ढिस्क्लेमर
१. सदर पाककृती हि एका बॅचलर ने केलेली आहे
२. आपण बॅचलर असल्याची हि जाहिरात नसून , नवीन बॅचलरांसाठी मार्गदर्शन दीपिका समजावी
३. गणपा, सानिका स्वप्नील, मृणालिनी .. यांच्या पाकृन्सारखी हि टकाटक.. खतरनाक.. कातील.. जीवघेणी वेग्रे नाही.. अपेक्षाभंग होईल.. वेळीच धाग्याबाहेर पडू शकता
४.भांडी, चमचे आणि किचन उच्च नाही... त्यामुळे तिकडे जास्त लक्ष देऊ नये
टीप : १.तोपांसू छाप प्रतिक्रिया अपेक्षित नसून " पोटाची खळगी भरण्याची सोय झाली" ,
"वा महिनाअखेरीस पैसे वाचवायची उत्तम सोय" छापाच्या प्रतिक्रिया चालतील
२.अंडे घालून हि खिचडी करता येते . त्याला अंडा खिचडी म्हणू शकता
ओक्के
आता साहित्य
१. एक मोबाईल, एक भांडकुदळ मित्र. साधा असला तरी चालतोय (आमच्या बाबतीत तो सूड होता)
२. फोडणीच साहित्य ( एक मोठा चमचा तेल ,मोहरी, तिखट, मीठ, जीर, हिंग, हळद, काळा मसाला)
३ . एक वाटी तांदूळ, मुगाची डाळ सम प्रमाणात (हे माझ्या आकारमानानुसार , तुमच्या आकारात वरील साहित्याला गुणून.. तुम्ही तुमचा हिशोब लावू शकता )
४. चार वाट्या पाणी
५. फ्रीज मध्ये सापडतील त्या भाज्या (इथे मी बटाटा , कांदा आणि तळाशी पडलेला एक जुनाट फ्लॉवर चा तुकडा घेतला)
६ . लसूण, आलं आवडीनुसार
कृती :
हातात असलेल्या मोबाईल वरून.. त्या मित्र कम बॅचलरला फोन लावून (अर्थात सूड ) खिचडी कशी करतात ते विचारणे , त्याचे ज्ञान एका कागदावर लिहून घेणे
बाजूला साहित्याची जमवाजमव करणे
हे सर्व साहित्य
ओक्के
आधी एक अर्धा तास.. घेतलेले तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून बाजूला निथळत ठेवा
आता एका भांड्यात तेल तापत ठेवून कच्क्कून फोडणी करा .. मोहरी जळून तुम्हाला तळतळात देत असतानाच त्यात कांदा टाकून तीच थोबाड बंद करा .. वरून फोडणीच इतर साहित्य मारा .
बाजूला एका भांड्यात ते चार वाट्या पाणी उकळवत ठेवा ..
तोपर्यंत इथे कांदा अदृश्य अवस्थेत पोचलेला असेल .. त्यात ते तांदूळ - डाळ, बटाटा टाकून छान परतवायला लागा..
इथे पाणी मजबूत उकळल कि.. ते बाजूच्या मिश्रणात ट्रान्स्फर करा.
आता छान पैकी त्यावर झाकण ठेवून .. बाहेर टीवी बघत बसा..
साधारण १० मिनिटात गरम गरम खिचडी तयार :)
खिचडी वर खोबर कोथिंबीर घालू शकता, साजूक तुपाची धार मस्ट ..सोबत पापड, लोणचं.. ताक.. मेनू फक्कड होतो :)
सोबत टोमाटो सूप चा बेत होता.. पण बाहेर टीवी बघताना आपण टोमाटो उकळत ठेवले आहेत हेच विसरलो .. .. पातेल्यात बॉम्बस्फोट झाल्यावर कळलं... असो नंतर त्या २ टोमातोंच्या प्रेताची योग्य विल्हेवाट लावण्यात आलीच .. असो..
खिचडी तरी झकास बनली.. आणि महत्वाच म्हणजे हाटेलात जायचे पैक वाचले :D
प्रतिक्रिया
5 May 2012 - 10:10 am | कुंदन
साला तुमच्या खंबाल पाड्यात अजुन पोळी भाजी केंद्र नाही सुरु केले का कोणी ?
असो , खिचडी छान च दिसतेय.
चला , आता इथे एक " एक भांडकुदळ मित्र" आणि एक "फ्रिज" शोधणे आले.
5 May 2012 - 12:06 pm | सूड
>>आता इथे एक " एक भांडकुदळ मित्र" आणि एक "फ्रिज" शोधणे आले.
