मिक्स व्हेज फ्रित्ताता | Mix di verdure Frittata

पांथस्थ's picture
पांथस्थ in पाककृती
7 Aug 2011 - 5:08 pm

नमस्कार मंडळी.

आज बर्‍याच (मोठ्या) कालावधीनंतर पाकृ टाकत आहे. लिहण्याची प्रेरणा - सहज, गणपा, धमाल शेठ :)

आज आपल्या समोर पेश आहे इटालियन ऑम्लेट - मिक्स व्हेज फ्रीत्ताता - Mix di verdure Frittata. मस्त रविवार सकाळ असावी. एकदम निवांतपणा असावा. सावकाश पेपर वाचत वाचत फ्रित्ताता चा आनंद घ्यावा. मग एखादा कप कॉफीचा. थोडा वेळ टि.व्ही. पुढे. दुपारची झोप. क्या बात है!

चला तर मग....

फ्रित्ताता ह्या प्रकारात अंड्याबरोबर भाज्या (मश्रुम्स, सिमला मिरची, ब्रोकोली, अस्पॅरॅगस, टोमॅटो, कांदा, बटाटा ई.ई.) , मांस (सॉसेजेस, बेकन, हॅम, कोळंबी ई.ई.) , चीझ (रीकोटा, पामेजन ई.ई.), हर्ब्स (ओरेगॅनो, सेज ई.ई.) अश्या विवीध सामग्री वापरुन ऑम्लेट बनवले जाते. ह्या प्रकारात अंड्याचा तळ व्यवस्थित जमु दिला जातो. आणी ऑम्लेट पलटण्याऐवजी ओव्हन मधे थोड्या वेळ बेक केले जाते. मी बेक करण्याची कृती वगळली आहे.

साहित्यः

अंडी - ३ मध्यम आकाराची
बटाटा - १ मध्यम आकाराचा
टोमॅटो - १ मध्यम आकाराचा
कांदा - १ मध्यम आकाराचा
शेपु - २ टेबल स्पुन (चिरुन)
मिरची - १ लाल मिरची (आवडीप्रमाणे)
लसुण - ४/५ पाकळ्या
पार्मेजान चीझ - २/३ टेबल स्पुन (आवडीप्रमाणे)
मीठ - चवीपुरते
ऑलिव्ह ऑईल - १-२ टेबल स्पुन
कुकिंग बटर - १-२ टेबल स्पुन

कृती:

१. बटाट्याचे चार काप करुन घ्यावेत,

२. मीठ टाकलेल्या पाण्यात बटाट्याचे काप थोडे उकडुन घ्यावेत (१०-१५ मिनीटे)

३. मश्रुम्स, टोमॅटो, कांदा ह्यांचे बारीक काप करुन घ्यावेत.


४. लाल मिरचीचे एकदम पातळ काप करुन घ्यावेत (कात्रीने सोपे पडतात)

५. शेपु बारीक चिरुन घ्यावा.

६. उकडलेल्या बटाट्याचे बारीक काप करुन घ्यावेत (शक्यतो सालासकट)

७.एका पॅन मधे ऑलीव्ह ऑईल गरम करुन त्यात १ टेबल् स्पुन कुकींग बटर घालावे.

८. बटाट्याचे काप सोनेरी होउ पर्यंत परतुन घ्यावेत

९. बटाटे बाजुला काढुन कांदा परतायला ठेवावा

१०. कांदा परतला गेल्यावर मश्रुम्सचे काप टाकावेत.

११. मश्रुम्स मऊ झाल्यावर टोमॅटो टाकावा.

