साहित्यः-१)कालवं २)खवलेले खोबरे. ३)बारिक चिरलेला कांदा. ४)थोडासा उभा चिरलेला कांदा(भाजण्यासाठी).
५)हळद. ६)मालवणी मसाला. ७)चिंच/टॉमेटो/आमसुलं. ८)मिठ चवीपुरते. ९)एक च्मचा धणे.
१०)५-६ काळी मिरी.
कृती :-प्रथम कालवं साफ करून घ्यावी.
त्यात बारिक चिरलेला कांदा,हळद,मालवणी मसाला घालून चांगले ढवळून शिजत ठेवावे.(पाणी घालू नये.झाकण ठेवून
त्यावर पाणी घालून वाफेवर शिजत ठेवावे.)
एका कढईत थोडे तेल घेवून त्यात धणे व काळी मिरी परतून घ्यावींअंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालावा व तांबूस
होईपर्यंत परतावा.व मग त्यात खवलेले खोबरे घालावे.चांगले भाजुन घ्यावे.व नंतर जरा जाडसर वाटून घ्यावे.
कालवं शिजली की वाटलेलं खोबरे घालावे.मिक्स करून चांगले शिजवावे.वरून कोथिंबीर घालावी.
प्रतिक्रिया
8 Feb 2012 - 5:56 pm | गवि
अहा..
क्या बात है... मस्तच..
बादवे धबधबीत मधला "त" लुप्त असतो (सायलेंट) असं पुलंनी कुठेसं लिहिलं आहे..
8 Feb 2012 - 8:19 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ते वाक्य हसवणूक मधील माझे खाद्यजीवन या प्रकरणात आहे.
पण तो त उच्चारी लुप्त असतो, लेखी नाय काय !!!
8 Feb 2012 - 6:09 pm | कॉमन मॅन
फारच छान..
8 Feb 2012 - 6:34 pm | स्वाती२
व्वा! तोंडाला पाणी सुटले!
8 Feb 2012 - 10:14 pm | सानिकास्वप्निल
वाह! झक्कास :)
8 Feb 2012 - 10:24 pm | जाई.
तोँपासू
8 Feb 2012 - 10:34 pm | Mrunalini
मस्त... तोंपासु :)
9 Feb 2012 - 12:10 am | पिवळा डांबिस
पहिला आणि शेवटून दुसरा फोटो फार आवडला!!
जियो!
9 Feb 2012 - 12:21 am | गणपा
शिवाय कालव्याच्या भज्या आठवून जीव अंमळ व्याकुळ झाला.
9 Feb 2012 - 12:27 am | पिवळा डांबिस
आणि कालवांचं आमलेट (पोळा)!
गणपा, आता तू मेल्या नाय नाय त्या आठवणी काढू नको!!!
:(
9 Feb 2012 - 12:30 am | शुचि
हे बरय आपण आठवण काढायची आणि गणपांवर खापर फोडायचं :)
9 Feb 2012 - 12:33 am | गणपा
गावाला कालवं शोधायला खडकाय जायचो.
ताज्या ताज्या शोधुन आणलेल्या कालव्याचा भज्या, कांदा + बेसन + टोमेटो टाकुन केलेल्या वड्या आणि सोबतीला मस्त खाजरीची/ताडाची ताडी हिरवी मिरची मारके...... आहाहा काय पण आठण केलीत पिडांकाका.
9 Feb 2012 - 5:23 am | नंदन
>>> शिवाय कालव्याच्या भज्या आठवून जीव अंमळ व्याकुळ झाला.
हाय! दबदबीत, भज्या, पोळ्या इ. नावं वाचूनच हृदयात कालवाकालव झाली :(
9 Feb 2012 - 12:42 am | दिपाली पाटिल
कालवं शिंपल्यांसकट कसे दिसतात??
9 Feb 2012 - 12:50 am | पिवळा डांबिस
मला वाटतं शिंपल्यात असतात त्या तिसर्या आणि मुळे....
कालवं दगडांत किंव्हा कपारींना क्लिंग करून असतात....
9 Feb 2012 - 1:00 am | गणपा
बरोबर.
समुद्रातल्या खडकात अश्या पद्धतीने चिकटलेली असतात.
प्रचि जालावरुन साभार.
9 Feb 2012 - 12:46 pm | प्रीत-मोहर
म्हंजे कलव म्हंजे शिनाणे का?
9 Feb 2012 - 1:04 pm | गणपा
तुमच्या परक्या भाषेतले शब्द आम्हाला कळत नाहीत... पण शुद्ध मराठीत त्यांना 'ऑईस्टर्स' म्हणतात. :)
9 Feb 2012 - 9:50 pm | पैसा
गोव्यात पण कालवं मिळतात. कालवं वरून खडबडीत असतात तर शिनाणे मोठ्या शिंपल्यांसारखे, पण एकाच काळसर हिरवट रंगाचे.
9 Feb 2012 - 3:14 am | दिपाली पाटिल
अमेरिकेत मिळतात कां कालवं? तिसर्या पाहील्या होत्या ९९ ranch मधे...
9 Feb 2012 - 8:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे
न मिळायला काय झाले ? अमेरिकन खातात कि ऑयस्टर.
९९ रांच कशाला, सेफवे मध्ये पण मिळायला हवे (असा अंदाज)
9 Feb 2012 - 11:47 am | श्यामल
व्वा मस्तच !
9 Feb 2012 - 11:54 am | जागु
वा छान रेसिपी. मी नेहमी कालवांचे सुकेच करते. कधी कधी वड्या लावते.
9 Feb 2012 - 2:44 pm | इरसाल
हुम्म्म्म.....
चालु द्या..... पण उपवासाच्याच दिवशी का हो ? म्हणुन प्रतिसाद नाही...............
11 Feb 2012 - 8:58 am | श्रीयुत संतोष जोशी
क्या बात है !!!!!!!!!!!!! झक्कास................. :)