सुके मटण चॉप्स

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
28 Dec 2011 - 3:07 am

साहित्यः

मटण चॉप्स - ५-६
दहि - १/२ कप
आले लसुण पेस्ट - १ चमचा
मिरची पेस्ट - १/२ चमचा
हळद - २ चमचे
लाल तिखट - ४ चमचे
धणे जिरे पावडर - १ चमचा
गरम मसाला - १ चमचा
विलायची पावडर - १/४ चमचा
लिंबुचा रस - १ चमचा
रवा - १/२ वाटी
तेल - १/२ वाटी
मिठ चवीनुसार

कृती:

१. मटण चॉप्स धुवुन कोरडे करुन घ्यावेत.
२. दही, आले लसुण पेस्ट, मिरची पेस्ट, १ चमचा हळद, २ चमचे लाल तिखट, गरम मसाला, धणे जिरे पावडर, विलायची पावडर, लिंबुचा रस, २ चमचे तेल व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करुन घ्यावे.
३. ह्यात मटण चॉप्स टाकुन, मिक्स करुन ४-५ तास मुरवावे.
४. ओव्हन २५० degree celcius ला preheat करुन घ्यावा.
५. पॅन मधे मटण चॉप्स काढावेत व ओव्हन मधे १५-२० मिनिटे रोस्ट करावेत.
६. १५-२० मिनिटांनी बाहेर काढुन बघावेत. मटण शिजलेले नसेल तर परत ५-१० मिनिटे ओव्ह्न मधे ठेवावे.
७. रवा, १ चमचा हळद, २ चमचे लाल तिखट व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करावे.
८. शिजलेले चॉप्स ह्या रव्यात घोळवावे.
९. गॅसवर पॅन गरम करावा. त्यात हे चॉप्स थोड्या तेलात shallow fry करावेत.
१०. दोन्ही बाजुनी brown झाल्यावर बाहेर काढावेत.
११. हे चॉप्स गरमच serve करावेत.

chops

प्रतिक्रिया

कौशी's picture

28 Dec 2011 - 4:12 am | कौशी

छान रेसिपी आणि फोटो..
करायला पण सोपे वाटतात.

गवि's picture

28 Dec 2011 - 9:40 am | गवि

वाह.... भले.

पियुशा's picture

28 Dec 2011 - 9:42 am | पियुशा

नॉन - व्हेज खात नसले तरी तुझ्या पाक्रु.अन असे टेम्प्टिन्ग फोटू पाहुन तो.पा.सु. :)

प्रभाकर पेठकर's picture

28 Dec 2011 - 10:29 am | प्रभाकर पेठकर

छान दिसताहेत. चवीलाही मस्त असणार. सोबत, चिनीमातीच्या वाटीत काय आहे?

निश's picture

28 Dec 2011 - 11:50 am | निश

मस्त आहे रेसिपी
आजच आईला म्हनतो, करुन दे ही रेसिपी
खरच मस्त

सदानंद ठाकूर's picture

28 Dec 2011 - 11:55 am | सदानंद ठाकूर

करुन घातल्यास खायला जास्त मजा येईल.

उदय के'सागर's picture

28 Dec 2011 - 12:35 pm | उदय के'सागर

पाकृचं शिर्षक वाचताच वाटलं हि पाकृ १००% गणपाचीच असणार, पण पोपट झाला :P

बादवे, पाकृ व फोटो कातिल आहेत (पण 'उपेग' काय, आम्ही पडलो शाकाहारी)

गणपा's picture

28 Dec 2011 - 12:42 pm | गणपा

मी ही असेच करतो. पण शेवटच्या पायरीत रव्यात घोळवण्या ऐवजी फेटललेल्या अंड्यात घोळवून शॅलो फ्राय करतो.
रव्यात घोळवल्याने कदाचीत वरुन जास्त कुरकुरीत होत असावेत. असेही करुन पहायला हवेत एकदा. :)

सुनील's picture

28 Dec 2011 - 11:18 pm | सुनील

पण शेवटच्या पायरीत रव्यात घोळवण्या ऐवजी फेटललेल्या अंड्यात घोळवून शॅलो फ्राय करतो

फक्त अख्या अंड्याऐवजी फक्त पांढरा भाग वापरतो.

बाकी पाकृ "कातील" हेवेसांनल.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Dec 2011 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार

पाकृ अगदी कातील वैग्रे आहे म्हणा...

असो..

मटणाला पर्याय सुचवा.

सोत्रि's picture

29 Dec 2011 - 8:58 pm | सोत्रि

पराण्णा, तुम्ही हा प्रकार का नाही ट्राय करून बघत ? ;)

- (अट्टल मांसाहारी) सोकाजीराव त्रिलोकेकर

सुहास झेले's picture

28 Dec 2011 - 12:59 pm | सुहास झेले

सही.... :) :)

खादाड's picture

28 Dec 2011 - 1:20 pm | खादाड

:)

सानिकास्वप्निल's picture

28 Dec 2011 - 1:51 pm | सानिकास्वप्निल

मस्तचं दिसत आहे पाकृ :)
तोंपासू

मयुरपिंपळे's picture

28 Dec 2011 - 11:04 pm | मयुरपिंपळे

दिसतय :)

स्वाती२'s picture

29 Dec 2011 - 5:54 pm | स्वाती२

झकास पाकृचा झकास फोटो!
मी नेहमी प्रेशर पॅनमधे करते. आता ओवन मेथड ट्राय करेन.

Mrunalini's picture

29 Dec 2011 - 6:44 pm | Mrunalini

सगळ्यांचे धन्यवाद... :)