लेबनिज मेझे हमूस,ताबुले

दीविरा's picture
दीविरा in पाककृती
18 Jun 2011 - 4:14 pm

लेबनिज मेझे हमूस,ताबुले (Lebanese Mezze Hummus, Tabbouleh)

आज मी तुम्हाला लेबनिज मेझेची ओळख करून देणार आहे .मेझे( Mezze are starters which can be served as full meals)

हमूस

साहित्य :

१. काबुली चणे १ कप
२. ताहीना पेस्ट २/३ चमचे( तिळ पेस्ट रेडीमेड)
३. एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल २ चमचे
३ लिंबू चवीनुसार
४. मीठ चवीनुसार
५.लसूण २/३ पाकळी
सजावटीसाठी पार्सले,लाल तिखट.

कृती :
१.काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजवून ,कुकरला शिजवून घ्या .
२. आता लसूण, शिजवलेले चणे ,ताहीना पेस्ट मिकसर मध्ये बारीक वाटून घ्या .
३. त्यात चवीनुसार मीठ,लिंबू व एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल घाला .
४. पार्सले, लाल तिखट ने सजवा.
पिटा ब्रेड बरोबर ताव मारा .

"" alt="" />

" " alt="" />
ताबुले:
साहित्य :
१.पार्सले १ जुडी
२. कांदा १
३. टोमॅटो १
४. लिंबू चवीनुसार
५. burgul रवा २ चमचे
६. एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल २ चमचे
७. लसूण १ पाकळी
८.मीठ चवीनुसार
कृती
पार्सले,कांदा, टोमॅटो,लसूण अगदी बारीक चिरून घेणे .burgul रवा २ मिनिट गरम पाण्यात भीजवून,निथळून त्यात घालावा.चवीनुसार मीठ,लिंबू घालावे.
एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल घालून छान कालवावे.
पिटा ब्रेड बरोबर ताव मारा.

प्रतिक्रिया

काय बी कळलं न्हाई.. पहिला पदार्थ ... काबुलं शिजवायचं , मिस्करात घालायचं आणि मग कच्चं तेल घालून हादडायचं एवढं कळल्म

आणि ते दुसरं काय आहे? त्यात रवा कच्चाच घालून तेही कच्चं तेल घालूनच खायचं का?

प्रास's picture

18 Jun 2011 - 8:39 pm | प्रास

जर्रा आणिक समजावून सांगा वो.... :-(

असा काबुलि चना खाल्ला जाइल ? (मला तरि नाहि)
मला तर मसाला काबुलि चना अन भटुरे ह्या शिवाय दुसरा पर्याय सुचत नाहि
असो
ज्याचि त्याचि आवड :)

सानिकास्वप्निल's picture

18 Jun 2011 - 8:25 pm | सानिकास्वप्निल

माझा अगदी आवडता प्रकार :)
पाकृचे फोटो छान आहेत :)

दीविरा's picture

18 Jun 2011 - 9:56 pm | दीविरा

अहो ते सॅलड आहे :) कच्चेच खायचे, चांगले लागते :)

एकदा खाऊन पहा :)

लापशीचा रवा काही वेगळा असतो का? म्हणजे ईन्स्टंट पीठासारखा. नाहीतर कच्च्या रव्याचे सलाड कसेतरीच लागेल खायला.

ताबूले सलाड मध्ये बल्गर वापरतात. बल्गर हा गव्हाचाच रवा (wheat cereal , ) असतो . हा गव्हाचा रवा उकळत्या पाण्यात अर्धवट शिजवून (parboiled) मग सुकवलेला असतो. त्याला बल्गर म्हणतात. बल्गर १. २. ३. ४ अशा नंबर मध्ये विकत मिळते. नंबर १ चे बल्गर अगदी बारीक असते आणि नंबर ४ चे बल्गर बरेच जाड असते. ताबुले सलाड ला नंबर १ , २ चे बल्गर ठीक आहे .
ताबूले सलाड करताना बल्गर उकळत्या पाण्यात घालून मऊ होइपर्यंत शिजवायचे असते. साधारण १ कप बल्गर ला अडीच कप (घट्ट वाटले तर अजुन थोडे जास्त) पाणी असे प्रमाण आहे. मग त्यात ऑलीव्ह चे तेल, ( एक आख्खे ) लिंबू रस आणि मीठ घालून १ तासभर तेल त्यात मुरण्यासाठी तसेच झाकून ठेवायचे असते. (बल्गर मऊ झालेकीच गॅस वरून उतरवावे). मग नंतर त्यात बारीक चिरलेली कांदा पात , कोथिंबीर , पुदिना पाने , काकडी , टोमॅटो वगैरे घालून खायला घ्यायचे. पाण्याऐवजी चिकन स्टॉक किंवा भाज्यांचा स्टॉक वापरल्यास अजून चवदार लागते.
इथे पण बल्गर पाण्यात शिजवून घेतलेले आहे http://www.foodnetwork.com/recipes/kathleen-daelemans/tabouleh-recipe/in...

दीविरा's picture

19 Jun 2011 - 8:36 am | दीविरा

हो तुमचे बरोबर आहे :) त्यला आमच्यकडे burgul असे म्हणतात.मी तोच रवा वापरला आहे.पण न शिजवता,फक्त गरम पाण्यात ३ मिनिट भिजवला होता. कच्चा लगत नाही :) कारण खूपच कमी प्रमाणात वापरला आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Jun 2011 - 2:02 am | लॉरी टांगटूंगकर

एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल मन्जे???
पिटा ब्रेड बरोबर ताव मारा ..................हे चुकुन ब्राड पिटा बरोबर ताव मारा असे वाच्ले.
पहिल्या फोटु मधे बाटलि बघुन थोडा वेगळा समज झाला...

हे नाव अरबी वाट्ते आहे.

मिडल ईस्ट चे फूड आहे. मी हे प्रकार आधी खाल्ले मग त्याचे साहित्य आणि कॄती कळली... त्यामुळे काबुली चणे असे खाणे हे फारसे छान वाटत नसले तरी हे सगळे पदार्थ भारी लागतात.

फलाफल हा तर माझा आवडता प्रकार आहे.

गणपा's picture

20 Jun 2011 - 4:30 pm | गणपा

माझाही एक प्रयत्न.....
(कालच केल होतं.)

दीविरा's picture

20 Jun 2011 - 6:12 pm | दीविरा

तूमचे छानच दिसतेय हमूस :)

सजावट पण छान आहे :) माझ्यापेक्षा सुद्धा

माझा पण हा आणी सगळेच लेबनीज प्रकार आवडते आहेत :)

मृत्युन्जय's picture

20 Jun 2011 - 6:21 pm | मृत्युन्जय

दोघांच्या हमुसचा फोटो कातिल है. चवही तितकीच खल्लास असणार याची खात्री आहे. तुमच्या दोघांच्याही घरचा पत्ता देता का जरा ;)

खादाड_बोका's picture

20 Jun 2011 - 10:19 pm | खादाड_बोका

त्याला हमूस नाही "हमस" म्हणतात.

बाकी चालु द्या :)