स्ट्रॉबेरी- राजबेरी चिजकेक

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
12 Oct 2011 - 2:33 am

साहित्यः

Mascarpone cheese - ५०० ग्रॅम
ग्रीक दही - १०० ग्रॅम (हे दही न मिळाल्यास चक्का किंवा पाणी काढलेले दही वापरु शकता)
स्पॉन्ज केक - १ (त्याचे २ लेयर करुन घ्यावेत)
जिलेटीन - १ मोठा चमचा
गरम पाणी - १/४ कप
अंडी - २ (पांढरा भाग)
साखर - २५० ग्रॅम
व्हॅनिला इसेन्स - १/२ छोटा चमचा
लिंबुचा रस - १-२ चमचे
लिंबु - १
स्ट्रॉबेरी - १ किलो
राजबेरी - १ टिन (राजबेरी नसल्यास चेरी वापरु शकता)
केक करायचे भांडे - असे भांडे ज्याचा बेस वेगळा करता येतो.

कृती:

१. १/४ कप गरम पाण्यामधे जिलेटीन टाकुन, त्यात विरघळुन घ्यावे.
२. Mascarpone cheese हे room temprature ला आणावे.

cheese

३. २ अंड्याचे पांढरे व साखर टाकुन इलेक्ट्रीक बिटरने मिक्स करुन घ्यावे. ह्याचे मिश्रण पुर्ण घट्ट होईपर्यंत फेटावे.
४. दुसर्‍या बाउल मधे चीज व दही निट मिक्स करावे. त्यात गरम पाण्यात विरघळलेले जिलेटीन टाकावे. हे सर्व एकत्र करावे. ह्या मधे गुठळ्या होउ न देणे.
५. ह्या मिश्रणा मधे, व्हॅनिला इसेन्स, अंड्याचे पांढरे व साखर यांचे मिश्रण टाकुन मिक्स करावे.
६. ह्यात लिंबुचा रस व १/४ छोटा चमचा लिंबुचा वरचा भाग (lemon zest) किसुन टाकावा व मिक्स करावे.
७. केकच्या भांड्यामधे सगळ्यात आधी खाली बटर लावुन घ्यावे. त्यावर स्पॉन्ज केकचा १ लेयर लावावा.
८. त्यावर चीजचे १/२ मिश्रण टाकावे. ते निट पसरुन घेउन, त्यावर पुर्ण वरचा भाग १/२ चिरलेल्या स्ट्रॉबेरीने सजवावा.

strawberry

९. ह्या वर केकचा दुसरा लेयर व उरलेले चीजचे मिश्रण टाकुन निट पसरावे. आता हा केक २-३ तास फ्रिज मधे सेट करावा.
१०. २-३ तासांनी केक बाहेर काधुन, त्यावर राजबेरी व स्ट्रॉबेरीने केक सजवावा. परत केक १/२ तास फ्रिज मधे ठेवावा.

final

११. १/२ तासानी केक बाहेर काढावा. त्याच्या कडा सुरीन सोडवुन घ्याव्यात. आता केकच्या भांड्याचा बेस वेगळा करुन घ्यावा.

jdd

jnkn

jhd
१२. केक खायला तयार आहे.

प्रतिक्रिया

सानिकास्वप्निल's picture

12 Oct 2011 - 2:51 am | सानिकास्वप्निल

नशीब.. वाटलं आठवण करू द्यावी पाकृ द्यायची ;) किती वाट बघायला लावलीस तु ;)
भन्नाट आहे ...मी नक्की नक्की बनवून बघणार आहे हा चीझकेक :)

Mrunalini's picture

12 Oct 2011 - 3:01 am | Mrunalini

हा हा हा... अगं नाही गं, विसरले नव्हते. काल बाहेर गेले होते, त्यामुळे वेळ नाही मिळाला. म्हणुन आज टाकली. नक्की करुन बघ. सोपी आहे तशी पाकृ आणि एकदम टेस्टी. :)

आत्मशून्य's picture

12 Oct 2011 - 3:04 am | आत्मशून्य

.

प्राजु's picture

12 Oct 2011 - 5:17 am | प्राजु

..........................................................................
................................................
......................................
................................
.......................

