कॅमेरा आणि बेसिक फोन या बद्दल

गणेशा's picture
गणेशा in काथ्याकूट
15 Oct 2012 - 5:45 pm
गाभा: 

१.
या दिवाळीला १ डीजीटील कॅमेरा घेण्याचे मनात आहे.. परंतु जास्त काही त्यातील कळत नसल्याने येथे चर्चासत्र ओपन करत आहे.
तसे गुरुघंटाल यांचा मागील धागा ओपन केला, परंतु slr कॅमेरा बद्दल तो धागा होता, आणि त्यात मिपाच्या नविन रुपड्या मुळे की काय प्रतिसादा मध्ये काहीच दिसत नव्हते..

तसे पाहिले तर, आधी SLR कॅमेराच घेण्याचा ठरले होते 550 D.

परंतु, कॅमेरातील आणि त्यातही मॅन्युल मोड चे काहीच जास्त माहिती नाही.. पुन्हा असे ऐकुन आहे की.. १५-२०००० ची लेन्स घ्यावे लागतात त्या कॅमेराला पुन्हा.. हे सगळे बजेट च्या बाहेर वाटल्याने आणि त्यातही हौशी फोटुग्राफर या टाईपात मोडत असल्याने मी पुन्हा आपल्या कॉम्प्क्ट कॅमेराकडे वळालो.. ट्रेकींग भटकंतीला पण तेव्हडेच खिशात बाळगता येणारा कॅमेरा असा पण एक उपाय लगेच डोळ्यासमोर आलाच..

पण काही केल्याने योग्य कॅमेराची निवड होत नाहीहे.. मिपावरच बर्‍याच जनांकडुन सोनी कॅमेराचे कलर्स जास्त भडक असतात असे वाचले होते.. त्यामुळे त्या ब्रॅम्ड ला मी राम राम ठोकला.

आता माहीती असलेले कॅनॉन आणि निकॉन ..

पण कॅनॉन पॉवर्शॉट की निकॉन कुलपिक्स यात पुन्हा गफलत ..
तरी त्यातल्या त्यात
कॅनॉन sx500 IS/50x/30x
आनि निकॉन कुलपिक्स p510 / 800c with android os
हे प्रकार पाहिले.

तरीपण कन्फ्युजन आहेच..
माझे बजेट २०,००० - २२,०००

तुम्हाला चांगले वाटलेले कॅमेरे येथे शेअर करताल का ? वरील पैकी किंवा इतर कुठला कॅमेरा चांगला आहे हे सांगुन माझा प्रश्न सोडवण्यात मदत होयील अशी अपेक्षा..

२. घरच्यांसाठी बेसिक मोबाईल घेण्याचा विचारात आहे तुम्ही बेसिक फोन सुचवताल का.
कॉल येण्ये -जाणे आणि बॅटरी बॅकअप चांगला ह्या दोन गोष्टी त्यात हव्यात बस्स.
बजेट एका फोनसाठी १५०० ते २२००

नोकिआ चे आधीचे बेसिक फोन छान होते .. आता जुने फोन मिळत नाहिये आणि नविन चांगले वाटत नाहोयेत.

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

15 Oct 2012 - 5:50 pm | किसन शिंदे

काय हे गणा?
एका आयटी कुंपनीत काम करणार्या तुला असे प्रश्न पडावेत याचं आश्चर्य वाटतं. ;)

काही लिंका वाचून अभ्यास करावा

http://www.dpreview.com/

http://imaging-resource.com/

http://www.jjmehta.com/

http://www.snapsort.com/

(तुला हापिसात लिंका दिसणार नाहीत हे माहित असल्यामुळेच) कॅनन किंवा निकॉन यापैकी कुठलातरी एक ब्रॅन्ड पक्का करून क्यामेरा बेधडक घेउन टाकावा. उगा जास्त विचार करत बसू नये.

मृत्युन्जय's picture

15 Oct 2012 - 6:13 pm | मृत्युन्जय

http://www.canon.co.in/personal/products/compact-cameras/powershot/power...

वरचा घे. PowerShot SX500 IS

एक नंबर आहे.

पैसा's picture

15 Oct 2012 - 6:20 pm | पैसा

अगदी बेसिक मोबाईल हँडसेट्सच्या किंमती आता १००० च्या आतबाहेर आहेत. त्यात जरा बरा कॅमेरा, ड्युअल सिम, टॉर्च, एफ एम, आणि ५/६ दिवस चालणारी बॅटरी असलेला मायक्रोमॅक्स एक्स २६३ चागला आहे. किंमत १७०० रुपये. या बजेटमधे तुला अनेक चांगले हँडसेट्स मिळतील. नोकियाचा नाद सोडून दे! ते पण आता चीनमधे बनवलेलेच हँडसेट्स विकतात.
http://www.flipkart.com/mobiles/price-range/below+rs.2000

इथे तुला असले बरेच फोन बघायला मिळतील.

