गाभा:
मी गेले १५ दिवसा पुण्याबाहेर रहात आहे. पुण्यातल्या नोकरीची शस्त्रक्रिया झाली म्हणून पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चेन्नैत येऊन राहिलो. वेळ मिपावर काही काळ येऊन विरंगुळा शोधण्याची होती. मिपावरती कवितांच्या विडंबनांच्या जिलब्या वाचून मन चलबिचल व्हायचे. मिपावर रोज १-२ नवकवी अतृप्त आत्म्याच्या विडंबनाच्या धडकेने/चित्र विचीत्र स्मायल्यांनी खिन्न होत आहेत. कुठे इथे नवकवींना साधी कौतुकाची थापही मिळत नाही. पण इकडे
अतृप्त आत्म्याकडे खूप प्रेरणा आहे. स्पावड्याही आहे त्याला चेव द्यायला, पुन्हा विडंबने पाडायला. अजून त्यात वल्ली वगेरे वेगळेच.
कुठून येते प्रेरणा आणि अशी का विडंबने पडतात?
हीच काय नवकवींचा उत्साह वाढवण्याची पद्धत आहे?
प्रतिक्रिया
31 Mar 2012 - 5:13 am | पिवळा डांबिस
कुठून येते प्रेरणा आणि अशी का विडंबने पडतात?
कारण तमाशाप्रमाणेच 'राडा' ही देखील आपली जाज्वल्य परंपरा आहे!!!!
:)
------------------------------------
विडंबन इतना करो, नवोदित की सटकाय ||
मैं हंस-हंसके मरूं पर, संपादक न भडकाय ||
:)
31 Mar 2012 - 5:19 am | सुहास..
हा हा हा ,,
मरीना बिच वर काकटेल मिळत नाय का तुमची ;)
अरे, सोत्रि जरा पॉझिटिव्ह कर की !
सुपरस्टार ला लोक्स का लाईक करतात, कमल हासन ला का नाही, ' तमील तेरीयाद " म्हणजे काय ? जरा एम.जी.एम. ला जा !! भुज्जी खा , टासमॅक च्या बार मध्ये उभा राहुन ' मद्रास बियर ' मार . चेन्नईच्या , पक्षी तमील, पोरी जिन्स घालुन का फिरत नाही, प्लास्टिक मधल्या पाण्याचा भाव १ रु. का. बसमध्ये प्रवासाचे कमी पैसे कसे का लागतात, एखादा माणुस दिवसभर लुंगी घालुन कसा काय फिरू शकतो, अय्यपा स्वामी वाली गॅन्ग काळे कपडे, पायात चप्पल न घालता उन्हात का फिरते, गजर्यांचा खप ईतका कसा काय . पेपर नॅपकीन एवजी पेपर कट करून कस काय वापरतात ......
आणि जाता जाता विजय आणि श्रियाचे एक गाणे टाकतो आहे, एम.जी.आर वर चित्रीत झालेल गाणे कार्तिक राजा ( ईल्लय राजा च पोरगं) ने मस्त रिमीक्स मारलय बघ ... अर्थात ओरिगनल गाणे तु शोध ;) ;) ;)
2 Apr 2012 - 12:34 pm | प्रीत-मोहर
पाण्याच्या पिशवीचे ६ महिन्यापुर्वीचे भाव २ रु. होते ;)
बाकी सुहासशी सहमत!!!
31 Mar 2012 - 9:10 am | स्पा
<अ आ मोड ऑन> ऑ?... :( अस काय ते...माझ नाव का बर्र
<अ आ मोड ऑफ >
मी एकतरी कवितेच विडंबन केलाय आतापर्यंत ? पुरावा दाखवा पाहू ....
सोत्री तू दुष्ट आहेस .... दुष्ट..दुष्ट.....दुष्ट......
भेट आता एकदा .. पानातून भांगेच्या गोळ्याच खिलवतो तुला
31 Mar 2012 - 4:19 pm | किचेन
ऊगिचच का?
31 Mar 2012 - 4:19 pm | किचेन
ऊगिचच का?
