वीकेंडचा मेनू

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
23 May 2011 - 11:18 am

वीकेंडचा मेनू

सध्या आमरसाचा सिझन आहे , म्हटल चला ट्रायच करुया म्हणून आमरस ,पुरणपोळी ,भात आणि आमटी अन कांदा भाजी ,बटाटा भजी, याचा घाट घातला होता .(आणि इथे देण्याचा मोह अनावर झाला म्हणुनच देत आहे )
पुरण पोळी :-अर्धा कि. हरबरयाची डाळ पातेल्यात बर्यापैकी शिजवून घेऊन त्यात किसलेला गुळ (जेव्हढ गोड चालत तेव्हढा ),आणि १ वाटी साखर घालणे ,इलायची पूड १ छोटा चमचा ,जायफळ पूड १ छोटा चमचा .चुट़कि भर मीठ घालून पुरण यंत्रात ,मिक्सित /पाट्यावर वाटून घेणे .
कणकेच्या पारया बनवून त्यात हे पुरण भरणे,मोदकासारखे तोंड बंद करून हलकेच गोल लाटी बनवून लाटावी
आणि भरपूर तूप लावून शेकावी ,पुरणपोळी तय्यार !


आमरस : आंबे (तुम्हाला जे आवडतील ) १ किलो ,एक वाटी दुध आनि ४-५केसर काड्या ,इलायची पावडर चुटकी भर
आंब्याची साल काढून त्याचे काप बनवा एका पातेल्यात आंब्याचे काप घेऊन त्यात एक वाटी दुध ,इलायची ,हवी असल्यास थोडी साखर घालून हॅण्ड ग्राइडर ने घुसळून घ्या,नाहि तर मिक्सी मध्ये , ज्यांना हाताने आवडत असेल त्यांनी हाताने स्मश करून घ्या ,रस झाल्यावर फ्रिज मध्ये थंड करा ,गार गार आमरस खायला तय्यार !

भजी : २ वाट्या बेसन ,ओवा छोटा चमचा ,२ कांदे उभे पातळ चिरून ,कोथिंबीर ,५-६ हिरव्या मिरचीचे तुकडे ,खाता सोडा चुटकी भर ,मीठ चवीनुसार ,थोडी हळद, या सर्व साहित्याचे पाणी घालून मध्यम मिश्रण करून घ्या ,भजि गरम तेलात तळुन घ्या .
बटाट्याचे पातळ काप करून मी याच मिश्रणात बटाटा भजी पण तळुन घेतली होती


प्रतिक्रिया

पुरणपोळी छान जमलीये. बेत एकदम तब्बेतीत.

निवेदिता-ताई's picture

23 May 2011 - 12:05 pm | निवेदिता-ताई

मस्तच बेत आहे...:)
पण आमरस पुरणपोळीबरोबर कसा लागेल याचा विचार करतेय..
अफ़लातून कल्पना..

पियुशा's picture

23 May 2011 - 12:20 pm | पियुशा

@ निवेदिता ताइ
मि स्वत: कधि खाल्लि नव्हति त्या निमित्ताने खाउन बघितलि मस्त लागते,पन काहि लोक पुरि बरोबर्,शेवइच्या भाताबरोबर ,दुधाबरोबर ,गुळ्वणी बरोबर
आनि आमटी बरोबर पन खातात पुरन पोळी !(ज्यचि त्याच्या आवडीनुसार)

हा माझा अतिशय आवड्ता खाद्य प्रकार आहे त्यामुळ त्यावर भर्पुर तुप घेउन तशिच खाते ;)

नगरीनिरंजन's picture

23 May 2011 - 12:39 pm | नगरीनिरंजन

जबरदस्त!!

