काही कामासाठी खरगपुरात असल्याने मित्राच्या खोलीवर राहतोय. या मित्राला मेसचे जेवण अज्जिबात आवडत नाही. (मला खूप आवडते असे नाही, पण सहन तरी करु शकतो, पण ते असो!)
आज रविवार असल्याने रुमवरच काहीतरी बनवू असे त्याने आज सकाळी सुचवले. म्हणलं ठिकेय. दुपारी १२च्या सुमारास मित्र भाजी घेऊन आला आणि आमचा स्वयंपाक चालू झाला.
मित्र कन्नडिग असल्याने भात ठरलेलाच. (रुमवर इतर काही करण्यासारखेही नव्हते)
जिन्नसः तांदूळ, घेवडा, १ गाजर, १ कांदा, गरम मसाला, तेल, जिरे, २ मिरच्या, कोथिंबीर
कृती:
सर्व भाज्या धुवुन चिरुन घेतल्या. एका कुकरमध्ये धुतलेले तांदूळ घेऊन सर्व भाज्या टाकल्या. कांदा जरा मोठाच चिरला. पाणी, जिरे, तेल, गरम मसाला, मीठ हे सर्व त्यात टाकले. (सर्व अंदाजेच. रुमवर सानिकातैंच्या स्वयंपाकघरात असतात तसे व तेवढे चमचे नाहीत.)
प्रेस्टीज हॉटप्लेट ७०० वॅट सेटींगवर लावून कुकर १० मिनिटे ठेवला व रायत्याच्या तयारीला लागलो.
रायत्यासाठी हातात होते २ टोमॅटो आणि १ कांदा. कांदा बारीक चिरला. टोमॅटो जसे जमतील तसे चिरले.
कोथिंबीर, मिरची चिरली. एका पातेल्यात चिरलेली सामग्री घेतली. अंदाजे मिठ टाकले. दही ओतले. चमच्याने मस्त एकत्र केले.
झाला रायता तयार.
पत्रावळीवर वाढलेला भात-रायता. सोबत कांदा आणि लोणचे.
प्रतिक्रिया
26 Aug 2012 - 2:56 pm | किसन शिंदे
मस्त रे अन्या!
नाव नोंदणी केली असेलच. ;)
26 Aug 2012 - 3:04 pm | सानिकास्वप्निल
पुलाव छान जमलाय :)
>>सानिकातैंच्या स्वयंपाकघरात असतात तसे व तेवढे चमचे नाहीत
काय रे सगळे मेले माझ्या स्वयंपाकघरातील चमच्यांवर नजर ठेवून आहेत ;)
>>>नाव नोंदणी केली असेलच
हा हा हा अगदी हेच विचारणार होते बघ :)
26 Aug 2012 - 3:00 pm | स्पा
चला रेवती आज्जी कडच काम अजून वाढल तर ........
आज्जे प्रोफाईल अपडेट कर ग, अन्याची .. he can cook too :D
अवांतर : दातृ पुलाव भारी झालाय हो .. सोबत रायता आणि कांदा..
पापड तेवढा विसरलात
26 Aug 2012 - 4:44 pm | ५० फक्त
आज्जे प्रोफाईल अपडेट कर ग, अन्याची .. he can cook too and for two....
26 Aug 2012 - 3:10 pm | अन्या दातार
चायला, ढुश्क्लेमर टाकायचा राहिलाच!
कुठेही नाव नोंदणी केलेली नाही (सध्या) करायची इच्छाही नाही. उगाच तसदी घेऊ नये.
@स्पाजी: पापड नव्हतेच एकतर. असते तरी हॉटप्लेटवर भाजायला जमले असते की नाही याबद्दल शंकाच आहे.
@सानिकास्वप्निलः तुमचे चमचे डोळ्यात भरतील असेच आहेत. (ही कॉम्प्लिमेंट आहे बरं!)
26 Aug 2012 - 4:50 pm | प्रचेतस
अरे वा. जमलेलं दिसतंय.
अभिनंदन.
26 Aug 2012 - 6:45 pm | पक पक पक
अरे वा. जमलेलं दिसतंय.
अभिनंदन.
