पातळ पोहे चिवडा --

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
13 Jun 2012 - 9:22 am

साहित्य - पातळ पोहे अर्धा किलो, शेंगदाणे एक वाटी, चिवडा डाळे अर्धी वाटी, कडीपत्ता, मिरची पावडर एक चमचा, धने पुड एक चमचा, मिठ चवीनुसार, पिठीसाखर एक चमचा, तेल, फोडणी साहित्य,

कॄती -- पोहे निवडुन घ्या, कढईमध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या..
नंतर प्रथम जिरे हिंग, हळद घालून खमंग फोडणी बनवा त्यात कढीपत्ता घाला, शेंगदाणे घाला,चांगले खरपुस होईपर्यंत भाजा, आता त्यात डाळे घाला, मिठ, मिरची पावडर, धने पुड त्यातच घाला, पोहे घाला चांगले परतुन घ्या , मिठ तिखट सगळीकडे लागले पाहिजे.वरुन पिठीसाखर घालून पुन्हा थोडावेळ परतत रहा...
झाला चिवडा तय्यार, खावुन पहा, चव कशी आहे, मिठ कमी असल्यास थोडे घाला व एकत्र करा.

हा घ्या चिवडा --

chivda

प्रतिक्रिया

योगप्रभू's picture

13 Jun 2012 - 10:11 am | योगप्रभू

ताई! फोडणीत लसणाच्या पाकळ्या नाही का टाकत तुम्ही? छान वेगळीच चव येते चिवड्याला. सुक्या खोबर्‍याचे पातळ कापपण स्वाद वाढवतात चिवड्याचा.

प्रभाकर पेठकर's picture

13 Jun 2012 - 11:29 am | प्रभाकर पेठकर

मिरची पावडर (चांगलं, तिखट म्हणा की!) आणि धणेपुड पेक्षा हिरव्या मिरच्या (आणि अर्थात, बारीक चिरलेला लसूण) फोडणीत घालून मस्तं चव आणि रंग येतो चिवड्याला.

प्रत्येकाची आवड वेगवेगळी. मला, लाल तिखट आणि धणेपुड, तळलेल्या जाड पोह्याच्या चिवड्यात आवडते.

पिवळा डांबिस's picture

13 Jun 2012 - 11:44 am | पिवळा डांबिस

अरे तुम्ही दोघांनी लसूण-लसूण काय लावलंय?
निवेदिता-ताई काय गिलरॉयकरीण आहेत की काय? आँ?
:)
(स्पष्टीकरणः उत्तर-मध्य कॅलिफोर्नियामधील गिलरॉय हे गाव तिथे असलेल्या शेकडो एकर लसणाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. मालगाड्या भरून लसूण तयार होतो तिथे! द गार्लिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड!! तिथे लसणाचं आईस्क्रीम देखील मिळतं, झकास लागतं!! आमच्या सीकेपी बायकोला रिटायर झाल्यावर तिथेच जाऊन रहायचं आहे!!!! :))

उदय के'सागर's picture

13 Jun 2012 - 12:33 pm | उदय के'सागर

लसणाचं आईस्क्रीम वगैरे काय अरे..... कसंसच झालं ऐकुनच... पण तुम्हि म्हणताय 'झकास' लागतं म्हणजे उगिच आम्हि नाकं मुरडण्यात अर्थ नाहि... ट्राय करायला हवं ऐकदातरी... :)

प्रभाकर पेठकर's picture

13 Jun 2012 - 2:27 pm | प्रभाकर पेठकर

लसूणाचा मोघलाई पुलावही करतात. अजून करून पाहिला नाही. पण केला पाहिजे.

शुचि's picture

13 Jun 2012 - 6:56 pm | शुचि

:)

उदय के'सागर's picture

13 Jun 2012 - 12:40 pm | उदय के'सागर

मला ह्या चिवड्यात धणेपुड पेक्षा अख्खे धणे फोडणित घालुन आणि वाळलेला/तळलेला कांदा घालुन केलेला चिवडा जास्त आवडतो...खमंग.... म्हणजे असा वर्‍हाडी पद्धतीचा :)

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jun 2012 - 1:55 pm | परिकथेतील राजकुमार

वैदिक पद्धतीने कसा करायचा ?

नाना चेंगट's picture

13 Jun 2012 - 2:30 pm | नाना चेंगट

हेच विचारतो. किमान पौराणिक पद्धतीने कसा करायचा ते सांगा

५० फक्त's picture

13 Jun 2012 - 5:44 pm | ५० फक्त

अंडी घालायची फॅशन संपली वाट्टं ?

कवितानागेश's picture

13 Jun 2012 - 5:49 pm | कवितानागेश

कुठल्याही धाग्यावर वैदिक, पौराणिक किंवा तत्सम शब्दांचा उच्चार जरी केला तरी आपोआपच त्याचा चिवडा तयार होतो.
त्यात महाभारताचे पातळ काप फार चविष्ट लागतात.