दादा कोंडके's picture

15 Oct 2012 - 6:41 pm | दादा कोंडके

नोकियाचा नाद सोडून दे! ते पण आता चीनमधे बनवलेलेच हँडसेट्स विकतात.

मला वाटतं बहुतांश सगळ्याच कंपनीचे हँदसेट्स चीन मध्ये तयार होतात.

चीन मध्ये "प्रोड्यूस" न झालेल्या आणि अमेरीकेत "डीझाईन" न झालेल्या इलेक्ट्रीक/इलेक्ट्रॉनीक वस्तू मिळवणं अंमळ अवघड आहे.

श्रीरंग_जोशी's picture

15 Oct 2012 - 7:20 pm | श्रीरंग_जोशी

हा सल्ला अमेरिकेत राहणार्‍यांनी मानला तर आदिम काळात परत जावे लागेल ;-).

नेपाळ व बांग्लादेशमार्गे तस्करीच्या मार्गाने आलेल्या स्वस्त चिनी खेळण्यांची तुलना सर्व आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणार्‍या कंपन्यांच्या उत्पादनांशी (जे चीनमध्ये बनविले जातात) करणे बरोबर नाही.

गणेशा - तूझ्या गरजांनुसार मिररलेस कॅमेरा घेणे हा एक इष्ट पर्याय आहे. मी स्वतः गेले काही महिन्यांपासून हा कॅमेरा समाधानाने वापरतोय.

पैसा's picture

16 Oct 2012 - 8:41 pm | पैसा

म्या त्येच लिवलाय वं!

ते पण आता चीनमधे बनवलेलेच हँडसेट्स विकतात

दादा कोंडके's picture

16 Oct 2012 - 9:39 pm | दादा कोंडके

हो पण मग त्यामुळे त्यांचा नाद सोडून देण्याचा सल्ला देण्याचं प्रयोजन कळलं नाही.

पैसा's picture

16 Oct 2012 - 10:36 pm | पैसा

एकेकाळी नोकियाचा दबदबा होता. आता तो राहिला नाही. १० वर्षांपूर्वी माझ्याकडे पहिला फोन हँडसेट अमेरिकेत तयार झालेला मोटोरोला सी ३५० होता, तो अजून नीट चालतो आणि मला फार आवडतो. मग दुसरा हँडसेट मारे नोकियाचा एन७२ घेतला. (ही २००७-८ ची गोष्ट) त्याच्या डब्यावर 'मेड इन चायना' चं लेबल पाहिलं आणि धक्का बसला. तो फोन गेल्या वर्षी खंप्लीट डेड झाला, दुरुस्ती होत नाही म्हणे. आता चिनी बनावटीचा फोन पाहिजे असेल तर त्याहून स्वस्तातले दुसरे बरेच आहेत की!

दादा कोंडके's picture

16 Oct 2012 - 11:46 pm | दादा कोंडके

पण नोकिया सारख्या कंपन्यांच्या प्लांट चीन, ब्राझील किंवा भारत कुठेही असला तरी फरक पडत नाही कारण त्यांच्या क्वालीटी प्रोसेस सारख्याच असतात.

श्रीरंग_जोशी's picture

17 Oct 2012 - 12:12 am | श्रीरंग_जोशी

आम्हा गरिबांचे बरे असते बुवा यापेक्षा, २००५ साली प्रथमच भ्रमणध्वनी वापरायला सुरुवात केली. तेव्हा घेतलेला ११०८ अजूनही व्यवस्थित चालतोय. बॅटरी लौकर डाउन होते पण आता लोडशेडिंगही कमी झालेच की ;-).

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Oct 2012 - 6:35 pm | विश्वनाथ मेहेंदळे

चीन मध्ये बनलेला म्हणजे वाईट क्वालिटी या समजाबद्दलच आक्षेप आहे हो. अमेरिकेत मिळणाऱ्या ९०% वस्तू या लो कॉस्ट देशात बनलेल्या असतात तुम्ही अगदी अमेरिकेतून कॅमेरा किंवा laptop आणलात तरी तो चीन मध्ये बनलेला असण्याची शक्यता दांडगी आहे.

