सुरमई ही मत्स्यप्रेमींची लाडकीच. त्यामुळे ही अर्थात कोळणींचीही लाडकीच. स्वस्त भावात सोडायला त्या तयार नसतात. हिची एक तुकडीच जवळ जवळ ५० रुपयाला मिळते.
सुरमई खात्री पुर्वक घ्यावी. कारण सुरमईच्या नावाखाली कुपा हा मासाही कोळणी खपवतात. कुपा माश्याला सुरमईची चव नसते. फक्त दिसायला साधारण तसाच असतो. सुरमई ही चकचकीत असुन छोट्या सुरमईच्या कातडीवर काळपट ठिपके असतात बाजुने तर मोठया सुरमई फोटोत दाखवल्या प्रमाणे.
साहित्यः
सुरमईच्या ४-५ तुकड्या
चिमुटभर हिंग
हळद अर्धा चमचा चमचा
मसाला १ ते २ चमचे (तिखटाच्या आवडीवर)
मिठ अंदाजे
पाककृती:
१) सुरमईच्या तुकड्या स्वच्छ धुवुन घ्या.
२) तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन घ्या.
३) पॅन गरम करुन त्यात तेल चांगले गरम करा. गॅस मिडीयम ठेवा व त्यात तुकड्या सोडून द्या.
४) तुकड्या पातळ असतील तर ३-४ मिनीटे आणि जर जाड्या असतील तर मंद पेक्षा थोडा मोठा गॅस ठेउन ५-६ मिनीटे एक बाजु शिजवुन पलटून तेवढाच वेळ ठेवून गॅस बंद करावा. अगदीच रहावले नाही तर एक तुकडा जेवायच्या अधी मोडून खायला सुरमईची काहीच हरकत नसते :स्मित:
महत्वाची सुचना : हा फोटो पाहुन कोणी जळू नये आणि जळल्यास मी जबाबदार नाही. :हाहा:
अधिक टिपा:
सुरमईचे कालवण इतर कालवणांसारखेच करतात.
तळताना तुमच्या आवडीनुसार आल-लसुण वाटण, लिंबु पिळून लावू शकता.
प्रतिक्रिया
15 Nov 2011 - 11:57 pm | सुहास झेले
आहाहाहा.... तोंडाला पाणी सुटले.... :) :) :)
16 Nov 2011 - 12:27 am | Mrunalini
वा..... मी तरी जळाले...आणि याला जबाबदार जागुताईच आहे... ;)
16 Nov 2011 - 12:35 am | स्मिता.
एकदम खतरनाक फोटो आहेत!
16 Nov 2011 - 12:51 am | रेवती
आता मात्र मी मत्स्याहारी झालेच!
यापुढे नवख्यांना मार्गदर्शन करावे.
16 Nov 2011 - 1:40 am | प्राजु
.......................................
काय बोलणार!! लवकरात लवकर तुझं घर गाठायला हवं. :)
16 Nov 2011 - 4:29 am | सन्जोप राव
सुरमई माझ्या आवडीची. फोटो आणि कृती बघून आठवण झाली एकदम. आज उद्या सुरमई खायला हवी...
16 Nov 2011 - 6:52 am | गवि
pr ka ta aa
16 Nov 2011 - 6:50 am | गवि
आहा.
नेहमीप्रमाणेच अफ़लातून.
...पण खुद्द मस्त्यसम्राज्ञी सुरमईला पस्तिसावे स्थान? ऑ?
की खाशांची एंट्री दरबारात शेवटीच होते म्हणून??? ;)
16 Nov 2011 - 7:44 am | पूनम ब
मस्त दिसत आहे फोटो..तोंडाला पाणी सुटले बघून :)
16 Nov 2011 - 9:42 am | जाई.
झकास
तोँपासु
16 Nov 2011 - 10:26 am | उदय के'सागर
सुरमई ! "मासे" ह्या प्रकारामधे पहिल्यांदा खाल्लेला मासा आणी त्या दिवसापासुन त्याच्या प्रेमात पडलो. हे फोटो बघुन तो पहिला दिवस आठवला आणी अर्थात तोंडाला पाणी सुटले :) झकास पाकृ (as usual)
(पुण्यातल्या "एस.पी.ज बिर्याणी" मधले सुके सुरमई फ्राय खुपच भरी असते ... आणी बरोबर सोलकढी... व्वा क्या बात :))
16 Nov 2011 - 11:18 am | मानस्
फिश एक्सपर्ट जागुताईंचा नेहमीप्रमाणेच अप्रतिम पदार्थ.