१२. टोमॅटो परतला गेल्यावर परतलेला बटाटा, बारीक चिरलेला लसुन, मिरची, शेपु टाकावेत आणी चवीपुरते मीठ घालावे

१३. सगळे मिश्रण एका पातळीत पसरुन घ्यावे

१४. अंडी फोडुन अगदी हलकेच मिक्स करुन घ्यावीत आणी पॅन मधील मिश्रणावर हळुवार ओतावे

१५. वरुन थोडा शेपु, मिरचीवे तुकडे आणी किसलेले चीझ भुरकावे

१६. अंडे थोडे व्यवस्थित बसले आणी चीझ थोडे विरघळले की पॅन झाकुन घ्यावी

१७. साधारणपणे ५-६ मिनीटात ऑम्लेट तयार होते.

फोटू काढत असतांना कन्यारत्नांने ताव मारायला सुरुवात केली :)

बघता बघता संपले देखील!

मंडळी तेव्हा तयारीला लागा. आपण काही बदल केले तर नक्की कळवा!

चाओ!

प्रतिक्रिया

सहज's picture

7 Aug 2011 - 6:38 pm | सहज

आद्य बल्लवाचार्य पाथंस्थ यांना पुनरागमाबद्दल धन्यवाद!

फ्रिटाटा ओव्हन शिवाय मस्तच!

फ्रीटाटा, फळे, ज्युस, चीज... झोप अहाहा....!

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Aug 2011 - 7:26 pm | बिपिन कार्यकर्ते

** %%%% $$ @

इरसाल's picture

7 Aug 2011 - 7:27 pm | इरसाल

मुस्तच......जाम भाली

आयला बटर आणि चीझ मुळे जीभ स्लीप मारायला लागली कि काय.

फोटो म्हणजे काही बोलायलाच नको.

पल्लवी's picture

7 Aug 2011 - 7:51 pm | पल्लवी

कातील..कातील म्हणतात ते हेच !

(बाकी, पाककला हा तुमचा अल्लाउद्दिनचा दिवा असेल, तर फोटोग्राफी ही तुमची अंगठी असू शकेल ;) )

पप्पु अंकल's picture

7 Aug 2011 - 7:59 pm | पप्पु अंकल

आवडले.......
काय ते फोटो राव स्टेप बाय स्टेप मस्तच.............
आता एकदा नक्की करुन बघणार

गणपा's picture

7 Aug 2011 - 9:08 pm | गणपा

पांथस्थांनी आपला लेखन सन्यास सोडलेला पाहुन अत्यानंद झाल्या गेला आहे. :)
पाककृती, सादरीकरण, शब्दांकन सगळ्यात अव्वल.
शेवटी गुरु तो गुरुच साष्टांग <=०O=< :)

(गुरुवर्यांचा चेला ) - गणा.

पांथस्थ's picture

8 Aug 2011 - 9:20 pm | पांथस्थ

गणपा ब्वा

आम्ही कसले गुरु ब्वा, तुमच्या सारखे सातत्य आमच्या कडे नाहि. आमची गाडी जाऊन येऊन असते.

तेव्हा तुम्हालाच दंडवत! <=०<

.....predictability over occasional excellence....हा व्यवहारी जगाचा नियम आहे. आणी तुमच्या कडे तर दोन्ही आहे.

माझीही शॅम्पेन's picture

7 Aug 2011 - 9:26 pm | माझीही शॅम्पेन

खल्लास.. खपलो !!! असेच फोटो आणि पा कृ टाकत राहिलात तर लवकरच मनुष्य-वधाचा आरोप येईल ! :)

निवेदिता-ताई's picture

7 Aug 2011 - 9:46 pm | निवेदिता-ताई

फोटो मस्तच..

मृत्युन्जय's picture

7 Aug 2011 - 11:37 pm | मृत्युन्जय

_/\__/\__/\_

जागु's picture

7 Aug 2011 - 11:42 pm | जागु

जबरदस्त एकदम.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Aug 2011 - 1:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुन्हा लिहीते झालात हे पाहून आनंद झाला.

वेताळ's picture

8 Aug 2011 - 1:29 pm | वेताळ

परत लिहताना पाहुन आनंद झाला. एक शंका श्रावणात अंडे शाकाहारी समजावे काय?

