पेअर चॉकलेट केक

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
21 Apr 2011 - 1:01 am

बर्‍याच दिवसांनी एक नवी केकृ खास इस्टर निमित्त-

साहित्य- १५० ग्राम बटर, १५० ग्राम साखर,३०० ग्राम मैदा,५० ग्राम ओट फ्लेक्स, ४ अंडी, ३ चहाचे चमचे बेकिंग पावडर, १ चमचा रम,१ चमचा कोको पावडर, १०० ग्राम कुकिंग चॉकलेट,१/२ चमचा जायफळ पावडर+१/२ चमचा दालचिनी पावडर,४ चमचे दूध, ८५० ग्रामचा पेअरचा टिन.( ४ पूर्ण + अर्धे पेअर असे ९ अर्धे पेअर ), १ चिमूट मीठ
सजावटीसाठी- चॉकलेट आयसिंग, व्हाइट चॉकलेट

कृती-पेअर चाळणीवर टाकून पाक निथळून घेणे.
बटर भरपूर फेटणे. त्यात साखर+ दालचिनी पावडर+ जायफळ पावडर घालून फेटणे.
अंडी फोडून घालून फेटणे,रम घालणे व फेटणे.
ओट फ्लेक्स+ कोको घालून फेटणे.
मैदा+मीठ+ बेकिंग पावडर एकत्र करणे आणि ते वरील मिश्रणात घालून फेटणे.
चॉकलेटचे तुकडे करणे व ते वरील मिश्रणात एकत्र करणे.
थोडे दूध ह्या मिश्रणात घालणे.
एव्हाना पेअर मधील पाक निथळला असेल , केकच्या मोल्डला जरा जास्त बटरने ग्रिसिंग करणे. आता ह्यावर पेअर पालथी घालणे. एका पेअरचे टोक काढून त्याचा वर्तुळाकार बनवून तो मध्यात ठेवणे.
केकचे मिश्रण ह्यावर ओतणे.
१८० अंश से ला तासभर बेक करणे.केक झाला की नाहे ते पाहण्यासाठी सुरीने टोचून पाहणे. केक झाला तरी पाच मिनिटे अवन मध्येच राहू देणे, नंतर बाहेर काढणे व अजून ५/७ मिनिटे तसाच ठेवणे, नंतर जाळीवर काढणे.
व खालची बाजू वर येईल असा जाळीवर ठेवणे. पेअर्स वर येतील.
केक पूर्ण थंड झाल्यावर चॉकलेट आयसिंगने डेकोरेट करणे. चॉकलेट आयसिंग उपलब्ध नसेल तर कुकिंग चॉकलेट वितळवून ते केकवर पेअर नसलेल्या भागावर लावणे. वरुन व्हाइट चॉकलेट किसून घालणे.
व्हिप्ड क्रिमबरोबर खाणे (आणि नंतर पळायला जाणे.म्हणजे क्यालरींच्या अपराधी भावनेवर विजय मिळवता येतो.)

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

21 Apr 2011 - 1:05 am | नेत्रेश

जबरदस्त ...
केक,
पा.कृ.,
प्रेझेंटेशन
फोटो
सर्वच.

सानिकास्वप्निल's picture

21 Apr 2011 - 1:14 am | सानिकास्वप्निल

:) बनवायला हवा

आत्मशून्य's picture

21 Apr 2011 - 2:50 am | आत्मशून्य

वा वा मस्त दीसतोय फोटो.

रेवती's picture

21 Apr 2011 - 4:40 am | रेवती

स्वातीताई तू ग्रेट आहेस!
आजपर्यंतच्या सगळ्या केकृ एकापेक्षा एक होत्या.
आम्हाला वाटले की आता यापेक्षा जास्त व्हरायटी कोणती असू शकते?;)
हा वेगळ्या प्रकारचा अपसाईड डाऊन केक लाळग्रंथींचे काम वाढवतो.;)
सगळे फोटू ग्रेट आलेत. आत्ताच व्यायाम करून आल्याने टंकताना अपराधीपणा आला नाही.;)

निवेदिता-ताई's picture

21 Apr 2011 - 7:25 am | निवेदिता-ताई

अतिशय सुंदर......

मस्तच.

ऋषिकेश's picture

21 Apr 2011 - 8:48 am | ऋषिकेश

पेअर म्हणजे काय? ते भारतात मिळते का?
(हाफिसातून फोटो दिसत नाहियेत म्हणून प्रश्न विचारतोय.. जर फोटोत पेअर दाखवले असेल तर म्हणजे काय? हा प्रश्न गैरलागू)
मिळत नसल्यास बनवता येते का?