हा हा हा !! हे आवडलं !! :D
5 May 2012 - 9:50 am | यकु
च्यायला सक्काळी सक्काळी खिचडी टाकलीस
आता इथे कुठे मिळेल खिचडी ते शोधणे आले :p
5 May 2012 - 9:57 am | किसन शिंदे
प्रयत्न चांगला आहे. :)
त्या जिरे आणि कांद्याच्या फोटोंवर पण फोटोशापी किडे करतोस. :D
5 May 2012 - 10:04 am | स्पा
ए गपे ,
ते असली फोटू आहेत..
एकही फोटोवर प्रक्रिया केलेली नाही... :)
5 May 2012 - 11:04 am | ५० फक्त
त्या जिरे आणि कांद्याच्या फोटोंवर पण फोटोशापी किडे करतोस - हे त्या जिर्यातले अन कांद्यातले किडे दिसु नयेत म्हणुन असेल बहुधा.
5 May 2012 - 10:14 am | प्रचेतस
चान चान.
क्यामेर्याचा अतिरिक्त वापर खटकला.
मुगाची डाळ म्हणजे अंमळ स्वीट कॉर्न चे दाणे आहेत की काय असे वाटून गेले.
स्वीट कॉर्न खिचडी अशीच करता येईल काय?
5 May 2012 - 12:53 pm | प्रसाद प्रसाद
मुगाची डाळ म्हणजे अंमळ स्वीट कॉर्न चे दाणे आहेत की काय असे वाटून गेले.
अगदी हेच म्हणणार होतो!!!
5 May 2012 - 10:58 pm | सोत्रि
घ्या, मी तर ते मक्याचे दाणे समजूनच चाललो होतो!
- (सध्या 'बॅचलर' असूनची पा़कृच्या फंदात न पडलेला) सोकाजी
5 May 2012 - 11:03 am | ५० फक्त
१. सदर पाककृती हि एका बॅचलर ने केलेली आहे - म्हणजे कुणी, आपण स्वताबद्दल हे लिहित असाल तर संबंधित प्र्माणपत्राची सत्यांकित प्रत इथं डकवावी. अथवा आपण लाकडी पादुका वापरता किंवा कसे हे सांगावे.
२. आपण बॅचलर असल्याची हि जाहिरात नसून , नवीन बॅचलरांसाठी मार्गदर्शन दीपिका समजावी - म्हणजे आपण जुने बॅचलर आहात काय, गुड, आपल्या बॅचलरपणाचे वय किती कळु शकेल काय ?
३. गणपा, सानिका स्वप्नील, मृणालिनी .. यांच्या पाकृन्सारखी हि टकाटक.. खतरनाक.. कातील.. जीवघेणी वेग्रे नाही.. अपेक्षाभंग होईल.. वेळीच धाग्याबाहेर पडू शकता - काय माहित खाल्यावर असेल सुद्धा जीवघेणी.
४.भांडी, चमचे आणि किचन उच्च नाही... त्यामुळे तिकडे जास्त लक्ष देऊ नये - मग काय जिरे आणि कांदे पहावे का काय ?
टीप : १.तोपांसू छाप प्रतिक्रिया अपेक्षित नसून " पोटाची खळगी भरण्याची सोय झाली"
"वा महिनाअखेरीस पैसे वाचवायची उत्तम सोय" छापाच्या प्रतिक्रिया चालतील - का पैसे महिन्याच्या सुरुवातीला वाचु शकत नाहीत काय ?
२.अंडे घालून हि खिचडी करता येते . त्याला अंडा खिचडी म्हणू शकता - आता काहीजणांना असा प्रश्न पडेल की अंडे घातल्यावर किती वेळाने ही खिचडी करायची, त्यामुळे शब्द रचना बदलावी ही नम्र विनंती.
१. एक मोबाईल, एक भांडकुदळ मित्र. साधा असला तरी चालतोय (आमच्या बाबतीत तो सूड होता) - मोबाईल चार्ज नसेल तर चालेल काय, म्हणजे तसा उल्लेख नाही म्हणुन विचारले.
२. फोडणीच साहित्य ( मोहरी, तिखट, मीठ, जीर, हिंग, हळद, काळा मसाला) - तेल विसरलात ते ?
३ . एक वाटी तांदूळ, मुगाची डाळ सम प्रमाणात (हे माझ्या आकारमानानुसार , तुमच्या आकारात वरील साहित्याला गुणून.. तुम्ही तुमचा हिशोब लावू शकता ) - फोनवर ऐकण्यात झालेल्या चुकीचा परिणाम.
