उपीट / उपमा

Pearl's picture
Pearl in पाककृती
1 Feb 2012 - 6:35 am

उपीट / उपमा:

साहित्यः
१ वाटी जाड रवा, तूप, साखर, मीठ, भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लिंबू/लिंबाचा रस, कढीलिंब, जिरे, हिंग, तेल
खालील गोष्टी ओप्शनलः
बारीक चिरलेली कोथिंबीर, खोवलेले खोबरे, काजू, शेव, फरसाण, शिजवलेले मटार

क्रुती:
थोड्या तूपावर रवा भाजून घ्या. एका कढइमध्ये तेल घेउन त्यात हिंग, जिरे घालून फोडणी करा. त्यात कढीलिंब, मिरच्यांचे तुकडे, शेंगदाणे घालून परता. मग काजू घालून परता. मग कांदा घालून तो लालसर होईपर्यंत परता. मग त्यात ३ वाट्या पाणी, मटार, टोमॅटो, मीठ, साखर व ४/५ थेंब लिंबूरस घाला. पाण्यास उकळी आली की त्यात भाजलेला रवा घालून चांगले हलवा. झाकण ठेवून उपमा शिजत ठेवा. शिजत ठेवताना त्यावर ४/५ चमचे तूप घाला.
उपमा शिजल्यावर त्यावर खोबरे-कोथिंबीर आणि आवडत असल्यास शेव/फरसाण घालून खा :-)

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2012 - 8:19 am | अत्रुप्त आत्मा

चान...चान
अत्ता तेच खातोय

Mrunalini's picture

1 Feb 2012 - 8:26 pm | Mrunalini

माझी आवडती डिश... पोह्यांपेक्शा जास्त मला उपीठ आवडते... :)

सेम हियर. गपागप गिळता येतो. चावायचे श्रम नाहीत ;)

लै भारी..आवडत्या नाष्त्यांमधे पोह्यानंतर उपम्याचाच नंबर लागतो. :)
ही मी बनवलेली झैरात.. आय मीन डिश. :)

मसाला उपमा.

पैसा's picture

1 Feb 2012 - 9:07 pm | पैसा

साधी सोपी पाककृती. फोटो छान आलाय.

ममो नी त्या उपम्याला शेवेत बुडवून टाकलाय. पण बेळगावला असा शेव घातलेला उपमा पहिल्यांदा खाल्ला होता त्याची आठवण झाली. तसंच उडपी हॉटेलांमधे हमखास मिळणारी डिश म्हणजे शिरा-उपमा. त्याचीही आठवण झाली!

Pearl's picture

1 Feb 2012 - 10:35 pm | Pearl

धन्यवाद पैसा.

सुनील's picture

1 Feb 2012 - 9:46 pm | सुनील

छान छान.

आधी पाणी गरम करून मग त्यात भाजलेला रवा घालण्यापेक्षा भाजलेल्या रव्यात गरम केलेले पाणी घालूनही करता येते. उपम्यात मटारचे दाणे, मक्याचे दाणे, चिरलेली फरसबी, गाजराचे तुकडे इत्यादी घालून थोडी वॅल्यू अ‍ॅड करता येईल.

पाषाणभेद's picture

1 Feb 2012 - 10:17 pm | पाषाणभेद

उप्पीट आणि उपमा हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत.
उप्पीट (उपीट नव्हे) हे पिठापासून तर उपमा हा रव्यापासून करतात. (उप्पीट माझ्या घरी कालच केले होते.)

उप्पीट हे तेलात बनवतात.

हा मोठ्ठा भेद सोडल्यास पदार्थ उत्तम आहे.

हे मान्य नसल्यास सांजा, उपमा आणि उप्पीट यात काय फरक आहे ते सांगावे, किंवा पिठापासून तिखट सांज्यासारख्या पदार्थाला काय म्हणतात ते सांगावे. (आंतरजालावरील पाककृतींचा 'इतीहास' म्हणून संदर्भ देवू नये. त्यांची माहितीही चुकीची असू शकते.)

मिपासारख्या पदार्थीय नाव असलेल्या संकेतस्थळावरून निव्वळ पाककृतीसाठी चुकीचा आशय, संदर्भ आशय लोकांपर्यंत जावू नये म्हणून संपादक महोदयांना विनंती की त्यांनी वरील धाग्याचे नाव 'उपमा' असेच ठेवावे.

