बालूशाही

सूड's picture
सूड in पाककृती
29 Jan 2012 - 1:01 am

बरेच दिवस काही लिहीलं नाही, म्हणलं चला एखादी पाकृ टाकूया. भले मग कोणी झैरातीचा धागा का म्हणेना !! भारतीय संविधानातला अभिव्यक्तिस्वातंत्र्य वैगरे कसलासा अधिकार घेऊन म्हटलं लिहायला काही हरकत नाही. ;) तर काय म्हणत होतो...हां, पाकृ आहे बालूशाहीची. गोष्टी आयत्या खाण्यापेक्षा त्या करुन पाहायची खुमखुमी भारी. त्यामुळे या पाकृच्या दोन तीन रेशिप्या डोळ्याखालून घालून झाल्या. त्यातल्या सगळ्यातलं मनाला जे पटलं ते उचलून ही पाकृ केलेली आहे, कारण काही रेशिप्यांमध्ये मैद्याच्या निम्मं तूप घालायला सांगितलं होतं. तसा प्रकार केला असता तर बालूशाही नक्की कढईत विरघळली असती. असो, तर साहित्य पुढीलप्रमाणे,
मैदा २ वाट्या
दही अर्धी वाटी
तूप अर्धी वाटी
बेकिंग पावडर पाव टीस्पून
खाण्याचा सोडा चिमूटभर
पाकासाठी एक वाटी साखर
थोडं केशर

मैदा चाळून एका पातेल्यात घेऊन त्यात बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा मिसळून घ्यायचा. नंतर तूप वितळेल इतपत गरम करायचं, फार गरम होता कामा नये मोहन घालायचं नाहीये. आता हे वितळलेलं तूप मैद्यात ओतून नीट मिसळून घ्यायचं. त्यानंतर त्यात दही घालायचं. दही घालून निव्वळ कालवल्यासारखं करायचं, मळायचं नाही. दही घातल्यानंतर हे असं दिसायला हवं. कोरडं वाटतंय म्हणून आणखी थोडं दही घालावं असा विचार पण करु नका.

आता अर्धा तास त्याच्याकडे ढुंकून बघायचं नाही. पाक करताना एक वाटी साखर बुडेल इतपत पाणी घेऊन एकतारी पाक करायचा. थोडं केशर घालायचं. आता पाऊण तासानंतर पीठाचे छोटे चपटे उंडे, पेढे काय म्हणाल ते करायचे आणि ते करताना तुम्हाला बालूशाहीचा जेवढा आकार अपेक्षित आहे त्याच्या निम्म्या आकाराचे करायचे. कारण बालूशाही तळल्यानंतर बर्‍यापैकी फुलते. त्या गोळ्याला अंगठ्याने मधोमध एक खळगा करायचा. मात्र आता गोळे करताना ते नीट मळून मगच आकार द्या, आता प्रश्न येतो आधी नाही मळलं आता का मळायचं ?? आधी मळून आता पुन्हा ते थोडंफार मळावंच लागणार होतं, मैद्याच्या गोष्टी खुसखुशीत व्हायच्या असतील तर फार मळू नये. ( अर्थात ही एका बालूशाहीच्याच व्हिडोत मिळालेली टीप आहे.) गोळे साधारण असे दिसतील.

आता कढईत मंद आचेवर तळून काढा. आच वाढवली तर वरवर रंग आला तरी आत कच्चंच राहील. खालच्या चित्रात वर जो एक तळलेला गोळा दिसतोय तो गोळे करताना पीठ वरचेवर मळून केलेला आहे आणि खाली जे दोन आहेत ते गोळे करण्याआधी पीठ नीट मळल्यानंतरचे आहेत. थोडक्यात वरचा बिनसलेला आहे.

आता ही तळलेली बालूशाही पाकात घालून १०-१५ मिनीटांनी बाहेर काढा. बालूशाही तयार आहे.

कोणाला याची आणखी चांगली पद्धत माहीत असल्यास जरूर सांगा.

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jan 2012 - 1:27 am | अत्रुप्त आत्मा

सगळ्यात लाश्टचा फटू कातिल आलाय...! कातिल बोले तो...भूक-भडकाऊ
आपला हात बाकी चांगलाच तय्यार हाय हो...! आपल्याला ग्यारेंती हाय,ओल्या नारळाच्या करंज्यापण इज्जी/इज्जी कराल... :-)

सूड चांगलाच पेटलेला दिसतोय. :)

प्रेझेंटेशनला वाव आहे.
शिकुन घे हो हळु हळु. होणार्‍या बायकोला इंप्रेस करायला कामी येईल. ;)

मी-सौरभ's picture

30 Jan 2012 - 1:01 pm | मी-सौरभ

बॅचलरच प्रेझेंटेशन आहे ते...असंच असणार...
आम्हाला काय खाण्याशी मतलब...

