मेथीचे लाडू

जागु's picture
जागु in पाककृती
11 Aug 2011 - 4:18 pm

साहित्यः
मेथीचे पिठ १ वाटी (१०० ग्रॅम)
५ वाट्या गव्हाचे पिठ
२ वाट्या रवा
१०० ग्रॅम डिंक
५० ग्रॅम हालिम (अळीव)
२ वाट्या सुके खोबरे
५ १/२ वाट्या गुळ
१ चमचा सुंठपावडर
अडीच ते ३ वाट्या साजुक तुप
खारीक बदामचे बारीक तुकडे

पाककृती:
मेथिचे पिठ आदल्या दिवशी तुपात भिजवत ठेवा. त्यामुळे कडूपणा कमी होतो.
सुके खोबरे किसुन मंद आचेवर खरपुस भाजुन घ्या.
खारीक व बदाम बारीक करुन घ्या.
तुपात थोडा थोडा डिंक घालुन तळा व थंड झाल्यावर तो कुस्करुन बारीक करा.

चमचाभर तुपात हालिम (अळीव) तळून घ्या.

भांड्यात दिड वाटी तुप घालुन रवा व गव्हाचे पिठ मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्या व भाजल्यावर एका परातीत काढा.

त्या पिठात तुपात भिजत घातलेले मेथीचे पिठ घाला व हाताने चांगले फेसुन पिठाच्या गुठळ्या मोडा.

आता त्यात भाजलेले खोबरे जरा कुस्करुन घाला. बारीक केलेले बदाम व खारीक घाला. सुंठपावडर व डिंक घाला व चांगले मिसळा.

आता एका मोठ्या भांड्यात १ चमचा तुप टाकुन गुळ चिरुन टाका. आता गॅस एकदम मंद ठेवा व गुळ विरघळेपर्यंत ढवळा. गुळ विरघळला की लगेच गॅस बंद करा.
From Methi ladu

भांडे गॅसवरुन काढून त्यात लगेच पिठाचे मिश्रण घाला व चांगले ढवळा.

आता पटापट लाडू वळून घ्या.

झाले लाडू तयार.

अधिक टिपा:
हे लाडू पौष्टीक असतात.
हे लाडू थंडीत खातात.
बाळंतीणीसाठी हे लाडू खुपच उपयुक्त ठरतात.

पाक करताना गॅस मोठा मुळीच ठेउ नका. एकदम मंद ठेवा नाहीतर पाक पक्का तयार होइल इ लाडू कडक होतील.

लाडू वळताना मिश्रण थंड झाले आणि भांड्याला चिकटले किंवा लाडू वळता येत नसतील तर पुन्हा मंद गॅसवर २-३ मिनिटे ठेवावेत म्हणजे मिश्रण ओले होउन लाडू वळता येतील.

प्रतिक्रिया

नन्दादीप's picture

11 Aug 2011 - 4:25 pm | नन्दादीप

पा.कृ. विभागात जास्त डोकावत नाही...... (नाहीतर बघून बघूनच वजन वाढायचे)...

पण मेथीचे लाडू नाव वाचून मुद्दाम धागा उघडला...आपला आवडता लाडू आहे ना तो.

फटू वरून तरी मस्त झालेत.... कधी येऊ खायला????

मस्त आहेत लाडू जागुताय.. बोल कधी येऊ खायला? नाहीतरी येत्या विकांती कळंबोलीला परततोय.

- पिंगू

पल्लवी's picture

11 Aug 2011 - 9:20 pm | पल्लवी

उग्ग्गाच जास्त पाठवु नकोस... :P
लै दिवस झाले मेथीचे लाडू खाउन !
मस्तं रेंगाळत राहणारी डिंक-मेथ्याची गोड्-कडू चव.. अहाहा.

पाठव पाठव लवकर !

प्राजु's picture

11 Aug 2011 - 11:55 pm | प्राजु

वाह! मस्तच!!

जागु.. काय विशेष बाई?? सगळं बरं आहे ना? ;) (ह . घे.)

लाडू मस्त दिसताहेत.