16 Nov 2011 - 1:20 pm | कच्चा पापड पक्क...
जागुताईं!!!!! लय भारी फोटु....
16 Nov 2011 - 2:14 pm | प्रचेतस
चवीला सुरमई जास्त भारी का पापलेट?
अर्थात शाकाहारी असल्याने केवळ कुतुहल म्हणूनच विचारतोय.
अवांतरः हल्ली उत्तर कोकणात पापलेट फारसे मिळत नाहीत काय?
मागच्या नोव्हेंबरात अलिबाग ते हरिहरेश्वर असा पट्टा फिरताना पापलेट एकाही ठिकाणी मिळाले नाहीत व आमच्या मत्स्यप्रेमी मित्रांना सगळीकडे फक्त सुरमईवरच समाधान मानावे लागले.
16 Nov 2011 - 2:22 pm | गवि
कोणता जास्त टेस्टी हे वैयक्तिक मत झालं.. पण
..पापलेट हापूस तर सुरमई पायरी समजावी..
17 Nov 2011 - 1:49 am | यकु
आता हापूस आणि पायरी हापूस यांच्यातही डावा उजवा कोणता ते सांगावं! ;-)
सिरियसली.
17 Nov 2011 - 9:55 am | पैसा
मला तर हापूस आणि पायरीपेक्षा हल्ली मानकुराद आवडतो!
17 Nov 2011 - 10:32 am | गवि
एक्झॅक्टली.. म्हणून अगदी विचारपूर्वक ती तुलना दिली होती.
हापूस आंबा जनरली सर्वांना सर्व आंब्यांत जास्त आवडतो म्हणून त्याला आंब्यांचा राजा म्हणतात.
पायरी त्याच्याखालोखाल फेमस..
पण,
काहीजणांना हापूसपेक्षा पायरी आवडतो..
रसासाठी हापूसपेक्षा पायरी बर्याचदा चांगला वाटतो.
हापूस अजिबात न आवडणारे लोक जरुर असतात पण ते एकूण आंबाच न आवडणारे असतात.
खास खवय्या लोकांना रुढ हापूसपेक्षाही अनेक जातीचे आंबे टेस्ट करायला मिळाल्याने लंगडा, दशहरी, माणकुराद, ईशाड्द (उच्चाराची चूभू सुधारावी), शेपू (आंबा बरं), बदामी किंवा अन्य काहीची टेस्ट जास्त आवडते स्पेशालिटी म्हणून.
तसंच, बहुतेकांना पापलेट आवडतो, तो फेमस असल्याने मिळतोही सगळीकडे. प्रीमियम असल्याने महागही असतो.. चवीला स्टँडर्ड आणि बर्याचजणांना आवडेल असा, माफक काटे आणि कमी दुर्गंधी..
सुरमई ही खास चवीची.. पापलेटपेक्षा काही मस्त्यप्रेमींमधे टेस्टसाठी प्रिय, पुन्हा तशीच कमी काट्यांची वगैरे.
खेरीज काहीजण खास मस्त्याहाराचे स्पेशालिस्ट असतात त्यांना पापलेट / सुरमई या दोन्ही माश्यांपेक्षा बोंबील, मांदेली, मोरी, वाम यापैकी काहीतरी आवडते.
:)
पण सुरमई आणि पापलेट हे हापूस आणि पायरीसारखेच ठरतात..
हुश्श... :)
17 Nov 2011 - 8:58 pm | यकु
अहो गवि,
आजवर हजारो वेळा आम्रफल खाल्ले असले तरी तो कोणता प्रकार हे कुणा नार्याला ठावं?
म्हणून एक आपली प्रामाणिक शंका हो.
:)
16 Nov 2011 - 2:51 pm | विशाखा राऊत
जागुताई _/\_
तोपासु, मस्त, चविष्ट असे जे काही असेल ते सगळे सुरमईला लागु होते.