४. चार वाट्या पाणी - वाटीचा आकार काय असावा, याबद्दल मार्गदर्शन अपेक्षित.
५. फ्रीज मध्ये सापडतील त्या भाज्या (इथे मी बटाटा , कांदा आणि तळाशी पडलेला एक जुनाट फ्लॉवर चा तुकडा घेतला) - कांदे सहसा फ्रिजमध्ये ठेवु नयेत, दुधाला वास लागतो, तुमच्यासारख्या जुन्या बॅचलराला ही गोष्ट अनुभवानं माहित व्हायला हवी.
६ . लसूण, आलं आवडीनुसार
कृती :
हातात असलेल्या मोबाईल वरून.. त्या मित्र कम बॅचलरला फोन लावून (अर्थात सूड ) फोन लावून (अर्थात सूड ) खिचडी कशी करतात ते विचारणे , त्याचे ज्ञान एका कागदावर लिहून घेणे -( या ऐवजी एखाद्या विवाहित मित्राला फोन लावला असता तर तेवढ्याच टॉक टाईम मध्ये संपुर्ण जेवणाची पाकृ सांगितली असती, तेवढंच काय एसेमेस पण केला असता. )
बाजूला साहित्याची जमवाजमव करणे - आता मिपाकरांकरित या मागची स्टोरी सांगतो, ही माहिती आमच्या खास बातमीदाराकडुन आलेली आहे.
सदर दिवशी मा. श्री स्प्पजी यांचेकडे मुलगा बघण्यासाठी आलेले असता, प्रत्यक्ष मा.श्री स्पाजी यांनी आपणांस उत्तम स्वयंपाक करता येतो असे प्रतिपादन केल्याने, आलेल्या आशिंबदु कन्यकेने ' मग खिचडी करुन दाखवता काय आता ?' असे आव्हान केल्याने हा प्रपंच (उपद्याप ) केल्याचे समजते, पण खिचडी नाहीच पसंद पडली तर पड्ली नाही तर नाही, गेलाबाजार एखादा शंभरी धागा मिपावर टाकु असा विचार करुन मा. श्री स्पाजी यांनी फोटो काढल्याचे कळते.
अवांतर - फोटो चांगले आले आहेत. आमच्याकडे अशीच काचेची डिश आहे, त्यामुळे तुम्हाला मागणार नाही.
अतिअवांतर - सगळ्या स्वयंघोषित आणि अप्रमाणित बॅचलरांना फ्लॉवर का आवडतो, याचं कारण कळेल काय.
5 May 2012 - 12:06 pm | रमताराम
'अप्रमाणित ब्याचलर' हा शब्दप्रयोग आवडला. फक्त त्यामुळे बिचार्यांच्या ब्याचलरहुड (काय हूड पणा करायचा तो याच काळात म्हणून हा प्रत्यय असावा काय? एखाद्या मंग्लिश वैय्याकरणाला विचारायला पाहिजे.) भोवती उगाच शंकेचे प्रश्नचिन्ह उभे केले जाते. त्यामुळे समस्त ब्याचलरांच्या वतीने ५० फक्त यांचा णिषेध. (जेवण बनवण्यात) अप्रशिक्षित ब्याचलर्सतर्फे आपल्या हाताने स्वैपाक करून यांना जबरस्तीने खायला लावण्याचे आंदोलन केले जाईल अशी (संपाची देतात तशी) नोटिस देतो आहे.
ता.क. ब्याचलरहुड न गमावता ब्याचलरपणा प्रमाणित कसा करून घ्यावा यावर गत-ब्याचलरांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.
5 May 2012 - 12:10 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या विषयावरती आपण न्यूज २४, इंडीया टीव्ही अथवा आजतक वरती 'वारांगना का पतिव्रता' ह्या टायपातले एखादे चर्चासत्र आयोजीत करावे असे सुचवतो.
धन्यवाद.
5 May 2012 - 12:51 pm | प्रसाद प्रसाद
२.अंडे घालून हि खिचडी करता येते . त्याला अंडा खिचडी म्हणू शकता - आता काहीजणांना असा प्रश्न पडेल की अंडे घातल्यावर किती वेळाने ही खिचडी करायची, त्यामुळे शब्द रचना बदलावी ही नम्र विनंती.
ह.ह.पु.वा.
5 May 2012 - 11:05 am | सस्नेह
छान ! पाकृ पेक्षा फोटूच लै भारी दिसताहेत.
आम्ही इतकी वर्षे खिचडी करताहोत पण आमची खिचडी अशी कॅटरिनासारखी चकचकीत कधी दिसली नाही ब्वा ! ही किमया मन्याभाऊंची की क्यामेऱ्याची ?
