टोमॅटोची चटणी किंवा भाजी

मराठमोळा's picture
मराठमोळा in पाककृती
9 Jul 2012 - 11:03 am

नमस्कार मंडळी,
काय भाजी करावी हे बराच वेळ विचार करुन पण नाही सुचले तर हा प्रकार नक्की करुन पहा, स्पेशली पुरुष मंडळीसाठी ही पाकृ. बायको भाव खाऊ लागली की स्वतः स्वयंपाक घरात घुसाव आणी ही पाकृ करावी. तुमची कॉलर ताठ झालीच पाहिजे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही टोमॅटोची चटणी किंवा भाजी. घ्या

साहित्य.
३ मोठे रसरशीत गर असलेले लाल टोमेटो चिरुन
२ मध्यम कांदे बारीक चिरुन
२ ईंच गुळाचा खडा चिरुन किंवा किसून
३-४ पाकळ्या लसूण बारीक चिरुन
१ छोटा चमचा मोहोरी
१ छोटा चमचा जिरे
१/२ छोटा चमचा हिंग
१ छोटा चमचा गरम मसाला
२ छोटे चमचे लाल तिखट
१/२ चमचा हळद
१ कप शेंगदाण्याचा कुट किंवा किसलेले सुके खोबरे
तेल
चवीनुसार मीठ
सजावटीसाठी कोथिंबीर.

कृती
१ कढईत पळीभर तेल टाकून त्यात मोहोरी घाला.
२. मोहोरी तडतडली की त्यात जिरे आणि लसूण घाला.
३. लसूण खरपूस तळला गेला की त्यात हिंग घालून कांदा परतायला घ्या.
४. कांदा कमी आचेवर खरपूस होईपर्यंत परतत रहा.
५. यात शेंगदाण्याचा कुट किंवा खोबरे घाला. ४-५ मिनिटे परता.
६. आता गरम मसाला, लाल तिखट आणि हळद घालून चांगलं परता तेल सुटेपर्यंत परता.
७. किसलेला गुळ घालून २ मिनिटे गूळ वितळू द्या.
८. यात आता चिरलेला टोमॅटो घालुन ५-१० मिनिटे मंद आचेवर परता.
९. भाजी किंवा चटणी चांगली रसरशीत झाली की मीठ घाला.
१० चपाती किंवा जीरा राईसबरोबर कोथिंबीर सजवून वाढा.

तळटीपः चपातीपेक्षा गरमागरम तुप-जीर्‍याची फोडणी दिलेल्या भाताबरोबर जास्त चवदार लागते हा वैयक्तीक अनुभव.
वरील साहित्यात प्रमाण कमी जास्त करुन तुमच्या पद्धतीने यात बदल करु शकता.

प्रतिक्रिया

पिंगू's picture

9 Jul 2012 - 11:14 am | पिंगू

काय रे बाबा, बायकोने भाव खायला सुरुवात केल्यावरच तू हे धंदे करायला लागलास की काय?

कधीतरी बायकोचा रुसवा काढण्यासाठी पण हे धंदे करत जा रे.. ;)

मराठमोळा's picture

9 Jul 2012 - 11:56 am | मराठमोळा

पिंगूशेट,
आपण एकमेकांना इतके परीचित नाही की वरील प्रतिसाद मी खेळीमेळीत घ्यावा. माझ्याबद्दल आणी माझ्या वैयक्तीक आयुष्यात काय चाल्लय याची आपल्याला काडीचीही माहिती नसताना असे उगाच जवळीक असलेल्या मित्रासारखे प्रतिसाद देऊ नये ही विनंती.
संपादक मंडळाने दखल घ्यावी ही विनंती. धन्यवाद.

पक पक पक's picture

11 Jul 2012 - 9:38 pm | पक पक पक

आपण एकमेकांना इतके परीचित नाही की वरील प्रतिसाद मी खेळीमेळीत घ्यावा.
म मो आपण प्रस्तावना ज्या खेळीमेळीत लिहीली आहेत ते पहाता या सारखे प्रतिसाद देखील त्याच पद्ध्तीने (हलकेच)घ्याल अशी एक रास्त अपेक्षा असणारच्. :)

भाजी छान झाली आहे... :)

सुहास..'s picture

9 Jul 2012 - 11:36 am | सुहास..

पिंग्या !

कधीतरी बायकोचा रुसवा काढण्यासाठी पण हे धंदे करत जा रे..;)

- पिंगू

ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |

लई भारी ;)

तुझ व्हायचं ना अजुन ..बर बर !!

बाकी ममो, पाकृ छान...