सुडः पुढच्या कट्ट्याला घेउन ये बरं का...

वा मस्तच.... मला बालुशाही खुप आवडते... पण ती घरी केलेली असली पाहिजे... बाहेरुन आणलेली आवडत नाही. आता तुमच्याकडे यायला पाहिजे बालुशाही खायला. :)

वपाडाव's picture

29 Jan 2012 - 4:00 am | वपाडाव

अरे सुडक्या, अबे माझी फ्लॉवरची भाजी थोडी शिळी तरी होउ द्यायची होतीस ना....
एवढी काय घाइ लागली होती, पाकृ टाकण्याची....
पुढच्या धाग्यातला एक प्रतिसाद कटाप आता...

शेवटचा फोटू मस्त!
तुझे अनेक गोष्टींसाठी अभिनंदन.
मग कोणी झैरातीचा धागा का म्हणेना
आयत्या खाण्यापेक्षा त्या करुन पाहायची खुमखुमी भारी
तर बालूशाही नक्की कढईत विरघळली असती
मैद्याच्या गोष्टी खुसखुशीत व्हायच्या असतील तर फार मळू नये.

ही वाक्ये काय दर्शतात?
समजले, सगळे समजले. अभिनंदन!
फक्त सातव्या फोटोतली की सतराव्या एवढेच सांग. ;)

मिपावरचे बहुतेक ब्याचलर लोक हल्ली पाकृंच्या मागे लागलेले पाहून त्यांच्या लग्नाळूपणाबद्दल कल्पना येत आहे. उतावळा नवरा अन् स्वैपाकघराला बाशिंग.

दीपा माने's picture

29 Jan 2012 - 10:31 am | दीपा माने

बालुशाही अगदी शाही झालेली दिसते पटकन उचलुन खावी अशी. अशी बालुशाही न आवडणारा विरळाच असेल. पाकृबरोबर दिलेल्या टिपांची नोंदही चांगली आहे. आणखी पाकृ येऊ द्या.

पियुशा's picture

29 Jan 2012 - 10:41 am | पियुशा

कोण सुड का ? ;)
व प्या झाला आता सूड ;)
आता स्पा च्या रेशेपिच्या प्रतिक्षेत ;)
चालु दे बालुशाही मस्त जमलिये :)

पण अशा मला तरी न जमणार्या पाक्रु बघुन खरच

पैसा's picture

29 Jan 2012 - 10:53 am | पैसा

त्याला फक्त भेळ करता येते!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jan 2012 - 4:03 pm | अत्रुप्त आत्मा

त्याला फक्त भेळ करता येते!

आता स्पा च्या रेशेपिच्या प्रतिक्षेत
तुमच्याच जिलब्या एवढ्या पडत असतात कि आम्हाला चान्सच मिळत नाही :D

पैसा's picture

29 Jan 2012 - 10:50 am | पैसा

तू आणि तुझी पाक् दोन्ही ग्रेट! हे सगळे 'सुगरणीचे सल्ले' कुठून गोळा केलेस?
आणि यानाच भक्कमपेढे म्हणतात का?

सुहास झेले's picture

29 Jan 2012 - 11:10 am | सुहास झेले

लैच भारी....

अजून येऊ द्यात सूड साहेब :) :)

सानिकास्वप्निल's picture

29 Jan 2012 - 12:56 pm | सानिकास्वप्निल

अहाहा ! मस्त मस्त मस्त :)
बालुशाही खुप खुप आवडते आणी पाकृ बघून तर जीव खल्लासचं झाला
येऊ द्या अजुन अशाच पाकृ :)

फक्त रेल्वे कर्मचार्‍यांसाठी असे एक कँटीन आहे. या कॅंटीनात आठवड्यातून दोनदा तू जशी लिहीली आहे तशी बालूशाही बनवतात. त्या बालूशाहीसारखी बालूशाही अजून तरी कुठे खाल्ली नाही. पण एक विचारावसं वाटतं ते असं की कँटीनवाले त्याला खाजा का म्हणतात ?
(कँटीनला गेल्यास पाच रुपयात कुरकुरीत बटाटा भजी मिळतात आणि जरा लवकर गेल्यास गरम शिरा पण मिळतो.जरूर खाऊन बघावी )

खाजा का म्हणतात ?
कणिक, मैदा, बेसन इ. पिठे वापरून शेव, बालुशाही असे पदार्थ तळून त्यावर साखर किंवा गुळाचा थर दिलेल्या पदार्थाला खाजा म्हणतात असे ऐकून आहे. गुडीशेव (त्याला खाजाही म्हणतात) ज्याला म्हणतात त्याला एक मैत्रिण गुड के लड्डू म्हणत होती. लाडू हे गोलच असायला हवेत असा त्यांच्याकडे नियम नाही.