5 May 2012 - 3:21 pm | चौकटराजा
अर्थात मन्याभाउची .कारण no camera is better than its lens and no lens is better than the photographer ! | अशी फोटोग्राफीत
एक म्हण आहे असे म्हणतात .
5 May 2012 - 11:31 am | गणपा
चला, अजुन एक पोरगा मार्गाला लागला.
5 May 2012 - 11:38 am | मुक्त विहारि
मस्तच....
5 May 2012 - 11:38 am | नंदन
झकास पाकृ हो मन्याबापू! फोटोही मस्त प्रोफेशनल आलेत.
चला, रेवतीआजींची एका नातवाची चिंता मिटली म्हणायची ;)
5 May 2012 - 11:47 am | प्रास
चिंता मिटली की सुरू झाली? ;-)
आता आणखी एक नातू चांगल्या स्थळी पडला पाहिजे या विचाराने रेवतीआज्जी धायकुतीला येणार ब्वॉ आता.....
5 May 2012 - 11:49 am | परिकथेतील राजकुमार
सदर पाकृ स्पावड्यानेच केली आहे ह्याला पुरावा काय ?
5 May 2012 - 12:09 pm | रमताराम
इतका त्रिशतकी धागा काढूनही अजून 'आमचा शब्द हेच प्रमाण' हा अखंडनेबल पुरावा असतो हे शिकला नाहीत तर जगणे फुकट की तुमचे.
5 May 2012 - 12:13 pm | परिकथेतील राजकुमार
ते खरे आहे पण 'विकी'वरती ह्या संदर्भात काही पुरावा नाही आणि अलेक्साचा विदापण उपलब्ध नाही. मग कसे मान्य करावे आम्ही ?
5 May 2012 - 11:50 am | स्पा
ह्याला पुरावा काय ?
नको गाडाच आता
5 May 2012 - 11:56 am | मृत्युन्जय
मन्या फेणे खिचडी टाकतो या नावाचे पुस्तक लिहीन म्हणतो. ;)
5 May 2012 - 12:13 pm | सहज
पापड, ताक असे काही जोडीला दाखवले असतेस तर तुला बॅचलरांचा गणपा, स्वप्नीलसानिका, मृणाल तरी म्हणता आले असते.
:-)
5 May 2012 - 12:18 pm | स्पा
घरात या पैकी काहीही नव्हते :(
5 May 2012 - 12:20 pm | नाना चेंगट
कुणाच्या?
5 May 2012 - 12:24 pm | सूड
मनातलं विचारलंत !! मी तर म्हणेन हा प्रयोग स्वगृहीच झाला आहे याला पुरावा काय ?
5 May 2012 - 12:27 pm | सहज
नाही म्हणजे मिपावर वाचून कळतेय की काळ बदलला आहे. आजकाल बॅचलरांना त्यातुन आयटीवाल्या बायको असणार्यांना स्वयंपाक येणे मस्ट इ इ
पण मुलगी मुलाला घरी बोलावून खिचडी करुन दाखव अश्या परिक्षाही घ्यायला लागल्या? काय स्पा काय म्हणतो हा (का घेतोय कसला) सूड?
5 May 2012 - 12:17 pm | पिंगू
फेण्या, कळले हो तुझे सत्याचे झोल... :D
- (झोलर स्वयंपाकी) पिंगू
5 May 2012 - 12:20 pm | सूड
टॉमेटो गॅसवर ठेवलेले टीव्ही पाहताना लक्षात आलं नाही म्हणतोय्स तर असं लागलं तरी काय होतं टीव्हीवर हे ऐकण्याची उत्सुकता आहे. इथेच सांगायला पाह्यजे असं नाही व्यनित सांगितलं तरी चालेल. दुसरी गोष्ट एक वाटी तांदूळ आणि साधारण मूठभरपेक्षा थोडी कमी मूगडाळ असं मी म्हणलं होतं समप्रमाण हे तू केलेलं दिसतंय. असो, ज्याची त्याची आवड.
शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, शीर्षक हे 'माझे आणि सत्याचे प्रयोग' असं असायला हवं होतं का ?
स्वगतः माताय, मराठी पोरींची नावं सत्या वैगरे कधीपासून ठेवायला लागले लोक ?? सूड अरे ते सत्यवती वैगरे असेल, लाडाने सत्या वैगरे म्हणत असतील लोक तिला. आपल्याला का नसत्या चवकशा !!