26 Aug 2012 - 3:33 pm | चिंतामणी
आयटीयन्सला ह्याचा उपयोग होइल आणि तुला शुभेच्छा मिळतील मजबूत.
>>>कुठेही नाव नोंदणी केलेली नाही (सध्या) करायची इच्छाही नाही. उगाच तसदी घेऊ नये.
तसदी घेणा-यांना त्यात आनंद मिळेत असेल तर तू कशाला थांबवतोस. पुढची प्रकिया तुझ्या संमतीशिवाय कशी होइल.
26 Aug 2012 - 4:19 pm | सस्नेह
वॉव ! पुलाव अन रायत्याचे फोटो मस्त आलेत. टेस्टही भारीच असणार.
भूले दिन याद आये...
बाकी, आम्ही होस्टेलवर असताना भाताची खिचडी भाज्या अन डाळी घालून करत होतो तशी टेस्ट आता सुसज्ज स्ययंपाकघरातही येत नाही...
26 Aug 2012 - 4:22 pm | जाई.
छान!!
26 Aug 2012 - 4:45 pm | ५० फक्त
मस्त रे, आता उद्या गणेशखिंड जवळ कोलकत्त्या हॉटेल मध्ये जाणे आले,
26 Aug 2012 - 4:49 pm | प्रचेतस
त्याबरोबरच तिथल्या बंगाली मिठाया खाणे आले.
26 Aug 2012 - 4:53 pm | पैसा
=)) =))
थांब, जरा हसून घेते.
आधी माझ्या काही शंका आहेत त्यांची उत्तरे दे. इथे नाही दिलीस तरी चालेल.
१. कुकरात डायरेक्ट भात आणि भाज्या टाकल्यात?
२. तेल आधी जरा गरम करून कांदा आधी परतून नाही घेतलात?
३. पाकृ कोणी केली आणि फोटो कोणी काढले?
४. कूकर कोणी घासला?
आता काही नोंदी.
१. अधिकृत नावनोंदणी नसली तरी नोंद घेतली आहे.
२. मित्राकडे हॉटप्लेट असेल तर पापड डायरेक्ट भाजता येतो.
३. जर का तो इंडक्शन कूकर असेल तर स्टीलचा इंडक्शन बेस तवा वापरून बरंच काही करता येईल.
पुढच्या प्रयोगांसाठी शुभेच्छा!
अवांतरः पूर्वी स्पा ला बर्याच टीपा दिल्या होत्या पण प्रत्यक्षात स्वयंपाक कोणी केला हे शेवटपर्यंत कळलं नाही. तसं असेल तरी शुभेच्छा! :D
26 Aug 2012 - 5:22 pm | अमोल खरे
माझीपण भर.
पुलावात "घेवडा" घालतात ? फरजबी माहितेय पण घेवडा ????
>>कांदा जरा मोठाच चिरला
एक्स्ट्रा मोठा चिरलाय. एका कांद्याचे मॅक्स ३-४ तुकडे केले आहेत.
पण तुझ्या खटपटीचे कौतुक वाटले. पुढील रेसिपिला शुभेच्छा.
26 Aug 2012 - 7:48 pm | सानिकास्वप्निल
>>>पुलावात "घेवडा" घालतात ? फरजबी माहितेय पण घेवडा ????
फरसबीला श्रावण घेवडा देखील म्हणतात ..हं आता घाई घाईत श्रावण लिहायचे राहून गेले असेल बिचार्याचे , समजून घे रे ;)
26 Aug 2012 - 4:53 pm | प्रभाकर पेठकर
वा..वा..वा.. झटपट पुलाव मस्तंच दिसतोय. अर्थात, चविलाही मस्त असणार.
कुकरमध्ये भरपूर दिसणार्या भाज्या पत्रावळीवरील भातात का गायबल्यात?
27 Aug 2012 - 2:14 am | रेवती
काका, बॅचलरांसाठी वेगळा, सोप्या पाकृंचा विभाग सुरु करायला हवा. :)
27 Aug 2012 - 11:11 am | प्रभाकर पेठकर
---------------स्वाक्षरी--------------
पुन्हा खोडकरपणाचा झटका आलाय मला.