सहज's picture

21 Apr 2011 - 8:59 am | सहज

पेअर म्हणजे हिंदीत नाशपती. फळ आहे, अ‍ॅपल की पेअर मधले :-) फळवाल्या 'भैय्याला' कळावे :-)

पेअर फारसे आवडत नाही, चॉकलेट केक बरोबर तर नाहीच नाही :-( हिरवी नाशपती एकवेळ नुस्ती खायला बरी.

चॉकलेट केक बोले तो


फोटो - जालावरुन

ऋषिकेश's picture

21 Apr 2011 - 9:10 am | ऋषिकेश

मंडळ आभारी आहे! :)
मला वाटलं स्वाती ताई 'टिन' मधून पेअर काढतेय म्हणजे काहितरी आतापर्यंत न पाहिलेलं/चाखलेलं असावे. (फोटो दिसत नव्हता ना!)

यशोधरा's picture

21 Apr 2011 - 9:08 am | यशोधरा

वा स्वातीताई! लय भारी!

स्पंदना's picture

21 Apr 2011 - 9:11 am | स्पंदना

__/\__

धन्य आहेस स्वाती ताई तु. इतका सुन्दर केक?

मी एकदा लग्ना आधी पार्शी लोक ब्रँडी घालुन केक करतात हे ऐकुन घरातली ब्रॅडी घालुन केक केला होता. पण केकच कौतुक करण्या ऐवजी मी घरातल्याम्च्या डोळ्यात मी ब्रँडी प्याले की काय ? असा संशय अगदी ठसठशीत दिसत होता. एकदा सहजच ध्यानी आल की बाटली ओतुन टाकण्यात आली आहे.

आता धडधडीत उघडपणे रम घालुन हा केक करते.

जबरदस्त केक, मिपावर येउन धन्य झालो असं वाटतंय,

नंदन's picture

21 Apr 2011 - 10:38 am | नंदन

आहे पाकृ, चॉकलेट आणि फळांचे तुकडे हे कॉम्बिनेशन एकदोनदा चाखून पाहिलं आहे ते आवडलं होतं.

(मिपावर अमेरिका-आफ्रिका अशी पाकयुती झालीच आहे. त्यात आता ब्रेक के बाद युरोपियन डेलिकसीजची भर पडते आहे. इनोचा साठा वाढवायला हवा :))

मराठमोळा's picture

21 Apr 2011 - 10:41 am | मराठमोळा

>>मिपावर अमेरिका-आफ्रिका अशी पाकयुती झालीच आहे. त्यात आता ब्रेक के बाद युरोपियन डेलिकसीजची भर पडते आहे. इनोचा साठा वाढवायला हवा

सहमत आहे..बाकी ईनोचा साठा संपल्यावर काय करायचं हाही प्रश्न आहेच कारण हे लोकं काही केल्या थाम्बणार नाहीत..
:)

मृत्युन्जय's picture

21 Apr 2011 - 10:45 am | मृत्युन्जय

मस्त दिसतो आहे केक केकृ ताई

गणपा's picture

21 Apr 2011 - 1:32 pm | गणपा

हॅप्पी इस्टर इन अ‍ॅडव्हांस....
केकावली दिसतेय सुंदर.

पण मला हे सफरचंद,पेअर ही फळं फारशी आवड्त नाही.
आपल्या ला बॉ संत्रा मोसंबी आवडते. :)

स्मिता.'s picture

21 Apr 2011 - 1:41 pm | स्मिता.

केक तर मस्त दिसतोय. त्यातल्या त्यात चॉकलेट केक म्हणजे विचारायलाच नको :)
पण त्यासोबत पेअर... हे कॉम्बिनेशन थोडं वेगळंच वाटतंय.

अहा..

तातडीने खावासा वाटत आहे... दुधासोबत किंवा चहासोबत.

मस्त.. :)

चतुरंग's picture

21 Apr 2011 - 5:49 pm | चतुरंग

काही नाही, बारिकशी कळ उमटली छातीत! ;)
काय दिसतोय तो केक!! वा वा!!! खल्लास!!! __/\__

-केकरंग

(खुद के साथ बातां - रंग्या, गधड्या, वजन जरा कमी असतं तर काही बिघडलं असतं का? आता बैस नुस्तं लाळेरं बांधून!)

रोचीन's picture

21 Apr 2011 - 6:11 pm | रोचीन

करुन बघायला हवा!!!!!!! :)