बार्ली डोसा

बहुगुणी's picture
बहुगुणी in पाककृती
7 Sep 2012 - 12:53 am

नमस्कार मंडळी! 'या लेखकाने पाककृती विभागात सक्रिय लिखाण करण्याचं धाडस कसं केलं' असा विचार करून दचकू नका! ही पाककृती माझी नाही :-) तेंव्हा नि:शंक मनाने प्रयोग करा, हा पदार्थ फारच नामी होतो असा माझ्या जिभेचा दावा आहे!

अमेरिकेत राहूनही फक्त शाकाहारी आणि फक्त स्वहस्ते शिजवलेलंच खाणार्‍या आमच्या परिचयातील हिमबिंदू या तेलुगू कन्यकेने, 'नेहमी नवीन काहीतरी प्रयोग करून पहायचं' या वृत्तीने ही अनोखी डिश खायला घातल्याबद्दल आणि त्याची पाककृती पुरवल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझा सहभाग फक्त ही पाककृती तुमच्यापर्यंत मराठीतून पोहोचवणे इतकाच आहे, डोसा आवडेल अशी आशा आहे.

[ज्यांना कल्पना नसेल त्यांच्यासाठी: बार्ली हे गव्हासारखं एक द्विदल धान्य, ते असं दिसतं: ]

डोसा:

१ कप बार्ली
१/४ कप उडीद डाळ
अर्धी वाटी चणा डाळ
१०-१२ मेथी दाणे

वरील सर्व पदार्थ सकाळी एकत्र भिजवून ठेवा.

संधाकाळी ८-१० तासांनी अर्धी वाटी पोहे ५ मिनिटे भिजवून, आधी भिजवलेल्या वरील मिश्रणात एकत्र करा, आणि हे सर्व मिक्सर मधून मऊ पेस्ट होईपर्यंत वाटून घ्या. आता हे मिश्रण रात्रभर उबदार जागी आंबवण्यास ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी नेहेमीप्रमाणे डोसे करा. ६-८ डोसे होतील. ते खालील दुधी भोपळ्याच्या चटणीबरोबर गरम-गरम खायला द्या/घ्या.

दुधी भोपळ्याची चटणी:

हिमबिंदूने ही चटणी बरीचशी या दुव्यावर दिलेल्या कृतीने केली, फक्त तिने दुधी भोपळा शिजवण्यापासून सुरूवात करण्याऐवजी दुधी भोपळ्याचा तयार पल्प वपरला आणि त्यात चिंचेचा एक चमचाभर कोळ वापरला.

१०० ग्रॅम दुधी भोपळ्याचा पल्प आणि अर्ध्या लिंबाएवढा चिंचेचा कोळ हे दोन्ही एकत्र करून त्याला १ चमचा गरम तेलात खालीलप्रमाणे फोडणी द्या:

१ टेबल्स्पून उडीद डाळ, ती तांबूस/ ब्राऊन झाल्यावर,

२ टेबल्स्पून जिरं
चिमूटभर हिंग
१ लाल मिरची
६-८ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या
२ लसूण पाकळ्या
६-७ पानं कडीपत्ता

हे क्रमाने घातल्यावर मग वरील दुधी भोपळा-चिंच मिश्रण घाला. आता १/२ चमचा हळद घालून ३-५ मिनिटे परता (कच्च्या दुधी भोपळ्याचा वास गेला पाहिजे).

नंतर हे परतेलेले मिश्रण १ मूठभर भाजलेले, सोललेले शेंगदाणे घालून मिक्सर मध्ये त्याची पेस्ट करा, आवश्यक वाटेल तितकेच पाणी घाला.

प्रतिक्रिया

सानिकास्वप्निल's picture

7 Sep 2012 - 1:16 am | सानिकास्वप्निल

डोसा व चटणी अप्रतिम :)
नक्कीच बनवून बघीन

हा प्रकार बराच पौष्टिक असणार याबद्दल दुमत नाही. चटणीचा ही नवा प्रकार कळला.
बहुगुणी काका ही पाककृती इथे दिल्याबद्दल आभारी आहे.
हिमबिंदूस ही आमचे आभार कळवा.

धनंजय's picture

7 Sep 2012 - 4:27 am | धनंजय

काही वर्षांपूर्वी मी वेगवेगळी धान्ये भिजवून दोसे बनवण्याचे प्रयोग केले होते. पैकी बार्लीचा दोसा छान लागतो +१

चटणीची नवी कृती कळली.