उदय के'सागर's picture

9 Jul 2012 - 12:09 pm | उदय के'सागर

व्वा ... छान! टोमॅटोची चटणी/भाजी विशेष अवडत नाही पण हि अशी भाजी करुन पाहिन नक्कि... आणि भाता बरोबर तर कधिच खाल्ली नाहिये (किंवा विचारहि केला नव्हता)... ते हि करुन पाहिन... :)
.
.
.
.
.
बाकि ममो साहेब... ते आपलं खानदेशी 'काळ्या/कटाच्या' आमटिच्या पाकृचं (प्रॉमीस) लक्षात आहे ना? वाट पाहतोय :)

निवेदिता-ताई's picture

9 Jul 2012 - 5:44 pm | निवेदिता-ताई

मस्त आहे, मी नेहमी करते

नाना चेंगट's picture

9 Jul 2012 - 6:09 pm | नाना चेंगट

मस्त !!

कवितानागेश's picture

9 Jul 2012 - 6:37 pm | कवितानागेश

यातले "१ कप शेंगदाण्याचा कुट किंवा किसलेले सुके खोबरे" असले जिन्नस ब्याचलरांना झेपणारे नाहीत.
त्याऐवजी त्यांनी तयार लसूण-खोबरे चटणी किंवा तयार शेंगदाण्याची चटणी घरात तय्यार ठेवावी.
ब्याचलर नसून, मीदेखिल हेच करते. ;)

मलाही ही भाजी आवडते. बरे झाले आठवण करून दिलीत. आता करतेच.

कुंदन's picture

9 Jul 2012 - 11:13 pm | कुंदन

+१ देणार होतो , पण आज माउ चा वरचा प्रतिसाद वाचल्यावर अंडा बुर्जी ने टोमॅटो वर मात करायचे ठरवले आहे. ;-)

काय म्हणता भाऊजी? सध्या थोडा मोकळा वेळ दिसतोय्.............विचारपूस करायला (खोड्या काढायला म्हणणार होते चुकून.).

रेसिपी छानच आहे. मी कधी शेंगदाण्याचा कुट नाही घालत आता अश्याप्रकारे करून बघेन.
मी मेथीदाणे घालुन करतेय. ....

शेंगदान्याचा कूट वगैरे घालू नये.. त्याऐवजी ही भाजी करायला सुरु करायच्या आधीपासूनच दीड कप दूध उकळायला ठेवावे.. ते आटून एक कप होईल... भाजीत टोमॅटो शिजले की हे दूध त्यात घालावे. थोडे ढवळावे... छान लागते.

( ही वहिदा रहमान स्पेशल हिंट आहे.... अ‍ॅक्चुअली तिने क्रीम ऑफ मिल्क घालून ही भाजी सांगितली आहे. पण क्रीम ऑफ मिल्क म्हणजे नेमके काय ते न कळल्याने हा बदल केला आहे. क्रीम ऑफ मिल्क म्हणजे साय का? की आणखी काही कंडेन्स्ड प्रकार आहे? नेमके न कळल्याने आटवलेले दूध वापरले. त्याने भाजी छान लागली, म्हणुन आता तसेच करतो.

पिया तोसे नैना मधील पहिले कडवे बघावे. त्या साडी सारखा रंग येतो.)

vahida

मराठमोळा's picture

10 Jul 2012 - 5:32 am | मराठमोळा

>>क्रीम ऑफ मिल्क म्हणजे साय का? की आणखी काही कंडेन्स्ड प्रकार आहे? नेमके न कळल्याने आटवलेले दूध वापरले.
क्रीम ऑफ मिल्क म्हणजे सायच, पण कच्च्या दुधाची.. बाजारात मिळते. पंजाबी लोकं बहुतांश पाकृ मधे ही क्रीम ऑफ मिल्क वापरतात. दुध आटवून वापरल्याने फार फरक पडला नसणार. पण क्रीम ऑफ मिल्क कधी कधी वापरणेच तब्येतीला चांगले. ;) तशीही एकदा करुन पहातो.

बाकी वाहीदा रेहमान, गाइड सिनेमा आनि त्यातली गाणी यांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.. रसिक दिसता हो जामोप्या.. अगदी साडीच्या रंगाप्रमाणे भाज्यांना पोत आणताय :)

सोप्पी अन फोटोतही छान दिसतेय. करुन बघते.

कुसुमिता१'s picture

10 Jul 2012 - 12:52 pm | कुसुमिता१

छान लागते ही भाजी..मी पावभाजी मसाला आणि भरपूर कांदा घालून करते. कूट आणि खोबरं दोन्ही घालते.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2012 - 12:52 pm | अत्रुप्त आत्मा

भाजीची अनुपस्थिती निभावून नेणारी फर्मास पाकृ.
बाकी मला तरी टोमॅटो हा प्रकार शिजवल्यापेक्षा कच्चाच बरा वाटतो..

कुंदन's picture

11 Jul 2012 - 10:18 pm | कुंदन

काल केली होती अशीच भाजी , मस्त झाली होती.