तुम्ही दोन वस्तू वापरल्यात त्यातली अमेरिकेत बनलेली टिकली आणि चीन मध्ये बनलेली टिकली नाही, यावरून तसा तर्क काढू नये. सांख्यिकी दृष्ट्या, २ ही sample space खूपच छोटी आहे.

मिपाच्या भाषेत, चष्मा बदला ;-)

पैसा's picture

18 Oct 2012 - 2:03 pm | पैसा

चीनमधला वाईट असे मी म्हणत नाहीये. तर नोकिया म्हणजे चांगलाच असं नाही हे सांगतेय! नोकियाच्या ब्रँडसाठी ९००० आणि नाव नसलेल्या जवळपास त्याच सुविधा असलेल्या फोनची किंमत २००० असेल आणि दोन्ही चीनमधे बनलेले असतील तर महागडा फोन कशाला घ्यावा म्हणते मी! म्हणजे तीन एक वर्षांत फोन बाद झाला तर निदान जास्त पैसे फुकट गेल्याचं दु:ख नको! एकाच किंमतीचे नोकिया, सॅमसुंग आणि मायक्रोमॅक्सचे फोन पाहिले तर सॅमसुंग जास्त चांगल्या सुविधा देतो तर मायक्रोमॅक्स सर्वात जास्त सुविधा देतो. अशा वेळी मी तरी नोकिया घेणार नाही!

कपिलमुनी's picture

19 Oct 2012 - 10:23 am | कपिलमुनी

जेव्हा एखादी नामांकीत कंपनी जेव्हा काम करून घेते , तेव्हा ठरलेल्या नॉर्म नुसार क्वालिटी चेक कर्रोन घेते ..

उदा . नोकिया चा २ मेगापिक्सेल कॅमेरा आणि मायक्रोमॅक्सचा २ मेगापिक्सेल कॅमेरा यांच्या क्वालिटी मधे फरक पडतो

तुम्ही सजेस्ट केलेला मोबाईल, नोकिआ आणि सॅमसंग यांच्या बेसिक फोन पेक्षा खरेच छान आहे.. नेटवरती १४५० किंमत आहे.. मला ३ मोबाईल घ्यायचे असल्याने १३५० पर्यंत डिल केल्यास हा पर्याय आवडला आहे.
अवेलॅबिलीटी मात्र चेक करतो.

धन्यवाद..

कॅमेरा बद्दलच्या रिप्लाय बद्दल सर्वांचे आभार..
मी पण चेक करत आहेच त्याबद्दल..
आत्ताच.. ezone मध्ये गेलो होतो.
निकोन पी ५१० आणि कॅनॉन एस एक्स ४० होता तेथे.
दोघांमध्ये केनॉन ची कॉलीटी फोटो मध्ये छान वाटली.. सगळ्या दृष्टीने.

त्यामुळे आता फक्त कॅनॉन या ब्रँड वर शिक्का मोर्तब करत आहे..

५० एस एक्स पण लॉन्च होतो आहे या महिन्यात बघु.. नाहीतर ५०० आय एस अजुन पाहिला नाहिये मी, मृत्युंजय यांच्या म्हणण्याबद्दल तो पण सर्च करत आहे.

धन्यवाद

मालोजीराव's picture

16 Oct 2012 - 9:16 pm | मालोजीराव

नोकियाचा नाद सोडून दे! ते पण आता चीनमधे बनवलेलेच हँडसेट्स विकतात.

बरोबर आहे ! चीन,तैवान सोडुन इतर देशात हँडसेट्स बनवुन तेवढ्या कमी किमतीत विकणे जवळ्पास अशक्य आहे.

पुष्कर जोशी's picture

22 Oct 2012 - 2:31 am | पुष्कर जोशी

हा फोन कसा वाटतो ... ३००० मध्ये 3.5G आणि Wi-Fi Hot Spot LINK

पुष्कर जोशी's picture

22 Oct 2012 - 2:51 am | पुष्कर जोशी

म्या हा फोन १.५ महिन्या पासून वापरतोय उत्तम आहे बघा... म्या लिहिलेला review पण पहा...

काही उत्तम मुद्दे
Java Phone, 650Mhz Processor, 512 MB ram, (यामुळे वेगवान)
3.5G, 7.2 MBPS पर्यंत, Wi-Fi Hotspot, (वेगवान अंतरजालाचा अनुभव)
Front & Rear Cam, Video Calling,
80-90 % Java Soft Support :) जावा मध्ये whats App & Bluetooth चालत नाही :(

आणि किंमत ३००० रु.

