कॉकटेल लाउंज : माइ ताइ (इयर एंड स्पेशल)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
31 Dec 2012 - 10:29 am

एका जबरदस्त कॉकटेलनी 2012 ह्या वर्षाची सांगता करुयात.

तर 'कॉकटेल लाउंज' मधले, 2012 इयर एंड स्पेशल कॉकटेल आहे माइ ताइ (Mai Tai).

पार्श्वभूमी:

माइ ताइ हे नाव वाचून , "ताइ माइ अक्का विचार करा पक्का" ह्या निवडणूक घोषणेची आठवण होऊन, मला 2014 च्या निवडणुकींची बाधा झाली की काय असा विचार तुमच्या मनात आला असेल, येऊही शकतो किंवा नसेलही! काय आहे, कोणाच्या मनात काय यावे ह्यावर माझा ताबा थोडीच असणार आहे, काय? तर असो, ह्या कॉकटेलची पार्श्वभूमी अगदी चित्तवेधक आहे.

पहिल्या महायुद्धानंतर आणि दुसर्‍या महायुद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत अमेरिकेत, युद्धात शस्त्रसामग्री विकून मिळालेल्या अमाप पैशामुळे, अनेक बदल, स्थित्यंतरे होत होती, सुधारणा होत होत्या. अमेरिकन्स नव्या नव्या कल्पनांच्या भरार्‍या घेऊन नवनिर्माणाचे कार्य मनापासून करीत होते. त्याच काळात अमेरिकेत 'टिकी संस्कृती'चा (Tiki Culture) प्रभाव पडला होता. त्या प्रभावाखाली रेस्तराँ आणि बार ह्यांची रचना पॅसिफिक महासागराच्या दक्षिणेला असलेल्या पॉलिनेशिआ ह्या द्वीपसमूहांतील रेस्तराँ आणि बारच्या धर्तीवर (Polynesian-themed) केली जाऊ लागली. डॉन बीच (Donn Beach) ह्या त्या टिकी पब्ज आणि बार याचा जनक समजला जातो.


(हे छाचि विकीपिडीयावरून साभार)

पुढे व्हिक्टर ज्यूल्स (Victor Jules Bergeron) ह्या इसमाने त्याच्या 'ट्रेडर विक्स (Trader Vic's)' या टोपणनावाने एक टिकी रेस्तराँ आणि बार सॅन फ्रॅंसिस्को, कॅलिफोर्निया येथे चालू केला. हाच व्हिक्टर ज्यूल्स 'माइ ताइ' ह्या कॉकटेलचा जनक मानला जातो. पण डॉन बीचने सुरुवातीला हे कॉकटेल हा त्याचाच शोध असल्याचा दावा केला होता. पण त्याची कॉकटेल सामग्री आणि कॉकटेलची चव बरीच वेगळी असल्याने तो दावा पुढे फोल ठरला.

पण मला अजूनही तुमच्या चेहेर्‍यावर असलेले भले थोरले प्रश्नचिन्ह दिसते आहे आणि तो प्रश्नही मला कळतो आहे की, 'माइ ताइ' हेच नाव का आणि कसे?

सांगतो! त्याचे काय झाले की व्हिक्टर जुल्सने त्याचा पहिला ट्रेडर विक्स हा रेस्तराँ आणि बार चालू केल्यावर एका दुपारी त्याला त्याचे काही ताहिती मित्र ताहिती आयलंडवरून (पॉलिनेशियामधील एक द्वीप) भेटायला आले होते. त्यांच्यासाठी स्पेशल ड्रिंक म्हणून त्याने, रम आणि कुरास्सो लिक्युअर वर आधारित एक शीघ्ररचित (Improvised) कॉकटेल तयार केले. ते कॉकटेल प्यायल्यावर त्याचा ताहिती मित्र एकदम खूश होऊन ताहितीमध्ये अत्यानंदाने उद्गारला "Maita'i roa ae!". त्याचा अर्थ 'Very good! Out of this world!' म्हणजेच 'एकदम फर्मास, कल्पनेपलीकडचे!'. त्याच्या त्या उद्गारांचेच नाव ह्या कॉकटेलला मिळाले, 'माइ ताइ'.

चला, आता बघूयात ह्या कल्पनेपलीकडच्या कॉकटेलची रेसिपी.