5 May 2012 - 12:24 pm | स्पा
दुसरी गोष्ट एक वाटी तांदूळ आणि साधारण मूठभरपेक्षा थोडी कमी मूगडाळ असं मी म्हणलं होतं समप्रमाण हे तू केलेलं दिसतंय
माताय
सर.. माझी ऐकण्यात चूक झाली वाटत .. मी अर्धी अर्धी वाटी प्रमाण घेतल :)
5 May 2012 - 12:51 pm | सौरभ उप्स
उत्तम मांडणी, आम्ही केलेली खिचड़ी ची आठवन अनुन दिलीस....
5 May 2012 - 3:34 pm | स्मिता.
वा वा, एक बॅचलर मार्गाला लागला म्हणायचा! छान छान... खिचडीसुद्धा छानच दिसतेय.
जिरं, कांदा, बटाट्याचे इतके क्लोज अप फोटो बघून डोळे पाणावले.
5 May 2012 - 3:40 pm | निश
मन्या फेणे साहेब, खिचडी तर एकदम फक्कड झालेली आहे .
फोटो पण एकदम भारी आहेत.
आता सांगुनच टाका की राव, खिचडी नक्कि कोणासाठी केली होती ते?
5 May 2012 - 4:22 pm | ५० फक्त
तुम्हाला असं म्हणायचं आहे का निश ?आता सांगुनच टाका की राव, खिचडी नक्कि केली होती का ते?
5 May 2012 - 4:58 pm | निश
५० फक्त साहेब, तस नाही मला हेच विचारायच होत की , खिचडी नक्कि कोणासाठी केली आहे ते?
कारण डाळ व तांदुळ ह्यांच मन्या फेणे साहेबानी दिलेल प्रमाण बघता त्यांच लक्ष खिचडी पेक्षा खिचडी खायला येणार्या व्यक्तिकडे असाव अस वाटल म्हणुन तस विचारल.
5 May 2012 - 4:47 pm | पैसा
मन्याचं लग्न झाल्यावर त्याची बायको उपाशी रहाणार नाही हे नक्की! खिचडी खाण्यालयक दिसतेय नक्की. आणि खाऊन मन्या धडधाकट आहे हे बघून बरं वाटलं.
डाळ आणि तांदुळांचं प्रमाण वाचलं तेव्हा काहीतरी लोचा झालाय हे कळलं, पण गडबड नक्की कोणाची म्हणजे सुड की मन्या, हे कळायला थांबले.
5 May 2012 - 5:09 pm | सूड
>>डाळ आणि तांदुळांचं प्रमाण वाचलं तेव्हा काहीतरी लोचा झालाय हे कळलं, पण गडबड नक्की कोणाची म्हणजे सुड की मन्या, हे कळायला थांबले.
मग गडबड कोणाची म्हणता ??
5 May 2012 - 5:14 pm | पैसा
ऐकणार्याने नेहमीप्रमाणे फास्ट फॉरवर्डमधे वेगळंच काहीतरी ऐकलं!
5 May 2012 - 5:59 pm | सानिकास्वप्निल
खिचडी छानचं जमतेयं की :)
5 May 2012 - 7:00 pm | अत्रुप्त आत्मा
आता असेच असत्याचे प्रयोगपण दाखवा
5 May 2012 - 9:38 pm | रेवती
क्रमांक सत्तावीस असलेल्या मुलीशी लग्न केलं असतस तर अशी वेळ आली नसती मन्या!
फालतू करणानं मुली नाकरण्याच्या सवयीमुळे सध्या स्थळं येणं बंद झालय.
दिपिकाच्या इतकं प्रेमात असणं बरं नव्हे हे सांगून काही उपयोग नाही.
मार्गदर्शन दीपिका समजावी
यामुळे माझी काळजी वाढली.
ठीक आहे. जे झालं ते झालं.
तुझ्या फोटू काढण्याच्या कलेमुळे आणि पाकृमुळे प्रभावित झाले आहे हेही सांगून टाकते.
यापुढच्या पाकृंमध्ये घरामध्ये जुना फ्लॉवरचा तुकडा असणे आणी तो पाकृमध्ये वापरणे, किचन उच्च नसणे, महिनाअखेर असे शब्दप्रयोग करू नयेत. स्थळांच्या संख्येत घट होते.;) आपले आकारमान काय आहे याचाही उल्लेख टाळावा. आपण नेहमीच जॉन एब्राहमच्या जिममध्ये वर्कआउट करत असल्याचा आभास निर्माण केल्यास आम्हाला सूनमुख लवकर बघायला मिळेल अशी आशा व्यक्त करून माझे भाषण संपवते.
6 May 2012 - 6:55 pm | चिगो
मन्या, रेवतीआजीचा सल्ला मनावर घेच लेका.. ;-)
बाकी खिचडी जमलीय. आता खिचडीचे डोहाळे, च्यामायला !