कपिलमुनी's picture

15 Oct 2012 - 6:58 pm | कपिलमुनी

कॅनन चा ११०० डी घ्या ... बेसिक लेन्सने सुद्धा चांगले फोटो येतात

मॅन्युअल मोड चे काहीच ज्ञान नाही, आणि जर दूरवरचे फोटो काढायचे असल्यास ह्या एसएलआर ला लेन्स लागेलच असे वाटते.
त्यामुळे हा पर्याय मी सोडला.. नाहीतर ११०० डी, निकॉन डी ३१००/३२००, ५५० डी ह्या पैकी एक सिलेक्ट करणार होतो.
आणि हौस म्हणुन सगळे लगेच शिकणे अवघड वाटत आहे.

धन्यवाद

चौकटराजा's picture

15 Oct 2012 - 7:02 pm | चौकटराजा

माझेकडे टी झेड २५( पॅनासॉनिक) हा कॅमेरा आहे. त्यात सोयी भरपूर उदा. त्रिमिती फोटो फुल एच डी व्हिडेओ वगैरे पण कॅमेरे दहा वर्षे वापरल्यानंतरही मला असे वाटते की जो पर्यंत आपल्याला टोन टिंट, कॉनट्रास्ट , कलर सॅचुरेशन ई कल्पना नुसत्या मेंदूत नाही तर नजरेत बसेपर्यंत अतिउत्तम कॅमेर्यातून फारसे काही साध्य होत नाही. संयमाने विचारपूर्वक एक्सपोजर देणे प्रवासात जमत नाही. व ते उत्तम फोटोग्राफचे बेसिक आहे. तो संयम उच्च दर्जाच्या फोटो ग्राफरकडे असतोच!

हे सगळं ठीक आहे... पण तू काढलेले फटू तरी तुला दिसतील का रे इथे...? ;-)

(अवांतर प्रतिसाद वाटू शकतो - कारण तो अवांतरच आहे)

अन्या दातार's picture

17 Oct 2012 - 11:35 am | अन्या दातार

कॅमेराने काढलेले फोटो तुला कॅमेरात तरी दिसतील का असे न विचारल्याबद्दल ;-)

राजेश घासकडवी's picture

16 Oct 2012 - 3:48 am | राजेश घासकडवी

तुम्हाला काय प्रकारची फोटोग्राफी करायची आहे त्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जर मुख्यत्वे घरगुती फोटो आणि काही प्रमाणात प्रवासाचे, आणि इतर किंचित कलात्मक फोटो काढायचे असतील तर मी कॅनन पॉवरशॉट एस९५ सुचवतो. बहुतेक कंडिशन्समध्ये अत्यंत सुंदर फोटोग्राफ्स येतात. मी ट्रायपॉडवरच्या आणि काही हॅंडहेल्ड फोटोंची अगदी झूम इन करून चांगल्या कॅमेरांच्या फोटोशी तुलना केली आहे - फार थोडे फरक जाणवतात. संपूर्ण मॅन्युअल मोडसुद्धा आहे. त्यावर म्हटलं तर सीरियस फोटोग्राफी करता येते. या एवढ्याशा कॅमेरात एचडीआर मोडदेखील आहे. पण सगळ्यात मोठा फायदा म्हणजे खिशात टाकून केव्हाही कुठेही जाता येतं. त्यामुळे अधिक फोटो काढले जातात.

वाचक's picture

16 Oct 2012 - 5:59 am | वाचक

अतिशय उत्तम कॅमेरा आहे, शिवाय आता (थोडे) जुने मॉडेल असल्यामुळे स्वस्तात मिळू शकेल. सगळीकडे रिव्ह्यूज ४/५ स्टार आहेत, डोळे झाकून घेणे - अर्थात तुम्हाला हवा तितका झूम मात्र नाही - फक्त ४X आहे.

अँग्री बर्ड's picture

18 Oct 2012 - 9:23 am | अँग्री बर्ड

Nikon P510 घ्या. मी स्वतः वापरतोय. शिवाय तुमच्या बजेट मध्ये बसणारा आहे, घेण्यापूर्वी एकदा किंमत सांगा, मी विचारून बघतो. मुंबईला फोर्ट मध्ये ललीत मध्ये, पुण्यात दगडूशेटजवळ कीर्ती जनरल स्टोअर मध्ये किंमत विचारा. ऑनलाईन मागवू नका, महाग पडेल.

श्रीरंग_जोशी's picture

18 Oct 2012 - 9:55 am | श्रीरंग_जोशी

आज महागडा पॉइंट & शूट घेशील अन मग काही महिन्यांनी इतरांचे मिररलेस पाहिले की वाइट वाटेल.
तसाही तू किमतीकडे फारसे बघत नाहीसच ;-).