27 Aug 2012 - 11:35 am | सूड
>>बॅचलरांसाठी वेगळा, सोप्या पाकृंचा विभाग सुरु करायला हवा.
बॅचलरांणा अंडरएस्टिमेट केल्याबद्दल रेवतीआज्जी यांणा संमंतर्फे समज का दिली जाऊ णये ?
(पाहूण ये)
27 Aug 2012 - 12:40 pm | बॅटमॅन
+१.
संमंनी ब्याचलरांना मंमं बद्दल अंडरेस्टिमेट करू नये.
(उगीच इकडेतिकडे पाहू नये/पाहून ये )
26 Aug 2012 - 5:11 pm | पियुशा
अन्या.......मस्त जमलाय बे पुलाव ,
पण पत्रावळी का वापरली म्हणे ( भांडी धुवायचा कंटाळा का ? ;) )
एखाद्या डिश मध्ये किंवा प्लेट मध्ये सर्व्ह केला असतास तर फोटो अजुन भारी आला असता ,असो.... :)
26 Aug 2012 - 5:40 pm | अन्या दातार
@ पैसाताई, घ्या तुमच्या कुशंकांची उत्तरे:
१. कुकरात डायरेक्ट भात आणि भाज्या टाकल्यात?
हो. भाज्या उकडून घेणे/वाफवुन घेणे/परतून घेणे इ.इ. गोष्टी फाट्यावर मारल्या गेल्या आहेत
२. तेल आधी जरा गरम करून कांदा आधी परतून नाही घेतलात?
प्र. १ चे उत्तर पाहणे
३. पाकृ कोणी केली आणि फोटो कोणी काढले?
पाकृ मी केली. फोटोही मीच काढले
४. कूकर कोणी घासला?
पाकृ मी केल्याने कुकर मित्राने घासला.
@पिवशे:
कारण रुमवर त्याच उपलब्ध होत्या. प्लेट-बिट काही नाहीये.
@पेठकर काका:
भाज्या भाताखाली गेल्याने गायबल्या. :)
@ अमोल खरे: चित्रातील कांद्यांची संख्या मोजायचे कष्ट घ्या जरा. किमान १२ फोडी सहज दिसताहेत.
26 Aug 2012 - 6:52 pm | पक पक पक
बरं... आता कस वाट्तय... ? ;)
26 Aug 2012 - 5:44 pm | निवेदिता-ताई
अन्या -- मस्तच......मा़झेकडेही नाव नोंदणी चालू असते बरका...... बरेच जणांनी नाव नोंदले आहे...
अजुन कोणाला नाव नोंदणीकराय्ची असेल...त्यांनी मला व्यनी करावा.. :D
27 Aug 2012 - 12:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे
नाव नोंदणी सगळेच करून घेतात, रिझल्ट्स अजून कुणीच दिले नाहीत.
अजून एक निरीक्षण असे की येथील सर्व मंडळात केवळ उपेक्षित आय मीन अपेक्षित वरांचीच भरती आहे. वधू कुठेच नाहीत.
27 Aug 2012 - 12:13 pm | अन्या दातार
प्रकाटाआ
27 Aug 2012 - 12:13 pm | अन्या दातार
खाली "(डेस्परेट) वि मे" असं लिहायला विसरलात काय हो? ;)
27 Aug 2012 - 2:16 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अन्या दातार, आपण वयस्कर आयडींना वैयक्तीक (म्हणजे गैरसोयीचे ) प्रश्न विचारत आहात.
28 Aug 2012 - 2:17 am | मोदक
विश्वनाथ मेहेंदळे - आपण दातारांना समज द्यायची सुपारी देवूया कुणाला तरी.. तुम्ही आधी अवांतर आणि वैयक्तीक प्रश्नाचे उत्तर द्या..!
26 Aug 2012 - 6:59 pm | वेताळ
मस्त लागतात. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
26 Aug 2012 - 7:01 pm | अत्रुप्त आत्मा
पाक-कृती पेक्षा प्रतिक्रीयांचा आस्वाद घ्यायला मज्जा येतीये. :D
शतकी धाग्यासाठी शुभेच्छा हो अन्या भौ! ;)
27 Aug 2012 - 12:54 am | शिल्पा ब
अगंबै ! स्मायल्यांऐवजी चक्क प्रतिसाद ! छान छान.
