नमस्कार मंडळि,
आता लवकरच भारतात आंब्याचा सीजन चालु होईल तेव्हा खालील बर्फि हि तमाम आंबा आणि पनीर प्रेमींसाठि.
साहित्यः
१. आंब्याचा पल्प / ताजा रस - १.५ वाटि (ताजा असेल तर मिक्सर मधे एकदा फिरवुन घेणे जेणेकरुन गुठळ्या राहणार नाहित)
२. ताजं पनीर / क्युब्स - १ वाटि (क्रश करुन/किसुन)
३. खवा - १ वाटि
४. साखर किंवा नेस्ले स्वीट कंन्डेस्ड मिल्क - आवडिप्रमाणे कमी / जास्त (आंबा कितपत गोड आहे त्या प्रमाणात)
५. तुप - १.५ पळि
६. वेलची पुड - १/२ चमचा
७. सजावटिसाठि बदाम, पिस्ता पुड किंवा तुमच्या आवडिचे ड्राय फ्रुटस
कॄती:
१. मध्यम आचेवर एका नॉनस्टिक कढईत / पातेल्यात तुप तापले कि त्यात खवा आणि किसलेल पनीर घालुन परतावे
२. खवा / पनीर चांगल परतल कि त्यात आंबा पल्प घालुन मिश्रण एकजीव करावे
३. सतत परतावे नाहितर पल्प, खव्यामुळे मिश्रण खाली चिकटण्याची शक्यता आहे
४. एक ८-१० मि. परतलं कि त्यात आवडिप्रमाणे साखर/कंन्डेस्ड मिल्क घालाव व परतत रहावे
५. एक ५-६ मिनटानी साखर विरघळली कि मिश्रणाचा गोळा होईल
६. आता त्यात वेलची पुड, आवडिचे ड्राय फ्रुटस घालुन एक ४-५ मि. गॅस बंद करावा
७. गरम मिश्रण तुप लावलेल्या थाळित काढावे व सगळिकडे एकसारखे पसरुन घ्यावे
८. पुर्ण गार झाल्यावर वडया ह्व्या त्या आकारात कापुन आंबामिश्रित पनीर बर्फिचा लुफ्त घ्या; इतरांना द्या :)
प्रतिक्रिया
2 Mar 2013 - 4:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त दिसतंय...
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
2 Mar 2013 - 4:39 pm | अक्षया
मस्त दिसते आहे बर्फी, अंबा, पनीर आणि खवा काँबीनेशन छानच.
नक्की करुन बघणार.
2 Mar 2013 - 4:42 pm | पैसा
या दुष्टाला ब्यान करा रे!
4 Mar 2013 - 8:23 am | ५० फक्त
ही जाहीर मागणी मी दिपक यांच्या पहिल्याच धाग्यात केली होती, आता मा.संपादक माझ्याबरोबर आहेत म्हणल्यावर लगेच एक स्टेज,फ्लेक्स आणि टोप्या करुन घेतो आंदोलनासाठी.
2 Mar 2013 - 7:32 pm | अनन्न्या
लगेच करून पाहीन.
2 Mar 2013 - 7:50 pm | Mrunalini
वा... छान.... तुम्हाला पनीर खुप आवडते वाटते.. ;)
3 Mar 2013 - 4:57 am | दीपा माने
सुंदर आणि नाजुक वडी पाहुनच तोंडात विरघळेल. इथे अमेरिकेत आंबा बाराही महीने मिळतो पण आपल्या आंब्यासारखी चव नसते. भारतीय ग्रोसरीस्टोअर्समध्ये उत्तम आंबरस डब्यातला मिळतो. तोच वापरु म्हणते. पाकृबद्दल आभार.
3 Mar 2013 - 6:31 pm | सानिकास्वप्निल
आंबा - पनीर बर्फी छानच दिसत आहे:)
सुंदर
3 Mar 2013 - 7:09 pm | बॅटमॅन
फार जीवघेणा फटू!!!
3 Mar 2013 - 7:16 pm | सूड
आहाहा !! कातिल फोटू आहे राव.
3 Mar 2013 - 11:26 pm | अत्रुप्त आत्मा
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स..............!!!!!!!!!!!!!!!!!
4 Mar 2013 - 11:59 am | कच्ची कैरी
आंबा आवडत फळ असल्याने हा पदार्थही आवडेल :)
http://mejwani.in/
4 Mar 2013 - 12:46 pm | दिपक.कुवेत
लोक्स! करा, खा आणि खिलवा! मस्त खा आणि फिट रहा!
4 Mar 2013 - 12:55 pm | निवेदिता-ताई
अहाहा...............अतिशय सुंदर......आंबा बर्फी सगळ्यात जास्त आवडते.............:)
4 Mar 2013 - 1:06 pm | जयवी
झक्कास :)
4 Mar 2013 - 5:17 pm | किसन शिंदे
मस्तंच!
फोटू लय भारीय राव.
4 Mar 2013 - 5:19 pm | यशोधरा
मस्त फोटो! बर्फी उचलून खावीशी वाटते आहे.