5 May 2012 - 11:06 pm | सोत्रि
'माझे सत्याचे प्रयोग', सोबत मित्र त्यात तो 'भांडकुदळ' असावा आणि 'खिचडी''
मन्या (पूर्वाश्रमीच्या स्पावड्या) , ही सामग्री खास 'दोस्ताना' स्पेशल आहे असे वाटून गेले. वपाडावला खासकरून आवडावी अशीच आहे.
- (नवाबी शौक नसलेला) सोकाजी
5 May 2012 - 11:22 pm | धन्या
मन्याने पकवली स्वीटकॉर्नची खिचडी आणि दारुवाल्या सोकाजींना वपाडावची काळजी ;)
5 May 2012 - 11:28 pm | सोत्रि
धनाजीराव,
पुढच्या वेळी तुमचीही योग्य ती 'काळजी' करण्यात येईल, याबद्दल निश्चिंत असावे ;)
- (काळजीवाहू) सोकाजी
6 May 2012 - 2:57 pm | धन्या
तुम्हाला आमची आमची योग्य ती 'काळजी' करण्यात रस असला तरी आम्हाला त्यात रस नाही. आमचं काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ. ;)
6 May 2012 - 9:17 am | शिल्पा ब
अय्या!!! छान दिसतेय की खिचडी! मी पण आज खिचडीच केली होती अन टॉमेटोचं सार पण केलं होतं! खरंच!
6 May 2012 - 11:51 am | पियुशा
खिचडी बर्यापैकी बरिये फेण्या :)
6 May 2012 - 3:04 pm | सुहास झेले
लैच... ह्या खिचडीची अनेक पारायणे झाली असल्याने जास्त नवल वाटले नाही ;)
ह्याप्रकारात अजून थोडी साहित्य भर घातल्यास, पोटाची खळगी नव्याने भरता येतील... :) :)
- चीझ खिचडी
- मॅगी खिचडी
- ऑम्लेट खिचडी
- भुर्जी खिचडी
- चिकन खिचडी
- पास्ता खिचडी
आणि अजून बरंच काही, पण तूर्तास इतकं मार्गदर्शन पुरे ;)
6 May 2012 - 7:28 pm | रमताराम
मूगडाळीचा भात, तांदळी मूग-आमटी (वरील पाकृ मधे बटाटे न घालता पाणी अंमळ जास्त ठेवावे), बटाट्याचा डाळ-भात, टोमॅटोचा डाळ-भात (वरील पाकृ मधे बटाट्याऐवजी टमाटू) इ. इ. शिवाय कढी-खिचडी नावाचा जो प्रकार मिळतो त्याप्रमाणे लसूणचटणी-डाळभात, दा.च.- डाळभात, ज.च. - डाळभात, कारळे/खुरासणी च. - डाळभात इ.इ. पदार्थ (डाळभात च्या ऐवजी खिचडी असा बदल केला की यादी दुप्पट होते) असे 'जोड-पदार्थ' द्यावेत. समस्त चटण्या आपले मित्र, नातेवाईक इ. मंडळी भारतातून येत असता त्यांना आणायला सांगाव्यात. (नाहीच भेटले कोणी तर मिपाच्या इतिहासाला स्मरून 'इकडे कुठे मिळतील' असा धागा टाकावा).
घ्या, बघता बघता इतके ब्याचलर पदार्थ झाले, हा का ना का.
-(देशी) रमताराम
7 May 2012 - 1:48 am | Mrunalini
खिचडी म्हणजे ऑल टाईम फेवरीट... कशीही कधीही कोणीही खायला दिली, तरी तयार आहे.... त्यामुळे माझ्यासाठी हि खिचडी बेश्ट्च... ;)
7 May 2012 - 12:14 pm | सुहास..
प्रिय मित्र मन्याराम फेणे यासं,
सप्रेम नमस्कार विनंती विषेश, थोड्या वेळा पुर्वी (ही त्या सिरियल मधील 'पुर्वी' नव्हे याची कायमची नोंद घेणे. तशी ही ते वयाने तुझ्यापेक्षा मोठी आहे ;) म्हणजे तुला चालेल ही , पण मी सहज निरीक्षण नोंदविले ;) ) तु केलेले स्वंयपाक घरातील किडे...आय मीन पाकृ पाहिली, पाहिल्यावर ..." स्पावडेश !! आवडेश !! " असे उद्गार सहज बाहेर पडले.