पांथस्थ's picture

8 Aug 2011 - 9:14 pm | पांथस्थ

माफ करावे मालक श्रावण पाळत नसल्याने कल्पना न्हाय बुवा!

अवांतरः आमच्या मते जे काय खायचे ते जेव्हा पाहिजे तेव्हा खावे :)

पंगा's picture

8 Aug 2011 - 2:44 am | पंगा

.

सानिकास्वप्निल's picture

8 Aug 2011 - 3:37 am | सानिकास्वप्निल

झक्कास :)

बहुगुणी's picture

8 Aug 2011 - 6:08 am | बहुगुणी

काय लालायित करणारं वर्णन आहे! आता करून पहायलाच हवं लवकरच.

फोटो तर मस्तच! (त्या १४व्या फोटोतल्या फेटलेल्या अंड्याचे तरंग...अहाहा!)

[ती ४थ्या फोटोतली कात्री कसली खतरनाक दिसते! तिला काय म्हणायचं, कुठे मिळाली वगैरे काही डिटेल्स मिळतील का?]

ती ४थ्या फोटोतली कात्री कसली खतरनाक दिसते! तिला काय म्हणायचं, कुठे मिळाली वगैरे काही डिटेल्स मिळतील का?

नाव नाहि माहित बुवा. मी बेंगलोरला स्पार हायपरमार्केट मधे घेतली आहे.

मस्त कलंदर's picture

9 Aug 2011 - 11:34 pm | मस्त कलंदर

थोडं मॉलमध्ये किंवा 'अ‍ॅट होम'/तत्सम दुकानांत शोधलं तर मिळेल. माझ्याकडेही अगदी वरच्या फोटोत दाखवलीय तशी नसली, तरी साधारण त्या जातकुळीतली म्हणावी तसली कात्री आहे. तिच्या मुठीकडचा चित्रात दाखवलाय तो भाग ओपनर म्हणूनही वापरता येतो.

ओपनर ?
बर बर आम्ही अक्रोड फोडतो. ;)

धमाल मुलगा's picture

10 Aug 2011 - 1:28 pm | धमाल मुलगा

हे राम!!!!

मस्त कलंदर's picture

10 Aug 2011 - 6:35 pm | मस्त कलंदर

अरे ढ लोकांनो, हे सॉस, केचपच्या बाटल्यांवरची झाकणं काढायचं ओपनर आहे. तुम्हाला हवं ते वेगळं ओपनर विक्षिप्तबैंबी गिफ्ट दिलंय.

पंगा's picture

12 Aug 2011 - 2:20 am | पंगा

केचपच्या बाटल्यांवरची झाकणं काढायचं ओपनर आहे.

या ओपनरने फक्त केचपच्याच बाटल्यांवरचे झाकण उघडू शकते?

मुलूखावेगळी's picture

8 Aug 2011 - 10:38 am | मुलूखावेगळी

मस्त रेसिपी
श्रावणानंतर ट्राय करेल

पियुशा's picture

8 Aug 2011 - 12:29 pm | पियुशा

जबरी १ नम्बर !
:)

स्पा's picture

8 Aug 2011 - 12:44 pm | स्पा

आयला.... काय जळवतात हे लोक...

आधी एकतर एकेकटे करून खाणार.. वर त्याची पाक्रु टाकणार..
ते हि कमी म्हणून असे हे असे....... फोटो टाकणार.... :D

अवांतर : पियुषा जरा शीक, गणपा पण म्हणे यांचे शिष्य होते :)

आधी एकतर एकेकटे करून खाणार.. वर त्याची पाक्रु टाकणार..

बेंगळूरात राहणार्‍या (आणी एकुणच) मिपाकरांचे स्वागतच आहे.

याना राव आमच्या बेंगळूरला फ्रित्ताता खायला (संदर्भ: मुंबईकर, पुणेकर, नागपुरकर आणी बेंगळूरकर)

छोटा डॉन's picture

8 Aug 2011 - 2:35 pm | छोटा डॉन

वेल्क्म बॅक मालक.