वरचे फोटो एकदम जबरदस्त आहेत. सकाळी सकाळी बघुन खुपच जळजळ होत आहे.
16 Nov 2011 - 3:44 pm | गणपा
झक्कास.
तोंपासु.
16 Nov 2011 - 6:13 pm | नरेश_
जागुताईचा विजय असो !!
16 Nov 2011 - 6:42 pm | जागु
सगळ्यांचे धन्यवाद.
16 Nov 2011 - 7:11 pm | संदीप चित्रे
असली की आपण एकदम खूष असतो :)
20 Nov 2011 - 12:43 pm | नंदन
अगदी असेच. फोटो पाहूनच 'आमोद सुनासि आले' :)
17 Nov 2011 - 11:45 am | खादाड
ताई तळतांना मास्याच स्कीन तव्याला चिकटत नाहि का ?
17 Nov 2011 - 4:36 pm | दिपक पाटील
मी तुमच्या घराचा पत्ता शोधत आहे, बरेच दिवस झाले....
आता हरलो....जरा कळवता का प्लीज....अहो जेवायला येतोय...
(वाटल्यास हावरट म्हणा....)
17 Nov 2011 - 5:25 pm | परिकथेतील राजकुमार
मत्स्यकन्येच्या धाग्यावर फटू बघायला नेहमीप्रमाणे हजेरी लावली आहे.
गवताळ
परा
17 Nov 2011 - 11:35 pm | जागु
प्रत्येकाची आवड कोणाला सुरमई चांगली वाटते तर कोणाला पापलेट. मला सुरमई पेक्षा पापलेट आवडतो कारण पापलेट कितीही खाल्ला तरी जड वाटत नाही पण सुरमईची एक मोठी तुकडी भरपुर वाटते.
परा धन्स.
दिपकजी थोडे दिवस थांबा मी कळवते तुम्हाला.
18 Nov 2011 - 5:56 pm | राही
जागुताई, मासळीच्या तुमच्या पा.कृ. छानच असतात आणि तळलेल्या फिशचे फोटो तर अप्रतिम. पण एक शंका आहे. तुम्ही मासळीसाठी हिंग वापरता. पण अनेक घरांमध्ये मासळीला हिंगाचा स्पर्शही चालत नाही. त्यांच्या मते हिंग म्हणजे मासळीसाठी अगदी 'नो नो'. त्या उलट त्यांच्याकडे चिंच आणि हळदीची रेलचेल असते. केरळात तर हिंग अजिबात घालत नाहीत, पण कढीपाने घालतात. प्रांताप्रांतागणिक मासळीची कृती बदलत असावी.
मंगला बर्वेंच्या 'अनपूर्णा'मध्ये हापूस आंब्याच्या रसात शिजवलेल्या मासळीची पा.कृ. वाचली होती तेव्हा एक जोरदार कल्चरल शॉक बसला होता.
19 Nov 2011 - 5:40 pm | पिंगू
ओ राहीताई, प्रांतोप्रांतीच्या तर्हा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे मसाल्यांचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कोकणात मासे मॅरिनेट करताना त्यात हिंग अगदी थोडेसे वापरतात. बाकी चिंच आणि हळद तर पाहिजेच, नाहीतर टेस्ट कुठे आहे याचा पत्ता शोधायला लागेल.. :)
- (पूर्वाश्रमीचा मत्स्याहारी) पिंगू
20 Nov 2011 - 12:01 am | जागु
राही हिंग अगदी पाव चमचा तोही छोटा टाकतात. हिंगामुळे पोटाला बाधा होत नाही. अजुन तुम्हाला ऐकायचे असेल तर काहि ठिकाणी माश्यांना दही पण लावतात.
18 Jan 2012 - 9:19 pm | गणेशा
अप्रतिम ..
18 Jan 2012 - 9:28 pm | कॉमन मॅन
!!!!!!!!!!
18 Jan 2012 - 9:36 pm | सुनील
अरेच्चा. ही पाकृ पहायची राहून गेली होती. पुन्हा वर आणल्याबद्दल गणेशांचे आभार!
सुरमईची एक भक्कम तुकडी आणि बियर. अहाहा!