दुसरे म्हणजे, आजपासुन तु स्वयंपाकी झालास आणि त्यामुळे तुला आजपासुन आम्ही " वाग्दत आयटी नवरा " असे मानु , त्या करिता तु ही आपल्या नावापुढे कु. ( म्हणजे कुमार) असे विषेशण लावावे अशी जाहीर विनंती करतो आहे.
फार -फार वर्षा पुर्वी ( पुर्वी विषयी आधीच सांगीतले आहे, धन्यवाद ! ) , कोणी एके काळी, कोणीतरी अशीच थालीपीठे बनवुन टाकली होती ( टाकली होती म्हणजे काय रस्त्यात नव्हती टाकली ;) ) तेव्हा ही गरीब बिचार्या बॅचलर्स ने , बॅचलर असुन ही , त्या बॅचलर ची खिल्ली उडविली होती. त्यानंतर त्याने पाकृ बंड (द) केल्या, पण आपण मात्र तसे करायचे नाही, नेटाने बनवित रहायच्या , एक दिवस स्वताला च खायच्या आहेत म्हणुन हळु-हळु का असेना नीट होतात च ;)
बाकी, माझ्या माहीतीतील एक " कू. मनी नेणे " नावाची सदस्या तुझा फोन नंबर मागत होती, त्याचे काय करावयाचे ( हम्म आता वाटतो का पुणेकर ;) ) ते कळविणे.
ता.क. : तु पाठविलेले पैसै संपले असुन सध्या क्वार्टर चे वांदे झाले आहेत, लवकरात लवकर मनीऑर्डर करणे ;)
आपला कृपाभिलाषी मित्र
वाश्या
7 May 2012 - 12:30 pm | प्यारे१
बॅचलर पाकृंना 'चान चान' म्हणायचं असतं म्हणे.... !
त्यानुसार चा न चा न!
बाकी वर ५० ना पडले ला प्रश्न!
सगल्या बॅचलरना 'फ्लॉवर' का आवडतो?
सोप्पं आहे. फ्लॉवर म्हणजे फुल. असंही आणि तसंही बॅचलरना 'फुलं' आवडतातच.
आणि ह्या 'फुला'/'फुलां'पायी ते फुल्ली 'फूल' होतात हे ही ओघानं आलंच.
आणि एकदा लग्नाचा 'फूल'पणा केला की आयुष्यभरासाठी 'फूल'त राहणं हे नशीबी आहेच्च.
तर असे हे दूरदृष्टी असलेले 'सभ्य नि सोज्वळ बॅचलर मिपाकर' सूज्ञपणे 'फिलावर' चा वापर करत आहेत.
-(फुल्ली फूल असलेला आणि झालेला) प्यारे :)
7 May 2012 - 11:05 pm | अत्रुप्त आत्मा
काय फुलुन आलाय प्रतिसाद...! व्वा...!
8 May 2012 - 7:41 am | ५० फक्त
मा. श्री,प्यारे,
नम्र विनंती प्रश्न नीट वाचावा आणि मग उत्तर द्यावे, प्रश्न असा आहे.
सगळ्या स्वयंघोषित आणि अप्रमाणित बॅचलरांना फ्लॉवर का आवडतो, याचं कारण कळेल काय.
9 May 2012 - 9:01 am | स्पा
माझे सत्याचे प्रयोग भाग २ ;)
रविवारी आखलेला पुर्या, वरण भात , शाही खीर , लोणच असा आटोपशीर बेत
:)
सूड मदतीला धावून आल्याने पुर्या, आणि खीर जमणे शक्य झाले :)
मा श्री किसन खीर ओरपताना , आणि रिकामा झालेला पुर्यांचा डबा ;)
9 May 2012 - 9:57 am | गवि
मेल्या, म्हणजे खीर आणि पुरी हे दोन्ही पेशल पदार्थ सूडने केले आणि तू वरणभाताचा कुकर लावलास फक्त ना...? ;)
9 May 2012 - 10:53 am | अत्रुप्त आत्मा
@आणि तू वरणभाताचा कुकर लावलास फक्त ना...? >>> चोरी पकडी गई
अहो... तो फक्त ''आयत्या ........ ..... आहे'' ;-)
9 May 2012 - 10:58 am | अन्या दातार
मन्या, आता या अत्रुप्त आत्म्याला तुझ्या हातचे जेवायला घालून शांत कर रे एकदाचा (त्यावरुन आम्ही यायचे की नाही ते ठरवू :P )
9 May 2012 - 10:59 am | प्रचेतस
तुम्हास 'त्रुप्त कर' असे म्हणावयाचे आहे काय?
9 May 2012 - 11:11 am | अत्रुप्त आत्मा
@(त्यावरुन आम्ही यायचे की नाही ते ठरवू Tongue ) >>>
SCRAP ANIMATED SMILIES.
