साहित्य:
१ वाटी चणा डाळ
१ वाटी उडदाची डाळ
१/२ वाटी पांढरे तीळ
८-१० लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
भरपूर कढीपत्ता
८-१० काळीमिरी
१ टीस्पून हींग
मीठ चवीनुसार
१ टेस्पून तेल
पाकृ:
एका पॅनमध्ये कोरडेचे काळीमिरी भाजून घ्यावी व एका प्लेटमध्ये काढून ठेवावी.
त्याच पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करून लाल सुक्या मिरच्या व कढीपत्ता परतून घ्यावा व बाजूला काढून ठेवावा.
त्यात आता चणा डाळ सोनेरी रंगावर परतून घ्यावी, तसेच उडदाची डाळ ही सोनेरी रंगावर परतून घेऊन , प्लेटमध्ये काढून ठेवावी.
आता त्यात तीळ भाजून घ्यावे.
सगळे गार झाले के एकत्र करावे.
त्यात हींग व चवीपुरते मीठ घालावे.
तळलेल्या मिरच्या व कढीपत्ता घालून मिक्सरवर भरडसर वाटून घेणे (कोरडेच)
हवाबंद डब्यात भरुन ठेवावे.
ही चटणी तुम्ही कोरडीच सर्व्ह करु शकता किंवा तीळाचे अथवा खोबर्याचे तेल घालून ,मिक्स करून इडली, डोसा, उत्तप्पा, अडई बरोबर सर्व्ह करु शकता.
तिखट असल्यामुळे ह्याला गन पावडर असे ही म्हणतात. मिरच्यांचे प्रमाणा आवडीनुसार कमी- जास्त करावे.
काही लोकं ह्यात मोहरी ही घालतात.
प्रतिक्रिया
10 Aug 2012 - 10:23 pm | अत्रुप्त आत्मा
नेहमीचा प्रतिसाद दिला आहे....... :-)
11 Aug 2012 - 1:06 pm | आसावरी मेढेकर
वाचून फार बरे वाटले
10 Aug 2012 - 11:06 pm | पक पक पक
एकदम खमंग .... :tongue: मि अजुन एक 'मुळ्गा पुडी ' हा शब्द पण ऐकला होता... :)
10 Aug 2012 - 11:09 pm | बॅटमॅन
मीपण हाच व्हॅरियंट ऐकला होता.
10 Aug 2012 - 11:17 pm | सुनील
मीदेखिल हा शब्द ऐकलाय.
11 Aug 2012 - 3:29 am | सानिकास्वप्निल
हो आम्ही पण मुळगंपुडीच म्हणतो :) (आईच्या तामिळ मैत्रीणीने सांगितले होते हे नाव व ही पाकृ पण त्यांची आहे)
दक्षिण भारतात ह्या चटणीला वेग-वेगळ्या नावांनी ओळखलं जातं, काहीजण चटणी पोडी / इडली पोडी असेही म्हणतात :)
11 Aug 2012 - 1:19 am | प्रभाकर पेठकर
'मुळगं' म्हणजे मिरची (लाल) + 'पुडी' म्हणजे पावडर. 'मुळगंपुडी' म्हणजे लाल तिखट.
हिरव्या मिरचीला 'पच्चं मुळगं' म्हणतात.
11 Aug 2012 - 1:27 am | बॅटमॅन
तमिऴ /मलयाळम मध्ये म्हणतात का असे? कारण कन्नडमध्ये मिरची म्हणजे "मेणशिनकाई" होते.
11 Aug 2012 - 9:48 am | प्रभाकर पेठकर
मल्याळम मध्ये मुळगं म्हणतात.
'पुडी' शब्दाचा एक अर्थ चटणी (कोरडी) असाही आहे.