31 Mar 2012 - 8:43 am | प्रचेतस
मी गेल्या ३० वर्षापासून पुण्यातच राहात आहे. नोकरीची शस्त्रक्रिया अजूनही झाली नसल्याने पोटापायाचा प्रश्न इथेच सोडवत आहे. नोकरीत काम फारसे नसल्याने मिपावरती भरपूर विरंगुळा मिळतोय. मिपावरच्या दारूच्या धाग्यांनी मन चलबिचल व्ह्यायचे. सोकाजीरावांना लावलेल्या दारवांच्या फोटूंमुळे रोज एक दोन सोज्वळ मिपाकर खिन्न होत आहेत. कुठे ते दारूला विष मानणारे मिपाकर पण इकडे
सोकाजीरावांकडे दारूचे खूप ज्ञान आहे. समुद्रातले काही जीवही आहेत त्यांना चेव द्यायला-पुन्हा दारूचे धागे टाकायला. काही विहिरीतले जुने बेडूकही आहेतच साथीला.
सोकाजीरावांनी केलेल्या दारवांच्या उदात्तीकरणाने आजवर सोवळे राहिलेले काही नवागत मिपाकर अट्टल दारूबाज व्हायला लागले आहेत. कुठून येते ही प्रेरणा सोज्वळांना दारूबाज करण्याची, संस्कृती असंस्कृत करण्याची?
हीच का लिंबूपाणीवाल्यांना दारूडे करण्याची पद्धत आहे?
31 Mar 2012 - 8:59 am | चिंतामणी
जरा ह.घे.
या गोष्टीला (पक्षी विडंबनाला) फारच वैयक्तीक घेतले असे वाटते.
ह्याची प्रेरणा इथे आहे हो.
31 Mar 2012 - 9:05 am | प्रचेतस
ह. च घेतले आहे हो.
वैयक्तिक तर बिलकुल नाही. सोकाजीराव आमचे मैतरच आहेत. :)
31 Mar 2012 - 9:54 am | ५० फक्त
सहकारी काव्य विडंबक संस्था व जालीय अर्थहीनकाव्य किल्लर संधातर्फे श्री. घागाकर्ते सोकाजीराव यांचा जाहीर निषेध. सदर दोन्ही संस्थांच्या पदाधिका-यांची नावे सदर माहितीपुर्ण धाग्यात न टाकल्याने पुन्हा एकदा निषेध.
तसेच मा. श्री स्पाजी यांचे नाव टाकुन सदर दोन्ही संस्थांची कार्यपद्धती व दाहकतेबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे असे वाटते.
जुन्या आंतरजालीय विडंबकांची किमान आभार तरी मानायला हवे होते, पण ने सुद्धा नसल्याने एक आंजालीय विडंबक म्हणुन शरम वाटली.
लवकरच ' जिल्बी टु डायरी - अ जर्नी नॉट लास्टेड मोअर ' असा एक शुद्ध मराठी लेख येणार असल्याचे कळते.
असो.
31 Mar 2012 - 10:08 am | सोत्रि
वल्ली,
माझ्या कुर्निसाताचा स्विकार करावा! :)
- (कमरेत वाकून कुर्निसात करणारा) सोकाजी
31 Mar 2012 - 10:50 am | अत्रुप्त आत्मा
@हीच का लिंबूपाणीवाल्यांना दारूडे करण्याची पद्धत आहे?>>>
वल्ली शेठ खतम झालो हाय
सोत्रींचे खत्री इडंबन....
31 Mar 2012 - 8:54 am | स्पा
अयययय्या... विडंबनाचे विडंबन =))
मेलो मेलो
वल्लीसेठ साष्टांग हो __/\__
-- मुत्री
31 Mar 2012 - 9:38 am | प्रकाश घाटपांडे
आमच्या मते प्रेरणा 'आतून' येते. ती अपेय पानातून येते, ती अभक्षभक्षणातून येते, ती जळजळीतूनही येते काहींच्या मते ती शरीरात विशिष्ट ठिकाणी रहिवास करणार्या किड्यातून येते. त्याला काही लोक रेहमानी किडाही म्हणतात.
यानिमित्ताने 'खाज' व 'प्रेरणा' या वरील तुलनात्मक फरक व साम्य जाणकारांकडून जाणुन घ्यायला आवडेल.
31 Mar 2012 - 9:52 am | बिपिन कार्यकर्ते
+१
=)))))
31 Mar 2012 - 9:56 am | ५० फक्त
आपली ती प्रेरणा , दुस-याची ती खाज. - असं असावं बहुधा.
31 Mar 2012 - 9:58 am | स्पा
आपली ती प्रेरणा , दुस-याची ती खाज. - असं असावं बहुधा.
जोरदार अनुमोदन
किंवा साडेतीन ते चारवर्ष सदस्य्काल असणार्यांची प्रेरणा.. आणि बाकीच्यांची खाज.. असाही एक प्रवाद मांडला जातो....
31 Mar 2012 - 11:19 am | धन्या
पन्नासने तयार केलेली नवी म्हण आणि स्पावड्याचं तिचं एक्स्टेंशन वाचुन. :)
31 Mar 2012 - 10:41 am | अत्रुप्त आत्मा
आमचे परम मित्र सोकाजी बाबा,यांनी आमची जाहिर दखल घेतल्याबद्दल,मनात दाटुन आलेल्या अतीव भक्तीने ही आरती समर्पित करीत आहोत... ;-)
तरी तुमचेही उरी भक्ती असावी ही णम्र सदिच्छा... ;-)
आरती सोत्री बाबा,तुमचा घेतला कुणी ताबा...?।
कॉकटेल आहे जरी काशी,आमचा विडंबन काबा॥धृ॥
सक्काळी सकाळीच,तुंम्हा चढली का हो थोडी..?।
खवतल्या विषयांची,काढली का हो जाहिर खोडी..?॥१॥
आंम्ही-पडलो विडंबक,तुंम्हा व्हावे का हो दु:ख्ख..?।
पाहाता तुमचा शिरियसनेसं, आमच्या मनी झाले खिक्क ॥२॥
नवंकवी प्रोत्साहने,त्यांची उचलू नका तळी।
विडंबन ऐसा रसं,कधी बाहेर येते मळी॥३॥
मळीचीच करुन दारू,आंम्हा सोत्री लागले मारू...।
आंम्हाही द्या प्रोत्साहन,आमचे नवे आहे तारू..॥४॥
चुकले माकले आमचे काही,आंम्ही त्यांची मागतो माफी।
॥५॥
तुंम्ही करा कॉकटेलं,का हो आंम्हा देता कॉफी..?
स्मायल्या चित्र भावना,आंम्हा त्या शिवाय रहाव्वे ना...।
शब्दांपेक्षा परिणामी,कळ्ळे का हो सोत्री मामा॥६॥
संपले आमचे भांडण,अता करु थोडी मज्जा।

तरिही न ऐकाल,ऊडवू तुमचा पुरता फज्जा॥७॥
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
रुस्तुम-ए-मिपा---विडंबन सेना झिंदाबाद...
31 Mar 2012 - 11:46 am | गणामास्तर
बेक्कार फुटलोय...भटजी बुवा तुम्ही घेणार जीव आमचा एक दिवस नक्की.
31 Mar 2012 - 11:43 am | सोत्रि
हायला डायरेक्ट मामा...
खाकी वर्दी घालून, तोंडात पकडलेली शिट्टी वाजवत , हातातला दंडूका उगारून मी भटजीबुवांच्या मागे धावतो आहे असे दृश्य एकदम डोळ्यासमोर आले. :D
- (गुर्जी आता फज्जा उडवणार ह्या भितीने ग्रासलेला) सोकाजी
31 Mar 2012 - 12:11 pm | अत्रुप्त आत्मा
डोळे हे फिल्मी गडे,ठोकुनी मज पाहू नका...
आंम्हीच आहोत पोलिस बडे,तुम्चा झालाय सोत्रीबाबा... :-p
(आजच्या बुर्जीचा फन्ना उडणार या भितिने हसलेला) बाबाजी ;-)
31 Mar 2012 - 12:09 pm | निश
सोत्रि साहेब, फुटलो , पडलो...
चित्र बघुन हसुन हसुन गडाबडा लोळणारा( तॄप्त आत्मा.)
