आईस क्रीम की.....????

छत्रपति's picture
छत्रपति in काथ्याकूट
14 Jun 2011 - 2:42 pm
गाभा: 

आईस्क्रीम खायला तसं सगळ्यांनाच आवडतं. आणि आता तर उन्हाळाच काय पण १२ महिने आईस्क्रीम खायची एक संस्कृती तयार झाली आहे. मधुमेही रुग्णांसाठी देखील शुगर फ्री पर्याय उपलब्घ झाले आहेत. बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कद...ाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत.

मध्ये एका मिटींगसाठी आमच्या एका सरांनी मला हॉटेलमध्ये बोलावलं होत. तेव्हा माझ्या आधी सरांची अजून एका माणसाबरोबर मिटींग चालू होती. मी त्यांच्या मिटींगचा प्रेक्षक झालो गेलो. तो माणूस आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे आउटलेट उघडायचे आहे. त्यासाठी फायनांस करा म्हणून तो त्या सरांना पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच.

त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काही कंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. ते आवडणाऱ्यात मीही एक होतोच.

तो म्हणाला ; “आता मी लेमन आईस्क्रीम मध्ये ४ नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे मला कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांना खूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदा उठवता येईल. ”

त्यावर सरांनी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; “समजा आपण आउटलेट उघडलं आणि तुझा हा लेमन फ्लेवर लोकांना आवडला नाही तर तू त्या लेमन फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत? लोकांना ते आवडेपर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वाया जाणार मग ते नुकसान कुणी सोसायच? ”. पुढे सरांचे अनेक प्रश्न होतेच. वीज खर्च, दुध , कच्चा माल इत्यादी.

त्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ; “त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही. अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही... ”

आम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ; “ते कस काय? दुध आहे ते खराब होणारच.”

तो तत्काळ म्हणाला ; “छे छे. दुधापासून आईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाच संपलेत. ”

“मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम ?”

“डालडा तुपापासून!”

“डालडा तूऽऽऽऽप?”

“आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्या तर सगळे डालडाच वापरतात आणि त्यामुळेच ते परवडतं. आता आईस्क्रीम मध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की डालडा तूप आहे. शिवाय ते दुधाच्या आईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं. आणि तेच लोकांना आवडतं. डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात. ”

तो भरात येऊन त्याच्या तंत्राच मार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो.

पुढे तो सांगत होता; “डालडा आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही. याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला ८-१० दिवसांनी वास येतो. आणि १५ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळे खर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम २ वर्ष फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत.

डालडा आईस्क्रीमसाठी लाईट खुपच कमी लागते. १० डिग्री तापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते लक्षात नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्या आईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो.

शिवाय दुधापेक्षा डालडा कच्चा माल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपे आहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीम मध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे. म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीम आउटलेट निघू शकतात. ”

“डालडा आईस्क्रीम उत्पादनाचा आणखी एक फायदा असा आहे की एकच प्रोडक्शन युनिट चालवून भारत भर कुठेही आपण याचे वितरण करू शकतो. तेही कमी खर्चात. दुधाच्या आईस्क्रीमला तो बेनिफिट नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन युनिट सुरु करावे लागेल.”

तो रंगात आला होता. त्याने त्याचे नवीन लेमन फ्लेवर टेस्ट करायला दिले. मला डालडा आईस्क्रिम खाल्ल्यामुळे नक्की काय तोटा होतो ते माहीत नाही. पण त्यानंतर आईस्क्रीम खायची मजा निघून गेली इतकं नक्की.

कमलेश कुळकर्णी या॓ज कडून साभार...!!!

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

14 Jun 2011 - 3:09 pm | मस्त कलंदर

फेसबुकावर या लेखाची फीड पाहून पुन्हा एकदा स्वतः 'खादाड' असूनही आम्हांला हे खाणं कसं चांगलं नाही आणि ते खाणं कसं चांगलं नाही असं सांगणार्‍या अमिताबैंचा लेख असेल असं वाटलं होतं. तरी हिय्या करून मिपा रिफ्रेश केलं, आणि लेखकाचं नांव पाहून 'किमान आईस्क्रीम खाऊ नका' असं म्हणणारा लेख नसेल असं वाटलं.
पण लेख वाचून अमिताचं सांगणं परवडलं असं वाटतंय. छे:, इथून पुढे आईस्क्रीम खाववणार नाही.. :-(

आता आणखी कोणत्या गोष्टीत कशाची भेसळ असेल असे प्रश्न पडायला लागलेयत..

पैसा's picture

14 Jun 2011 - 3:17 pm | पैसा

आईस्क्रीम म्हटलं की आता "आय स्क्रीम" असं म्हणायची वेळ आली!

मराठी_माणूस's picture

14 Jun 2011 - 3:27 pm | मराठी_माणूस

हे वाचुन धक्काच बसला ? कोलेस्ट्रोलचे काय ?

आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्या तर सगळे डालडाच वापरतात

ह्या एक दोन कंपन्या कोणत्या ?

माहीती बद्दल धन्यवाद

नन्दादीप's picture

14 Jun 2011 - 3:31 pm | नन्दादीप

अरे बापरे.....

परवाच अमुलच्या "५० रु.त अनलिमिटेड" ऑफर मधे चेपून आईस्क्रीम खाल्ल....

आता काय होणार ??? किती कॅलरीज, फॅट्स वाढल्या असतील?? देवा.....

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jun 2011 - 3:31 pm | परिकथेतील राजकुमार

कमलेश कुळकर्णी या॓ज कडून साभार...!!!

???
म्हणजे त्यांच्या परवानगीने की सरळ उचलले आहे ?

धमाल मुलगा's picture

14 Jun 2011 - 3:46 pm | धमाल मुलगा

साभार ह्या शब्दाचा अर्थ काय आहे?

आणि उचललेले असलेच तरी आपल्यासोबत आणखी चारजणांना कळावे अशा उद्देशानं दिलेलं दिसतंय. उगा ह्याची कविता, त्याची गोष्ट चोरून आणलेली नाही असं दिसतंय.

शिवाय, मुळ लेखकाला द्यायचे ते क्रेडिट दिले गेलेले दिसतंय.

मग उगाच तिरकं जाण्यात काय हशील?

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jun 2011 - 4:11 pm | परिकथेतील राजकुमार

आणि उचललेले असलेच तरी आपल्यासोबत आणखी चारजणांना कळावे अशा उद्देशानं दिलेलं दिसतंय. उगा ह्याची कविता, त्याची गोष्ट चोरून आणलेली नाही असं दिसतंय.

शिवाय, मुळ लेखकाला द्यायचे ते क्रेडिट दिले गेलेले दिसतंय.

मग उगाच तिरकं जाण्यात काय हशील?

मान्य.

