दाल तडका

आचारी's picture
आचारी in पाककृती
15 Jul 2012 - 1:32 pm

साहित्य -
१) १ वाटी तुरीची दाळ (यासोबतच हरभरा किवा मसूर / मुग दाळहि घालू शकता)
२) ५ लसून पाकळ्या (बारीक चिरून घ्यावे)
३) १ इंच आले (बारीक चिरून घ्यावे)
४) हिरव्या मिरच्या - ५ (बारीक चिरून घ्याव्या )
६) फोडणी साठी - कडीपत्ता , जिरे आणि तेल
७) तडका साहित्य - गरम मसाला, लाल तिखट, २-३ लाल सुक्या मिरच्या.
कृती -
१) तुरीची दाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी.
२) एका कढई मध्ये थोडे तेल घालून चांगले कडक होऊ द्यावे त्यात आधी मिरच्या , कडीपत्ता , जिरे घालावेत. नंतर आले लसून घालून एक दोन वेळा परतून लगेच त्यात शिजलेली दाल घालून थोडेसे पाणी घालून उकळू द्या. एक दणदणीत उकळी आली ki लगेच खाली उतरवून एक भांड्यात काढून घ्या.
तडका -
१) कढई मध्ये फोडणी पेक्षा थोडे जास्त तेल घालून चांगले कडकडीत तापू द्यावे. तेल तापले कि ग्यास बंद करून त्यात गरम मसाला, लाल तिखट, लाल सुक्या मिरच्या तुकडे करून घालाव्यात आणि हा तडका तयार डाळीवर घालावा.

दाल तडका कालच केला होता पण फोटो काढण्याआधीच संपला त्यामुळे फोटोसाठी क्षमस्व !!

प्रतिक्रिया

मोठ्या अपेक्षेने धागा उघडला होता आता मस्त पैकी दाल तडका चा फोटु बघु म्हणुन !
फोटु का नाही टाकला ?

मोहनराव's picture

16 Jul 2012 - 1:57 pm | मोहनराव

+१
फोटु का नाही वो टाकला ?
खाण्याआधी फोटु काढावा, एवढीच जर खायची घाई असेल तर धागा टंकायची तरी घाई काउन म्हंतो मी?

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jul 2012 - 3:14 pm | अत्रुप्त आत्मा

फोटू नसल्यामुळे... पास...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2012 - 3:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो नसल्यामुळे दा़ळ पोहचली, त्याचा तडका नाही पोहचला. :(

-दिलीप बिरुटे

फोटो लवकरच टाकण्यात येईल !!
फोटो काढण्याआधिच स॑पला ना दाल तडका !!

स्वैर परी's picture

16 Jul 2012 - 1:16 pm | स्वैर परी

कृती क्र. २ नंतर जर तयार डाळीत आमचूर पावडर घातली, कि मस्त चटपटीत चव येते!

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jul 2012 - 1:36 pm | परिकथेतील राजकुमार

प्रतिक्रिया लवकरच टाकण्यात येईल !!
प्रतिक्रिया देण्याआधिच गंडला ना कीबोर्ड !!

सानिकास्वप्निल's picture

18 Jul 2012 - 4:00 am | सानिकास्वप्निल

+१

निवेदिता-ताई's picture

16 Jul 2012 - 9:41 pm | निवेदिता-ताई

मस्त ... मला कॄती हवीच होती.....धन्यवाद

बरेचदा पाककृती काय आहे या पेक्षा पदार्थ कसा दिसतोय हे बघण्यासाठीच धागा उघडला जातो. पण तिथे फोटो न देता नुसतीच साहित्य आणि कृती दिसली की मोठ्या अपेक्षेने दिवाळी अंक म्हणून उचलावा आणि त्यावर रामदेव बाबांचा पोट आवळलेला किंवा (स्वतःच्या) तंगड्या (स्वतःच्या) गळ्यात अडकवलेला फोटो दिसावा तस्सा पोपट होतो!