27 Aug 2012 - 11:22 am | अत्रुप्त आत्मा
@अगंबै ! स्मायल्यांऐवजी चक्क प्रतिसाद !>>> म.....ग???, तुंम्ही नै का कधी कधी एकदम सरळ आनी साजुक बोल्ता....!
तसच आहे हे...!
26 Aug 2012 - 7:09 pm | रेवती
अभिनंदन दातारसाहेब.
26 Aug 2012 - 7:11 pm | सूड
अरे वा !! इकडे आलास की असा भात बनवून खायला घाल , मग प्रतिक्रिया देणेत येईल.
26 Aug 2012 - 7:32 pm | बॅटमॅन
+१.
असेच म्हणतो. बाकी प्रोफाईल ष्ट्राँग करण्याचे खुंदलखुंदलके प्रयत्न सुरू झालेले आहेत वाट्टं ;)
27 Aug 2012 - 7:24 am | स्पंदना
खुंदलखुंदलके
हा ! हा! हा!
26 Aug 2012 - 7:26 pm | कौशी
आवडला.
26 Aug 2012 - 7:55 pm | इरसाल
कधी आहे म्हणे तुमचं लग्न ?
पुलाव टेस्टीच असावा.
27 Aug 2012 - 12:27 pm | गवि
मला दोन मुद्दे मांडायचे आहेत:
१. अन्या दातार. लेख आणि पदार्थ उत्तम झालेले आहेत.
२. "बॅचलर पाककृती" असा एक वेगळा विषय आपण सर्वांनी तयार केला आहे. यात सोपे, कमी कष्टाचे , कमी जमवाजमव करावी लागेल असे पदार्थ असतात असं गृहीत आहे. हे सर्व लग्नापूर्वीच सुटसुटीतपणासाठी करावं असं "बॅचलर" शब्दात अध्याहृत आहे..
याचाच अर्थ लग्न केलं की रीतसर, साग्रसंगीत , वैविध्यपूर्ण, वाटणघाटणाचं, सजावटीसह, पंचपक्वान्नयुक्त, भांडी घासण्यासहित चारीठाव जेवण बनवून वाढण्यासाठी स्वयंपाकी(ण बाई)ची सोय होते हे आजच्या जमान्यातही गृहीत धरलं गेलं आहे असं म्हणावं का?
-(ग्यास लायटर) गवि.
28 Aug 2012 - 8:58 am | निनाद
-(ग्यास लायटर) गवि.
पेटत नाहीये का? ;)
28 Aug 2012 - 10:07 am | गवि
हो ना.. :(
28 Aug 2012 - 11:21 am | पैसा
हे कसं कोणी पाहिले नाही? तुम्हाला फुल्ल पाठिंबा, गवि!
काडीसारिणी महिला.
31 Aug 2012 - 12:51 pm | चिगो
आमचे गविंना पेटते अनुमोदन.. ह्या वृत्तीचा मी भारत सरकारच्या टायपातला तीव्र निषेध करतो.
(लग्नोपरांत हौशी स्वैंपाकी) चिगो
31 Aug 2012 - 1:16 pm | पैसा
भारत सरकारचा निषेध म्हणजे कोणा अट्टल चोराला 'हात् मेल्या' म्हणून सोडून देण्यासारखे आहे.
27 Aug 2012 - 12:45 pm | गणपा
सोप्पी आणि सुटसुटीत पाकृ आवडली रे अन्या.
चला, अजुन एक गडी मार्गाला लागला. :)
27 Aug 2012 - 1:08 pm | कवितानागेश
छान. :)
27 Aug 2012 - 4:04 pm | मोहनराव
जबराट
28 Aug 2012 - 12:35 pm | सुहास झेले
लैच... मस्त दिसतोय हॉस्टेल पुलाव :) :)
1 Sep 2012 - 8:55 am | पैसा
प्रयोग संपले?
1 Sep 2012 - 9:01 am | प्रचेतस
५० झाल्यावर संपणारच ना आता. :)