मस्तारामच्या काही कथा तरुण वाचकांना वाचायला मिळाव्यात ह्या उद्देशाने श्री. मस्ताराम ह्यांच्या नावासहीत इथे दिल्यास चालतील काय ?

पराराम

धमाल मुलगा's picture

14 Jun 2011 - 4:26 pm | धमाल मुलगा

मस्तरामच्या कथा/पुस्तकं हे माझ्या माहितीप्रमाणे पोलिस कारवाई होण्याच्या भानगडीचं आहे.

ह्या धाग्यात तसं काय आढळते?

हे म्हणजे, एखाद्यानं फिरायला गेलं असताना एखाद्या भिजलेल्या माकडिणीचा फोटो काढून (स्वतः अथवा इतर कोणी) इथे चिकटवला म्हणून तुम्ही एखाद्या पॉर्नसाइटवरच्या विवस्त्र ओलेत्या स्त्रियांचे फोटो चढवण्याबद्दल विचारणा केल्यासारखे झाले.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jun 2011 - 4:36 pm | परिकथेतील राजकुमार

मस्तरामच्या कथा/पुस्तकं हे माझ्या माहितीप्रमाणे पोलिस कारवाई होण्याच्या भानगडीचं आहे.

ह्या धाग्यात तसं काय आढळते?

सगळ्याच कथा वा पुस्तके तशी आहेत कय? सदर लेखकाची अनके पुस्तके बस स्टँड, रेल्वे स्थानक, वृतपत्राचे स्टॉल्स, चौकीशेजारी विक्रीसाठी ठेवलेली सहज आढळतात.

हे म्हणजे, एखाद्यानं फिरायला गेलं असताना एखाद्या भिजलेल्या माकडिणीचा फोटो काढून (स्वतः अथवा इतर कोणी) इथे चिकटवला म्हणून तुम्ही एखाद्या पॉर्नसाइटवरच्या विवस्त्र ओलेत्या स्त्रियांचे फोटो चढवण्याबद्दल विचारणा केल्यासारखे झाले.

अंमळ गल्लत होते आहे काय?
'जे जे आपणास ठावे...' ह्या नात्याने सदर कथा इथे देण्यास काही हरकत आहे काय असा आमचा प्रश्न होता. आपण लगेच नको त्या (म्हणजे तुम्हाला हव्या त्या) विषयाकडे घसरलात.

असो..

डान्रावांना सांगुन तुमचे एक चित्र काढू.

धमाल मुलगा's picture

14 Jun 2011 - 4:46 pm | धमाल मुलगा

सगळ्याच कथा वा पुस्तके तशी आहेत कय? सदर लेखकाची अनके पुस्तके बस स्टँड, रेल्वे स्थानक, वृतपत्राचे स्टॉल्स, चौकीशेजारी विक्रीसाठी ठेवलेली सहज आढळतात.

त्या स्टॉलवाल्यांना विचारलं का कधी, किती हप्ता पोहोचतो राउंडच्या वेळी ते? (आता, हे असंच कशावरुन वगैरे मुर्ख आदर्शवादी स्टान्स घेऊ नका म्हणजे झालं. )

>>अंमळ गल्लत होते आहे काय?
मुळीच नाही.

>>'जे जे आपणास ठावे...' ह्या नात्याने सदर कथा इथे देण्यास काही हरकत आहे काय असा आमचा प्रश्न होता.
आणि त्यावरचे आमचे मत आम्ही दिले.

>>आपण लगेच नको त्या (म्हणजे तुम्हाला हव्या त्या) विषयाकडे घसरलात.
अंहं, आमच्या की तुमच्या? मस्तरामसंबंधी अधिकारवाणीने बोलणारे तुम्ही की आम्हे?

>>डान्रावांना सांगुन तुमचे एक चित्र काढू.
=))
बोंबला! आम्ही काय भारतमाता आहोत की सरस्वती?

श्रावण मोडक's picture

14 Jun 2011 - 5:16 pm | श्रावण मोडक

आम्ही काय भारतमाता आहोत की सरस्वती?

नाहीच. त्यासाठी जे लागतं ते तुमच्याकडं नाही.
आम्ही तुम्हाला राष्ट्रपुत्र म्हणू. बास्स? ;)

धमाल मुलगा's picture

14 Jun 2011 - 6:07 pm | धमाल मुलगा

परंतु गरज नाही. आमची वंशावळ शुध्द आहे.

बोंबला! आम्ही काय भारतमाता आहोत की सरस्वती?
खि:खि:खि:!!!!!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jun 2011 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा

अहो, ईतका खत्री प्रकार चाल्लाय,मागे एका हिंदी न्युज चेनलवर पनीर आणी चक्क्याचा पंचनामा पाहिला होता...ही बातमी कशीही करुन एखाद्या पत्रकाराला पास ऑन करायला हवी...

धमाल मुलगा's picture

14 Jun 2011 - 3:43 pm | धमाल मुलगा

>>ही बातमी कशीही करुन एखाद्या पत्रकाराला पास ऑन करायला हवी...
तुम्हाला असं वाटतं, की ही बातमी त्यांना ठाऊक नसेल?
साहेब, भोळे असतो ते फक्त आपण... :)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jun 2011 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा

अहो, ईतका खत्री प्रकार चाल्लाय,मागे एका हिंदी न्युज चेनलवर पनीर आणी चक्क्याचा पंचनामा पाहिला होता...ही बातमी कशीही करुन एखाद्या पत्रकाराला पास ऑन करायला हवी...

धमाल मुलगा's picture

14 Jun 2011 - 4:03 pm | धमाल मुलगा

आता एकदा जन्माला येताना मानवी डिएनए मध्येही भेसळ सुरु झाली, की मग चक्र पुर्ण होईल. :)

असो,
बाकी, दुधाऐवजी वनस्पतीतूपापासून आईसक्रिम बनवण्याची युक्ती मात्र नामी आहे.

आता, त्या कोणत्या एकदोन कंपन्या, ज्या अजूनही आईसक्रिम बनवण्यासाठी दुधाचा वापर करतात, त्यांची नावे/ब्रँड्स इथे द्या, म्हणजे लोकांना काय घ्यावं आणि काय टाळावं हेही कळेल.

------------
एकदम एक गोष्ट आठवली. जर आपण हे आईसक्रिम थोडा वेळ तसंच उघड्यावर ठेवलं तर ते वितळलेलं दिसतं. अगदी बर्‍यापैकी पातळ झालेलं असतं.
वर लेखात म्हणल्याप्रमाणं, फ्रीझिंगशिवायही हे आईसक्रिम नीट राहू शकतं, तर मग पुठ्ठ्याच्या खोक्यांमधून वितरीत केलेले आईसक्रिम नीट कसे राहते? वितळत कसे नाही?

त्यामुळं प्रश्न असा उभा राहिला, की हे सांगितलेलं नक्की खरं आहे का?

