मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मेथीचे लाडू

जागु · · पाककृती
साहित्यः मेथीचे पिठ १ वाटी (१०० ग्रॅम) ५ वाट्या गव्हाचे पिठ २ वाट्या रवा १०० ग्रॅम डिंक ५० ग्रॅम हालिम (अळीव) २ वाट्या सुके खोबरे ५ १/२ वाट्या गुळ १ चमचा सुंठपावडर अडीच ते ३ वाट्या साजुक तुप खारीक बदामचे बारीक तुकडे पाककृती: मेथिचे पिठ आदल्या दिवशी तुपात भिजवत ठेवा. त्यामुळे कडूपणा कमी होतो. सुके खोबरे किसुन मंद आचेवर खरपुस भाजुन घ्या. खारीक व बदाम बारीक करुन घ्या. तुपात थोडा थोडा डिंक घालुन तळा व थंड झाल्यावर तो कुस्करुन बारीक करा. Image removed. चमचाभर तुपात हालिम (अळीव) तळून घ्या. Image removed. भांड्यात दिड वाटी तुप घालुन रवा व गव्हाचे पिठ मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्या व भाजल्यावर एका परातीत काढा. Image removed. त्या पिठात तुपात भिजत घातलेले मेथीचे पिठ घाला व हाताने चांगले फेसुन पिठाच्या गुठळ्या मोडा. आता त्यात भाजलेले खोबरे जरा कुस्करुन घाला. बारीक केलेले बदाम व खारीक घाला. सुंठपावडर व डिंक घाला व चांगले मिसळा. Image removed. आता एका मोठ्या भांड्यात १ चमचा तुप टाकुन गुळ चिरुन टाका. आता गॅस एकदम मंद ठेवा व गुळ विरघळेपर्यंत ढवळा. गुळ विरघळला की लगेच गॅस बंद करा. Image removed.From Methi ladu भांडे गॅसवरुन काढून त्यात लगेच पिठाचे मिश्रण घाला व चांगले ढवळा. Image removed. आता पटापट लाडू वळून घ्या. झाले लाडू तयार. Image removed. अधिक टिपा: हे लाडू पौष्टीक असतात. हे लाडू थंडीत खातात. बाळंतीणीसाठी हे लाडू खुपच उपयुक्त ठरतात. पाक करताना गॅस मोठा मुळीच ठेउ नका. एकदम मंद ठेवा नाहीतर पाक पक्का तयार होइल इ लाडू कडक होतील. लाडू वळताना मिश्रण थंड झाले आणि भांड्याला चिकटले किंवा लाडू वळता येत नसतील तर पुन्हा मंद गॅसवर २-३ मिनिटे ठेवावेत म्हणजे मिश्रण ओले होउन लाडू वळता येतील.

वाचन 14458 प्रतिक्रिया 0