सूड's picture

24 May 2011 - 6:55 am | सूड

आता फोटू पाह्यले, पुरणपोळी निदान दिसतेय तरी छान !! पियुषाबै पानात वाढलेल्या वरण-भात, पापडाची पाकृ र्‍हायली की वो. ह्म्म आमच्या पाकृ टाकण्याचा प्लान तूर्तास पुढे. उगाच मिपाच्या सर्व्हरवर लोड कशाला, नाही का ??
जाता जाता: 'जेवायला कधी बोलावतांय' असं निर्लज्जपणे विचारण्याचा मोह आवरत नाहीये. :)

परिकथेतील राजकुमार's picture

23 May 2011 - 2:16 pm | परिकथेतील राजकुमार

रोज अंडी घालणार्‍या कोंबड्यांच्या समुहात पियुशाला सामिल झालेले बघुन खेद वाटला.

बाकी चालु द्या...

नन्दादीप's picture

23 May 2011 - 4:26 pm | नन्दादीप

वपाडाव's picture

23 May 2011 - 6:32 pm | वपाडाव

स्पा's picture

23 May 2011 - 2:30 pm | स्पा

अरे हा दुपारच्या पाकृचा फोटो होता..
रात्रीच्या जेवणाच्या फोटोचा धागा येईलच, संध्याकाळी ;)

परिकथेतील राजकुमार's picture

23 May 2011 - 4:03 pm | परिकथेतील राजकुमार

चान चान.

त्यानंतर बडीशेप किंवा कायमचुर्णाची गरम पाण्यातली पाकृ / एखादी कविता / कायमचुर्ण घ्यावे की नको असे काकु कोणितरी टाकेलच. :)

त्यानंतर बडीशेप किंवा कायमचुर्णाची गरम पाण्यातली पाकृ / एखादी कविता / कायमचुर्ण घ्यावे की नको असे काकु कोणितरी टाकेलच

अगगागागागागागागा

आता महिला मुक्ती मोर्चा येणार तुमच्या घरी...

विसोबा खेचर's picture

23 May 2011 - 3:57 pm | विसोबा खेचर

लै भारी..!

प्रभाकर पेठकर's picture

23 May 2011 - 5:11 pm | प्रभाकर पेठकर

झटपट ३ पाककृती आणि चित्ताकर्षक छायाचित्रांची मेजवानी. मस्त मजा आली.
सोबत शुद्धलेखनाकडे किंचित लक्ष दिले तर मेजवानीची रंगत अजून वाढेल.

नरेशकुमार's picture

23 May 2011 - 6:41 pm | नरेशकुमार

मला 'गरम पानी' करन्याची पाक्रु पाहीजे. मिळेल काय ?

आता विडा -दक्षीणा देऊन बोळवण करा .

खरंच पराशेट म्हणतात तसं आता जरा अतिच व्हायला लागलंय, का बरं मिपाचा सर्वर बंद नाहि पडणार अशानं. हे असं सगळं आपल्या आपल्या ब्लॉगवर टाकावं आणि चेपुला अपडेट म्हणुन लिंक टाकावी, उगा मिपाला याप नको.

पियुशा's picture

24 May 2011 - 10:55 am | पियुशा

@ परा,स्पा,५० फक्त ,पीन्गु ,तुमचि सुचना सिरियसलि घेन्यात आलि आहे
या पुधे मि पा वर पा.क्रु देत नाहि ,उगा सर्व्हर ताण नको माझ्यामुळ !

@ परा,स्पा,५० फक्त ,पीन्गु ,तुमचि सुचना सिरियसलि घेन्यात आलि आहे
या पुधे मि पा वर पा.क्रु देत नाहि ,उगा सर्व्हर ताण नको माझ्यामुळ !

पियुषा तुला असं म्हणायचं का?

@ परा,स्पा,५० फक्त ,पीन्गु ,तुमची सूचना सिरियसलि घेण्यात आली आहे
या पुढे मि पा वर पा.क्रु देत नाही ,उगा सर्व्हरवर ताण नको माझ्यामुळे !

गवि's picture

24 May 2011 - 11:10 am | गवि

स्पा भाऊ..

तुमच्या प्रयत्नांचे आणि काही बदलेल या आशावादाचे कौतुक वाटते.