कानडाऊ योगेशु's picture

14 Jun 2011 - 3:54 pm | कानडाऊ योगेशु

आपण खातोय ते भेसळयुक्त (डालडा) आईसक्रिम आहे हे ओळखायचे कसे?
म्हणजे काही वेळ फ्रिजबाहेर ठेवले तर हे आईसक्रिम इतर (दुधापासुन बनवलेले) आईसक्रिमप्रमाणे विरघळते का?

शैलेन्द्र's picture

14 Jun 2011 - 4:24 pm | शैलेन्द्र

एक सोपी टेस्ट सांगतो.. वाटीभर आईसक्रीम बाहेर ठेवा, नीट वितळल की जरा गरम करा.. आणी त्यात लींबु पिळा.. दुधाचे असेल तर आईसक्रीम फाटेल..

अमुलचे, नॅचरल्चे फाटते.. ईतर मी खात नाही..

कानडाऊ योगेशु's picture

14 Jun 2011 - 6:12 pm | कानडाऊ योगेशु

एकदम लॉजिकल.
आणि समजा आईसक्रिम नाहीच फाटले तर आईसक्रिम घेणार्याची फाटेल..! ;)

सोत्रि's picture

14 Jun 2011 - 8:42 pm | सोत्रि

>>आईसक्रिम घेणार्याची फाटेल..!

पोट फुटेपर्यंत हसलो :)

आणि समजा आईसक्रिम नाहीच फाटले तर आईसक्रिम घेणार्याची फाटेल..!

फुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र हहह्ह्हाआआआहा मेलो हसुन. =))

वाटीभर आईस क्रीम वाया घालवण्या पेक्षा, एखादी वात आईस क्रीम मधे भिजवून पेटवून बघा...!!!
तेवत राहिली तर तुपा ऐवजी खुशाल आईस क्रीम वापरा...!!!
तुमचे देव पण खुश होतील...!!!

:-)

सांगलीचा भडंग's picture

15 Jun 2011 - 8:39 am | सांगलीचा भडंग

हि टेस्ट मस्त आहे ...पुढ्च्या वेळि आइस क्रिम आनले कि नक्कि करुन बघेन

स्वानन्द's picture

14 Jun 2011 - 3:55 pm | स्वानन्द

चायला!! :O

डालडा तरी अस्सल वापरतात का ते सुद्धा ......

हॅ हॅ हॅ

सूर्यपुत्र's picture

14 Jun 2011 - 3:59 pm | सूर्यपुत्र

की डालड्यात कशा-कशाची भेसळ असेल??

-सूर्यपुत्र.

५० फक्त's picture

14 Jun 2011 - 4:18 pm | ५० फक्त

+१ टु धमु, खरंच मी तरी आजपर्यंत आईस्क्रिम कधीच न विरघळता तसंच राहिलेलं बहितलं नाही. पण डालडा मात्र थोडासा पातळ झालेला पाहिला आहे, तो सुद्धा धारा कंपनीचा. पण आपण अशाही एवढ्या गोष्टी भेसळ युक्त खातो त्यात अजुन आईस्क्रिमनं काय फरक पडणार आहे, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी भेसळ कधीच कुणाच्या लक्षात आली नसेल हे थोडंसं अवघड वाटतंय.

Nile's picture

14 Jun 2011 - 4:26 pm | Nile

डालडा तूपाबद्दल केलेले दावे ओव्हरफेच्ड वाटत आहेत. तूपाबद्दल फारशी माहिती नसल्याने कोणा जाणकाराने माहिती दिल्यास आवडेल, नाहितर शोधाशोध करता येईल.

बाकी जरी डालडा तूपा पासून आईसक्रीम बनवलं तरी ते थंड ठेवायला पैसे जाणारच आहेत. थंड नसलेलं आईसक्रीम फार खपत असेल असं वाटतं नाही. तुपकटपणा घालवायला अन आईसक्रीमसारखी चव/फील यायला नक्की कीती प्रोसेसिंग खर्च येतो हे ही जाणून घ्यायला आवडेल.

शरद's picture

14 Jun 2011 - 4:36 pm | शरद

सर्व जगभर दूध नसलेले आईसक्रीम तयार केले जाते. दुधाच्या आईसक्रीममध्ये व यामध्ये फरक एवढाच की दुधातील प्रोटिन्स व कार्बोहायड्रेट्स यात नसतात. पण या दोन गोष्टींकरता कोणी आईसक्रीम खात नाही. तेव्हा फार आरडाओरड करण्याचे कारण नाही. तक्रार करावयाची असेल तर ती "डालडा" बद्दल करा. डालडा म्हणजे हायड्रोजनेटेड फ़ॅट्स. तो नक्कीच आरोग्याला हानीकारक आहे. पण त्याला भारतात बंदी नाही. अमेरिकेत आहे (असे वाटते) व म्हणून मॅकडोनाल्डला एकदा उकळलेले तेल परत वापरता येत नाही. तेल उकळल्याने त्यातील नॉन-सॅच्युरटेड फ़ॅट्सचे रुपांतर सॅच्युरेटेड फ़ॅट्समध्ये होते. जर तुम्हाला डालडामध्ये केलेले फ़रसाण व जिलबी चालत असेल तर नवीन आईसक्रीम
बिनधास्त खा.
शरद

स्वानन्द's picture

14 Jun 2011 - 4:55 pm | स्वानन्द

ग्लासभर दूध आणि ग्लासभर तूप ( तेही डालडा ) यामध्ये प्रमाण सारखे असले तरी कंटेंट चा फरक प्रचंड नाही का??

थोडा शोध घेतल्यावर हे सापडले. मेलोरिन (?) म्हणजे वनस्पती तुपापासुन बनवलेले आईस्क्रीम.

इथे एक प्रॉडक्ट बघा.

अर्थात भारतात मिळते ते आईस्क्रीम मेलोरिन असते की दुधापासुन बनवलेले असते ही कल्पना नाही.

- सूर्य.

माझीही शॅम्पेन's picture

14 Jun 2011 - 4:41 pm | माझीही शॅम्पेन

चला ह्या वर्षी पाणीपुरी नंतर आईस-क्रीम सुध्धा वर्ज करावे लागणार !

मागे ठाण्याच्या मामालेदार मिसळपाव मध्ये जनावरांची चरबी टाकत असलेल्याची अफवा(?) होती (चु.भु.द्य.घ्या)

भेसळीचा धंदा जोरात असल्याने भेसळ-पाव.कॉम सकेन्त स्थळ सुरू करावे म्हणतो !

