्रे
मस्स्त..
करून पाहिलं पाहिजे..
10 Sep 2008 - 6:43 pm | स्वाती राजेश
काय मस्त रेसिपी आहे.....चवदार...:)
फोटो सुद्धा मस्त,
स्वच्छ व कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीत हि मिरची भरून ठेवावी. ८ ते १० दिवस मुरू द्यावी.
मुरेपर्यंत राहिल का बरणीत?
11 Sep 2008 - 12:45 am | चकली
सर्वांना प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद !
चकली
http://chakali.blogspot.com
11 Sep 2008 - 11:39 am | विसोबा खेचर
चकली,
लै भारी अन् चटपटीत पाकृ टाकली आहेस! :)
आपला,
(मिरचीप्रेमी) तात्या.
11 Sep 2008 - 11:44 am | मनस्वी
तोंडाला पाणी सुटले.. मस्त पाकृ.. धन्यवाद चकली!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *