"वुई कॅन कूक" : सडाफटिंग पाकसिद्धी - भाग २

प्रास's picture
प्रास in पाककृती
22 Feb 2012 - 12:43 pm

रात्री साडे तीनापर्यंत गप्पा मारत बसल्यामुळे दुसर्‍या दिवशी अंमळ उशीराच म्हणजे साडे सातला जाग आली. गवि आधीच उठून आपल्या माळीबुवांना वेतन प्रदान करत होते. काल सर्वात आधी टपकलेले विमे मात्र अजूनही दुलईत पहुडलेले. नेहमी प्रमाणे आटोपून मी आपला तयार होतोय तर गविंनी गावातून मागवलेला चहा आणि न्याहरीचा वडापाव घेऊन माणूस आला. विमेंना बहुतेक झोपेतच वडापावाचा गंध आला असावा कारण तोपर्यंत त्यांना चांगलीच जाग आलेली. मग व्हरांड्यातच यथावकाश गरम गरम चहा घेऊन वडापावाचा नाश्ता केला गेला. वड्याच्या तिखटाने तोंड चांगलेच पोळले पण मजा आली. चहा पिता पिता आमच्या गप्पांचा पार्ट टू सुरू झाला, जणू काही आदल्या रात्री त्या थांबल्याच नव्हत्या.

बाहेर ओट्यावरच बसल्यामुळे गविंच्या घराच्या कंपाऊण्डमध्ये माझं लक्षं गेलं. आता घासफूसचाच सतत संबंध आलेला असल्याने आमचा वनस्पती सृष्टीवर भारी जीव! त्यात त्या निर्मनुष्य जागी विविध प्रकारच्या वनस्पती उगवलेल्या दिसत होत्या. मग काय, गवि आणि विमेंची एक वनौषधी आकलन कार्यशाळाच घेतली गेली. गविंच्या घराजवळच एक नाही दोन नाही तब्बल दहा - बारा वनौषधी मिळाल्या. मग आमच्या वाक्गङ्गेला पूर आला. हातासरशी आयुर्वेदावरही एक व्याख्यान देण्यात आलं. एकूण कार्यशाळेमध्ये घडलेल्या चर्चेचा परिणाम असा झाला की बोलून बोलून माझे आणि ऐकून ऐकून गवि-विमेंचे खाल्लेले वडापाव पचून गेले.

कार्यशाळेदरम्यान सारिवाच्या मूळापर्यंत जाण्याच्या प्रयत्नात

मग आता दुपारच्या जेवणासाठी काय बेत करावा यावर विचार सुरू झाला (आणि गवि-विमेंना हुश्श झालं कारण माझी आयुर्वेदिक बडबड बंद झाली.) आधी गविंच्या मनात आता बाहेरच कुठेतरी चांगल्या ठिकाणी खाऊ असं आलं पण विमेंनी त्याला कडाडून विरोध केला आणि घरातंच आदल्या दिवशीप्रमाणे काही तरी बनवून, ते खाऊन दुपारनंतर मुंबईकडे निघू असं त्यांनी ठासून प्रतिपादन केलं. विमे जिंकले हे वेगळं सांगायला नकोच!

मग आता आमच्याकडे जे जिन्नस होते त्यावरून गविंची त्यांच्या बॅचलरहूडमधली पेटंट डीश 'मिक्स वेजिटेबल मसाला खिचडी' बनवायची ठरली. अर्थात माझीही त्या प्रकारची डिश आवडतीच असल्याने मी तात्काळ अनुमोदन दिलं. विमेंकडे पर्यायच नव्हता. आमच्याकडच्या वाणसामानाच्या आणि भाज्यांच्या पोतडीतून जिन्नस बाहेर काढले -

१. तांदूळ - साधारण २०० ग्रॅम

२. मुगाची डाळ - साधारण १०० ग्रॅम

३. तूरीची डाळ - साधारण १०० ग्रॅम

४. टॉमॅटो - ४ मध्यम आकार

५. भोपळी मिरची - २ मोठी (साधारण २०० ग्रॅम)

६. फ्लॉवर - १ छोटा (साधारण २५० ग्रॅम)

७. बटाटे - ३ मध्यम आकार

८. हिरवी मिरची - ३ मध्यम आकार

९. आलं - अर्धा इंच

१०. कडीपत्ता - आवडीनुसार

११. कोथिंबीर - आवडीनुसार

१२. मीठ - आवडीनुसार

१३. साखर - आवडीनुसार

१४. एवरेस्ट बिर्याणी मसाला - ४ चहाचे चमचे

१५. हळद - ३ चहाचे चमचे

१६. मोहरी - ३ चहाचे चमचे

१७. जिरं - ३ चहाचे चमचे

१८. हिंग - अर्धा चहाचा चमचा

आज वरकामाला मी आणि विमे होतो आणि मास्टर शेफ गवि होते. मग (नेहमीप्रमाणे गुरूवर्यांना वंदन करून) मी आणि विमेंनी पटापट बटाटे, भोपळी मिरच्या, टॉमॅटो, हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर व्यवस्थित चिरून घेतले. फ्लॉवर मोकळा करून मिठाच्या पाण्यात घेतला आणि 'मिक्स वेजिटेबल मसाला खिचडी'ची जय्यत तयारी केली.

गविंच्या मास्टर मार्गदर्शनाखाली केलेली कृती अशी होती -

एक स्वच्छ कुकर मंद विस्तवावर चढवून त्यात शेंगदाण्याचं तेल तापत ठेवलं. तेल व्यवस्थित तापल्यावर त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, हळद, आलं आणि हिरव्या मिरच्या टाकून फोडणी तयार केली. तयार फोडणीमध्ये कापलेले टॉमॅटो टाकून परतले. टॉमॅटोंना पाणी सुटायला लागल्यावर त्यात भोपळी मिरची, फ्लॉवर आणि बटाट्याचे तुकडे सोडून परतून घेतले. दरम्यान गविंनी डाळी आणि तांदूळ धुवून घेतले होते, ते ही त्यात टाकून परतून घेतले. त्यात आवश्यक त्या प्रमाणात साखर-मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घेतले आणि त्यामध्ये खिचडी शिजायला लागेल तितके पाणी घातले. या मिश्रणामध्ये एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आणि कोथिंबीर भुरभुरवून त्यातलं पाणी जरा गरम होताच कुकरचं झाकण लावून टाकलं. कुकरच्या तीन शिट्ट्या काढल्या आणि नंतर गॅस बंद करून तो निववंत ठेवला.

'मिक्स वेजिटेबल मसाला खिचडी'ची फोडणी

रंगीबेरंगी वेजिटेबल कंटेन्ट्स

ते रंगीत कंटेन्ट्स फोडणीत परतले जात असताना

रंगीत कंटेन्ट्समध्ये एक पांढरी अ‍ॅडिशन (फ्लॉवर)

डाळ-तांदळासकट जिन्नस परतल्यावर मिश्रणात मीठ घालताना मास्टरशेफ

पाणी, कोथिंबीर आणि बिर्याणी मसाला टाकल्यावर

एका बाजूने खिचडी तयार होत आली असतानाच तिच्याबरोबर तोंडी लावायला गविस्पेशल 'बेडेकरी अचारी वांगी-काप' बनवण्याचं गविंनी ठरवलं. मग आमच्या पोतडीतून आम्ही आणखी काही जिन्नस बाहेर काढले -

१. भरताची वांगी - ३ मोठी

२. डाळीचं पीठ - १०० ग्रॅम

३. बेडेकर लोणच्याचा मसाला - १०० ग्रॅम

४. मीठ - चवीनुसार

५. शेंगदाण्याचं तेल - आवश्यकतेनुसार

पुन्हा मास्टर शेफ गवि आणि मी त्यांचा असिस्टंट. आम्ही केलेली कृती पुढीलप्रमाणे -

आधी तीनपैकी एक भरताचं वांग घेतलं आणि सुरीने त्याचे काप करून घेतले. काप साधारण १ सेमी रुंदीचे कापण्याचा प्रयत्न केला गेला. एकाच वांग्यापासून मिळालेल्या कापांची संख्या बघता बाकीची वांगी बाजूला ठेवून दिली. मग डाळीचं पीठ आणि बेडेकर लोणच्याचा मसाला यांचं २:१ प्रमाणात मिश्रण करून घेतलं. लोणच्याच्या मसाल्यात थोड्याप्रमाणात मीठ असल्याने त्या हिशोबाने त्यात आवश्यकतेनुसार मीठ घालून ते एकत्र केलं. त्यानंतर वांग्यांच्या कापांना हे मिश्रण चोपडलं. वांग्याला पाणी सुटल्यामुळे थोड्याच वेळात मिश्रणाचा कापांवर एक थर बसला. अशाप्रकारे पीठात लडबडलेल्या वांग्याच्या सर्व कापांना तव्यावर शेंगदाण्याचं तेल सोडून ते तापल्यावर त्यात शॅलो फ्राय करून घेतलं.

'बेडेकरी अचारी मसाला' बनवताना आमचे 'मुख्य आचारी'

वांग्याचे काप सुरीनेच केलेले आहेत

मसाला आणि वांगी-काप यांच्या दिलजमाईच्या प्रयत्नात

दिलजमाई झालेल्या कापांची अशी तव्यावरच्या गरम तेलावर रवानगी झाली

वांग्याचे काप बनत होते तोवर आमचा कुकर पडला आणि आम्हाला दिसलं की आम्ही बनवलेली सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ३ - तांदळाची खिचडी आणि आता सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ४ - वांग्याचे काप व्यवस्थित तयार झालेले होते. मग विमेंनी या दोन्ही पाकसिद्धींची एकाच प्लेटमध्ये कलात्मक मांडणी करून त्यांचे फोटो काढले. आम्ही मात्र तोपर्यंत प्रचंड भूक लागल्याने मिळेल त्या प्लेटमध्ये पटापट व्यंजनं घेतली. एकूणच दोन्ही डिशेस् इतक्या मस्त दिसत होत्या की तोंड भाजत असूनही आमचे खाण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यावर गविंनी फार सुंदर मखलाशी केली, ""शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत निघत नाही.." पण तरीही हे दोन्ही पदार्थ चवीला अप्रतिम झालेले आणि व्यक्तिशः मी खिचडी उरणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली.

सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ३ - 'मिक्स वेजिटेबल मसाला खिचडी' आणि सोबत सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ४ - 'बेडेकरी अचारी वांगी-काप' (कलात्मक मांडणी सौजन्य - वि मे)

'बेडेकरी अचारी वांगी-काप' खाताना विमे आणि गवि, कुठल्याशा घोळू का काय माशाचे काप चवीला डिट्टो असेच लागतात असं सारखं म्हणत होते. गविंनी त्यांच्या वडिलांचा एक किस्सा सुनावला. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या एका शुद्ध शाकाहारी मित्राला असेच वांगी-काप खिलवले. त्या मित्राने ते वांगी-काप समजूनच फार आवडीने खाल्ले पण थोड्यावेळाने खाता खाता गविंचे वडिल त्या मित्राला म्हणाले, "काय, घोळूचे काप अगदी वांग्याच्या कापांसारखे लागतात नाही?" हे ऐकताच त्यांचा तो मित्र एकदम स्टन् झाला आणि त्याच्या पोटात ढवळून येऊ लागले. शेवटी स्वयंपाक घरात मासे नाहीत आणि काप वांग्याचेच होते हे जेव्हा त्या मित्राला त्यांनी प्रत्यक्ष दाखवलं तेव्हा कुठे त्यांच्या मित्राची खात्री पटली. यावेळी पाकसिद्धीच्या वेळेसच मी असिस्टंटकी केलेली असल्याने बिनघोर बेडेकरी अचारी वांगी-कापांचं सेवन केलं. खरंतर ते इतके चविष्ट झाले होते की आणखी एखादं वांगं कापलं असतं तरी त्याचे कापही स्वाहा झाले असते, हे निश्चित!

सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ४ 'बेडेकरी अचारी वांगी-काप'

जेवून होतंच आहे तर आता परतीचे वेध लागले. गविंचा मुलगा त्यांना फोन करून परतण्याची जणू आठवणच करून देत होता. विमेंनी झपाट्याने पुन्हा एकदा भांडी-प्रक्षालनाचा कार्यक्रम हाती घेतला आणि पूर्णतेला नेला. त्या बरोबरच मी आणि गविंनी आणलेल्या वाण सामान आणि भाज्यांची योग्य ती वाटणी पुन्हा आमच्या आमच्या पिशव्यांमध्ये करण्यातही त्यांनी हातभार लावला. आम्ही घर व्यवस्थित आवरून घेतलं, जेणे करून पुढच्या वेळेला सहकुटुंब तिथे आल्यावर आमच्या सडाफटिंग पाककौशल्याबद्दल आणि नंतरच्या कचर्‍याबद्दल गविंना बोल लागणार नाही, याची खबरदारी घेतली.

शेवटी घराच्या दाराला कुलूप लावताना मनात खूप समाधान दाटलं होतं. समाधान एका स्वयंपाकी कट्ट्याच्या यशस्वी आयोजनाचं होतं, समाधान सडाफटिंग पाकसिद्धींचं होतं, समाधान एका नव्या मैत्रीच्या नात्याच्या जन्माचं होतं, समाधान नव्या जिव्हाळ्याच्या निर्मितीचं होतं आणि समाधान इतक्या वर्षात जे गमावल्याची भावना झालेली ते काही प्रमाणात नक्कीच कमावल्याचंही होतं.

परतीच्या वाटेत पुढचा सडाफटिंग कट्टा कुठे करता येईल याची जोरदार चर्चा झाली. थोडं लांबचं ठिकाण ठरवण्याचा विचार होत आहे, कोकण, कदाचित गोवादेखिल! कुणी सांगावं, नव्याने तयार झालेल्या या मैत्रीच्या नात्याला इतका विश्वास तर नक्की वाटतोय की जगाच्या पाठीवर कुठेही जायला सांगा, आता जिथे जाऊ तिथे स्वतःची आनंदाची खाण निर्माण करू.

अशा प्रकारे मिपाकरांच्या सडाफटिंग पाकसिद्धी कट्ट्याच्या साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.

प्रतिक्रिया

>>>> परतीच्या वाटेत पुढचा सडाफटिंग कट्टा कुठे करता येईल याची जोरदार चर्चा झाली. थोडं लांबचं ठिकाण ठरवण्याचा विचार होत आहे, कोकण, कदाचित गोवादेखिल! कुणी सांगावं, नव्याने तयार झालेल्या या मैत्रीच्या नात्याला इतका विश्वास तर नक्की वाटतोय की जगाच्या पाठीवर कुठेही जायला सांगा, आता जिथे जाऊ तिथे स्वतःची आनंदाची खाण निर्माण करू.

---- टाळ्या!!!
आपण तर ब्वॉ एका पायावर तयार आहे.. या इंदूरला.. मस्त दोन दिवस सराफ्‍यात आणि दोन दिवस नर्मदाकिनारच्या कुठल्यातरी निमाडी खेड्‍यात राहूटी ठोकून राहू.

एकंदरीत फार मजा केलीत.. आणि तेवढ्‍याच खुमासदारपणे आमच्यापर्यंत पोचवलीत त्याबद्दल धन्यवाद.
कुकरमधल्या भाज्यांचा फोटो खूपच कातील आला आहे.. आणि वांग्यांचे काप तर लाजवाब!
कालपर्वा फूटपाथच्या कडेला असलेल्या एका झोपडीतून फोडणीचा असा खमंग घमघमाट आला की च्यायला त्या झोपडीत जाऊन आत्ता जेवायला वाढा असं म्हणावं वाटलं.

प्रचेतस's picture

22 Feb 2012 - 1:10 pm | प्रचेतस

इंदूरला होवूनच जाउ दे आता. आम्हीपण हजेरी लावूच.
प्रासभौंची लेखनशैली मस्तच.

प्रासभौंची लेखनशैली मस्तच.

यालाच प्रासादिक शैली म्हणावे..

इंदूर फिक्स करण्यात येत आहे.. दिवस आणि वेळेचा तपशील ठरवू लवकरच..

यकु's picture

22 Feb 2012 - 1:50 pm | यकु

चला.. कोण कोण आहे? हात वर करा..
तारीख आणि वेळे ठरविणार्‍या व्यनिच्या प्रतिक्षेत.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2012 - 2:47 pm | अत्रुप्त आत्मा

@कोण कोण आहे? हात वर करा.. >>> हम हाजिर है...

महिन्याभर अगोदर कळवा.. म्हणजे सडफटिंग कट्टा चुकायला मुहूर्त मिळणार नाही.. ;)

- (सडफटिंग स्वंयपाकी) पिंगू

वपाडाव's picture

22 Feb 2012 - 7:33 pm | वपाडाव

मेरा नंबर कब आयेगा !!

जब तुम पर्भणी से वापस आयेंगा. ;)

उगा काहितरीच's picture

23 Feb 2012 - 7:20 pm | उगा काहितरीच

ओ पर्भणी नाहि हो .. परभणी
आमच्या गावाचा अपमान ???

परभणीला पर्भणी म्हनुन का "सुड" घ्यायलात. :) ( ह.घ्या.)

उगा काहितरीच's picture

23 Feb 2012 - 7:25 pm | उगा काहितरीच

चला परभणीतच कट्टा करु ... वाटिकावर...

पियुशा's picture

22 Feb 2012 - 12:59 pm | पियुशा

__/\___
पाकसिद्धी कट्टा जबरा !!!!

हंस's picture

22 Feb 2012 - 1:06 pm | हंस

एकदम भन्नाट कट्टा! आणि प्रासभौंच्या ओघवत्या लेखनशैलीला सलाम!

अन्या दातार's picture

22 Feb 2012 - 1:10 pm | अन्या दातार

मस्त वृत्तांत.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2012 - 3:21 pm | अत्रुप्त आत्मा

सर्व प्रथम या भन्नाट कट्यासाठी हा दुसरा दिवस खर्‍या अर्थानी आंम्हा गवताळांचा आहे...काय ती खिचडी,ते तयार होतानाचे फोटो,सकाळचा नाश्टा(तोंड भाजणे वगैरे)...बेचैन झालं काळिज..(आज इनोचं सलाइन लावावं लागणार ;-) ),यात राहुन राहुन राहिल्यासारखं वाटतय ते आमचं खास कोकण श्टाइल पानाचं ताट,,,जेवण झाल्यावर गाडी गप्पांच्या गावाला जर डौलात जायला हवी असेल,तर पान हवच...त्या शिवाय चर्चेतुन खरी रसं-निष्पत्ती होत नाही,,दुपारचा चहा होईपर्यंत विमान कसं धक्क्याला लागतं... ;-)
आपला सलाम तुमच्या दर्दी भटकंती/खादाडीला ---^---

अवांतर- आमच्याही एका मित्रांच्या ब्याचलर पार्टित,,,साखरपुडा होऊन लग्नाची आतुरतेने वाट पाहाणार्‍या मित्राला उद्देशुन ही म्हण वापरली गेली होती >>>"शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत निघत नाही.."

>>>>आज इनोचं सलाइन लावावं लागणार
+11111111111111111111111111111111111111111

स्मिता.'s picture

22 Feb 2012 - 3:32 pm | स्मिता.

वांग्याचे काप तर खूपच टेम्टिंग दिसत आहेत. ते चटपटीत काप बघून आता तयार केलेली भेंडीची भाजी खायची इच्छा होत नाहीये :(

आता तयार केलेली भेंडीची भाजी खायची इच्छा होत नाहीये

मग ती तत्काळ आमच्याकडे धाडून देण्याची व्यवस्था करावी. भेंडीची भाजी ही आमच्या अनेक बहि:स्थ प्राणांपैकी एक आहे.