अग प्राजु सगळ ठिक आहे म्हणुनच केलेयत ना ? माझ्या नणंदेची डिलिव्हरी झाली आहे ग बयो. तिच्यासाठी केलेयत. घरीच आहे ती माझ्या.

शुचि's picture

12 Aug 2011 - 7:34 am | शुचि

मस्त!!!

जाई.'s picture

12 Aug 2011 - 10:55 am | जाई.

+१

जागुतै.. मस्त पाकृ. हे लाडू मस्त स्वादिष्ट असतात पण एकदम मेथी दाताखाली आली तर कधीकधी कडूझार तोंड होते. इथे तर तू मेथीचे पीठच वापरले आहेस. त्यामुळे एकसमान कडुत्व येईलसे वाटते.

मेथी न घालता बाकीचे जिन्नस वापरुन हे जास्त छान लागतील असं माझं लहानपणापासून मत आहे.
असेच एक डिंक वगैरे नसलेले प्लेन खमंग तुपातले मेथीचे लाडूही करतात असे वाटते. खेरीज खालील लाडूंविषयी अधिक माहिती दिल्यास आभारी राहीनः

राघवदासाचे लाडू- नुसतेच ऐकले आहेत पण जाणण्यास आणि खाण्यास उत्सुक - अशा नावाचे लाडू खरंच असतात का?

नागलीचे लाडू (आजी गेल्यापासून तसे अप्रतिम नागलीचे लाडू मिळाले नाहीत. एकदा विकत मिळाले होते पण डालड्यासारखे मेणचट.. फेकून देण्याच्या लायकीचे.)

तंबिटाचे लाडू

बाकी शेवलाडू, कुरकुरीत कडक बुंदीचे लाडू हे नेहमीप्रमाणे कोकण गोव्याची आठवण जागवणारे लाडू अत्यंत आवडीचे.

राघवदासाचे लाडू- नुसतेच ऐकले आहेत पण जाणण्यास आणि खाण्यास उत्सुक - अशा नावाचे लाडू खरंच असतात का?

हो असतात खुप छान लागतात!
खूप तुप लागत पन त्याला!!

गवि's picture

12 Aug 2011 - 1:07 pm | गवि

ते कसे करायचे कळले तर करण्याची इच्छा आहे.

आणखी एक नाव आठवत नव्हते.. गूळपापडीचे (की अशाच काही नावाचे..कसल्यातरी पापडीचे चूभूदेघे..) लाडू . याची चव अगदी लहानपणी खाल्लेल्याची अजून जिभेवर आणि आठवणीत तश्शी आहे. पण हे लाडू कुठे गडप झाले कोण जाणे. एखादी एक्स्पर्ट सुगरण कदाचित काही सांगू शकेल अशा आशेवर.

गुळपापडी, मेथीचे लाडू आज्जीची आठवण आली. :(

आजी गेली ती सगळे आवडते लाडू घेऊन गेली सोबत.. :( :(

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Aug 2011 - 3:17 pm | बिपिन कार्यकर्ते

राघवदास आणि गूळपापडी असे लाडू असतात, इतकेच नाही तर ते खायचा प्रसंग माझ्यावर ओढवायचा लहानपणी. मला त्या नावांमुळेच ते कधी आवडले नाहीत. :(

कच्ची कैरी's picture

12 Aug 2011 - 1:13 pm | कच्ची कैरी

मूळात लाडु हा प्रकारच मला खूप आवडतो ! जनरली ही लाडू हिवळ्यात करतात पण जागुने सांगितल्यप्रमाणे नंदेसाठी करावे लागलेले दिसतात .
@गगनविहारी-ते गूळ्-पापडीचे लाडू माझ्या एका चुलत सासुला अप्रतिम करता येतात मी भारतात गेल्यावर त्यांच्याकडुन नक्की शिकुन घेईल व तुमच्यासाठी मिपावर पेश करेल.

स्मिता.'s picture

12 Aug 2011 - 1:36 pm | स्मिता.

वाह! लाडू तर मस्त दिसतायेत.

मेथीचे पीठ वगळून केलेले डिंकाचे लाडू तर खूपच आवडतात.

धनुअमिता's picture

12 Aug 2011 - 3:10 pm | धनुअमिता

मस्त. खुपच छान .

