टॉमची सॅंडविच

Maharani's picture
Maharani in पाककृती
8 Jun 2012 - 11:44 pm

साहित्य:
४ ब्रेड स्लाइस
३/४ लसूण पाकळ्या बारीक चिरून
२ मध्यम आकाराचे टोमॅटो (मिक्सर मधे प्युरी करून)
१ लाल सुकी मिरची चुरडून
२ चीज़ स्लाइस
मीठ चवीनुसार
चिमूटभर साखर
मिक्स हर्ब्स (असल्यास)
२/३ तुळशीची पाने (असल्यास)

कृती :-

१) पॅन मधे तेल घेऊन गरम करायला ठेवा.
२) त्यात चिरलेला लसूण घाला व परता.
३) त्यात टोमॅटो प्युरी घाला व थोडे घट्ट होई पर्यंत व रंग किंचित गडद होईपर्यंत परता.
४) त्यात मीठ,साखर,चुरडलेली लाल मिरची,हर्ब्स,तुळशीची पाने तोडून टाका. आता आपला टोमॅटो स्प्रेड तयार आहे.
५) हा स्प्रेड ब्रेड स्लाइस वर पअरा.त्यावर चीज़ स्लाइस ठेवून त्यावर दुसरी स्लाइस ठेवा.(चीज़ स्लाइस वर मिरपूड हवी असेल तर टाकु शकता.)
त्याचे त्रिकोणी तुकडे कापून खायला घ्या.

प्रतिक्रिया

कुंदन's picture

9 Jun 2012 - 1:33 am | कुंदन

छान दिसतेय पा कृ
हापिसात न्यायला बरी दिसतेय, पुढच्या आठवड्यात करुन बघिन

मोहनराव's picture

11 Jun 2012 - 12:00 am | मोहनराव

+१ असेच म्हणतो.

अरे वा.. करायला एकदम सोपा आहे हा.

- पिंगू

जाई.'s picture

9 Jun 2012 - 9:51 am | जाई.

मस्त
सोपी आहे कृती

मदनबाण's picture

9 Jun 2012 - 10:04 am | मदनबाण

मस्त वाटतय... :)

अमोल केळकर's picture

9 Jun 2012 - 10:57 am | अमोल केळकर

छान ! :)

अमोल केळकर

jaypal's picture

9 Jun 2012 - 12:03 pm | jaypal

पटकन होणारी रेसीपी.
आता आम्ची परीराणी या सॅंडविच मधे उकडलेल्या अंड्यांचे काप घालुन फुलपाखरा सारखी बगडेल. ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jun 2012 - 12:30 pm | परिकथेतील राजकुमार

पाकृ आवडल्या गेली आहे.

चला आता इकडे तुळशीची पाने शोधणे आले.

Maharani's picture

9 Jun 2012 - 1:13 pm | Maharani

धन्यवाद!! मी मिपा वर बरेच दिवस वाचनमात्र होते....माझा लिहीण्याचा पहिलाच प्रयत्न आहे..फोटो नीट डकवायला मदत केल्याबद्द्ल संपादकांचे आभार!!

निवेदिता-ताई's picture

9 Jun 2012 - 1:57 pm | निवेदिता-ताई

मस्त आहे

नाना चेंगट's picture

9 Jun 2012 - 3:18 pm | नाना चेंगट

टॉम्याची सँडविच असे शीर्षक वाचले आधी !!

५० फक्त's picture

9 Jun 2012 - 7:07 pm | ५० फक्त

एकच प्रश्न - ही टॉम ची का म्हणुन ?

पैसा's picture

9 Jun 2012 - 7:40 pm | पैसा

टोमॅटो + चिली असावं ते.

पाकृ सोपी आणि दिसायला छान. पण टोमॅटो प्युरी ऐवजी तयार केचप्/सॉस घातलं तर चवीत फार फरक पडेल का?

टोमॅटो + चिली / टोमॅटो + चीज ...जे आवडेल ते............
<<<पण टोमॅटो प्युरी ऐवजी तयार केचप्/सॉस घातलं तर चवीत फार फरक पडेल का?>>>
चवीत थोडा फरक पडेल पण तयार केचप्/सॉस मधे preservatives असतात त्यामुळे हा पर्याय जास्त चांगला व आरोग्यदायी व जास्त चविष्ट....

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2012 - 7:58 pm | अत्रुप्त आत्मा

चान...चान... :-)

पिवळा बलक काढुन टाकावा

तसेही छान लागेल...त्या वर मीठ व मिरपूड भूरभुरावी किंवा मीठ व लाल मिरची पावडर...

जयवी's picture

10 Jun 2012 - 11:50 am | जयवी

अहा.........मस्त रेसिपी !!
फक्त लसूण घातलेले सँडविचेस टिफीन मधे द्यायला थोडा प्रॉब्लेम होतो. वास येतो ना...... ;)

सानिकास्वप्निल's picture

11 Jun 2012 - 12:29 am | सानिकास्वप्निल

वाह! छानचं

एकदम सोप्पं आहे बनवायला... नक्की बनवणार :)

धन्यवाद