बाकी फक्त _/\_

- छोटा डॉन

धमाल मुलगा's picture

8 Aug 2011 - 2:46 pm | धमाल मुलगा

एका पांथस्थानं बर्‍याच दिवसांनंतर एके जागी तंबू टाकून अंमळ विसावल्याचे दिसते आहे. ;)
भल्या मनुक्षा,
एव्हढी सुंदर कला दिलीए देवानं, का मग असं आम्हाला वाट पहायला लावतोस? :)

आपल्या ह्या मिक्स (हॅम)व्हेज फ्रितातामुळे मंडळ आलरेडी स्वर्गारोहणास निघून गेलेले आहे. पुढील घरगुती कट्ट्याला सोकाजी जर कॉकटेलची जबाबदारी घेत असेल तर (व्हेज/नानव्हेज) फ्रिताता रांधण्याची जबाबदारी मोठ्या आनंदाने स्विकारणेस दस्तुरखुद्द आम्ही तयार आहोत. :D

बोला सकलकुकशिरोमणि पांथस्थबाबा क्की ....ज्जऽऽय! :)

सोत्रि's picture

10 Aug 2011 - 6:36 pm | सोत्रि

पुढील घरगुती कट्ट्याला सोकाजी जर कॉकटेलची जबाबदारी घेत असेल तर

ही जर तरची भाषा कशाला महाराज. तुम्ही आदेश द्या, कॉकटेल कीट सह जातीने हजर राहतो.
(आधि लग्न कोंढाण्याचे हा आवेश आहे ह्या विधानामागे) :)

- (साकिया) सोकाजी

धमाल मुलगा's picture

10 Aug 2011 - 6:55 pm | धमाल मुलगा

आमेऽऽन!

-उदयभान.

धमाल मुलगा's picture

8 Aug 2011 - 2:47 pm | धमाल मुलगा

प्रकाटाआ.

कच्ची कैरी's picture

8 Aug 2011 - 3:27 pm | कच्ची कैरी

व्वा! वाचुनच इतकी मजा आली तर खाल्ल्यानंतर किति येईल ?मस्त!

आत्मशून्य's picture

8 Aug 2011 - 4:06 pm | आत्मशून्य

.

शाहिर's picture

8 Aug 2011 - 6:01 pm | शाहिर

वि. सू. : पांथस्थ यांची रेसिपी वाचताना लाळेरे बांधावे ..( नेक टाय चा वापर करत येइल)

भारी हो (गणपा)गुरु के गुरु!!

पांथस्थ's picture

8 Aug 2011 - 9:25 pm | पांथस्थ

मंडळी आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

बाकी कोणी काहि म्हणो आम्ही आपली जागा ओळखुन आहो :)

शाहरुख's picture

8 Aug 2011 - 11:16 pm | शाहरुख

दाद्या, तुच जिंकलायस ! :)

प्राजु's picture

9 Aug 2011 - 6:34 pm | प्राजु

वेलकम ब्यॅक!!
पांथस्थ इज बॅकनिन सर्विस!! :)

जबरदस्त आता चातुर्मास संपायचि वाट पाहणे आले या साठी.

प्राजक्ता पवार's picture

11 Aug 2011 - 6:32 pm | प्राजक्ता पवार

मस्तं रेसेपी आणि सुपर्ब फोटो :)

कपिलमुनी's picture

15 Jul 2013 - 5:34 pm | कपिलमुनी

बरेच दिवस पेंडींग होता ...विकांताला केले होते ..
पावसाळी हवा आणि गरम फ्रिताता ...

कोमल's picture

15 Jul 2013 - 7:22 pm | कोमल

मस्तच कि ओ... :) तोंपासु.. उद्याच्या नाश्त्याची सोय झाली :)

जबरी आहेत फोटो आणि पाककृती!

जबरी आहेत फोटो आणि पाककृती...