टेस्टी नसायला काय झालं! मस्तच दिसतायत क्यालरीज्.;)
यात एक संपूर्ण थर स्ट्रॉबेरीजचा आणि रास्पबेरीज मात्र एकच गोल कडेने दिसतोय तेवढाच लावायचा का?
मी मागेच सांगितलय की तुझ्या आणि सानिकाच्या पाकृ म्हणजे कॅट्रिना आणि करीना असतात.
तुमच्या रेशिप्यांना चार चाँद लावायचे असतील तर कुठेतरी फिकट अक्षरात न्युट्रीशन फ्याक्टस् देत जावा ना!;)

हा हा हा.... :D
मला राजबेरी जास्त आवडत नाही. त्यामुळे मी त्या फक्त वरती लावल्या. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही स्ट्रॉबेरी सोबत राजबेरीचा सुद्धा थर लावु शकता. :)

भलताच क्रिमी/चिजी झालाय केक . :)

हा खाल्ल्यावर वाढलेल्या कॅलर्‍या किती तास बर्न कराव्या लागतील म्हणे. ;)

स्ट्रॉबेरीज बिल्कुल आवडत नसल्याने त्याजागी अननसाचा वापर केल्यास चालेल काय ?

हो. कॅलरीज तर आहेतच, पण करुन बघायचाच होत. त्यामुळे केला. हो, तुम्ही कुठल्याही फळाचा वापर करु शकता. फळे नाही टाकली तरी चालतील. नुसत्या लिंबुचा रस व lemon zest ह्याची चव पण खुप छान लागते. फक्त मग ह्याचे प्रमाण थोडे जास्त करावे लागेल.

विशाखा राऊत's picture

12 Oct 2011 - 1:49 pm | विशाखा राऊत

माझा फेवरेट केक आहे इथे हा :)
एकदम सही..
फळ नको असतील तर चॉकलेटचा पण मस्त लागतो लेयर ह्यात.. बाकी खरा मान चीझ चीझ न चीझचाच :)

कधी पण ये. केक तुझ्या स्वागता साठी तयार असेल. ;)

स्वानन्द's picture

12 Oct 2011 - 1:59 pm | स्वानन्द

Eating Pizza

अत्रुप्त आत्मा's picture

12 Oct 2011 - 2:00 pm | अत्रुप्त आत्मा

वाहव्वा...नेहमीप्रमाणेच बहारदार पाकक्रुती.... फोटोत उडी मारुन खावसं वाट्टय... क्या बात,,,क्या बात,,,क्या बात...

आपण जगण्यासाठी खात नसुन खाण्यासाठी जगतो.... ही अपली साइन अपल्याला अगदी शोभते... आंम्ही ती आज आपल्या सुपूर्द करतो ,,,ही अशी- आपण जगण्यासाठी खात नसुन खाण्यासाठी (च) जगता

Mrunalini's picture

12 Oct 2011 - 2:08 pm | Mrunalini

धन्यवाद. ;) :D

सुहास झेले's picture

12 Oct 2011 - 3:15 pm | सुहास झेले

भन्नाट पाककृती !!

daredevils99's picture

12 Oct 2011 - 3:18 pm | daredevils99

पदार्थ झक्कास हे. फोटो तर कातील हे.

स्ट्रॉबेरी-रास्बेरीचा केक झाला आता कालचा ब्लॅकबरीचा गोंधळ पाहून असे सुचवतो की पुढचा पदार्थ ब्ल्याकबेरीचे लोणचे असा द्यावा.

कच्ची कैरी's picture

12 Oct 2011 - 3:37 pm | कच्ची कैरी

एकदम सह्ही आहे पाकृ.,मला स्ट्रॉबेरी खूपच आवडतात म्हणुन मी नक्की ट्राय करुन बघेल.

केक लई भारी.
आपण कॅलरीच्या भानगडीत पडत नाय. (म्हणून पसरत चाललोय हि गोष्ट वेगळी )

च्यायला केक बघूनच तोंडाला पाणी सुटले.. नेहमी सारखीच भन्नाट पाककृती..

- पिंगू

जाई.'s picture

12 Oct 2011 - 5:37 pm | जाई.

मस्तच

प्रभो's picture

12 Oct 2011 - 6:29 pm | प्रभो

कडक!!

छे! हा केक मऊ असतो याची नोंद घ्यावी.

