पनीर - पिस्ता बहार...

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
14 Feb 2013 - 11:39 am

नमस्कार मंडळि,

कालची गणेश जयंती आणि आजचा प्रेमदिवस हा दुहेरी संयोग साधुन खालील पाकॄ केली....बाप्पा आणि बायको दोघेहि खुश......अरे हाय काय नाय काय!

सर्व मिपाकरांना प्रेमदिनाच्या हर्दिक शुभेच्छा!

Paneer-Pista

साहित्यः
१. किसलेलं पनीर - २ वाटया
२. पीठिसाखर - आवडिप्रमाणे कमी / जास्त
३. वेलची पुड - पाव चमचा
४. पिस्ता पुड - १ वाटि मध्यम
५. खायचा रंग - आवडिप्रमाणे कुठलाहि
६. बदाम काप - सजावटिसाठि

कॄती:
१. पनीर ताजं मिळालं तर उत्तम. मी अमुलचे फ्रोजन क्युब्स वापरले. फ्रोजन क्युब्स वापरणार असाल तर ते थोडया वेळ गरम पाण्यात ठेवा म्हणजे मउ होतील. मउ झाले कि किसुन घ्या किंवा हातानी कुस्करुन घ्या.
२. आता एका भांडयात/बाउल मधे किसलेल पनीर घ्या आणि हळुवार हातानी रगडत रहा.....अगदि पार त्याचा (पनीरचा) पॄष्ठभाग स्मुथ/गुळगुळित होईस्त.....एक साधारण १०-१२ मि.
३. आता त्यात आवडिप्रमाणे पिठिसाखर घालुन परत एकदा मळा. एक ५-७ मि. मिश्रणाचा गोळा होईल
४. आता त्याचे दोन भाग करा. एक भाग पांढरा ठेवा आणि दुस~या भागात आवडता रंग घाला. मी दोन प्रकार केले.

प्रकार १:
१. पिवळ्या पनीरच्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करा. आता पांढ~या पनीरचा थोडा मोठा गोळा हातावर घेउन पसरा. त्यात अलगद पिवळा गोळा ठेवा. बाजुच्या सर्व कडा एकत्र करुन गोलाकार वळा. पिस्त्याच्या पुड मधे हा गोळा घोळवुन बाजुला ठेवा

प्रकार २:
१. एका वाटित २ मोठे चमचे पिस्त्याची पुड, चवीप्रमाणे पिठिसाखर, वेलची पुड एकत्र करा. त्यात अगदि गरजेप्रमाणे दुध घालुन गोळा करा (दुध अगदि १ ते १.५ चमचा पुरलं)
२. आता पिवळ्या पनीरचा गोळा हातावर घेउन पसरा. त्यात अलगद पिस्त्याचा गोळा ठेवा. बाजुच्या सर्व कडा एकत्र करुन गोलाकार वळा.

५. वरिल दोन्हि प्रकार फ्रिज मधे जरा सेट होण्यासाठि ठेवा म्हणजे पनीर थोडं घट्ट होईल. लगेच सर्व करणार असाल तर जास्त वेळ ठेउ नका नाहितर पनीर खुप कडक होईल. पण दुस~या दिवशी खाणार असाल तर सर्व करण्याआधी एक १०-१५ सेकंद मायक्रोव्हेव मधे गरम करा.

६. एक १५-२० मि. सेट झाले कि बदामाचे काप घालुन सर्व करा :)

प्रतिक्रिया

श्रिया's picture

14 Feb 2013 - 11:43 am | श्रिया

एक नंबर! फोटो बघूनच खल्लास.

अक्षया's picture

14 Feb 2013 - 11:56 am | अक्षया

वाचनखुण साठवण्यात आली आहे.

क्रान्ति's picture

14 Feb 2013 - 12:13 pm | क्रान्ति

खास फोटो आलाय! देखणी आहे पाकृ अगदी आणि अर्थातच झक्कास!

पैसा's picture

14 Feb 2013 - 12:16 pm | पैसा

पाकृ अन फोटो दोन्ही झक्कास!

मृत्युन्जय's picture

14 Feb 2013 - 12:20 pm | मृत्युन्जय

फोटो बघुन जीव गेला हो दीपकभाइ. अगदीच जीवघेणा प्रकार आहे हा.

इरसाल's picture

14 Feb 2013 - 12:29 pm | इरसाल

मणुक्श अतिशेय भ्याणक हाए !

आम्ही पण अमुलचेच क्युब आणले होते पण ते पालक-पनीरात गेले.