होय, आम्हाला भेंडीची भाजी प्रचंड आवडते.

प्यारे१'s picture

22 Feb 2012 - 4:26 pm | प्यारे१

भेंडी.....!

प्रास तुम्हाला शेंबडी भेंडी आडौते?

-दुपारीच मसाला भेंडी खाल्लेला प्यारेभेंडी

कोण म्हणतं भेंडी शेंबडी असते, ज्यांची तशी होते त्यांना करायची माहिती नसते. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2012 - 7:00 pm | अत्रुप्त आत्मा

अssरे...भेंsssडि...कविता झाली ही तर ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2012 - 7:04 pm | अत्रुप्त आत्मा

अssरे...भेंsssडि...कविता झाली ही तर ;-)

जेनी...'s picture

22 Feb 2012 - 9:37 pm | जेनी...

जबराट.;)

स्मिता.'s picture

22 Feb 2012 - 11:13 pm | स्मिता.

कोण म्हणतं भेंडी शेंबडी असते, ज्यांची तशी होते त्यांना करायची माहिती नसते.

असंच म्हणते रे! भेंडी अतिशय छान आणि 'सात्विक' भाजी आहे. मलाही आवडतेच... पण चटपटीत वांग्यांच्या कापापुढे फिकी वाटते ना.

निवेदिता-ताई's picture

22 Feb 2012 - 5:45 pm | निवेदिता-ताई

मस्त..मस्त..

Recipe uttam ahe fakta khichdimadhe vatane add kela aste tar ajun maja ali asti 

सध्या गणेशाज्वराने पछाडलेले असल्याने फटु दिसले नाहीत.
पण एकंदरीत वर्णन वाचता कट्टा भलताच रंगला असणार यात तिळमात्र शंका नाही. :)
लगे रहो.

५० फक्त's picture

22 Feb 2012 - 10:44 pm | ५० फक्त

मेलो, आता मिपावर वेगवेगळे आजार सुद्धा डिफाईन व्हायला लागले म्हणजे हे जग सुद्धा परिपुर्ण व्हायला लाग्लंय.,

अतिशय उत्तम वर्णन. रेशिपी झकास.

वपाडाव's picture

22 Feb 2012 - 7:02 pm | वपाडाव

आत्म्याचं वाक्य साजरं करुन इनोचं सलैन लावल्या गेले आहे...

पुन्हा एकदा जळजळ.
कुठे गेला तो इनो?;)

प्रचेतस's picture

22 Feb 2012 - 9:35 pm | प्रचेतस

ह्या लोकांनी सलाईनं लावून लावून संपवून टाकला असेल.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2012 - 10:35 pm | अत्रुप्त आत्मा

@ह्या लोकांनी सलाईनं लावून लावून संपवून टाकला असेल.>>>

पिउन टाकला उरला सुरला

फोटो तर अप्रतिम...

लई भारी, आणि इंदुर कट्ट्याला तर नव्या मैत्रिणिबरोबर नक्की येउ, जाम मजा येईल तिला पण.

पैसा's picture

22 Feb 2012 - 10:46 pm | पैसा

काय ते अफलातून वर्णन आणि काय ते अप्रतिम फोटो!! शॉल्लेट मजा केलीत राव तुम्ही!

सानिकास्वप्निल's picture

22 Feb 2012 - 10:54 pm | सानिकास्वप्निल

अहाहा! काय फोटो आले आहेत खिचडीचे आणी कापाचे तोंडाला पाणी सुटले आहे :)
कट्टा तर झक्कास रंगला मस्त मस्त मस्त :)

कुंदन's picture

22 Feb 2012 - 11:24 pm | कुंदन

आज सकाळी जळजळ झाली फोटो बघुन , आता संध्याकाळी खिचडी बनवुन खाल्ली तेंव्हा कुठे जळजळ थांबली.