सदर पाकृमध्ये गॅस जाळण्याचा काही संबंध नसल्याने, सर्व वाचक व प्रतिसादक वर्गाने जळुन ही पाकृ खमंग बनवावी असे तुमचे म्हणणे आहे काय ओ,

तो दुसरा फोटो काळ्या भांड्यातील स्ट्रॉबेरीचा तर हमखास जळवणारा आहे, एवढ्या स्ट्रॉबेरी माझ्या स्वप्नात जरी आल्या न तर बायको मारेल मला, अगदी करिना विद्या बालन आलेली चालेल किंवा शाळामधली मास्तरीण अमृता सुद्धा, पण एवढ्या स्ट्रॉबेरी छे छे पाप ओ पाप.

असो, खेड शिवापुरला कैलास गार्डनला जेवायला गेलो की नेहमी मी गाडीची किल्ली विसरतो आत, मग बायको बाहेर गाडीपाशी उभी असते अन मी किल्लि घेउन परत येताना स्ट्रॉबेरि स्टॉलकडे ओढला जातो, आणि नंतर गाडिजवळ आल्यावर शर्टावर पडलेले डाग बघुन ...... तिथुन घरी परत येईपर्यंत बायको काही बोलत नाही..... याचा एक फायदा पण आहे तो नंतर केंव्हातरी इथं लईच अवांतर होइल.

नाही हो, मी कशाला जळवु.... ;)
पण तुमच्या बायकोचा स्ट्रॉबेरी वर एवढा राग का??

५० फक्त's picture

13 Oct 2011 - 9:05 am | ५० फक्त

'पण तुमच्या बायकोचा स्ट्रॉबेरी वर एवढा राग का??'

माझ्या बायकोचा स्ट्रॉबेरीवर एवढा राग नाहि, एवढ्या स्ट्रॉबेरीवर राग आहे.

Mrunalini's picture

13 Oct 2011 - 4:43 pm | Mrunalini

हा हा हा... पण का???? स्ट्रॉबेरी नी काय होणारे>???

५० फक्त's picture

13 Oct 2011 - 5:54 pm | ५० फक्त

अहो काय आहे ना, मला स्ट्रॉबेरी नुसती उतरत नाही घशाखाली, एका स्ट्रॉबेरीबरोबर एखादा चमचा क्रिम किंवा व्हॅनिला आईस्क्रिम असलं तरच जाते, म्हणुन. खर्च तर होतोच जास्त आणि सगळं अंगी लागतं ओ लगेच.

गेली एक आठवडाभर पहाटे (पक्षी :- साडेसात वाजता) उठवायची मेहनत वाया जाते ना तिची. अर्थात उठल्यावर पण मी फिरायला जातो ते लोकपाल विधेयक मंजुर होण्याची शक्यता पाहुनच.

Mrunalini's picture

13 Oct 2011 - 7:39 pm | Mrunalini

:D ओ... असं आहे तर....

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2011 - 5:14 pm | अत्रुप्त आत्मा

@एवढ्या स्ट्रॉबेरीवर राग आहे. :bigsmile:

@आणि सगळं अंगी लागतं ओ लगेच. :-D --- ^---

@ ते लोकपाल विधेयक मंजुर होण्याची शक्यता पाहुनच. :-D --- ^---

सूड's picture

12 Oct 2011 - 10:08 pm | सूड

कातिल फोटु !! झक्कास रेशिपी.
गेला महिनाभर जिमला दांडी मारलीये, पुढल्या आठवड्यात पुन्हा सुरु केलं की याचा विचार करेन . (दोन तीन ठिकाणी क्यालरी क्यालरी वाचलं म्हटलं आपण तरी का मागं राहा नै का ??) ;)

रेवती's picture

12 Oct 2011 - 11:19 pm | रेवती

होय, मीच ती..............क्यालर्‍यांचा उल्लेख करणारी!;)

गणपा's picture

13 Oct 2011 - 4:57 pm | गणपा

दुसरा मी ;)
काये ना कॅलरी फॅलरीचा तसा फारसा विचार मी करत नाही हे माझ्या आकाराकडे पाहुन लोकांना महिती आहेच.
पण तेवढ हुच्चभ्रु लोकांत मिरवायच म्हणुन......... हॅ हॅ हॅ.

मदनबाण's picture

16 Oct 2011 - 4:49 pm | मदनबाण

आहाहा... कसला भारी केके दिसतोय च्यामारी ! ;)
फोटु पण मस्त आहेत्,शेवटचा तर शॉलिट्ट. :)
आवडेश ! :)

क्राईममास्तर गोगो's picture

18 Oct 2011 - 12:22 am | क्राईममास्तर गोगो

त्वांडाला पानी सुट्लया.