मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कॅमेरा आणि बेसिक फोन या बद्दल

गणेशा · · काथ्याकूट
१. या दिवाळीला १ डीजीटील कॅमेरा घेण्याचे मनात आहे.. परंतु जास्त काही त्यातील कळत नसल्याने येथे चर्चासत्र ओपन करत आहे. तसे गुरुघंटाल यांचा मागील धागा ओपन केला, परंतु slr कॅमेरा बद्दल तो धागा होता, आणि त्यात मिपाच्या नविन रुपड्या मुळे की काय प्रतिसादा मध्ये काहीच दिसत नव्हते.. तसे पाहिले तर, आधी SLR कॅमेराच घेण्याचा ठरले होते 550 D. परंतु, कॅमेरातील आणि त्यातही मॅन्युल मोड चे काहीच जास्त माहिती नाही.. पुन्हा असे ऐकुन आहे की.. १५-२०००० ची लेन्स घ्यावे लागतात त्या कॅमेराला पुन्हा.. हे सगळे बजेट च्या बाहेर वाटल्याने आणि त्यातही हौशी फोटुग्राफर या टाईपात मोडत असल्याने मी पुन्हा आपल्या कॉम्प्क्ट कॅमेराकडे वळालो.. ट्रेकींग भटकंतीला पण तेव्हडेच खिशात बाळगता येणारा कॅमेरा असा पण एक उपाय लगेच डोळ्यासमोर आलाच.. पण काही केल्याने योग्य कॅमेराची निवड होत नाहीहे.. मिपावरच बर्‍याच जनांकडुन सोनी कॅमेराचे कलर्स जास्त भडक असतात असे वाचले होते.. त्यामुळे त्या ब्रॅम्ड ला मी राम राम ठोकला. आता माहीती असलेले कॅनॉन आणि निकॉन .. पण कॅनॉन पॉवर्शॉट की निकॉन कुलपिक्स यात पुन्हा गफलत .. तरी त्यातल्या त्यात कॅनॉन sx500 IS/50x/30x आनि निकॉन कुलपिक्स p510 / 800c with android os हे प्रकार पाहिले. तरीपण कन्फ्युजन आहेच.. माझे बजेट २०,००० - २२,००० तुम्हाला चांगले वाटलेले कॅमेरे येथे शेअर करताल का ? वरील पैकी किंवा इतर कुठला कॅमेरा चांगला आहे हे सांगुन माझा प्रश्न सोडवण्यात मदत होयील अशी अपेक्षा.. २. घरच्यांसाठी बेसिक मोबाईल घेण्याचा विचारात आहे तुम्ही बेसिक फोन सुचवताल का. कॉल येण्ये -जाणे आणि बॅटरी बॅकअप चांगला ह्या दोन गोष्टी त्यात हव्यात बस्स. बजेट एका फोनसाठी १५०० ते २२०० नोकिआ चे आधीचे बेसिक फोन छान होते .. आता जुने फोन मिळत नाहिये आणि नविन चांगले वाटत नाहोयेत.

वाचन 12551 प्रतिक्रिया 0