चालू दे.

पियुषा तुला असं म्हणायचं का? >>>

स्पा शेठ !! आपल्याला "पियुशा, तुला असे म्हणावयाचे आहे का? " असे म्हणावयाचे आहे का ? ;) (पुणेकर रे भावड्या..आय मीन स्पावड्या)

धाग्यावर : यु गो ऑन मॅम !! कधीतरी आपल्या मराठवाड्याकडे " गरम आमरस " कसा बनतो याची ही पाकृ टाकशीलास ! (मराठवाड्याच्या वाश्या ;) )

अवांतर : कुरडया विसरलात, पण पापड तरी किमान ..हॅ हॅ हॅ

च्यायला वीकेंड स्पेशल आमच्या माथी का मारते ही बया..

- (रागावलेला) पिंगू

गोगोल's picture

23 May 2011 - 10:35 pm | गोगोल

आणि फोटोज खूप खूप आवडले. मी जिथे आहे तिथे आंबे खायला मिळत नाहीत आणि अशी छान पुरणपोळी, भजी तर नाहीच मिळत. नुसते फोटोज पाहून देखील मन शांत झाले. धन्यवाद पियुशा ताई. प्लीज असे धागे अजून येऊ द्यात.

बाकी कोल्हेकुई करणार्याकडे लक्ष देऊ नका. त्यांना हे धागे न उघडायचे पुर्ण स्वातंत्र्य आहे. एक लक्षात घ्या की या कोल्ह्यांच्या पैशातून मिपा चालत नाही. मिपाच्या समर्थ संचालक मंडळानी याबाबत काहीही तक्रार केलेली नाहीये.

बाकी केवळ मिपा चा सर्वर स्लो चालतो म्हणून हा धागा ब्लॉग वर टाकणे इल्लॉजिकल आहे. मिपाचा सर्वर स्लो चालतो कारण की इम्प्लिमेंटेशन / कॉन्फिगरेशन मध्ये प्रॉब्लेम आहे. त्यासाठी काही धागे कमी महत्वाचे ठरवून न टाकायला सांगणे हे बरोबर नाही. कारण मग कुठले धागे मह्त्वाचे आणि कुठले नाही हे कोण ठरवणार?
काहींना लग्नाच्या गोष्टी पर्सनल वाटू शकतात आणि त्या ते ब्लॉग वर टाकायला सांगू शकतात नाही का?
बाकी ही तक्रार करणार्या "५० फक्त" यांनी "अखेरीस वायुपुत्राचे आगमन झाले आहे...!!!" किंवा
"'चहा" सार्ख्या धाग्यांवर काहीही निषेध नोंदवू नये याचे सखेद आश्चर्य वाटले.

आनंदयात्री's picture

26 May 2011 - 1:36 am | आनंदयात्री

गोगोलशी पुर्ण सहमत आहे.
पियुशा तुम्ही तुमचे लिखाण सुधारायला हवे, टंकुन झाल्यावर लेख लगेच प्रसिद्ध न करता नीट वाचून पहावा, चुका दुरुस्त कराव्यात, जिथे लेखन अपुर्ण वाटतेय तिथे योग्य ती पुरक जोड द्यावी आणि प्रसिद्ध करावे.

महेश काळे's picture

24 May 2011 - 6:17 pm | महेश काळे

तोन्डाला पाणी सुटलं...

छान बेत, आवडला. पुरणपोळी आणि आंबरस, त्याबरोबर भजी , वरण भात ... मस्तच.

तमाम लो़कानकरिता एक भारी जेवन

खरच मस्त.

तमाम लो़कानकरिता एक भारी जेवन

खरच मस्त.

ajay wankhede's picture

20 Jun 2011 - 11:56 pm | ajay wankhede

मस्तच आहे...
पण आमरस पुरणपोळीबरोबर कसा लागेल या विचाराने जीव कासाविस झाला.
पण कल्पना आवडली

लिहित रहा,खात रहा,खिलवत रहा