सूड's picture

14 Feb 2013 - 12:55 pm | सूड

अतिशय देखणी पाकृ. आम्हाला असलं काही कधी करता येणार देव जाणे !! ;)

bharti chandanshive१'s picture

14 Feb 2013 - 3:19 pm | bharti chandanshive१

पाकृ अन फोटो दोन्ही सुन्दर

स्ल्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प्प्प्प्प्प्प्प्प्प झक्कास !

विशाखा राऊत's picture

14 Feb 2013 - 3:43 pm | विशाखा राऊत

नुसता फोटो बघुनच वाटले काहीतरी भन्नाट दिसत आहे

अशक्य आहेस तू राव.
लै भारी. :)

तर्री's picture

14 Feb 2013 - 4:23 pm | तर्री

हलकट पणा - दुसरे काय ? जाहीर निषेध हया पाकृ चा
....जळून जळून भस्म झाले !

परिकथेतील राजकुमार's picture

14 Feb 2013 - 4:28 pm | परिकथेतील राजकुमार

पनीर आणि बहार हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द एकत्र पाहून अंमळ मौज वाटली.

अनन्न्या's picture

14 Feb 2013 - 5:36 pm | अनन्न्या

बायको खूश ना? हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!!!

दिपक.कुवेत's picture

14 Feb 2013 - 7:12 pm | दिपक.कुवेत

लोक्स...

मदनबाण's picture

14 Feb 2013 - 8:06 pm | मदनबाण

आहाहा... फोटो पाहुन उगाच सगळ्या बंगाली मिठाया डोळ्या समोरुन नाचुन गेल्या ! ;)
सोपी आणि शॉलिट्ट पाकॄ वाटली. :)

(पनीर प्रेमी):)

अश्फाक's picture

14 Feb 2013 - 8:45 pm | अश्फाक

गनपा भौ आम्ही तुमचे फॅन , पन दीपक शेठ सोलीड टक्कर देउ र्हायले .

माय स्वीट स्वीट हनी बनी दीपक काका ...
काकुला खुश करतो पणिर खायला घालुन ... :)
ओह माय स्वीट हनी बनी दीपक काका
आम्हाला जळवतो नुस्तेच फॉटु दाखवुन ... :-/

काका हापिसात कवा जाता वो ??? :( :P

:D

अहाहा......प्रेमदिनाला अगदी साजेसा पदार्थ !!
जियो दीपक :)

nishant's picture

14 Feb 2013 - 9:37 pm | nishant

एकदम tempting दिसतय... तोंपासु :)

मराठे's picture

14 Feb 2013 - 9:38 pm | मराठे

आई ग्ग! मेलो!

दिपकशेठ, कसली जबरी मिठाई आहे. मिठाई आणि व्हॅलेंटाईनचे औचित्य बघून जरा वेगळाच विचार मनात आला. असो.

- पिंगू

अहो काय फोटो टाकता हो तुम्ही :(
कुठे फेडाल???
नाही खरच सुंदर असतात आपले फोटो.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Feb 2013 - 12:27 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/cook/perfecto.gif

किसन शिंदे's picture

15 Feb 2013 - 12:34 am | किसन शिंदे

शॉल्लीडच!

पाककृती विभागात दिपक्.कुवेत हे नावं दिसलं की आता हाथ सवयीने माऊसकडे वळतात आणि काही विचार करायच्या आतच धागा उघडला जातो. ;)

अग्निकोल्हा's picture

15 Feb 2013 - 3:11 am | अग्निकोल्हा

हेच म्हननार होतो.

एखादी बंगाली प्रकारातली मिठाई वाटते आहे. भारीच हो कुवेतकर!

५० फक्त's picture

15 Feb 2013 - 8:53 am | ५० फक्त

मस्त रे एकदम, मजा आली फोटो पाहुनच.

हासिनी's picture

15 Feb 2013 - 10:13 am | हासिनी

धन्यवाद, एका चांगल्या पाकृ.दिल्याबद्दल.
फोटो एकदम मस्त.
पाकृ सुरेख! करुन पहायलाच हवी.
:)

कालच पाकॄ करुन पाहिली. मी गुलाबी रंग वापरला होता. फारच छान झाली. :)
धन्यु दिपक.

सानिकास्वप्निल's picture

15 Feb 2013 - 12:09 pm | सानिकास्वप्निल

वेगळीच आणी तितकीच सुंदर पाकृ :)

धनुअमिता's picture

15 Feb 2013 - 1:30 pm | धनुअमिता

साष्टांग नमस्कार तुम्हांला
खरच खुप सुंदर पाककृती आहे.