स्वादिष्ट टोमॅटो सूप

Pearl's picture
Pearl in पाककृती
4 Mar 2011 - 12:13 pm

साहित्यः ५/६ टोमॅटो, २ छोटे कांदे, मीठ, साखर, थोडीशी मिरपूड, लोणी

क्रुती: प्रथम टोमॅटो आणि कांद्यांचे अर्धे अर्धे तुकडे करून घ्या. (Cut Onion and tomatos into halves.) आणि ते कुकरला लावून ३/४ शिट्या होउ द्या. मग थोड्या वेळाने कांदे-टोमॅटो कुकरमधून काढा.

आता टोमॅटोची सालं काढा. मग हे कांदे-टोमॅटो मिक्सरमधून काढा. मोठ्या चाळणीने गाळून घ्या. हे गाळलेले सूप गरम करायला गॅसवर ठेवा. पाणी नाही घातलं तरी चालेल. ज्यांना पातळ सूप आवडतं त्यानी या सूपात थोडं पाणी घालावं.

मग त्यात चवीपुरते मीठ, बर्‍यापैकी साखर आणि किंचित मिरपूड घाला. छान ढवळून घ्या. मग एका बाउलमध्ये सूप घेउन त्यात थोडं लोणी घालून (आवडत असल्यास ब्रेड स्टिक्स किंवा ब्रेड क्रंबसोबत) गरमागरम सूप (सर्व्ह न करता ;-) त्याऐवजी स्वतःच) गट्टम करा :-)

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

4 Mar 2011 - 12:19 pm | निवेदिता-ताई

मस्त:)

स्वैर परी's picture

4 Mar 2011 - 1:23 pm | स्वैर परी

हॉटेल मध्ये अशीच बनवली जाते का?

>>हॉटेल मध्ये अशीच बनवली जाते का?

माहिती नाही.
ही माझ्या आईची रेसिपी आहे.

Actually मला पण जाणून घ्यायचं आहे की होटेल मध्ये कसे बनवतात टो.सू.

त्याचा फटु टाका ना.

Pearl's picture

4 Mar 2011 - 3:12 pm | Pearl

माझ्या सगळ्या पा.क्रुं. चे फोटो एकदमच टाकेन म्हणते मी :-)
तोपर्यंत पदार्थ करो, ओर खुद जान जाओ(की कैसा दिखता है पदार्थ ;-))

परिकथेतील राजकुमार's picture

4 Mar 2011 - 3:13 pm | परिकथेतील राजकुमार

मग फोटू टाकले की सगळ्या पाकृ वर एकदमच प्रतिसाद टाकेन म्हणतो मी :)

टोमॅटो सुप असे करतात हे खरेच माहित नव्हते.
कांदा पण असतो त्यात हे तर अजिबात माहित नव्हते.

एक प्रश्न :

अर्धे अर्धे टोमेटो उकडुन घेताना.. कुकर मध्ये कीती पाणी टाकावे .. त्या पाण्यामध्येच ते टोमॅटो विरघळणार तर नाहि ना ..
की पुर्ण टोमॅटो उकळुन घेवुन मग त्याला मिक्सर मध्ये बारीक करुन पुन्हा गरम पाण्यात टाकावे ..
थोडी माझी गफ्लत झालीये वाटते

Pearl's picture

4 Mar 2011 - 4:24 pm | Pearl

>>एक प्रश्न :
एक कुठे इथे तर ३ प्रश्न आहेत :)

>>अर्धे अर्धे टोमेटो उकडुन घेताना.. कुकर मध्ये कीती पाणी टाकावे ..
कुकरमध्ये (भात शिजवताना जेवढे टाकतो तेवढे) पाणी टाकून त्यामध्ये कुकरचे भांडे किंवा १ पातेले ठेवा. त्यात अर्धे अर्धे चिरलेले कांदे आणि टोमॅटो घाला. आणि १ (पाणी पिण्याचं) भांड किंवा २ वाट्या पाणी घाला. त्यावर ताटली झाका. मग कुकरचे झाकण लावा. हुssssश्श :-o दमले :-)

>>त्या पाण्यामध्येच ते टोमॅटो विरघळणार तर नाहि ना ..
नाही.

>>की पुर्ण टोमॅटो उकळुन घेवुन मग त्याला मिक्सर मध्ये बारीक करुन पुन्हा गरम पाण्यात टाकावे .. थोडी माझी गफ्लत झालीये वाटते
टोमॅटो चांगला शिजला म्हणजे झालं. मग कसाही शिजवा.

धन्यवाद ..
समजेश .. लवकर हा पदार्थ करण्यात येइलच..

अवांतर : मला वाटले होते भाजीचा छोटा कुकर असतो ना त्यामधेय करायचे होते .. भात करतो त्या कुकरमधेय करायचे आहे ते पण डबा ठेवुन म्हनजे सगळ्या प्रश्नाची उत्तरे आलीच .

खुपच छान, करुन बघायला हरकत नाही

Pearl's picture

4 Mar 2011 - 3:26 pm | Pearl

धन्यवाद रूपाली.
मी आजच हे सूप केलं होतं. टोमॅटो बरेच दिवस फ्रिजमध्ये पडून असतील आणि ते आता अजून ठेवले तर खराब होतील असं वाटलं की मी हमखास हे सूप करते.

कच्ची कैरी's picture

4 Mar 2011 - 4:01 pm | कच्ची कैरी

फोटो टाकला असता तर सूप प्यायला किती मजा आली असती बर ;)

Pearl's picture

4 Mar 2011 - 4:26 pm | Pearl

+१

एकदम मान्य ;-)

मस्त कृती. आजच करुन बघते. :)

खादाड's picture

5 Mar 2011 - 1:46 pm | खादाड

ह्यामधे corn floor गार पाण्यात मिक्स करुन मग गरम सुप मधे टाकल्यास छान घट्ट होतं !!!लसुण आल पण कुकर मधे टाकल्यास छान स्वाद येतो !:)

विनायक बेलापुरे's picture

5 Mar 2011 - 5:56 pm | विनायक बेलापुरे

माझ्या बायकोची जास्तीची सूचना :
१)उकडताना टोमटो-कांद्या सोबत आल्याचा पाव इंचाचा तुकडा आणि ४-६ लसूण पाकळ्या घालाव्यात.
२)मिक्सरमधून काढल्यावर अर्धा टीस्पून कॉर्न फलोअर किंवा तांदळाची पीठी पाण्यात मिसळून घालावी.
३)नंतर उकळताना फक्त मिरपूड घालण्या ऐवजी दालचीनी/लवंग्/मिरी/शाहजिरे यांची पावडर करुन अर्धा टीस्पून घालावी.
४)वरुन तूप आणि जिरे यांची फोडणी द्यावी.
५) सर्व करताना क्रीम किंवा बटर वापरावे.