मेथीचे लाडू आवडत नाय.
सबब काय पण बोलू शकत नाय.

बाकी उडदाचे लाडू आणि रव्याचे लाडू जाम आवडतात.

स्वाती दिनेश's picture

12 Aug 2011 - 4:42 pm | स्वाती दिनेश

तुझी पाकृ जरा वेगळी दिसते, आम्ही मेथीचे डिंकाशिवाय किवा डिंकासहित लाडू करतो, पण मेथीत हळीव नाही घालत, हळीव+ ओलेखोबरे+ गूळ असे लाडू करतो.
हे लाडू छान दिसत आहेत,
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

12 Aug 2011 - 5:44 pm | परिकथेतील राजकुमार

तोडलस फोडलस !
जागुतै लाडू कातिल दिसत आहेस एकदम.

भारतात असताना एकदा पुण्यात जायचा योग आला होता, तेंव्हा साखरे महाराज का कायशा मठापाशी हे लाडू खायला मिळाले होते. जुन्या आठवणी अशा कुठल्या ना कुठल्या रुपात समोर येतात बघ.

मदनबाण's picture

12 Aug 2011 - 7:26 pm | मदनबाण

वा... :)

(अळीवाच्या लाडूंचा चाहता) :)
http://www.misalpav.com/node/14522

michmadhura's picture

13 Aug 2011 - 5:02 pm | michmadhura

अळिवाचे लाडू आताच बाळंतपणानंतर खाल्ले ( मेथीच्या कडु लाडवावर उतारा म्हणुन). बनवायला खूप मेहनत लागते. नारळाचे डोळे असतात तेथे भोक पाडुन त्यातुन अळीव नारळातील पाण्यात भिजत घालतात. चांगले भिजले कि नारळ फोडुन तेच खोबरं वापरुन लाडू बनवतात.

फोटू छान आलेत.
स्वातीताई म्हणते तसेच, अळीवाचे ओला नारळ गूळ घालून ऐकलेले (अर्थातच खाल्लेले) आहेत.;)
मेथीच्या लाडवाचा प्रसंग तुमच्याकडे घडल्याबद्दल अभिनंदन!
तुझ्या मुलीला बाळ बघून फारच आनंद झाला असणार.
प्राजुलाही मेथीचे लाडू हवे असल्यास आमची ना नाही.;)

प्राजु's picture

12 Aug 2011 - 7:59 pm | प्राजु

मला उद्या सुद्धा चालतील. मथीचे असे लाडू खायला मला काहीही कारण लागत नाही. :)

(नविन घरात सामान लागलेलं दिसतंय.. नाही वेळ मिळाला माझी खोडी काढायला म्हणून विचारलं.. )

गगनविहारी तंबीटाचे लाडू म्हणजे नेमके कसले ते नाही समजले.

राघवदास लाडू असतात. मी करुन रेसिपी टाकेन.

गुळपापडीचे लाडूही टाकण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.

हो ग रेवती श्रावणी खुप खुष आहे सध्या.

प्राजूची तयारी असेल तर मी डबा भरुन पाठवायला तयार आहे.

राजकुमार, मदनबाण, स्मिता, धनु, अवक, गणपा, जाई, शुचि, धन्यवाद.

स्वाती अग हे बाळंतीणींसाठी पौष्टीक लाडू आहेत. म्हणून त्यात सगळच आहे.
नन्दादिप, पल्लवी, पिंगु कधी येताय सांगा.

बिपिन तुम्ही नाव पाहुन खाता ?

कच्चि कैरी हो हे नणंदेसाठी केले आहेत.

इरसाल एकदा खाउन बघा हे लाडू.

तंबिटाचे लाडू हे तांदळाच्या पिठीपासून तयार करतात.
त्याला गोल आकार न देता थोडे चपटे बनवतात.
माझ्या माहेरी केले जातात.
आईला विचारून बनवता येतात का ते पाहते.
प्रतिसाद मात्र मिळाले पाहिजेत हां!;)

रेवती नक्की टाक रेसिपी. मी पाच प्रतिसाद देईन. मला एक लाडू फ्रि दे त्यावर.

मधुरा मस्तच नारळाची आयडीया.