आज नागपंचमी.श्रावणातील पहिला सण.नागोबाची पूजा झाली. नैवेद्याला अळुची भाजी व पातोळ्या महत्वाच्या.
मागे मी पातोळ्याची कृती दिली होती.पण बर्याच जणांनी फोटो न टाकल्यामुळे प्रतिसाद दिला नव्हता. तेव्हा
आज पातोळ्याचा फोटो. गणपाभौना एक विनंती.मला या पाककृतीचा 'दुवा' द्यायला येत नाही.तेव्हडा द्याल कां?.
प्रतिक्रिया
4 Aug 2011 - 3:50 pm | इरसाल
नागसाहेबांना नमस्कार, आणा पाहू आता पातोळ्याचे ताट इकडे.
आंतरजालावरून साभार
4 Aug 2011 - 4:10 pm | परिकथेतील राजकुमार
वाह मस्तच !
नको ते अवांतर (स्वजबाबदारीवर वाचावे) :- (ते नागाच्या मूर्तीला जान्हवे घातले आहे का हो?)
4 Aug 2011 - 7:21 pm | गणपा
तुम्हा द्वेष्ट्यांना जानवे तेवढे दिसले.. तो 'बो' नाही का दिसला ?
4 Aug 2011 - 4:24 pm | गणपा
ज्योति ताईंची पातोळ्यांचीपाककृती.
साहित्यः-१)हळदीची पाने ७ ते ८.
२)२ वाट्या तान्दुळाची पिठी .
३)३ वाट्या ओले किसलेले खोबरे.
४)१ ते दीड वाटीकिसलेला गुळ.
५)चिमुटभर वेलचीपुड.
६)मिठ चविनुसार.
७)थोडे तेल.
कृती:-१)प्रथम किसलेले खोबरे व गुळ एकत्र करुन त्यात थोडे मिठ घालुन शिजवुन घ्यावे.
गुळ विरघळला व थोडे सुकले कि सारण झाले म्हणुन समजावे.
२)एका भान्ड्यात २ वाट्या पाणी घेवुन त्यात थोडे मिठ व एक चमचा तेल घालुन उकळत ठेवावे.
पाणी उकळले की त्यात तान्दुळाची पिठी घालवी.आच बारिक ठेवावी.व ढवळुन झाकण ठेवावे.
२ मिनिटानी आच बन्द करावी्. ह्याला उकड काढणे म्हणतात.
३)५ मिनिटानी एका परातीत उकड काढुन घेणे.त्यातील थोडी उकड घेउन त्यावर पाण्याचा हबका
मारावा व चान्गले मळुन घ्यावे.तेलाचा हात लाउन परत मळुन घ्यावे.
४)हळदीचे एक पान घेउन त्याला तेल लावणे.व त्यावर मळलेल्या पिठाचा गोळा घेउन पानभर पातळ
थापावा.
५)नन्तर त्यावर तयार केलेले सारण पसरावे.व पान दुमडून निट बन्द करावे.
सगळया पातोळ्या तयार झाल्यावर कुकरमध्ये जाळीच्या चाळणीत शिट्टी काढून २० मिनिटे
शिजत ठेवावे.
खाताना हळदीचे पान काढ्ण्याचे भान ठेवावे.छान तुपाची धार घालुन ताव मारायला सुरुवात करायची.
आमच्याकडे हा प्रकार हरितालिका व नागपन्चमीला करतात.
4 Aug 2011 - 9:10 pm | ज्योति प्रकाश
धन्यवाद गणपाभौ.
4 Aug 2011 - 4:30 pm | Mrunalini
मस्तच.... तोंडाला पाणी सुटले... :) ह्याची पण चव मोदकांसारखीच लागत असेल ना??? कारण फक्त आकार आणि हळदीचे पान एवढाच फरक आहे... कि अजुन काही वेगळे आहे???
4 Aug 2011 - 4:40 pm | पल्लवी
पातोल्यांना हळ्दीच्या पानांचा स्वाद येतो मस्तपैकी.
फारा दिवसांपुर्वी खाल्लेले आणि ते आवडलेले आठवते.
पाकृ छान.
4 Aug 2011 - 5:41 pm | मेघवेडा
मोदकांनाही हळदीची पानं असतात की! यांना उकडीच्या करंज्या म्हणा हवं तर! झकास पाकृ! टिपिकल कोकणी..! :)
पातोळ्यांच्या आणि त्याला लागून मोदकांच्या आठवणीनं कधी एकदा घरी पोहोचतोय असं झालं!
4 Aug 2011 - 7:11 pm | सूड
>>मोदकांनाही हळदीची पानं असतात की!
+१
4 Aug 2011 - 7:20 pm | पल्लवी
>>>>मोदकांनाही हळदीची पानं असतात की!
हे ठाउक नव्हते..
4 Aug 2011 - 4:31 pm | विनायक प्रभू
अरे परा हलकटा.......
हॅहॅहॅ
4 Aug 2011 - 4:34 pm | विनायक प्रभू
पातोळ्या म्हणजे कोकनी एथिनीक डिश.
सकाळी नागपुजा झाल्यावर नाश्त्याला खायला मिळते.
4 Aug 2011 - 5:00 pm | प्रीत-मोहर
काय यार .. कशाला असे फटु टाकताय? एक तर आईच्या हातचे पातोळे आणि मोदक मिसतेय मी....
(गोवन) प्रीमो
4 Aug 2011 - 5:16 pm | गवि
हा पदार्थ अफलातून असतो. आजीची फार फार आठवण झाली. ती गेल्यावर खायला मिळाला नाही आजतागायत.
4 Aug 2011 - 5:26 pm | निवेदिता-ताई
@पातोल्यांना हळ्दीच्या पानांचा स्वाद येतो मस्तपैकी.
हो हो ना...तो स्वादच फार फार आवडतो,
4 Aug 2011 - 8:01 pm | कच्ची कैरी
मी हा पदार्थ कधीही खाल्लेला नाही ,पण आता ट्राय करावा लागेल.
4 Aug 2011 - 9:08 pm | सानिकास्वप्निल
मस्तच झाल्या आहेत्...क्या बात है :)
4 Aug 2011 - 11:44 pm | ५० फक्त
मस्त पाक्रु आणि आठवणींने फोटो टाकल्याबद्दल अतिशय धन्यवाद ज्योतितै.