इन्दुसुता's picture

23 Feb 2012 - 7:29 am | इन्दुसुता

कट्टा वृत्तांत आवडला.

भेंडिच्या भाजी बद्दल सुड आणि स्मिता यांच्याशी सहमत.

इंदुर कट्ट्यासाठी माझा हात ( दोन्ही हात ) वर. पण मी सडाफटिंग नाही ( सडी फटांग आहे) चालत असल्यास कळवावे :)

कृह्घेहेवेसांनल

स्वातीविशु's picture

23 Feb 2012 - 11:26 am | स्वातीविशु

सही कट्टा आणि व्रुत्तांत, फोटो दिसत नसले तरी जळजळ होत आहे. :-)

इनोच्या शोधात....;)

जयवी's picture

23 Feb 2012 - 2:40 pm | जयवी

सही आहे रेसिपी.....!!
मला लेखाचं नाव खूपच आवडल;):)

एकत्र स्वयंपाक करायला खूपच धमाल आली. वेळ कसा गेला कळलं नाही.. दोन्ही दिवस मिळून २४ तास आम्ही एकत्र वेळ घालवला पण तास दोन तासच गेल्यासारखे वाटले इतका झपाट्याने वेळ संपला.

मुख्य म्हणजे रिकाम्या घरात आणि ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या पण गावाच्याही हद्दीबाहेर असलेल्या जागी होणार्‍या गैरसोयी विमे आणि प्रास यांनी सहन केल्या. आजुबाजूच्या जंगली वातावरणामुळे असणारे कीटक, डास (यांचा समूळ बीमोड करण्यासाठी अनेक उपाय केल्याने त्यांचा त्रास झाला नाही) , नळाच्या पाण्याचा लहरीपणा, टीव्ही आदि मनोरंजनाची उणीव.. अगदी जमिनीवर रजई टाकून झोपावे लागणे अशा कोणत्याही गोष्टीबाबत जराशीही नाराजी न दाखवता हे मित्रद्वय दोन्ही दिवस आनंदाने राहिले.. असे मित्र असल्यावर प्रासदादा म्हणाला तसं कुठेही गेलो तरी आपला आनंद अन मजा आपण तयार करुच..

आता दोन चार साधेसुधे पदार्थ करुन धाडस इतकं वाढलं आहे की पुढच्या हिवाळी सीझनमधे अंगणात मडक्यामधे भाजून उंधियो करावा असा प्लॅन शिजतो आहे..

प्रासच्या तीक्ष्ण नजरेने बागेत आपोआप उगवलेलं अनंतमुळाचं रोप हेरलं. थोडंसं उकरुन त्याच्या मुळाच्या एका तुकड्याचा सुगंध त्याने दाखवला.. अत्यंत वेगळा मातकट पण गोड वास नाकात दिवसभर दरवळत होता..

क्लास फोटो!
विशेषत: गविंच्या हातातली झार्‍याची पोझीशन फिट्‍ट जमलीय. कॅप्टन कुक सारखी.

प्रास's picture

24 Feb 2012 - 10:56 am | प्रास

गवि, अरे, तुझ्या घरात कुठे होत्या बाबा गैरसोयी? मला तर एकही गैरसोय दिसली नाही. तेव्हा गैरसोय झाली वगैरेचा विचारच करू नकोस :-)

आयला, डोक्यावर एक छप्पर (ते ही असायलाच पाहिजे अशी सक्ती नाही) आणि सर्व शंकांच्या निरसनाची सोय (ही असावी अशी माफक अपेक्षा ;-)) असली म्हणजे माझ्यासाठी नंदनवनच!

