भरलेली खानदेशी मिरची

मराठमोळा's picture
मराठमोळा in पाककृती
28 Jun 2012 - 4:48 pm

णमस्कार्स लोक्स (एका जुन्या मित्राची आठवण झाली)

ही पाकृ माझ्या आजीने सांगितलेली आहे. तिच्या हातच्या जेवणाची फार आठवण होत होती म्हणून रेसेपी मागवुन घेतली आणि ती तुम्हालाही सांगावी असे वाटले.. एकदा नक्की करुन पहा. :) घ्या मग साहित्य

काही लोकांनी ;) साहित्यापासून सगळं निगुतीने करण्याचा ट्रेंड सुरु केला आहे, तो पेशंस माझ्यात नाही म्हणून डायरेक्ट शेवटचाच फोटु टाकणार आहे.

साहित्य
४-५ खानदेशी किंवा जाड/ मोठ्या मिरच्या ही मिरची कमी तिखट असते. जास्त खाल्ली तरी त्रास होणार नाही :)
उसात पण मिळतील.
कपभर शेंगदाणे
२-३ लसूण पाकळ्या
जिरे पावडर - २ छोटा चमचा
धने पावडर - २ छोटे चमचे
हिंग - अर्धा छोटा चमचा
हळद - १ छोटा चमचा
चवीपुरते मीठ

कृती
१. मिरचीचे साल खुप जाड असेल तर तव्यावर तेलाचा वापर न करता थोड्या भाजून घ्याव्यात.
२. मिरचीला एका बाजुने मधुन उभी चिरुन त्यातील बिया काढून टाका आणि थोडं मीठ लावून ठेवुन द्या १५-२० मिनिटे
३. शेंगदाणे भाजून घ्या. मिक्सर मधे किंवा खलबत्त्यात शेंगदाणे, हळद, जिरे पावडर, हिंग, मीठ, धने पावडर आणि लसूण चांगले बारीक करुन घ्या. तव्यावर थोडं तेल घालून ह्या मिश्रणाचा गोळा करुन घ्या. किंवा मिश्रणात गरम तेल घाला. लगदा होईलसे बनवा.
४. हे मिश्रण मिरचीत व्यवस्थित भरुन घ्या.
५. तवा गरम करुन त्यावर थोडेसे तेल घाला.
६. ज्या बाजुने मसाला भरला आहे ती बाजू तव्याला लागेल अशा पद्धतीने ठेवा.
७. मसाला लालसर झाल्यानंतर मिरचीची बाजु बदला.
८. थोडा वेळ परता. आणि जेवणाबरोबर तोंडी लावायला ही मिरची घ्या.

p1

टीपः ही पाककृती अंडे घालुन करता येते की नाही माहित नाही कारण मी अंडे घालत नाही. जे मिपाकर अंडे घालतात त्यांच्याशी सम्पर्क साधावा. धन्यवाद.

प्रतिक्रिया

स्मिता.'s picture

28 Jun 2012 - 4:53 pm | स्मिता.

फोटू बघून तों पा सु. खूप आवडते मला ही मिरची.
आमच्याकडे अशी भरली मिरची दाण्याच्या कूटाऐवजी बेसन आणि चवीपुरते आमचूर / लिंबाचा रस / चिंचेचा कोळ वापरून करतात. अल्टिमेट लागते :)

अमृत's picture

28 Jun 2012 - 5:13 pm | अमृत

करून पहील. पाकृ आवडली.

अमृत

उदय के'सागर's picture

28 Jun 2012 - 5:21 pm | उदय के'सागर

व्वा व्वा... तों.पा.सू. :)

खानदेशी पदार्थ भारीच असतात राव...