निश
31 Mar 2012 - 2:37 pm | अत्रुप्त आत्मा
समगोत्री साहेब, उठलो...पळत सुटलो ;-)
मित्र असुन उठुन बसुन धडाधड मोडणारा (आप्त आत्मा)
ढिशss..
ढिशss..
31 Mar 2012 - 11:46 am | जेनी...
रुस्तुम-ए-मिपा---विडंबन सेना झिंदाबाद... ;)
लगे रहो ......हम तुम्हारे साथ ह्ये :D
:D
31 Mar 2012 - 2:29 pm | रमताराम
निर्वाण प्राप्त जाहले.
31 Mar 2012 - 4:25 pm | किचेन
बोला सोत्रीम्हाराज कि जय!
बोला अतृप्त आत्मा कि जय!
31 Mar 2012 - 2:10 pm | पिंगू
हास्यबाँब फुटलेला आहे... ;)
- पिंगू
31 Mar 2012 - 4:00 pm | गणपा
माझी जाहिर विनंती आहे सर्व विडंबकांना 'मिपाकरांना थोडी उसंत द्या'. अती झालं आणि आता हसु ही येईनास झालय. उलट अश्या विडंबनातुन तेढ निर्माण होतेय.
जेवणात चटणी,लोणचं चवी पुरता असावं, पण ते आवडते म्हणुन ताट भरुन कुणी खात नाही.
काही जण आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपला उपयोग करुन घेतायत याची कदाचीत तुम्हाला जाणीव ही होत नसेल.
असो सुजाण आहात. ही विनंती आहे ऐकलीच पाहिजे असा हट्ट नाही.
धन्यवाद.
-गणपा
31 Mar 2012 - 4:12 pm | निश
गणपा साहेब, तुमच म्हणण एकदम मान्य.
कुठलिहि गोष्ट थोडक्यात बरी.
मस्त आणि योग्य वेळि लिहिल आहेत तुम्ही.
मला मान्य .
खर तर सही लिहिल आहे तुम्ही.
तुमच्या लेखांचा व तुमचाही नेहमिच पंखा असलेला
निश
31 Mar 2012 - 4:22 pm | अत्रुप्त आत्मा
@माझी जाहिर विनंती आहे सर्व विडंबकांना 'मिपाकरांना थोडी उसंत द्या'. >>> आमेन... आंम्ही गंपाभाऊंचे ऐकणार... :-)
@उलट अश्या विडंबनातुन तेढ निर्माण होतेय. >>> हे ही मान्य... :-)
@जेवणात चटणी,लोणचं चवी पुरता असावं, पण ते आवडते म्हणुन ताट भरुन कुणी खात नाही.>>> मान्य... इससे गेहेरा सच तो दुनीया मे नही है...
@काही जण आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपला उपयोग करुन घेतायत याची कदाचीत जाणही होत नसेल. >>> हे घडु शकतं...ठिक आहे... काही दिवस आमचे कडुन शांततेचे पालन होइल...
फक्त आमची पण एक विनंती- विडंबन बंद ठेवले म्हणुन, पुन्हा कोणी डिवचू नये,,,,याची काळजी कोण घेणार..? आंम्ही तरिही गप्प बसू...पण मनावरचा संयम तुटावा अश्या पद्धतिने आणी तेही याच्याशी प्रत्यक्ष संमंध नसलेले लोक प्रतिसादातुन खोड्या काढतात... जेणे करुन पाणी पुन्हा गढुळ व्हावे... व यांना मजा बघता यावी... असो... हा धागा किंवा ही जागा असल्या वाद/विवादात गुंतुन पडू नये याची नम्र जाणिव मला आहे... कुण्या कविंची मने दुखावली असतील तर मी नम्रपणे पुनश्च क्षमस्व म्हणतो... आणी थांबतो... :-)
31 Mar 2012 - 4:48 pm | ५० फक्त
'... कुण्या कविंची मने दुखावली असतील तर मी नम्रपणे पुनश्च क्षमस्व म्हणतो... आणी थांबतो''
अहो, गेला महिनाभर स्त्री -पुरुष समानतेवर चर्चा झाली ती वाचली नाही काय तुम्ही, नुसते कवि लिहिताय, कवयित्री / कवियत्री / कवियित्री यांचा अनुल्लेख किमान तुमच्याकडुन या दिवसात तरी अपेक्षित नव्हता.