प्रचेतस's picture

1 Feb 2012 - 10:27 pm | प्रचेतस

पदार्थ एकच पण उपमा तमिळ आणि उप्पीट कन्नड शब्द आहे. दोन्ही रव्यापासूनच बनवतात. पिठापासून बनवलेल्या पदार्थास उकडपेंडी म्हणतात.
बिनहळदीचा असतो तो उपमा, हळद घातल्यावर त्याचा सांजा बनतो. उपम्यात उडदाची डाळ पण घालतात, सांज्यात घातलेली कधी खाल्ली नाही.

पैसा's picture

1 Feb 2012 - 10:30 pm | पैसा

सांजा हा खास मर्‍हाटी आहे. आणि तो जाड लापशी रव्याचा करतात. गोड करताना त्यात गूळ किसून घालायचा. काय खमंग लागतो माहिती आहे! पाभे, कशाला आठवण करून दिलीत?

सांज्यात हळद असते वाटतं. उपम्यात नसते. उप्पीट माहीत नाही. उपम्यात मला वाटतं उडीद डाळ असते जी सांज्यात नसते.

आमच्याकडे मी वर दिलेल्या पदार्थाला उपीटच म्हणतात. नंतर मला त्याचे उपमा हे नाव पण कळालं. आणि आमच्याकडे रवा-साखरेच्या गोड पदार्थाला शिरा आणि रवा-गुळाच्या गोड पदार्थाला सांजा म्हणतात. आणि सांजापासून केलेल्या पोळ्याना सांजाच्या पोळ्या :-)

गणपा's picture

1 Feb 2012 - 11:05 pm | गणपा

शांत गदाधारी भीम शांत.

अगदी बरोबर...आम्च्याकडे नेहमी सांजाच बनवते...

फलटणहून पुण्य़ाला जाताना हॉटेल विलास आहे..तेथे उपमा छान मिळतो.

श्रेयाताई's picture

1 Feb 2012 - 11:45 pm | श्रेयाताई

तांदळाच्या पीठापासून फोडणी देऊन उकड करतात. लसूण फोडणी, शिवाय वर कच्चे तेल घालून छान लागते. कम्फर्ट फूड आहे, फार चावायला नको. उकरपेंडी (उकडपेंडी) रवाळ कणकेची करतात. आणि तांदळाच्या रव्याचा उपयोग करून उब्जे (उपजे असावे कदाचित) करतात. असो, फोटो पाहून आता उपमाच करावा खायला असे ठरवत आहे. पा.कृ. आहेच हाताशी...!

ऐकीव, बघीव माहितीनुसार,
उपमा: फोडणीत उ. डाळ, भाज्या (मटार, कांदा, टामाटू ;), गाजर, ग्रीन बीन्स) कढिपत्ता परतून पाणी उकळल्यावर न भाजलेला रवा वैरायचा.
उप्पीट: रवा कोरडा/किंचित तेल्/किंचित तूप घालून भाजायचा. फोडणीत नुसता कांदा परतून पाण्याला उकळी आणून पुढे उपम्यासारखेच. हवा असल्यास टामाटू.;) उकळत्या पाण्यात थोडे ओले खोबरे.
तिखटामिठाचा सांजा: फोडणीत उ. डाळ नाही, मोहरी, हिंग, हळद, लाल सुक्या मिरच्या, कांदा परतल्यावर त्यातच रवा घालून खमंग भाजायचा वरून उकळते पाणी आणि मीठ, कोथिंबीर इ..साखर अजिबात नाही. हा गव्हाच्या जाड तसेच आपल्या शिर्‍याच्या रव्याचा (बॉम्बे रवा) करता येतो.

कवितानागेश's picture

2 Feb 2012 - 12:59 am | कवितानागेश

मूळात ( वेदात सांगितल्याप्रमाणे!!) ;) उप्पीट तांदळाच्या रव्याचे करतात.
सांजा गव्हाच्या जाड रव्याचा, रवा भाजून करतात.
आणि उपमा वाट्टेल तसा, जमेल तसा करतात! :)

सुहास झेले's picture

2 Feb 2012 - 6:24 am | सुहास झेले

मस्त.... आवडता नाश्ता :) :)

अरेरे एका उपम्यावर किती काथ्याकूट !! उपमा काय नि उप्पीट काय पोटातच जाणार ना ? हो, पण पुण्याच्या लोकांसाठी प्रश्न तत्वाचा असतो. त्यामुळे चालू द्या मी पॉपकॉर्न घेऊन आलोच.

सजय नाकिल's picture

20 Feb 2012 - 12:55 pm | सजय नाकिल

आता या वादाला काय नाव द्यावे

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2012 - 1:03 pm | परिकथेतील राजकुमार

एकदम हटके आणि अनोखी पाकृ.