तुमच्या कडे त्या खानदेशी काळ्या आमटीची (शक्यतो पुरणपोळी बरोबर केली जाते ती) पाकृति असेल तर कृपया द्याल का? तुमच्या आजी कडुनच मिळाली तर अजुनच उत्तम ;)
मिपावर पुर्वप्रकाशीत असेल तर त्याचा धागा हि चालेल?
(मी जाम प्रेमात पडालो त्या आमटीच्या जेव्हा माझ्या मित्राच्या आजीने ति बनवली होती चुलीवर... अहाहा ...पोट भरलं पण मनं भरतच नव्हतं :))

मराठमोळा's picture

29 Jun 2012 - 6:30 am | मराठमोळा

उदय,
खरे आहे.. त्याला कटाची आमटी असेही म्हणतात. खानदेशात "सार" म्हणतात.
लवकरच टाकतो पाकृ.. आधी कुणी प्रकाशित केली आहे की नाही माहित नाही. प्रकाशित नाही करता आली तरी व्यनीतून पाठवतो. :)

आधी कुणी प्रकाशित केली आहे की नाही माहित नाही. प्रकाशित नाही करता आली तरी व्यनीतून पाठवतो.

पाककृती रिपिट होतात की रे.
तु टाक बिंधास्त. :)

पैसा's picture

28 Jun 2012 - 5:23 pm | पैसा

मस्त दिसतेय!

समर्थिका's picture

28 Jun 2012 - 6:08 pm | समर्थिका

मी अशी मिरचि बनवते.. पण सारण निट शि़जत नाही काय कारण असावे बर :(

मराठमोळा's picture

29 Jun 2012 - 6:33 am | मराठमोळा

मयुरी तै,
तुम्ही वर दिलेल्या पाकृ प्रमाणे करत असाल तर सारण शिजेल नक्कीच. शेंगदाणे कच्चे वापरलेत तर चव चांगली येणार नाही.
तरी मिरचीत भरण्याआधी सारण तव्यावर थोडे तेल गरम करुन परतुन घेतले (थोडेसेही जळू देऊ नये) तरी चालेल.

हा धागा वाचला.

सध्या इतकंच लिहिणं शक्य आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jul 2012 - 10:46 am | अत्रुप्त आत्मा

मिर्ची

सुनील's picture

28 Jun 2012 - 8:51 pm | सुनील

जे मिपाकर अंडे घालतात
तुम्हाला "अंडे खातात" असे म्हणायचे आहे काय? ;)

बाकी पाकृ छान. मिरची फार तिखट नसेल तर, थोडे लाल तिखट घालायला हरकत नाही, असे वाटते.

या पदार्थाबद्दल ऐकून होते. तिखटाशी माझं भलतच वाकडं असल्याने धारिष्ट्य लागेल हा पदार्थ बनवायला.
यापेक्षाही जाड असणार्‍या मिरचीत मंद आचेवर खमंग भाजलेले बेसन भरतात पण ती भाजी काही माझ्याकडून नीट होत नाही.

मराठमोळा's picture

29 Jun 2012 - 6:35 am | मराठमोळा

रेवती तै,
मिरची म्हंटल की तिखटपणाच आठवतो.. पण ही मिरची तितकी तिखट नाही. लहान मुलं देखील आवडीने खातील असा प्रकार आहे हा. एकदा करुन पहाच.. नक्कीच आवडेल तुम्हाला. :)

जमायला लागला की स्वयंपाक , परिपुर्ण आयटी नवरा होण्याकडे वाटचाल चालु आहे ;)

बाकी राक्या , तु खानदेशी नसल्याचा सशंय येतो आहे ...चार चं मिरच्या बनविल्या होत्या का बे ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Jul 2012 - 10:33 am | विश्वनाथ मेहेंदळे

जमायला लागला की स्वयंपाक , परिपुर्ण आयटी नवरा होण्याकडे वाटचाल चालु आहे

असहमत !! ममो लग्नाच्या एक वर्ष आधीपासूनच तय्यार होता, या बाबतीत पण. जुने धागे पहा.