CLICK HERE
9 May 2012 - 10:15 am | प्रचेतस
पहिल्या फोटोत लोणचं शोधायला गेलो तर बटाट्याची भाजी नजरेस पडली.
वरण साधे केले होते का फोडणीचे?
हिरवे पान कढीपत्त्याचे आहे का पुदिन्याचे?
9 May 2012 - 10:45 am | अत्रुप्त आत्मा
@हिरवे पान कढीपत्त्याचे आहे का पुदिन्याचे? >>> छे..! छे..! स्पांडु धार्मिक होतो हो काही वेळा ;-) तुळस आहे ती... हो कि नै रे मन्या... ऊर्फ (च.चा. ची मनुकडी :-p )
9 May 2012 - 12:56 pm | कुंदन
अन भात मौ होता ना रे
9 May 2012 - 1:02 pm | स्पा
अन भात मौ होता ना रे
तू भेट रे ;)
9 May 2012 - 10:00 am | पैसा
सत्याचे प्रयोग आहेत हे आमच्या लक्षात आहे बरं का!
9 May 2012 - 10:24 am | अन्या दातार
मला बेसिकमध्येच एक शंका आहे.
हा सत्या कोण??
9 May 2012 - 10:29 am | प्रचेतस
सत्या रत्नांग्रीकर असावी काय?
9 May 2012 - 10:32 am | अन्या दातार
मुळात 'हा' का 'ही' हेच कोडे सुटलेले नाही. तुम्ही थेट गाव वगैरे शोधायला निघालात. थांबा जरा, मन्या फेणेलाच विचारुयात.
9 May 2012 - 1:00 pm | सूड
मी त्याच्या घरी पोचल्यावर तरी सत्या नामक जे काय प्रकरण आहे ते हजर नव्हतं. ते जे काही आहे ते मी आणि किसन यायच्या आधी कुकर लावून गेलं असावं अशी दाट शंका येतेय.
10 May 2012 - 4:02 pm | अत्रुप्त आत्मा
@ते जे काही आहे ते मी आणि किसन यायच्या आधी
कुकर लावून गेलं असावं अशी दाट शंका येतेय.>>>
11 May 2012 - 7:17 am | ५० फक्त
कुकर लावून गेलं असावं अशी दाट शंका येतेय. - गेलं - ही टाईपातली चुक आहे का व्याकरणाची का अजुन काही, फ्युअॅ, तुमच्याकडुन खुलाशाची अपेक्षा आहे.
11 May 2012 - 7:24 am | स्पंदना
'तो' की 'ती' ??
असा गहण प्रश्न पडल्याने सुड ने सुवर्ण्मध्य गाठुन 'ते' उल्लेख केलाय.
11 May 2012 - 9:52 am | प्यारे१
अहो पण ह्या 'ते' सुवर्णमध्यानं मन्याचं जिणं अवघड होईल हो....! ;)
11 May 2012 - 11:08 am | ५० फक्त
अरे अरे, धाग्याचा विमंफळा व्हायला लागला की ओ, गेलं म्हणजे मला वाटलं होतं की ते मा. स्पाजी यांच्या घरातलं हिरव्या डोळ्यांचं काळं का काळ्या डोळ्यांचं हिरवं मांजर वगैरे आहे का काय, इथं सदस्य लोकं सुवर्णमध्य वगैरे काढायला लागली लगेच, कसलं महाग झालंय सोनं आणि त्यात त्याचा मध्य बिध्य कुठं काढता.
9 May 2012 - 1:31 pm | कुंदन
तीच का रे ती खंबाल पाड्याची "सत्या म्हात्रे" ;-)
11 May 2012 - 7:10 am | ५० फक्त
मा. श्री . स्पाजी, आता महापालिकेच्या शाळात दुपारचे जेवण पुरवायचे कंत्राट घेता का बघा, तिथं एवढंच यावं लागतं, खिचडी नायतर वरण भात. चांगला घंदा आहे बघा ट्राय मारुन.
11 May 2012 - 7:50 am | अन्या दातार
"चांगला घंदा आहे बघा ट्राय मारुन"- घंदा - ही टाईपातली चुक आहे का श्लेष आहे का अजुन काही, ५०फक्त, तुमच्याकडुन खुलाशाची अपेक्षा आहे.
11 May 2012 - 11:52 am | रमताराम
मन्यारावांची खिचडी म्हणजे बिरबलाची खिचडी झालीये की. 'तयार' होऊन खाऊन मोकळे झाले तरी अजून चुलीवर 'शिजतेच' आहे.