त्यामानाने तुझं घर म्हणजे स्वर्गच आहे भाऊ! तसंही पाण्यासाठी मागची बारमाही नदी पुरेशी वाटली. घरात नसलं तर आणायचं तिथून. हा. का. ना. का. :-)

हिवाळ्यातल्या उंधियुच्या प्लानसाठी अर्ध्या पायावर तैय्यार हौत आम्ही :-)

बाकी तुझ्या (आणि वहिनींच्या) परवानगीने रिक्रियेशनसाठी कधी एकटाही दोन-एक दिवसांसाठी जाईन म्हणतो, चालेल काय? ;-)

अवांतर - (सदस्यांच्या माहितीसाठी, विमेकाका, फोटोत दिसतायत त्यापेक्षा उंचच आहेत बर्का, कॅमेराच्या फोकसचा अंदाज न आल्याने फ्रेममध्ये राहण्यासाठी त्यांनी (अतिरिक्त) प्रयत्न केले आहेत :-)

सदस्यांच्या माहितीसाठी, विमेकाका, फोटोत दिसतायत त्यापेक्षा उंचच आहेत बर्का,

अरे रेवतीआज्जींनी विमे आणि तुझं नाव नोंदवून घेतलं आहे.. तेव्हा उंची, रास, अपेक्षा इ.इ. तपशील त्यांना नीटपणे कळवा..असे मोघम नको..

प्रास's picture

24 Feb 2012 - 11:22 am | प्रास

अरे, दिवस विमेंचे आहेत. त्यांना कळवू दे सगळी माहिती (खरं तर ही माहितीही मी रेवतीआज्जींच्यासाठीच सांगितली होती रे) ;-)

माझं कुठे आता टुमणं लावतोयस रेवतीआज्जींच्या मागे? बिचार्‍यांच्यावर कित्येक मिपाकर-तरुणांचे भावी जोडीदार मिळवण्यासाठीचं आधीच किती मोठ्ठं दडपण आहे. :-)

मालक, उंधियुसाठी मी पण 'पाव' पायावर येण्यास तयार आहे... पण एकच अट ती अशी की उंधियु गोड नका करु...
कारण पुढील प्रमाणे >>>
गुजरातेत संक्रांतीला एका मयतरणीने घरी बोलावुन उंधियु खाउ घातला होता... मित्र असला अस्ता तर लोणचं/चटणी/सॉस मागवुन खाल्ला असता... पोरगी होती म्हणुन मुकाट्यानं सगळी भाजी प्राण कंठात आणुन खाल्ली... अगदी म्याडी झाला होता माझा RHTDMवाला... मित्रांनो, ती रिना नव्हती हे क्लॅरिफाय करतो... बाकी, चालु द्या...

ऐकतिये, पाहतिये, वाचतिये.

अप्रतिम कट्टा आणि कट्टा वृत्तांत पण सुंदर

मोदक's picture

23 Feb 2012 - 4:23 pm | मोदक

रूचकर वृत्तांत.. :-)

चिगो's picture

23 Feb 2012 - 4:55 pm | चिगो

जबरा कट्टा झालाय.. यारादोस्तांसोबत स्वैंपाकाची केलेली खुडबूड आणि त्यानंतर मारलेला आडवा हात.. व्वाह, क्या बात है !! आता जेव्हा मित्रांपासुन आणि आपल्या लोकांपासून दुर राहावं लागतंय, तेव्हा तर ह्या आठवणी जरा त्रासच देतात.

(कट्टयांच्या आठवणींने हळवा झालेला) चिगो

प्रभाकर पेठकर's picture

23 Feb 2012 - 7:05 pm | प्रभाकर पेठकर

चमचमीत पाककृती आणि ओघवते, खमंग वर्णन. एकाचे पाककौशल्य तर दुसर्‍याचे लेखनकौशल्य.
दोघांच्याही हल्ल्यात, एक वाचक म्हणून, गारद झालो आहे.
अभिनंदन.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Feb 2012 - 4:23 am | निनाद मुक्काम प...

असे मराठमोळे शीर्षक अधिक समर्पक होते

प्रास ह्यांची ओघवती लेखनशैली व कट्याचे वर्णन वाचून जळजळ वाढली

तरी बर घरी इनो आणून ठेवला आहे.

स्वाती दिनेश's picture

15 Mar 2012 - 1:02 pm | स्वाती दिनेश

कट्टा आणि खादाडी सगळेच वर्णन मस्त!
स्वाती