शुचि's picture

13 Jun 2012 - 6:58 pm | शुचि

:D

नाना चेंगट's picture

13 Jun 2012 - 7:01 pm | नाना चेंगट

महाभारतापेक्षा रामायण भारी, स्त्रीमुक्तीवादी काजुबेदाणे टाकता येतात

मुक्त विहारि's picture

13 Jun 2012 - 5:52 pm | मुक्त विहारि

१) सगळे पदार्थ "वैदिक वस्तू भांडार " इथून घ्या.(पत्ता विसरलो आणि आठवायचे कष्ट अजिबात घेणार नाही).पण ते दुकान ओळखायच्या खूणा सांगतो. त्या दूकानावर बर्‍याच पाट्या आहेत आणि त्यातील एक पाटी "इथे फक्त माणसांनी खाण्याच्याच गोष्टी मिळतील" अशी आहे.तेच तुमचे दुकान.अजून एक खूण म्हणजे दुकानाच्या दारात "ड्रॅगन आणि डायनॅसॉर" दिसतील.मालकांपेक्षा त्यांचे ड्रॅगन आणि डायनॅसॉर बरेच मवाळ आहेत. ते फक्त एकाच घासात गिळून टाकतात.मालक मात्र गेल्या-गेल्याच असे काही "प्रेमळ" बोलतात आणि "प्रेमळ" कटाक्ष टाकतात की, कितीही नाही म्हटले तरी , आपण नरभक्षक झालो आहोत आणि मालकांना विविध प्रकारे खात आहोत असेच स्वप्न सतत १०-१२ वर्ष तरी पडतेच पडते.मी २५-३० वर्षांपुर्वी गेलो होतो.माझे फार स्वप्नवत नुकसान झाले आहे.

२ )ते पण जमत नसेल तर, मातीच्या पातेल्यात आणि चूलीवर हा पदार्थ करा.

३ ) ते पण जमत नसेल तर, आपले आडनांव बदलून "वैद" असे लावा.

४) ते पण जमत नसेल तर, प्रत्येक पदार्थावर थोडे-थोडे पाणी शिंपडून घ्या.नारळ-पाणी किंवा लिंबाचा रस टाकला तरी चालेल.मी लिबू-पाणी टाकतो.

५) ते पण जमत नसेल, तर मि.पा. वरील "वैदिक" ह्या विषयावरचे लेख वाचता-वाचता हा पदार्थ बनवा.जे काही बनेल ते तुम्हीच खा. किंवा नको असलेल्या पाहूण्यांना घरो-घरी पदरमोड करून वाटा. नेहमीच खर्च करण्यापेक्षा , एकदाच काय तो खर्च येईल.

६)ते पण जमत नसेल तर, प्रत्येक पदार्थावर वैदिक असे लिहा.कशाने लिहायचे? मीठावर कसे लिहायचे?वगैरे फालतू प्रश्न विचारत बसू नका.(मि.पा.वर लिहिता येते, तर मीठावर का नाही? असे प्रतिप्रश्न विचारण्यात येतील.)

७) ते पण जमत नसेल, तर किमान २ लग्ने करा.रोज जे काही कराल ते वैदिकच असेल.कारण सवती-मत्सर तर फार पुर्वी पासुनच आहे.

इतरही अनेक प्रकारे हे वैदिक पदार्थ करता येतात. पण ते पुन्हा कधी-तरी.

रेवती's picture

13 Jun 2012 - 7:31 pm | रेवती

छान गं निवेदिता ताई.
मला आवडतो पण त्यात थोडे चुरमुरे घालते.
बाकी काहीजणांनी सांगितल्यानुसार तळून खोबर्‍याचे काप (कापून तयार असतील तरच) व तीळ/ खसखस फोडणीत घालते. लसूण फक्त भडंगात घालते.

तीळ पण झकास लागतात.
शिवाय हा चिवडा करून ठेवलेला असेल तर कॉम्बिनेशन करून बऱ्याच भेळी पण होतात. :)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jun 2012 - 10:39 pm | अत्रुप्त आत्मा

मोदक's picture

14 Jun 2012 - 1:43 am | मोदक

एकदा दिवाळीत स्वयंपाकघरात लुडबूड करताना चुकून बरीच बडीशेप चिवड्याच्या डब्यात सांडली होती.

नंतर चिवडा खाताना अचानक दाताखाली आलेल्या बडीशेपेचा फ्लेवर मला आवडला, घरी आवडला नाही. तरीही बर्‍याच जणांनी चिवड्याला चान चान म्हटले. :-)

रेवती's picture

14 Jun 2012 - 5:03 am | रेवती

खी खी खी खी.

निवेदिता-ताई's picture

14 Jun 2012 - 10:14 pm | निवेदिता-ताई

भारी...

अजितजी's picture

15 Jun 2012 - 8:23 pm | अजितजी

धना +जीरा +बडीशेप याची साखर,मिठा बरोबर मिक्सर मध्ये बारीक पूड करावी ,सोबत आमचूर पण चांगले लागेल किवा चाट मसाला . फोडणी मध्ये लसून घातली तर खूपच चांगली लागते . बरीक चिरलेले कोथिंबिरी चे दांडे पण तळून घ्या लसणी बरोबर .पोहे मायक्रोवेव मध्ये भाजले -पाव किलो पोहे हाय वर चार मिनिटे तर खूप च कुरकुरीत लागतील

निवेदिता-ताई's picture

15 Jun 2012 - 10:02 pm | निवेदिता-ताई

:)