बाकी राक्या , तु खानदेशी नसल्याचा सशंय येतो आहे ...चार चं मिरच्या बनविल्या होत्या का बे

चार पिढ्या पुण्यात गेल्या हो.. व्हायचेच ;-)

स्वाती दिनेश's picture

28 Jun 2012 - 8:33 pm | स्वाती दिनेश

भरली मिरची आवडली.
(फोटोंच्या बाबतीत एकदम सहमत, मलाही तो पेशन्स कमीच आहे,:) )
स्वाती

स्वाती२'s picture

28 Jun 2012 - 8:35 pm | स्वाती२

व्वा! मस्त पाकृ! बागेत बनाना पेपर्स आहेत तेव्हा नक्की करुन बघेन.

इष्टुर फाकडा's picture

28 Jun 2012 - 8:48 pm | इष्टुर फाकडा

अंडे घालून मग मिरची भरायची म्हणजे भयानक साधना हवी !!
तस्मात; या वाटेला जाणे नाही :) उगाच एका मिरचीसाठी कशाला ताणायचा ;)

बाकी पाक्रु भन्नाट आहे.

वाँव मस्त
माझी आई या मिरच्या बनवताना ओल्या खोबऱ्‍याच सारण घालून बनवते
छान चविष्ट लागतात

jaypal's picture

28 Jun 2012 - 11:16 pm | jaypal

बेक ईन फॉर्म. ओर भि आनदेव

मुक्त विहारि's picture

29 Jun 2012 - 1:32 am | मुक्त विहारि

ह्यांच्या वाट्याला कधी गेलो नाही... आम्ही आपले अजून, "तेल मिरची" वालेच आहोत..

तेल-मिरची, पचवायची ताकद नाहीशी झाली

की मग इकडे वळू..

शुचि's picture

29 Jun 2012 - 3:05 am | शुचि

मस्त मस्त मस्त!!!

शिल्पा ब's picture

29 Jun 2012 - 6:02 am | शिल्पा ब

लहानपणी इंदुलकर नावाच्या मैत्रीच्या आईने केलेली खाल्ली आहे. अप्रतिम. त्यानंतर चवदार अशी मिरची कधीच मिळाली नाही. मी तुझ्या पाकृ सारखा प्रयत्न करुन बघते.

सानिकास्वप्निल's picture

29 Jun 2012 - 11:45 am | सानिकास्वप्निल

कालच रात्री बनवून बघीतल्या , घरात सॅलॅडच्या कमी तिखट असलेल्या मिरच्या होत्याच :)
एकदम भन्नाट लागल्या:)
आमच्याकडे ओले खोबरे, दाण्याचा कूट, कोळ व डाळीचे पीठ घालून मिरच्या बनवतात पण वरील मिरच्या म्हण्जे कमीत-कमी साहित्य आणी उत्तम असा पदार्थ :)

पुन्हा एकदा धन्यवाद :)

नाना चेंगट's picture

1 Jul 2012 - 1:57 pm | नाना चेंगट

>>भरलेली खानदेशी मिरची

अच्छा ही होय ! मला वाटले एखाद्या फटाकड्या छोकरीचे फटु टाकलेस की काय ?

मराठमोळा's picture

1 Jul 2012 - 2:31 pm | मराठमोळा

नॅन्स,
ही मिरची एखाद्या फटाकड्या पोरीपेक्षा कमी नाही आणि असं सारखा सारखा पोरींचा विचार करणे बरे नव्हे ;) आजकाल चौपाटीवर जाणं होत नाही वाटत?

अवांतरः मला वाटलच होत की कुणीतरी असा प्रतिसाद देणार म्हणून.. नानाने नम्बर लावला बुवा :)

नाना चेंगट's picture

1 Jul 2012 - 2:58 pm | नाना चेंगट

>>अवांतरः मला वाटलच होत की कुणीतरी असा प्रतिसाद देणार म्हणून.. नानाने नम्बर लावला बुवा Smile

(कोणताही) फुलटॉस सोडू नये अशी आमच्या गुरुंची शिकवण आहे.

रश्मि दाते's picture

8 Aug 2012 - 1:03 pm | रश्मि दाते

कालच रात्रि केल्या होत्या,घरी आवडल्या सगळ्यांना,धन्यवाद.