वपाडाव's picture

30 Jan 2012 - 1:53 am | वपाडाव

रामदासकाका, मी गेलोय त्या कँटीनमध्ये... पण तेव्हा बालुशाही नव्हती... पण खोबर्‍याचे लाडु मात्र होते... अन बटाटा भजी खाल्लीत तिथली... एकदम कुरकुरीत अन खमंग असतात... शिरा नाही खाल्ला... पुढील वेळेस नक्की.... शिरा अन बालुशाही.... एकदम फिस्क...

प्रभाकर पेठकर's picture

30 Jan 2012 - 9:13 am | प्रभाकर पेठकर

फक्त रेल्वे कर्मचार्‍यांसाठी असे एक कँटीन आहे.

तिथे इतरांनाही जायची परवानगी आहे? मग ते, 'फक्त रेल्वे कर्मचार्‍यांसाठी' कसे असेल? ह्यात जरा विरोधाभास दिसतो आहे.

रामदास's picture

30 Jan 2012 - 11:29 am | रामदास

रेल्वेत काम करणारासारखं दिसलं की झालं .

प्रभाकर पेठकर's picture

30 Jan 2012 - 3:21 pm | प्रभाकर पेठकर

म्हणजे कसं? सविस्तर सांगाल?

माझे स्वर्गस्थ वडील रेल्वेत नोकरीला होते त्यांचा तसेच इतर रेल्वे कर्मचार्‍यांचा अपमान होणार नाही अशा भाषेत सांगावे अशी नम्र विनंती आहे.

रामदास's picture

30 Jan 2012 - 9:25 pm | रामदास

पाठवला आहे.

खाजा प्रसिद्ध आहे. या 'खाजा' त आत पाक भरलेला असतो. हा प्रकार तुकडे करून खाता येत नाहि एका घासात तो फस्त करावा लागतो. तसेच एकदा खाजा तोंडात टाकल्यावर बोलायचे नाही. नाहीतर पाक बाहेर.

अवांतर - हैद्राबादला बालुशाहीला 'बादुशाही' म्हणतात आणि लिहितात. :-)

स्मिता.'s picture

29 Jan 2012 - 7:01 pm | स्मिता.

बालूशाही छानच दिसतेय... अधून मधून येणार्‍या सुगरणीच्या टिपाही खासच!
बॅचलराकडून ही पाकृ बघून कॉम्प्लेक्स आलाय.

कवितानागेश's picture

29 Jan 2012 - 7:08 pm | कवितानागेश

( माहिती मैत्रिणीकडून उधार घेउन देत आहे)
दह्याच्या आंबट्पणावर मधला धीर धरायचा वेळ ठरवायचा.
शक्यतो आंबट नसलेलेच दही घेउन दिड तास थांबायचे.
शिवाय वरुन पिस्त्याचे काप घातले की प्रेझेन्टेशन पुर्ण होते! :)

शिक्रेटः 'स्पा' ला भेळ पण येत नाही! फक्त फोटु काढता येतात. ;)

अगं माऊताई, किती लक्षात राहतं तुझ्या!
;)

स्पा's picture

30 Jan 2012 - 9:18 am | स्पा

चायला

इन्दुसुता's picture

30 Jan 2012 - 7:05 am | इन्दुसुता

बालु ( की लू) शाही करून बघीतली नाही कधी ... छानच दिसतेय...आता करून बघणार...

झैरातीचा योग्य परिणाम झालेला आहे.. रेवती आज्जीनी सातवी कि सतरावी विचारली आहे.. आणि तेही बरोबरच आहे... त्याचं काये, त्यांचं वधूसंशोधन मंडळ आहे ना?

पण झैराती साठी बरं का सूड, असं करून चालाचं नाही ... म्हंजे पाकृ देताना, एखादा चूक झालेला जिन्नस फोटोत ठेऊ नये हो.
आणखी एक गोष्ट, सर्वात शेवटी जो फोटो टाकाचा, त्यात ना चांगल्या ६ बालुशाह्या बशीत ठेऊन फोटो काढावा हो..
आणि मुलीकडील मंडळी बघाला आली ना कि त्यांना एका वाटीत एक अशी घालून द्यावी.

मुलीकडली आल्यावर कसं वागाचं याचे मी वर्ग चालवते हो ( तेवढीच वर्गाची झैरात म्हणते मी !) .

अरे हो, एक विसरले, तेवढं वप्यानी म्हटलेलं मनावर घ्यायचं नाही हां... मिपावरच्या ब्याचलरात अशी कांपीटीशन चालायचीच..