12 Aug 2012 - 12:14 pm | बॅटमॅन
धन्यवाद :)
10 Aug 2012 - 11:08 pm | बॅटमॅन
गनपावडर इडली हा आयटम जंम रोडवरच्या दक्षिणायनमध्ये खाल्ला होता, तेव्हापासून प्रेमात पडलोय या पदार्थाच्या :)
11 Aug 2012 - 6:02 am | सूड
आयला दक्षिणायन!! पुरलं का ? त्यांची टीचभर वाढण्याची पद्धत बघून साऊथ इंडियन हा एवढासाच भात खातात का असा प्रश्न पडला होता. पहिल्याच भेटीत हे ठिकाण मनातून उतरलं.
12 Aug 2012 - 12:16 pm | बॅटमॅन
क्वांटिटीबद्दल सहमत. पण पुण्यात तरी अशी क्वालिटी अन्यत्र कुठेच नाही पाहिली. जर अन्य कुठे अशी क्वालिटी असेल तर सांग, मला जायला नक्की आवडेल :)
12 Aug 2012 - 12:24 pm | प्रचेतस
रास्ता पेठ रॉक्स. :)
13 Aug 2012 - 12:03 am | बॅटमॅन
तिकडे कुठे रे?? (बैदवे माटुंग्यातील मद्रास कॅफेमधील रसम इडली छान आहे.)
13 Aug 2012 - 8:08 am | प्रचेतस
आंध्रा मेस आणि अजूनही बरीच. :)
11 Aug 2012 - 8:18 am | प्रचेतस
मी हैद्राबादच्या चटनीज् मध्ये हा आयटम खाल्ला होता. लै भारी.
बाकी दक्षिणायनबद्दल सूडशी सहमत.
बाकी गनपावडरची चव बरीचशी आपल्या मेतकूटासारखीच लागते.
10 Aug 2012 - 11:07 pm | रेवती
अगदी भारी!
मला याची पाकृ हवीच होती.
धन्यवाद.
अवांतर- त्या इटुकल्या बरणीचा आकार छान आहे.
11 Aug 2012 - 1:28 am | Mrunalini
मस्त... परवाच मी इडली सोबत खायला केली होती. मी ह्यात वाटताना एक छोटी चिंच पण टाकली. त्यामुले मस्त चव लागते आंबट-तिखट. next time करुन बघ. :)
11 Aug 2012 - 6:04 am | शिल्पा ब
हे मेतकुटासारखं खाता येतं का? कसं लागतं चवीला?
11 Aug 2012 - 9:31 am | इरसाल
एक्दम जबरा चटनी आहे ही.
ह्या च्या बाजुलाच प्रॉन्सची कोरडी चटणी पावडर पण पाहिली इथल्या सुपर मार्केटात.
11 Aug 2012 - 4:35 pm | ५० फक्त
इपुड्डे पोडे पोडे पोडे - याचा अर्थ - वाढा चटणी चटणी चटणी असा होत असावा बहुतेक.
12 Aug 2012 - 12:28 am | वीणा३
रेसिपी सोपी दिसत्ये, नक्की करून बघेन.
अवांतर: तुमचे फोटो नेहमीच छान असतात. खाद्य पदार्थांव्यातीरिक्त अजूनही काही फोटो काढले असतील तर ते पण टाका ना.
12 Aug 2012 - 4:22 am | रेवती
ही पोडी केली. तू दिलेल्या प्रमाणाच्या निम्मी केली.
मृने सांगितल्याप्रमाणे त्यात घालण्यास चिंच नव्हती म्हणून पेरभर आमसूल घातले.
स्वातीताईने सांगितलेल्या इडल्या केल्या.
खूपच छान तोंडीलावणे आहे हे. पुढच्यावेळी सुधारणा म्हणून आतापेक्षा आणखी बारीक वाटणार आहे.
12 Aug 2012 - 11:38 am | पिंगू
मस्तच चटणी आहे...
12 Aug 2012 - 4:30 pm | कवितानागेश
माझी आवडती 'पोडी'. :)
अशा चटणीत कढीलिंबाची पाने सुकवून/ तळून घालायची, आणि एकत्र पूड करायची. ती चटणी पण मस्त लागते.
15 Aug 2012 - 1:41 pm | निवेदिता-ताई
आम्ही चटणी पुडी असे म्हणतो बॉ