हिमबिंदू व बहुगुणी दोघांना धन्यवाद.

त. क. बार्ली आणि गहू दोन्ही एकदल धान्ये आहेत. उडीद डाळ हे द्विदल धान्य आहे. एक आणि द्वि-दलाचे मिश्रण, शिवाय भिजवलेले, त्यामुळे दोसा पौष्टिक आहे.

बहुगुणी's picture

7 Sep 2012 - 10:11 pm | बहुगुणी

Barley is a monocot plant.

शिल्पा ब's picture

7 Sep 2012 - 4:52 am | शिल्पा ब

चटणी नक्की करुन बघेन.

=)) =))

अर्धवटराव

सहज's picture

7 Sep 2012 - 6:30 am | सहज

करुन पाहीन!!

बहुगुणींना इथे पाहून आश्चर्य वाटले. :)
ही पाककृती ग्रेट आहे. दुधीची चटणी पहिल्यांदाच पाहिली.
हिमबिंदूस धन्यवाद आणि तुम्हालाही.
माझ्याकडे पाव किलो तरी बार्ली आहे. पूर्वी एका पाकृसाठी आणली होती. आता हा पदार्थ करता येईल.
फोटूही छानच आलाय.

प्रभाकर पेठकर's picture

7 Sep 2012 - 10:04 am | प्रभाकर पेठकर

पूर्वी एका पाकृसाठी आणली होती.

नक्की कुठल्या पाककृतीसाठी?

इथे शेअर केल्यास आम्हीही घरच्या घरी प्रयत्न करून पाहू.

रेवती's picture

7 Sep 2012 - 6:47 pm | रेवती

बार्ली सूपची पाकृ एका पुस्तकात पाहिली व बार्ली आणि हिरवे वाटाणे असे घेऊन आले होते. ते सूप काही रेस्टॉरंटसारखे झाले नाही व उत्साह मावळला. ;) उरलेले वाटाणे भिजवून, उकडून एकदा पावभाजीत वापरून टाकले पण बार्ली शिल्लक आहे. :)

प्रभाकर पेठकर's picture

8 Sep 2012 - 1:30 pm | प्रभाकर पेठकर

हात्तेरे की. मी उगीच, ग्लास वगैरे घेऊन, बसलो होतो पाककृतीची वाट पाहात.

सन्जयखान्डेकर's picture

9 Sep 2012 - 5:00 pm | सन्जयखान्डेकर

हात्तेरे की. मी उगीच, ग्लास वगैरे घेऊन, बसलो होतो पाककृतीची वाट पाहात.

अहो मग ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचे?
माफ करा परिचय नसताना प्रतिक्रिया दिली, पण राहवले नाही.
संजय

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2012 - 6:56 pm | प्रभाकर पेठकर

ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचे?

'ताकाला' गेलो असतो तर नसते लपविले भांडे..!

हा हा हा.
नाही नाही. ते पेय नाही.

आणि आश्चर्य का म्हणे? रेवतीताई, अहो मी इथे पाकविभागात नेहेमीच टपकतो..षटकार मारता येत नाही म्हणून मॅचच बघू नये असं थोडंच आहे :-)

अत्रुप्त आत्मा's picture

7 Sep 2012 - 8:03 am | अत्रुप्त आत्मा

अगदी छान...

आणी चटणीसाठी-खास हिमबिंदू यांना धन्यवाद :)

कच्ची कैरी's picture

7 Sep 2012 - 9:06 am | कच्ची कैरी

चटणीचा नविन प्रकार कळला :) आणि डोसाही पौष्टिक असल्याने दोघही रेसेपिज करुन बघितल्या जातील :)

इरसाल's picture

7 Sep 2012 - 9:10 am | इरसाल

"बहुगुणी" डोसा.

हिमबिंदुचे आभार.

प्रभाकर पेठकर's picture

7 Sep 2012 - 10:01 am | प्रभाकर पेठकर

वा..वा.. काहीतर वेगळे, तरीही चविष्ट. नक्कीच करून पाहणार. धन्यवाद.

बार्लीच्या डोश्याबरोबर एखादा कॅन बिअरचा असेल तर अजून मजा येईल.

अरे, हा तर एकदम वेगळाच प्रकार ! :)
हिमबिंदू चे कौतुक वाटले. :)
बाकी, बियर बनवण्यासाठी मुख्यतः बार्ली वापरली जाते.