1 Apr 2012 - 12:21 pm | सानिकास्वप्निल
सहमत!
धन्यवाद :)
1 Apr 2012 - 4:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे
समस्त विडंबन पीडित वाचक मिपाकरांच्या वतीने शतश: धन्यवाद हो गणपा भाऊ. मिपावर येणे कमी झाले होते या दंग्यात.
हे इतक्या स्पष्टपणे लिहिले ते बरे केलेत. याची गरज होती.
31 Mar 2012 - 4:44 pm | निश
अत्रुप्त आत्मा साहेब, तुमच्या सच्चेपणाला मानाचा मुजरा .
मुळात तुमच्यात अफाट काव्य प्रतिभा आहे अस असताना जर तुम्हि तुमचि काव्य प्रतिभा समाजातिल वाईट प्रथा विनोदी कवितेच्या माध्यमातुन समाजापुढे आणली तर एकदम बहार होईल.
तुमच्या कवितेत ती ताकद आहे, कि लोक त्या वाईट प्रथांवर विचार करायला लागतिल.
खरच मित्रा, तुझ्यात एक जबरदस्त कवि आहे.
31 Mar 2012 - 8:46 pm | अत्रुप्त आत्मा
@अत्रुप्त आत्मा साहेब, तुमच्या सच्चेपणाला मानाचा मुजरा . >>> स्विकारला... :-)
@मुळात तुमच्यात अफाट काव्य प्रतिभा आहे>>> खरं आहे...
@तुमच्या कवितेत ती ताकद आहे, कि लोक त्या वाईट प्रथांवर विचार करायला लागतिल. >>> बघतो प्रयत्न करून...
@खरच मित्रा, तुझ्यात एक जबरदस्त कवि आहे. >>> हे ही खरं आहे...
धन्यवाद.... :-)
31 Mar 2012 - 8:02 pm | इरसाल
काही जण आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपला उपयोग करुन घेतायत याची कदाचीत तुम्हाला जाणीव ही होत नसेल.
असो सुजाण आहात. ही विनंती आहे ऐकलीच पाहिजे असा हट्ट नाही.
गणपा +१, जोरदार हनुमोदन.बाकी सगळे सुज्ञ आहेतच.
1 Apr 2012 - 2:01 pm | विजुभाऊ
१५ दिवस चैनैत रहाणारानी इडली डोशावर हवे तेवढे बोलावे. भांबुर्ड्यातील लोकांवर इतक्या दुरून बोलायचे म्हणजे ******** फुल्या फुल्या फुल्या......
चैन्नैत राहून जे काही काळे करायचे ते करा इकडच्या नावाने का शंख करताय..... रजनीकांत कुठचे
1 Apr 2012 - 2:28 pm | चिंतामणी
उसातल्यांनासुद्धा असेच सांगावे ही विनंती.
3 Apr 2012 - 4:45 pm | नेहरिन
अरे रे रे ........................ मला वाटल होत कि इथे धुर, जळ्जळ , मरामारी होत नाहि .पण असे काही नाही. हे वरील सगळे पोस्ट वाचुन भ्रमाचा भोपळा फुटला. इथे हि शाब्दिक मारामार्या होतात. इनो द्यायचि वेळ येतेच . काय हे???
3 Apr 2012 - 4:59 pm | परिकथेतील राजकुमार
कंपूबाजाने कंपूसाठी काढलेला धागा.
3 Apr 2012 - 5:19 pm | वसईचे किल्लेदार
आतातरी सौजन्य सप्ताह (किमान दिवस तरी) चालु होणार बहुतेक☺
3 Apr 2012 - 9:55 pm | नेहरिन
हम्म्म
प्रेषक परिकथेतील राजकुमार Tue, 03/04/2012 - 16:59.
कंपूबाजाने कंपूसाठी काढलेला धागा.
तु ही या क्म्पुतलाच आहेस की............????