बुटर मिल्श कुकन म्हणजे ताकातला केक.
साहित्य-२ कप ताक,१.५ कप साखर,४ कप मैदा,१ चिमूट मीठ, ३ अंडी,५ ते ६ चहाचे चमचे बेकिंग पावडर,२ चमचे वॅनिला अर्क,
१ लिंबाचा रस+१/२ लिंबाची किसलेली साल,२०० ग्राम बदाम तुकडा,१५० ते २०० मिली अन व्हिप्ड क्रिम
कृती- मैदा+मीठ+बेकिंग पावडर एकत्र करणे. त्यात अंडी व ताक घालणे , साखर घालणे आणि चमच्याने सारखे करून एकजीव मिश्रण तयार करणे. त्यात वॅनिला अर्क आणि लिंबाचा रस व किसलेली सालं घालणे आणि सारखे करणे.
एका उथळ बेकिंग ट्रेला तूप/लोणी लावून घेणे व त्यात हे वरील मिश्रण ओतणे. त्यावर बदाम तुकडे पसरून पूर्ण मिश्रण झाकून टाकणे.
२० ते २५ मिनिटे प्रिहिटेड अवन मध्ये बेक करणे.केक बेक झाल्यावर गरम केकवर अनव्हिप्ड क्रिम सर्व बाजूंनी ओतणे म्हणजे ते आत जिरेल. केक गार झाल्यावर वड्या कापणे.
वि.सू.- १. ह्या केक साठी तूप/लोणी ची आवश्यकता नाही.
२. उथळ बेकिंग ट्रे/डिश घेणे जरुरीचे आहे.
३. हा केक खूप दिवस टिकत नाही.२, ३ दिवसात संपवावा लागतो. (अर्थात तसा तो एकाच दिवसातही संपतो म्हणा!)
प्रतिक्रिया
16 Jun 2008 - 12:56 pm | स्वाती दिनेश
त्यात अंडी व ताक घालणे ,साखर घालणे व चमच्याने सारखे करुन एकजीव मिश्रण करणे.
16 Jun 2008 - 12:56 pm | मनस्वी
ताकातला केक.. काहीतरी नवीन प्रकार दिसतोय..
कसा लागतो चवीला? थोडा आंबट असतो का?
करून बघावासा वाटतोय.
अन-व्हिप्ड क्रिम ला काही पर्याय आहे का?
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
16 Jun 2008 - 1:02 pm | स्वाती दिनेश
अनव्हिप्ड क्रिम न घालता तसाच नुसताही खाता येईल,पण तो जरा कोरडा लागतो कारण त्यात तूप/लोणी काहीच नाही.
अनव्हिप्ड/फ्रेश क्रिम आपल्याकडे भारतातही बाजारात उपलब्ध आहे.
ताक आंबट नसेल तर केक चवीला आंबट लागत नाही.त्यामुळे गोड ताक घेणे.
17 Jun 2008 - 6:27 am | वरदा
सॉरी गं उशीरा आले...माझी आई करायची लहानपणी हा रव्याचा ताकातला केक...पण अंडी नाही घालायची ती आणि तूप घालायची मला वाट्टं थोडं..कुणी बघितलय...फक्त ताईपेक्षा जास्त मला कसा मिळेल हेच पहाण्यात गर्क असायची मी....मस्त पाक्रु.
17 Jun 2008 - 2:51 pm | विसोबा खेचर
स्वाती,
केक छान झालाय, आवडला! :)
17 Jun 2008 - 3:05 pm | केशवसुमार
स्वातीताई..
पर्वा खाल्ला तो केक हाच की दुसरा ?
एकदम अफलातून होता.. =D>
बाकी सगळ्यांना टूक टूक... :P <:P
(तृप्त)केशवसुमार :\
(स्वगतः- टूक टूक केलस मेल्या केश्या आता सगळ्यांची नजर लागून पोट बिघडल :& नाही म्हणजे मिळवल :S
17 Jun 2008 - 3:35 pm | स्वाती दिनेश
परवाचा केक हा नव्हता,तो वॅनिला केक होता. हा पुढच्या वेळी करेन,:)
17 Jun 2008 - 8:29 pm | वरदा
के. सु. तिथे आहेत का स्वाती? हेवा वाट्टोय मला....मला पण केक हवा :(
17 Jun 2008 - 8:39 pm | स्वाती दिनेश
हो. के.सु. आले आहेत जर्मनीत, आणि परवाच्या रविवारी आम्ही भेटलो.धमाल आली ,:)
स्वाती
18 Jun 2008 - 7:59 pm | वरदा
किती विडंबनं ऐकलीस?
30 Dec 2010 - 2:26 pm | गणपा
स्वाती ताई लिंक बद्दल धन्यु. :)
30 Dec 2010 - 2:30 pm | गवि
वा वा.. छान लिंक.. ही कल्पनाच मस्त आहे. ताकामुळे एक छान फ्लेवर येत असणार. नुसत्या गोडमिष्ट केकपेक्षा एक वेगळीच चव येत असेल.
करायलाच पाहिजे..
शिर्याबद्दल अन्यत्र केलेला "जोक" होता.. माझ्या स्वतःच्या कौशल्यावर.. हे सांगणे नलगे.
30 Dec 2010 - 3:20 pm | खादाड अमिता
छान पाक्रु करुन बघणार!
30 Dec 2010 - 3:23 pm | मितान
आता मात्र यावंच लागेल स्वातीतै !
आधी महिनाभर डायटींग करून येईन म्हणते ;)