मुलीकडली आल्यावर कसं वागाचं
अरे वा! बरं झालं असे वर्ग चालू केलेत.
एकाच्या दाखवण्याच्या कार्यक्रमाला दुसर्‍यानं जास्त चांगले कपडे घालून बाहेर घुटमळू नये हेही सांगा.
नाहीतर मुलगी बघायला धडपडत असतात सगळे.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2012 - 8:04 am | अत्रुप्त आत्मा

@एकाच्या दाखवण्याच्या कार्यक्रमाला दुसर्‍यानं जास्त चांगले कपडे घालून बाहेर घुटमळू नये हेही सांगा>>> ---^---

मराठमोळा's picture

30 Jan 2012 - 8:43 am | मराठमोळा

अरे वा..

पुरुष मंडळींचा स्वयंपाकघराकडे वाढता कल पाहून खरेच जगबुडी होईल असे वाटायला लागले आहे.. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Jan 2012 - 12:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे

याला शर्विलकाचा प्रतीशंखनाद असे म्हणतात. गेल्या ३ महिन्यात सर्वात जास्त पाकृ धागे तुझे असतील (रेग्युलर बल्लव आणि सुगरणी सोडल्या तर)

आणि भा * * उ (फुल्या हव्या तशा भर), मिपा वर प्रतिसाद टाकायला वेळ आहे, पण एवढा आला आहेस इथे, तर एक फोन करायला वेळ नाही ??? की पैसे वाचवतो आहेस? मुंबईकर कुठचा !!!!

चायला लैच भारी रे
हा पदार्थ अजूनही चाखलेला नाही.. नाव ऐकून होतो, आज बघितला पण...

पुढच्यावेळी बदलापूरला आलो कि खायला देखील मिळेल ;)

रेवती's picture

30 Jan 2012 - 9:57 pm | रेवती

जा जा. बघ जरा कसा तयारीचा मुलगा आहे.
तूही भेळ (म्हणजे भेळेचं सामान) घेऊन जा. नाहीतर फक्त फोटू नेशील्......भेळेचा.;)

स्पा's picture

1 Feb 2012 - 9:40 am | स्पा

चायला माझ्या भेळेवर का सगळे टपलेत.. काय वाकड केलंय तुमच.. :D
मान्य... आहे साधा गावठी पदार्थ... नसेल तुमच्या गण्पाच्या, सानिका स्वप्नील च्या पाक्रु सारखा हुचः ;)

म्हणून एवढा राग राग :D

प्यारे१'s picture

1 Feb 2012 - 11:47 am | प्यारे१

>>>काय वाकड केलंय तुमच..

अरेरे, काय ही अर्वाच्य भाषा? वाकड नाही तरी हिंजवडी नक्कीच ना? :P
अरे, लोकांना ठाऊक आहे तुला बनवता येत नाही रे.... स्वयंपाक! ;)

सूड्स बालूशाही मस्त रे!

तुम्हा मुलांचे असे प्रतिसाद पाहून मी माझं मंडळच बंद करणारे.
मग बघुया कोण लग्न करतय तुमच्याशी.;)

फायनली यु डिसायडेड !! कधी बंद करणार ते सांग हो आज्जे. त्यादिवशी मिपावर चांगली गोडाधोडाची रेसिपी टाकेन. ( उद्याच बंद करत्ये म्हणाल्यास रेसिपी वीकांतास हजर होईल याची नोंद घ्यावी इकडच्या किचनात साधने लिमिटेड आहेत. )

जसा काही वाटच बघतोयस!
या वयात कसं बरं सोसावं मला हे?
जाऊ दे! नाही बंद करत.

५० फक्त's picture

30 Jan 2012 - 12:28 pm | ५० फक्त

भारीच रे, एकदम जबरा झालीय बालुशाही, मस्त प्रकार आहे,

स्वाती दिनेश's picture

30 Jan 2012 - 1:12 pm | स्वाती दिनेश

मस्त दिसते आहे बालूशाही..!
स्वाती

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Jan 2012 - 1:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे

चान चान !!!!
पुढील मुंबई कट्ट्याला हे आणलेस तर उरलेली (नीट) प्रतिक्रिया देईन :-)

गवि's picture

30 Jan 2012 - 3:35 pm | गवि

एकदम झक्कास आणि खुसखुशीत..

असे पाककुशल मित्र ही देवाची देणगीच...

भेटूच लवकर..

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2012 - 9:32 pm | बिपिन कार्यकर्ते

वा! छान!

निवेदिता-ताई's picture

30 Jan 2012 - 11:09 pm | निवेदिता-ताई

छान छान...पण दही थोड कमी घातल तरी चालेल..

रानी १३'s picture

1 Feb 2012 - 11:22 am | रानी १३

छान झाली बालूशाही.....:) काल करुन पाहिली.......

मेघवेडा's picture

1 Feb 2012 - 9:18 pm | मेघवेडा

वा रे! झकास! बरंच काय काय करतांव द्येवरुखकरांनु!