प्रकार
रम ऍन्ड कुरास्सो लिक्युअर बेस्ड कॉकटेल

साहित्य

डार्क रम
1.5 औस (45 मिली)

व्हाइट रम
1.5 औस (45 मिली)

क्वांथ्रो (कुरासाओ लिक्युअर)
0.5 औस (15 मिली)

अमारेतो (आल्मन्ड लिक्युअर)
0.5 औस (15 मिली)

लिंबाचा रस
10 मिली

ग्रेनेडाइन
10 मिली

बर्फ

लिंबचा काप सजावटीसाठी (अननसाचा असल्यास उत्तम)

ग्लास
ओल्ड फॅशन्ड ग्लास

कृती:

कॉकटेल शेकर मध्ये अर्धा शेकर भरून बर्फ भरून घ्या. वरील सर्व साहित्य कॉकटेल शेकर मध्ये ओतून घ्या.
शेकरवर बाहेरून बाष्प येईपर्यंत व्यवस्थित शेक करून घ्या.

आता ते मिश्रण ओल्ड फॅशन्ड ग्लासमध्ये ओतून घ्या. माइ ताइ परिपूर्ण करण्यासाठी ह्या मिश्रणावर डार्क रमचा एक थर असणे जरुरी आहे.
बार स्पून वापरून डार्क रमची एक धार त्या मिश्रणावर सोडून द्या.

आता ग्लासवर लिंबाचा एक काप सजावटीसाठी लावून घ्या.

चला तर, कल्पनेपलीकडचे माइ ताइ तयार आहे :)

तुम्हा सर्वांना नविन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नविन वर्षाचे स्वागत ह्या धडाकेबाज कॉकटेलच्या साथीने साजरे करा.

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

31 Dec 2012 - 12:36 pm | माझीही शॅम्पेन

नविन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...

लेख खल्लास

अत्रुप्त आत्मा's picture

31 Dec 2012 - 12:46 pm | अत्रुप्त आत्मा

मद्याचार्य सोकूनाना झिंदाबाद.... :-) ३१ डिसेंबर जिंदा-बाद ;-)

स्ट्राँग दिसते आहे. एका कॉकटेलमधे ४५+४५+१५+१५ = कमीजास्त अल्कोहोल कंटेटचे १२० मिली मद्य.
दोनतीन घेतल्यावर पार्टीत आयमाय निघू नये म्हणजे झालं.. ;)

बोका-ए-आझम's picture

31 Dec 2015 - 7:44 pm | बोका-ए-आझम

असा दाट (Tom Yum Soup एवढा दाट) संशय आहे!

नववर्षाच्या स्वागताला साजेशी दिसतीये.

स्पंदना's picture

31 Dec 2012 - 7:45 pm | स्पंदना

यावेळी बराच इतिहास लिहिला गेलाय या कॉकटेलचा.
पण खरच नाव वाचुन माइ ताई ऐवजी ताईमाइ हेच आठवल.

असो फोटो छान. करुन बघणार नाही, पण तुमच्या कलाकारीला दाद.

पैसा's picture

31 Dec 2012 - 8:05 pm | पैसा

फोटो मस्त सोत्रिअण्णा!

नव्या वर्षाच्या अर्थातच हार्दिक शुभेच्छा!

अनन्न्या's picture

31 Dec 2012 - 8:33 pm | अनन्न्या

नवीन वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा!!

वामन देशमुख's picture

2 Jan 2013 - 4:59 pm | वामन देशमुख

टेबलक्लॉथवरचा प्राणी ड्रिंक प्यायला झेप घेऊ पाहतोय की काय?

सोत्रि's picture

31 Dec 2015 - 5:51 pm | सोत्रि

सरत्या इंग्रजी वर्षाच्या संध्येवर हा धागा वर काढतोय!

सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

- (साकिया) सोकाजी

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Dec 2015 - 6:35 pm | कैलासवासी सोन्याबापु

ई ना चोलबे सोत्रिजी,

नवा गड़ी नवे राज्य नियमानुसार इसबार नया कॉकटेल मंगताय !

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Dec 2015 - 8:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

सोत्रिअण्णांनी बर्‍याच दिवसांनी हजेरी लावली, पण... जोरदार हजेरी लावली ! थ्री चिअर्स !!!

सूड's picture

31 Dec 2015 - 8:10 pm | सूड

जुनाच आहे हो धागा!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Dec 2015 - 9:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा, हा ! वाचण्याच्या भरात ३१/१२/२०१५ असे वाचले होते =))

काॅकटेल मस्तच आहे पण अल्कोहोल कंटेंट माईताईला झेपणारी नाही :)
फोटो बघून चिअर्स केल्या जाईल!

सोत्रि's picture

31 Dec 2015 - 9:15 pm | सोत्रि

चीयर्स!

- (साकिया) सोकाजी

बोका-ए-आझम's picture

31 Dec 2015 - 10:59 pm | बोका-ए-आझम

हाकानाका!