स्वाती२'s picture

7 Sep 2012 - 5:53 pm | स्वाती२

आवसम! चटणीची पाकृ पण छान !
बार्ली सूप, बार्ली पुलाव खाऊन कंटाळा आला होता. आता अधून मधून हे डोसे करता येतील.

पैसा's picture

7 Sep 2012 - 5:56 pm | पैसा

मस्त आयडिया आहे. करून बघणार. चटणीसुद्धा आवडली.
पाकृ देणार्‍या हिमबिंदू यांना आणि पाकृ आमच्यापर्यंत आणणार्‍या बहुगुणींना धन्यवाद!

तर्री's picture

7 Sep 2012 - 6:07 pm | तर्री

सगळे करून पाहणार आहेत. माझे येथेच तर जबरी वांधे !
( काही म्हणजे काही करता येत नाही )
बाकी सर्व पाककला मार्तंड प्रतिक्रिया देते झाले आहेतच. त्यास दुजोरा.

परिकथेतील राजकुमार's picture

7 Sep 2012 - 6:22 pm | परिकथेतील राजकुमार

पण साला डोसे करण्यात मजा नाही. कोणीतरी करून घालणारे पाहिजे. ;)

कोणीतरी कश्याला? हक्काचं माणूस तळकोकणात वाट बघतय पण आम्हाला लग्नाची घाई नाही ना! काय करणार?

परिकथेतील राजकुमार's picture

7 Sep 2012 - 7:21 pm | परिकथेतील राजकुमार

अफवा पसरवणे हा कायदेशीर गुन्हा आहे बरे.

कोणीतरी कश्याला? हक्काचं माणूस तळकोकणात वाट बघतय पण आम्हाला लग्नाची घाई नाही ना! काय करणार?

कोण.. कोण ?

प्रीत-मोहर's picture

8 Sep 2012 - 11:51 am | प्रीत-मोहर

रैवारच्या खाल्ल्या डॉष्याला तरी जागायचे होतेस!!!!!

स्मिता.'s picture

4 Oct 2012 - 8:46 pm | स्मिता.

हेच आम्ही कधीचे कानीकपाळी ओरडून सांगतो पण कुणाला पटत नाही.

प्रचंड , दारूण , भीषण , सहमत.
परा - जरा बघ कोण करून घालतो/तेय खायला ?

परिकथेतील राजकुमार's picture

7 Sep 2012 - 7:22 pm | परिकथेतील राजकुमार

परा - जरा बघ कोण करून घालतो/तेय खायला ?

तुमच्यासाठी ? माझ्यासाठी ? का दोघांसाठी? ;)

तर्री's picture

10 Sep 2012 - 11:25 am | तर्री

अर्ध-स्वार्थी

बहुगुणी's picture

7 Sep 2012 - 10:15 pm | बहुगुणी

हिमबिंदूला नक्की कौतुक कळवेन, इथल्या महारथींनाही पाककृती आवडली यातच सगळं आलं.
पाककृती वाचणार्‍यांचे आणि टंकनकष्ट घेणार्‍या सर्व प्रतिसादकांचे आभार!

आजच केला होता हा दोसा. चांगला झालाय. चटणी मात्र नारळाची केली आहे.
एक नवा पदार्थ कळवलात ते बरे झाले.

पुष्करिणी's picture

10 Sep 2012 - 7:11 pm | पुष्करिणी

बार्ली नसल्यानं फक्त चटणी केली काल, छानच झालीय.

स्वाती दिनेश's picture

3 Oct 2012 - 3:26 pm | स्वाती दिनेश

डोशाचा आणि चटणीचाही नवाच प्रकार समजला,
स्वाती

पिवळा डांबिस's picture

4 Oct 2012 - 9:09 am | पिवळा डांबिस

बार्लीची फक्त बीयर चांगली होते....
आणि ती आमची पत्नी घरच्याघरी उत्तम बनवते!! काय नंदन, खरां की खोटां?
:)
तेंव्हा पास....

स्मिता.'s picture

4 Oct 2012 - 8:45 pm | स्मिता.

कधी न ऐकलेली आणी पौष्टिक पाकृ आहे. करून बघायला हरकत नाही. पण आधी इकडे बार्ली शोधणे आले ;)

रामदास's picture

4 Oct 2012 - 9:41 pm | रामदास

या विकांताला हिमबिंदू शोधणे आले.