लॉरी टांगटूंगकर's picture

18 Oct 2012 - 10:05 am | लॉरी टांगटूंगकर

मिररलेस का घ्यावा?,मिररलेस चा फायदा काय??

श्रीरंग_जोशी's picture

18 Oct 2012 - 10:35 pm | श्रीरंग_जोशी

मिररलेस हे कॅमेऱ्यांमधले नवे तंत्रज्ञान आहे. त्याने बनलेले कॅमेरे गेल्या काही वर्षांपासून उपलब्ध आहेत.

त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, डिएसएलआर सारखी गुणवत्ता व सुविधा (१००% बरोबरी होईल असे नाही, पण हौशी छायाचित्रकारांना पुरेल एवढी नक्कीच) पण कॅमेऱ्याचे आकारमान बरेच लहान, वजन कमी. बरेचदा मध्यम आकाराच्या पॉइंट & शूट एवढी बॉडी व थोडी लांब लेन्स असे. वजनही बरेच कमी असते. त्यामुळे डिएसएलआर हाताळताना होणाऱ्या गैरसोयींपासून सुटका होते.

या कॅमेऱ्यांमध्ये ऑलिंपस कंपनीने प्रथम आघाडी घेतली नंतर इतरांनीही तसे कॅमेरे आणले आहेत. सोनीचे मिररलेस इंटरचेंजेबल लेन्स कॅमेरे भरपूर चालताहेत असे दिसते. मीही काही महिन्यांपूर्वी सोनी नेक्स ५एन घेतलाय अन आजवरचा अनुभव उत्तम आहे. सोनीकडून बऱ्याच लेन्स देखील उपलब्ध आहेत.

विकी, जाल व युट्यूब वर मिररलेस कॅमेरे व त्यांची डिएसएलआर बरोबर तुलना या विषयांवर भरपूर माहिती आहे.

त्यामुळे मी गणेशाला सल्ला दिला की, आज दुसरा काही महिन्यांनी इतरांकडे मिररलेस कॅमेरे दिसतील तेव्हा संधी गमावल्यासारखे वाटेल. जसे कोअर २ ड्युओ नवा आलेला असताना अधिक क्षमतेचा महागडा पेंटीयम ४ घेतल्यावर झाले असते.

इरसाल's picture

18 Oct 2012 - 9:56 am | इरसाल

शक्य असेल तर आताच लेन्सवाला कॅमेरा घे कारण आता जर पॉइंट अ‍ॅन्ड शुट घेतला तर नंतर कधी कधी असे वाटते की लेन्सवाला घेतला असता तर बरे झाले असते.

प्रचेतस's picture

18 Oct 2012 - 10:02 am | प्रचेतस

सहमत आहे.
तुझे बजेट २०००० आहेच. कॅननचा ११००डी २४००० रूपयांत येतो विथ १८-५५ किट लेन्स.

५० फक्त's picture

18 Oct 2012 - 1:05 pm | ५० फक्त

आगाउ प्रामाणिक सल्ला,

सध्या तरी मोठ्या ऑप्टिकल झुम आणि जास्त वाईड लेन्स असलेला पॉईंट अँड शुट घ्या,एक लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जेवढ्या सुविधा जास्त तेवढे लफडे जास्त,टच स्क्रिन / जिपिएस ची गरज नसते, निदान सुरुवातीला तरी, त्यावर ३-४ वर्षे घालवा मग डिएसएलआरचा विचार करा. सध्याचे पि&एस आणि डिएसेस्लारच्या बॉर्डरवरचे कॅमेरे ट्राय करा, काही पि&एस, एकदम बजेट डिएसएलाआरच्या तोंडात मारणारे आहेत आणि मिळणा-या सुविधा फक्त १०% कमी असतात, म्हणजे रॉ फाईल आउटपुट मिळत नाही वगैरे, पण रॉ फाईल एवढ्या प्रचंड साईझच्या असतात की तुम्हाला ६ तरी मेमरी कार्ड ठेवावी लागतील + ३ बॅटरीचे सेट + दोन चार्जर, पुन्हा त्या रॉ फाईल तुम्ही एडिट करणार आहात का रंगदुकानात घालुन तेवढा वेळ आहे का तुमच्याकडे ? वर मासं वल्ली यांनी दिलेल्या लिंकातली शेवटची लिंक बघा, खुप उत्तम साईट आहे ती.

आशु जोग's picture

20 Oct 2012 - 12:49 am | आशु जोग

>> रंगदुकानात घालुन

येथे पेंटशॉप मधल्या शॉपचा अर्थ दुकान नसुन शाळा असा आहे.
जसे वर्कशॉप.