अगदी!
यावर्षीपासून पाणीपुरी आणि आईस्क्रीम वर्ज्य.
अमेरिकेत तरी दूध वापरतात असा अंदाज आहे.
मागल्यावर्षी बेन अँड जेरी आईस्क्रीमची फ्याक्टरी बघायला गेलो होतो तेंव्हा तरी दूध दिसले बुवा!
हे फक्त दाखवण्याचे दात होते कि काय असा प्रश्न पडलाय.
आता काय काय म्हणून घरी बनवायचे?
मिपावर चर्चा झाल्यापासून मी दही घरीच विरजायला सुरुवात केलिये.
ब्रेडमेकर आणून त्यात ब्रेड तयार करून झालाय्.......बरेचदा!
ज्याम घरीच करते. आता अजून कोणते काम वाढवून ठेवायचे?
पापड कुर्डयांसारखी वाळवणेही करायची का?
दुकानातून आणताना मनात सारखे प्रश्न असतात की ह्या पापड्या कुठे वाळवल्या असतील? घटक पदार्थ कोणत्या प्रतिचे असतील वगैरे.
चांगल्या प्रतिचे, स्वच्छ खाद्यपदार्थ बनवून विकताना काय त्रास होतो ते काही कळत नाही. तसेही महाग असतातच.......आपल्याकडून पैसे घेतल्याशिवाय सोडतात का?

मिसळपाव's picture

14 Jun 2011 - 9:44 pm | मिसळपाव

...........मिपावर चर्चा झाल्यापासून मी दही घरीच विरजायला सुरुवात केलिये.......
दुवा देशील का? (आत्तापर्यंत अज्ञानात आनंद होता! )

बघते मिळतोय का.
बराच जुना आहे धागा.
दह्याबद्दल अतोनात वाईत नाहीये काही तरी एकंदरीत बाजारचे चांगल्यात चांगल्या ब्रँडचे दही तारा असलेले येऊ लागले तसे खावेसे वाटत नव्हते.

बहुगुणी's picture

15 Jun 2011 - 2:59 am | बहुगुणी

या चर्चेत दह्याचा उल्लेख आला होता...

मिसळपाव's picture

15 Jun 2011 - 3:43 am | मिसळपाव

...'पेक्टिन' घालतात. पेक्टिन फळात असतं आणि जॅम्/जेली ला घट्टपणा त्यामुळे येतो. घट्टपणा नाहि खरं - 'थलथलीत' पणा (रविवार सकाळ मधे ईडलीच्या रेसेपीत जसं थलथलीSSSSत भिजवायला सांगितलंय ना, तस्स्सं !!) तर दह्याच्या डब्यावर Ingredients बघ आणि फक्त 'Grade A Pasteurized Milk' असलेलंच दहि घे. आपली पट्टी जमवणारा पानवाला जसा थोडा हुडकावा लागतो ना, तसा थोडा शोध घ्यायला लागेल. उदा. हॅरिस-टीटरच स्टोअर ब्रँड. पण एकदा का समगोत्री दुकान/ब्रँड सापडला की 'जान जाय पण ब्रँड वही लाय' :-)

सध्या Chobani वगैरे ग्रीक योगर्टसनी धुमाकूळ घातलाय. Ingredientsची यादी चार चार ओळीभर असते. एकदा(च) खाल्लं. छ्या - पेक्टिनमधे थोडं दुध घालून विरजतात बहुतेक !

घरीच विरजलेलं दही आता आवडायला लागलय. बाजारातून एकदा जसा डबा आणला जातो तसेच अठवड्यातून एकदा, दोनदा विरजावे लागते. चिकट तारा अजिबात नाही येत. पूर्वी मुलाला दही खाल्ले की खोकला सुरु व्हायचा. आता वाटीवाटी दही खाल्ले तरी काही त्रास नाही. मी दूध व दही स्टोनीफिल्ड फार्मचे, ऑर्ग्यानिक आणते.

१) दूध कोमट करुन घेणे.
२) १ चमचा लोण्याचे विरजण लावणे.

करून पहा. इतक॑ नैसर्गिक गोड दही जन्मात कधी खाल्ल॑ नसेल तुम्ही.

खात्रीशीर वायुपुत्र

लोण्याच्या विरजणाची कल्पना नवीन आहे.

साधारण किती महिन्यांत होते हे दही तयार ?

आपल्याला जमिनीवर रहायची इच्छाच होत नाही की, आपला तो manufacturing defect आहे???

च्या मारी..., धू म्हणल॑ की धूवून बघा की एकदा तरी...

का अग्निशामक दलाची गाडी बोलवायची आता त्या साठी???

गवि's picture

16 Jun 2011 - 10:48 am | गवि

चिडलेत की काय भलतेच एवढ्यावरुन ? रेडिएटरमधे पाणी टाका हो..

गंमत केली हो जरा. साध्याशा कोपरखळीवरुन लगेच आमच्यातल्या मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टवर, धुण्याबिण्यापर्यंत आणि कमी पडेल म्हणून च्या मारी बिरी पर्यंत पोचलात.. की हा एक तुमचाही "मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट"च.. ? तुमची चूक नाही म्हणा.. असो.

आयडिया चांगली आहे तुमची. कदाचित करुन पाहीन कधीतरी.

हलके घ्या..शांत व्हा..

आम्हाला चिडायला जमतच नाही हो. आमच्या कूल॑ट ची टाकी कायमची भरलेली असते.
राहिली गोष्ट कोपरखळीची, वायुपुत्रा ला कोपरखळी मारल्यावर तुम्ही काय त्याच्या कडून पान सुपारिची अपेक्षा ठेवणार का?

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jun 2011 - 1:12 pm | बिपिन कार्यकर्ते

का हो, गवि? हे वायुपुत्रसाहेब पण पंढरपूरचेच आहेत काय? नाही म्हणजे, त्या तुमच्या वाक्यावरून मला 'त्याची काहीही चूक' नसलेला एक मित्र आठवला. त्याचाही असाच काही प्रॉब्लेम आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Jun 2011 - 5:00 pm | विश्वनाथ मेहेंदळे

शांत गदाधारी भीम, शांत !!!

भेसळीचा धंदा जोरात असल्याने भेसळ-पाव.कॉम सकेन्त स्थळ सुरू करावे म्हणतो ! >>>

=)) =))

आईसक्रीम, चॉकलेट आणि बिस्किटांपासुन खुप दुर असलेला

आनंद's picture

14 Jun 2011 - 4:57 pm | आनंद

३ महीन्या पुर्वी मी वाडीलालवाल्यांचा प्लांट मध्ये २/३ दिवस होतो तेव्हां तरी दुधच वापरताना दिसत होत ती लोक.

अमोल केळकर's picture

14 Jun 2011 - 5:47 pm | अमोल केळकर

चला म्हणजे वाडीलाल सेफ आहे म्हणायला हरकत नाही :)

अमोल केळकर

पण डालड्यावर काहीही प्रक्रिया केली तरी दुधाच्या आईसक्रीमला लहानपणापासून चाखत आलेल्या आपल्या जिभांना वेगळी चव कळणार नाही का ? एवढे बेमालूम साम्य असेलसे वाटत नाही.

की लहानपणापासून डालड्याचेच खात आलो?

एवढ्यात तरी भारतात आईस्क्रीम खाण्याचा योग आला नाही (तेच बरे झाले!) पण मागे एकदा खाल्लेल्या आईस्क्रीमबद्दल हा प्रश्न मनात येऊन गेल्याचे आठवते आहे. ते आईस्क्रीम खाल्ल्यावर तोंडात ओशटपणा राहिला होता. नंतर मी आईस्क्रीम बनवायच्या क्लासला गेले होते त्यात त्यांनी चोकोबार तयार करताना चॉकलेट वितळवून त्यात डालडा घालायला सांगितल्याचे आठवते आहे. अर्थात पूर्ण डालड्याचे नव्हते ते!

वपाडाव's picture

14 Jun 2011 - 6:57 pm | वपाडाव

टरकल्या गेली आहे.. अन नॅचरल्सचे नाव एका सदस्याने घेतले असल्याने अजुनच बी.पी. वाढले आहे....
इथुन फुडे आइसक्रीम खाउ नये या विचारा पर्यंत येउन पोहोचलो आहे....
कृतीत घडु नये असे वाट्टे....
बाकी.. ही माहीती खोटी निघावी हीच इ. प्रा.

>>>>>>>> अन नॅचरल्सचे नाव एका सदस्याने घेतले असल्याने अजुनच बी.पी. वाढले आहे....

........................ मजकूर नीट वाचा.....

एक सोपी टेस्ट सांगतो.. वाटीभर आईसक्रीम बाहेर ठेवा, नीट वितळल की जरा गरम करा.. आणी त्यात लींबु पिळा.. दुधाचे असेल तर आईसक्रीम फाटेल..

अमुलचे, नॅचरल्चे फाटते.. ..

.....म्हणजेच नॅचरल्सचे आईसक्रीम दुधाचे आहे. :)

बी. पी. वाढवायचे कारण नाही........ :wink:

भारी समर्थ's picture

14 Jun 2011 - 7:09 pm | भारी समर्थ

फारा वर्षांनी डालड्यास कोणी तुप संबोधिले आणि बेकरीत भाजलेल्या नानकटची आठवण झाली. तसं वनस्पती तुपाने फारसं काही बिघडलं नाही आमचं. पण उगीचच वाचलं असं वाटतंय.

सुकोबारायांनी म्हणून ठेवलेच आहे-

कसा काय देवा| झाला चमत्कार|
डालड्याचे ऐस्क्रीम| कोण वितळे||

पाहून विडीओ| दाटे मळमळ|
प्रत्येक पुरीतले पाणी| भासे पिवळे||

बोला जय हारी विट्ठल|

भारी समर्थ

धमाल मुलगा's picture

14 Jun 2011 - 7:53 pm | धमाल मुलगा

समर्थांचा अश्वमेध बर्‍याच दिवसांनी चौखूर उधळलेला दिसतोय. ;)

इष्टुर फाकडा's picture

18 Jun 2011 - 2:16 pm | इष्टुर फाकडा

कसा काय देवा| झाला चमत्कार|
डालड्याचे ऐस्क्रीम| कोण वितळे||

पाहून विडीओ| दाटे मळमळ|
प्रत्येक पुरीतले पाणी| भासे पिवळे||

नम्बर १

तिमा's picture

14 Jun 2011 - 7:35 pm | तिमा

दुधाशिवाय सेल्युलोज(सीएमसी), वनस्पती तेल, कुठल्याही स्त्रोतापासून मिळवलेली चरबी, इत्यादि कच्च्या मालापासून
'आइसक्रीम' तयार करता येते व ते खाल्लेही जाते. ज्यांना शुध्द दुधापासून केलेले आइसक्रीमच खायचे असेल त्यांनी ते घरीच बनवावे. शुध्द आइसक्रीम बाजारात कुठेही मिळणार नाही, अगदी 'नॅचरल्स' असे लिहिले असले तरी.

सुधीर१३७'s picture

14 Jun 2011 - 8:08 pm | सुधीर१३७

बाकी सर्व पिणार्‍यांना फक्त डालडाची अलर्जी का ?.......................... :wink:

पिवळा डांबिस's picture

15 Jun 2011 - 9:43 am | पिवळा डांबिस

डालडा 'चढत' नाही!!
:)

अविनाशकुलकर्णी's picture

14 Jun 2011 - 9:24 pm | अविनाशकुलकर्णी

मस्तारामच्या काही कथा तरुण वाचकांना वाचायला मिळाव्यात ह्या उद्देशाने श्री. मस्ताराम ह्यांच्या नावासहीत इथे दिल्यास चालतील काय ?
---------------------------------------------------
मस्त राम जुना झाला...अर्थात पराला सांगणे न लगे...
सा~या साईट्स कोळुन प्यायल्या असतिल ह्या विभुतिने.......
==========================================
पाहून विडीओ| दाटे मळमळ|
प्रत्येक पुरीतले पाणी| भासे पिवळे|
साष्टांग दंडवत.....हसुन ठार मेलो

आइस्क्रीम घरी बनवणे फारसे अवघड नाहिये. पण वे़ळखाऊ काम आहे कारण दूधाला उकळी आणणे, ते गार करणे मग आईस्क्रिम ला लागणारे घटक पदार्थ दूधात मिक्स केल्यावर ते फ्रिजर मधे गोठवायला ठेवणे ह्यात बराच वेळ जातो. पण चविष्ठ आइस्क्रीम तयार होते. हल्ली आइस्क्रिम मेकर पण मिळतात बाजारात . त्याने ही प्रक्रिया अजून सोपी होत असावी. बाहेरचे खाण्यापेक्षा घरी आइस्क्रीम बनवलेले केव्हाही चांगले. पण आता खावेसे वाटले म्हणुन केले आणि लगेच खाल्ले असे घरी करता येणार नाही.

अभिज्ञ's picture

15 Jun 2011 - 5:05 am | अभिज्ञ

ऑइल स्प्रेड हा प्रकार काय असतो? हा दिसायला व चवीला देखील आपल्या साध्या बटर सारखाच असतो.
ह्यात देखील डालडाच वापरतात का?

अभिज्ञ.

हुप्प्या's picture

15 Jun 2011 - 5:16 am | हुप्प्या

तूप स्वस्तात बनवणारे लोक चक्क प्राण्याची चरबी वापरतात असे आढळले आहे. मेलेले उंदीर, कुत्रे, मांजरे, पक्षी, घुशी जे काही प्राणी मिळतील त्यांची चरबी वापरुन त्यांचा वापर मिठाया, अन्य तळलेले पदार्थ यात केला जातो. अर्थातच अनधिकृत रित्या. मागे पाकिस्तानमधे कुण्या पत्रकाराने ह्या इंडस्ट्रीचा पर्दाफाश केला होता. पाकिस्तानी लोक बहुतांशी मांसाहारी असले तरी त्यांनाही असे वाट्टेल ते खाणे आवडत नाही. अमके हलाल, तमके हराम असे त्यांचेही मांसाहाराचे निकष असतात. त्यामुळे ह्या रिपोर्टनंतर तिथे खळबळ माजली होती. पाकिस्तानात होते तर भारतात होणे सहज शक्य आहे.
इथे पहा.
http://www.youtube.com/watch?v=i8iRxwyPst0

तेव्हा आईस्क्रीममधे दूध न वापरता वेगळे काही वापरले तर ते रुचेलच असे नाही. विशेषतः डालड्याचे प्रतिस्पर्धी असे उकिरड्यावरील प्राण्यांपासून बनत असतील तर.

पिवळा डांबिस's picture

15 Jun 2011 - 9:20 am | पिवळा डांबिस

पाकिस्तानी लोक बहुतांशी मांसाहारी असले तरी त्यांनाही असे वाट्टेल ते खाणे आवडत नाही. अमके हलाल, तमके हराम असे त्यांचेही मांसाहाराचे निकष असतात.
काहीतरीच काय सांगता? असं काही बोलू नका राव!!!
काय इथून तडीपार व्हायचंय का?

पाकिस्तानात होते तर भारतात होणे सहज शक्य आहे.
आता तर नक्कीच तडीपार होणार!!!
चला, चपला शोधायला लागा!!!
:)

गोगोल's picture

15 Jun 2011 - 9:28 am | गोगोल

>>> पाकिस्तानी लोक बहुतांशी मांसाहारी असले तरी त्यांनाही असे वाट्टेल ते खाणे आवडत नाही. अमके हलाल, तमके हराम >>> असे त्यांचेही मांसाहाराचे निकष असतात.

१००% खरे आहे.
कधी पाकीस्तानी लोकांबरोबर बाहेर खायला गेलात तर ते नेहमीच व्हेजिटेरियन खातात हे कळून येईल.
त्यांना माहीत असलेल्या पाकीस्तानी रेस्तेरां मध्येच (की जिथे हलाल मिळते) ते मांसाहार करतात.
ईतकेच काय तर वॉलमार्ट सारख्या ठिकाणावरून मीट पण विकत घेत नाहीत.

पिवळा डांबिस's picture

15 Jun 2011 - 9:34 am | पिवळा डांबिस

मी शिंचा सहमत हो!!!
मी इथे फक्त हुप्प्याला चपला घालायला मदत करतोय!!!!
:)
आता जाकार्ताला जाऊन राहू देत आणि डॉनमध्ये प्रतिकिया देऊ देत!!!!!!!!
:)

शैलेन्द्र's picture

15 Jun 2011 - 9:33 am | शैलेन्द्र

यावरुन एक आठवल.. मिठायांपेक्षाही, बेकरी आयटेममधे अ‍ॅनीमल फॅट(दुधाचे सोडुन) सर्रास वापरले जाते. खास्करुन "बडेका" फॅट.. कारण बीफ सगळे एक्स्पोर्ट होते, स्थानीक बाजरपेठ जवळ जवळ नाहीच, आणी एक्स्पोर्टला जास्त फॅट चालत नाही. त्यामुळेच खारी, बटर, मावा केक असे पदार्थ बनवताना सर्रास चरबी टाकतात. जर तुम्ही निरीक्षण केलेत तर अशा बेकर्‍या या कत्तल्खान्याच्या जवळ असतात.. कुर्ला/ देवनार- कल्याण भिवंडी ही काही उदाहरण..

पिवळा डांबिस's picture

15 Jun 2011 - 9:35 am | पिवळा डांबिस

त्यामुळेच खारी, बटर, मावा केक असे पदार्थ बनवताना सर्रास चरबी टाकतात.
पण लागतात मस्त!!!!!!
:)

शैलेन्द्र's picture

15 Jun 2011 - 10:06 am | शैलेन्द्र

मग काय.. तसही डालडापेक्षा जनावराची चरबी खाण कधिही चांगल..

नितिन थत्ते's picture

17 Jun 2011 - 6:54 pm | नितिन थत्ते

सहमत आहे.

म्हणून खारी बिस्किटं नेहमी डोक्यावर ट्रंक घेऊन येणार्‍या बेकरीवाल्याकडून घ्यावी.

सूर्यपुत्र's picture

17 Jun 2011 - 10:22 pm | सूर्यपुत्र

>>म्हणून खारी बिस्किटं नेहमी डोक्यावर ट्रंक घेऊन येणार्‍या बेकरीवाल्याकडून घ्यावी.
अनुस्वार वाचलाच नाही..... गडबडलो की... :)

-सूर्यपुत्र.

पिवळा डांबिस's picture

15 Jun 2011 - 9:42 am | पिवळा डांबिस

बाकी लोकं ज्या जेलीज खातात (आणि तिचे भाऊबंद!!) त्या गुरांच्या हाडं आणि खुरांपासून कॉलेजेन काढून बनवलेल्या असतात जगभर!!!!!
लोकं पांढरीशुभ्र साखर खातात ती पांढरीशुभ्र बनवण्यासाठी गुरांच्या हाडांपासून बनवलेला कोळसाच वापरतात जगभर!!!!
;)

पैसा's picture

15 Jun 2011 - 9:45 am | पैसा

आज या झाडावर बसायला भरपूर वेळ दिसतोय तुम्हाला! आज काय सगळ्यांच खाद्यपदार्थांचें पोस्ट्मॉर्टेम का? आणखी येऊ द्या! म्हणजे रेवतीचं काम वाढत जाईल!

गोगोल's picture

15 Jun 2011 - 9:51 am | गोगोल

दिवसांनी रेवती ताई शेती करायला लागतील .. मग गाय बकरी पण पाळतील.
सर्व काही घरच्या घरीच.

पिवळा डांबिस's picture

15 Jun 2011 - 10:01 am | पिवळा डांबिस

इथे जे बीन बरीटो मिळतं त्यात डुकराचा (बेकनचा) स्टॉक घातलेला असतो....
फ्रेन्च फ्राईज गुरांच्या चरबीत तळलेल्या असतात...
अगदी जिथे तेल वापरून फ्राईज तळल्यात अशा ठिकाणीदेखील फ्राईज आणि रक्ताच्छदित मांस एकाच तेलात तळतात....
कंट्री रेस्तॉरंटमधल्या भाज्या ह्या गाय/ डुकराचा स्टॉक घालून चविष्ट केलेल्या असतात!!!!!
:)
(बाकी आम्ही आईस्क्रिम घरीच बनवतो!! कारण आम्हाला आंबा आईस्क्रीम खूप आवडतं!!!!!)

रेवतीचं काम वाढत जाईल!

अच्छा! पाशवी शक्तीच माझ्या विरुद्ध!
आता बघा देते का प्रतिसाद कुठे!
खरडीतून रिक्वेष्टा पाठवाल.......
काही म्हणून टंकायची सोय राहिली नाही आजकाल!;)

पैसा's picture

15 Jun 2011 - 6:57 pm | पैसा

आपलं ट्रेड शिक्रेट सगळ्याना काय सांगतेस! मी व्यनि करीन ना तुला!

(आणि अजून भारत वर्ल्डकप जिंकल्याबद्दल मी तुला २५ प्रतिसाद देणारे ना पण एका धाग्यावर! ;) )

त्याना गोल गोळी सारखा आकार प्राप्त होण्यासाठी कातडी पिशवीत ते घोळावे लागते.

शैलेन्द्र's picture

15 Jun 2011 - 10:02 am | शैलेन्द्र

काय्पण..

पिवळा डांबिस's picture

15 Jun 2011 - 10:06 am | पिवळा डांबिस

तरीही साबुदाणे हे उपासाला न धुता फक्त पाण्याचा शिडकावा मारून वापरले जातात ना?
बाकी आमचा ह्या साबुदाण्याच्या खिचडीवर अंमळ भारीच जीव हो!!!!!
:)

पिवळा डांबिस's picture

15 Jun 2011 - 10:15 am | पिवळा डांबिस

केवळ नीलकांताने आमच्यावर अवांतर केल्याचा आरोप ठेवू नये म्हणुन....
;)
त्या आईस्क्रीमच्या कंपन्या जर दुधाच्या धंद्यात असतील उदा. आरे, अमूल वगैरे....
त्या अतिरिक्त दुघापासूनच आईस्क्रीम बनवतात असं समजायला प्रत्यवाय नसावा...
कारण या कंपन्या स्वतःचे प्रॉडक्ट सोडून उगाच वनस्पती तूप विकत घेउन त्याचं आईस्क्रीम बनवायचा उपद्व्याप करतील असं वाटत नाही...
द कॉस्ट ऑफ द गुडस मॅन्युफॅक्चर्ड वुड नॉट सपोर्ट दॅट!!!!
एन्जॉय!!!

|| डांबिस म्हणे आता, उरलो उपकारापुरता ||
:)

प्राजु's picture

15 Jun 2011 - 8:53 pm | प्राजु

+१
एकदम पटलं काकानु!!

आईस्क्रिम सगळीकडे उपलब्द होणे कठिण आहे म्हणुन डालडा कंपण्यानी डालडा आईस्क्रिम बाजारात आणले असावे.

नितिन थत्ते's picture

15 Jun 2011 - 10:36 am | नितिन थत्ते

लेखातली बरीचशी माहिती चुकीची आहे . ब्रॅण्डेड आइसक्रीम खायला काहीच हरकत नाही असे वाटते.

कमलेश कुलकर्णी यांनी या माहितीची ऑथेंटिसिटी तपासली आहे का?

पिवळा डांबिस's picture

15 Jun 2011 - 10:40 am | पिवळा डांबिस

लेखातली बरीचशी माहिती चुकीची आहे .
इतका सात्विक उद्रेक?
थत्तेकाकांना आईस्क्रीम भलतंच प्रिय दिसतंय!!!!!
:)

नितिन थत्ते's picture

15 Jun 2011 - 11:50 am | नितिन थत्ते

आइसक्रीम आवडतेच पण सात्विक संताप नाही. :)

सदरचा लेख आम जनतेच्या लिहिला असावा म्हणून माझ्या कडे असलेली माहिती शेअर करीत आहे.

आइसक्रीम सदृश विकले जाणारे दोन प्रकार असतात.
१ स्टॅण्डर्ड आइसक्रीम २. फ्रोझन डेझर्ट

स्टॅण्डर्ड आइसक्रीम मध्ये मिल्क फॅट असणे आवश्यक. मात्र ती फ्रेश क्रीमच्याच स्वरूपात असेल असे नाही. बटर सुद्धा असते. (तूप नक्की नसते कारण ते मिक्स होऊन स्टेबल राहू शकत नाही).

फ्रोझन डेझर्ट मध्ये मिल्क फॅट ऐवजी व्हेजिटेबल फॅट (म्हणजे डालडा असे नव्हे) असते ते सुद्धा काही प्रमाणात असते. म्हणजे मिल्क फॅट आणि वेजिटेबल फॅटचे मिश्रण. ही किंमतीला कमी असतात. बहुतेक आइसक्रीम उत्पादकांकडे दुधाचा पक्का सोर्स नसतो. दुसरे म्हणजे आइसक्रीमची मागणी जेव्हा उन्हाळ्यात सर्वाधिक असते तेव्हा दुधाचे उत्पादन सर्वात कमी असते. त्यामुळे मिल्क पावडर आणि व्हेजिटेबल आणि मिल्क फॅटचे मिश्रण वापरून फ्रोझन डेझर्ट हा प्रकार बनवला जातो.

जेव्हा व्हेजिटेबल फॅट वापरलेले असते तेव्हा पी एफ ए (भेसळ प्रतिबंधक कायदा) नुसार ते फ्रोझन डेझर्ट म्हणूनच विकावे लागते आणि कन्टेन्स व्हेजिटेबल फॅट असे डिक्लरेशन छापावे लागते. हा प्रकार आइसक्रीम म्हणून विकता येत नाही. (अर्थात या दोन्ही गोष्टी सिगरेटच्य पाकीटावरील सूचनेसारख्याच बारीक अक्षरात कोपर्‍यात लिहिलेले असणार)

माझ्या माहितीप्रमाणे जे ब्रॅण्ड पूर्वी फ्रोझन डेझर्ट बनवून विकत असत तेही हळू हळू मिल्क बेस्ड आइसक्रीम कडे वळत आहेत. म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे दुधाकडून डालडाकडे नव्हे तर डालडाकडून दुधाकडे. नावे जाहीर करता येणार नाहीत. क्षमस्व.

सदर लेखातील व्यक्ती जसा दावा करीत आहे की थंड ठेवले नाही तरी टिकून राहते वगैरे.... ही चुकीची आहे. फ्रोझन डेझर्टदेखील थंड (उणे १६ अंश सेल्शिअस चू भू दे घे) ठेवावे लागते कारण त्यातही मिल्क सॉलिड्स आनि मिल्क फॅटस असतातच.

या तापमानाला ठेवलेले आइसक्रीम किंवा फ्रोझन डेझर्ट किमान सहा महिने टिकून राहते.

म्हणून माझ्या मते ब्रॅण्डेड आइसक्रीम (फ्रोझन डेझर्टसुद्धा) खायला हरकत नाही. बाकी बाजारात अनेक लोकल ब्रॅण्ड्स असतात. त्याबाबत माहिती/खात्री नाही.

अधिकची माहिती म्हणजे केटरिंग पॅक हे आइसक्रीम ऐवजी फ्रोझन डेझर्ट असण्याची खूप शक्यता असते.

अवांतर: सर्व आइसक्रीम मध्ये सुमारे ४५ % हवा असते. आणि ती हवा एस्केप होऊ नये म्हणून काही गम्स. त्याला भेसळ म्हणावे का?
अतिअवांतर: हल्ली बाजारात बटर सब्स्टिट्यूट म्हणून काही ब्रेडस्प्रेड मिळतात आणि ते बटरपेक्षा हेल्दी असल्याचे क्लेमही असतात. ते देखील असेच मिल्क फॅट आणि व्हेजिटेबल फॅटचे मिश्रण असते. त्याला टेक्निकल भाषेत मार्जरीन/मार्गारिन म्हणतात.

अभिज्ञ's picture

15 Jun 2011 - 12:14 pm | अभिज्ञ

थत्ते काकांचा प्रतिसाद आवडला.

अभिज्ञ.

धमाल मुलगा's picture

15 Jun 2011 - 1:33 pm | धमाल मुलगा

माहितीपुर्ण प्रतिसाद.

धन्यवाद.

अरे क्या हो दादा तुमने तो सबके फसफसनारे बुडबुडे पे पानीच डाल दिया ये अच्चा प्रतिसाद देके

मृत्युन्जय's picture

15 Jun 2011 - 4:01 pm | मृत्युन्जय

काय वेळ आली आहे. थत्ते चाचांचा प्रतिसाद आवडला असे म्हणावे लागते आहे :)

जोक्स अपार्ट. माहितीपुर्ण प्रतिसाद. चाचांची वेगवेगळ्या कायद्यांच्या तरतुदींवरचा अभ्यासही जबरदस्त आहे असे म्हणावे लागेल.

मालोजीराव's picture

15 Jun 2011 - 6:01 pm | मालोजीराव

खूप बोगस लागतं ते मार्गारिन....हे म्हणजे दारूला सब्स्टिट्यूट म्हणून कोरेक्स पिण्यासारखं आहे...आणि चिकन ला सब्स्टिट्यूट म्हणून सोयाबीन खाण्यासारखं आहे... ;)
आपण बाबा अमूल बटर वर खुश आहोत....

पिवळा डांबिस's picture

17 Jun 2011 - 9:46 am | पिवळा डांबिस

सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद!
मुलांनो, यावरून थत्तेकाका हा एक निव्वळ चांचा नसून आपल्या सर्वांचा चाचा आहे हेच सिद्ध होते!!!
आपला,
पिडां स्कॉचवाले

विसुनाना's picture

17 Jun 2011 - 5:32 pm | विसुनाना

प्रतिसादातील माहिती योग्य आहे.

अवांतर :
'क्वालिटी वॉल्स' पहा म्हणजे पटेल.
आणि आईस्क्रीम ते आईस्क्रीम ! दुधाचं असलं काय? पाण्याचं असलं काय? किंवा डालड्याचं असलं काय? गारेगार गोड असलं म्हणजे झालं. :)

अनुराग's picture

18 Jun 2011 - 1:08 pm | अनुराग

योग्य प्रतिसाद, आवडले.

अन्या दातार's picture

15 Jun 2011 - 10:50 am | अन्या दातार

थत्ते चाचा,

>>कमलेश कुलकर्णी यांनी या माहितीची ऑथेंटिसिटी तपासली आहे का?
अन्यथा त्यांनी गप्प रहावे असे सुचवायचे आहे का?? ;)

मॉर्फिअस's picture

15 Jun 2011 - 3:48 pm | मॉर्फिअस

लेख वाचल्यापासुन आईस्किम खाताना डालड्याची चव शोधत होतो...
नितिन थत्तेंचा प्रतिसाद वाचुन खरेच हायसे वाटले..
आता पुन्हा आईस्किम चविने (डालड्याच्या नव्हे) खाता येईल...

बरेचदा आइस्क्रीमचा घट्टपणा कायम रहावा म्हणुन त्या जिलेटीन घालतात. हे जिलेटीन सरसाप्रमाणेच प्रणीज पदार्थापासून बनवतात.

नितिन थत्ते's picture

15 Jun 2011 - 8:14 pm | नितिन थत्ते

जिलेटिन प्राणीज असते हे बरोबर आहे. पण आइसक्रीममध्ये जिलेटिन नसते. त्या ऐवजी ग्वार गम हा व्हेजिटेबल गम वापरतात. (आइसक्रीम मिक्स म्हणून जे इन्स्टंट मिक्स मिळते -वेकफील्ड वगैरे- त्यात जिलेटिन असू शकेल).

>> पण आइसक्रीममध्ये जिलेटिन नसते.

काही आइसक्रीममध्ये जिलेटिन वापरलेले असते.

>> पण आइसक्रीममध्ये जिलेटिन नसते.

काही आइसक्रीममध्ये जिलेटिन वापरलेले असते.

विवेक मोडक's picture

15 Jun 2011 - 7:35 pm | विवेक मोडक

नशीब आमचं
रम आणि स्कॉच मधे भेसळ असल्याचा धागा नाही काढला कुणी, नाहीतर आमची गोची :-)

रमताराम's picture

15 Jun 2011 - 9:06 pm | रमताराम

तसेही एका पेग नंतर चव समजण्याच्या स्थितीत राहतोच कुठे आपण. चिंता करू नका विमो.

अवांतरः या आईस्क्रीमवरील गरमागरम चर्चेवरून हा धमाल चित्रपट आठवला. (पुणेकरांना खुली ऑफर - हिंजवडीवाल्यांना प्राधान्य - आमच्याकडून घेऊन जाणे.)

आनंदयात्री's picture

15 Jun 2011 - 9:09 pm | आनंदयात्री

हेच म्हणतो. आपली झाकली मुठ सव्वा लाखाची बरी असते चामारी !!

स्मिता.'s picture

16 Jun 2011 - 1:32 pm | स्मिता.

हा धागा भलताच फेमस झालाय (कि कमलेश कुळकर्णी यांचा ब्लॉग) याची कल्पना नाही. परंतु अगदी कॉपी टू कॉपी हाच लेख मला ढकलपत्रातून मिळालाय!

खाली अशी तळटीप आहे:
http://mukamar.blogspot.com/2011/05/blog-post.html या अनुदिनीवरून साभार

क्वालिटी वाल्स जेंव्हा भारतात आइस्क्रीम घेवून आले त्यावेळेस त्यानी हे आइसक्रीम दुधापासून नव्हे तर वनस्पती तुपाचा बेस घेवून केलेले आहे असे सांगितले होते.