शाही अंडा बिर्याणी

केशवसुमार's picture
केशवसुमार in पाककृती
1 Jan 2011 - 9:10 pm

काल ३१ डिसेंबराला 'निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी' भेटायला आला होता, तेव्हा पुन्हा एकदा राकलेट आणि चॉकलेट मूस चा बेत आणि भरपूर गजाल्या झाल्या..
DSC01595 DSC01599

नवीन वर्षाची सुरुवात वजन करून करावी अशी अभिनव कल्पना आमच्या डोक्यात आली.
मुक्काम पोस्ट फ्रँकफर्टला हालवल्यानंतर पहिले ३-४ आठवडे, ब्राझील मध्ये बसून स्वातीताईंच्या पाककृतींची बनवलेल्या यादीची यथेच्छ वसुली आणि आमच्या ब्राझील मध्ये केलेल्या पाककृतीची स्वाती व दिनेश यांना प्रात्यक्षिके करून दाखवण्यात गेले होते.. ह्याचा व्हायचा तो परिणाम झालाच होता.. ६ किलो वजन ३० दिवसात कमावले आहे अशी आनंदाची बातमी वजन काट्याने दिली... सकाळी निनादला टाटा बाय केल्यानंतर पुन्हा आमची आणि दिनेशची चर्चा वजनावर घसरली.. ह्या वजनाचे काही तरी केलेच पाहिजे असा एकमताने निर्णय झाला आणि ७ जानेवारीला दिनेश पॅरिसहून परत आला की डायेट आणि व्यायामशाळा सुरू करायचा संकल्प कॉफी पीतपीत सोडण्यात आला. थोड्या वेळ व्यनि, चेपू चाळाचाळी झाली आणि नव्या वर्षातली पोटातल्या कावळ्यांची पहिली कावकाव सुरू झाली.. काय करावे चा काथ्याकूट सुरू केला. नवीन वर्षाचा संकल्प सुरू करायला अजून ७ दिवस आहेत काही तरी फर्मास करूया असे दिनेशचे अनुमोदन मिळाले आणि अंडा बिर्याणी बनवायचा प्रस्ताव दोनमुखानी मंजूर झाला.
चला तर मंडळी शाही अंडा बिर्याणी बनवायला.
घ्या साहित्य लिहून ...
साहित्य:
सर्व साहित्य ४ माणसांना पुरेल ह्या हिशोबाने दिले आहे..
८ अंडी
३ वाट्या तांदूळ
३-४ मध्यम कांदे
१ मध्यम टोमॅटो
२ मध्यम बटाटे
६-७ लसुणाच्या पाकळ्या
२ पेरं आलं
१ टेबल चमचा कांदालसूण मसाला
३ टेबल चमचा तयार बिर्याणी मसाला
२ इंच दालचिनी
१-२ दगड फुल
४-५ तमालपत्र
७-८ लवंगा
१०-१५ मीरे
१ मसाला वेलदोडा
५-६ वेलदोडे
१ वाटी दही
१/४ वाटी दूध
४-५ काड्या केशर
१५-२० काजू
हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार
मीठ, कडीपत्ता, कोथिंबीर, पुदिना आवडीनुसार
जिरे, हळद, तेल(ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स. )
रायत्याचे साहित्य
२ कांदे
१ टोमॅटो
१-२ टेबल चमचा चाट मसाला
मीठ, कोथिंबीर आवडीनुसार
पोटातल्या कावळ्यांची कावाकावी मुळे सर्व पदार्थांचे फोटो काढायला वेळ नव्हता.
कृती :
तांदूळ स्वच्छ धुऊन, ४५ मिनिटे भिजवत ठेवा. केशर चुरडून दुधात भिजवत ठेवा.
१ १/२ कांदा बारीक उभा कापा, बाकीचे कांदे, टोमॅटो कोथिंबीर, पुदिना आणि मिरच्या बारीक कापून घ्या.
बटाट्याचे जाड काप करा. (एका बटाट्याचे फक्त ८ काप)
आलं लसूण मिक्सर मधून वाटून घ्या.
एका भांड्यात तेल गरम करत ठेवा. तेल तापले की त्यात उभा चिरलेला कांदा आणि बटाट्याचे काप तळून बाजूला ठेवा.
अंडी कडकडीत उकडून घ्या. उकडलेली अंडी अर्धी कापून थोड्याश्या तेलात शॅलोफ्राय करून बाजूला ठेवा.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवायला ठेवा, त्यात जिरे आणि सर्व खडा मसाला घाला. थोड्या वेळाने त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं लसूण वाटण आणि मिरच्या घाला. कांदा गुलाबी होई पर्यंत परता. मग त्यात काजू, थोडी कोथिंबीर, कडीपत्ता आणि पुदिना घाला. आणि सर्व मिश्रण २ मिनिटे ढवळा. आता त्यात कांदा लसूण मसाला, तयार बिर्याणी मसाला घाला. सर्व मिश्रण एकजीव करून त्यात एक वाटी दही घालून परता.दोन मिनिटे शिजू द्या. आता ह्या मसाल्यात भिजवलेले तांदूळ घालून २ मिनिटे परता. नंतर ४ वाट्या पाणी घालून पातेल्यावर घट्ट झाकण ठेवून तांदूळ ७-८ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. तांदूळ थोडे शिजले की त्यात तळलेले बटाटे घालून पुन्हा घट्ट झाकण ठेवून ७-८ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
तांदूळ पूर्णं शिजल्यावर, वरचा थोडा थर बाजूला करून त्यात शॅलो फ्राय केलेले अंड्याचे काप घाला, दुधात भिजवलेले केशर मिसळा, वर तांदुळाचा बाजूला केलेला थर पुन्हा लावा. वरून तळलेला कांदा आणि कोथिंबीर पेरा आणि झाकण घट्ट बंद करून अतिशय मंद आचेवर अंदाजे १० मिनिटे वाफाळू द्या.
झाली शाही अंडा बिर्याणी तयार...
DSC01603
रायत्याची कृती=
कांदा, टोमॅटो उभे चिरून घ्या. त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, दही आणि चाट मसाला टाका. चवी नुसार मीठ मिसळा. झाले रायते तयार.
DSC01606
आता पुढे काय हे सांगायला हवे का? एन्जॉय..
चला आता दुपारी कॉफी बरोबर टूटीफ्रूटी केक करायचा आहे..त्याच्या तयारीला लागतो..;) (७ जानेवारीला आजून बराच वेळ आहे)

प्रतिक्रिया

विलासराव's picture

1 Jan 2011 - 9:46 pm | विलासराव

खतरनाक दिसतेय बिर्याणी.
आता फक्त मेजवाणीसाठी तिकडे यायचा बेत पक्का झालाय माझा.

प्रियाली's picture

2 Jan 2011 - 8:18 pm | प्रियाली

खतरनाक दिसतेय बिर्याणी.

या शब्दाशी १०००% सहमत.

चिंतामणी's picture

1 Jan 2011 - 9:47 pm | चिंतामणी

छान छान.

पण थोडी उशीराने टाकलीस पाकृ. थोडावेळ आधी टाकली असतीस तर आज ऑम्लेट ऐवजी बनवली असती.

असो लौकरच करून बघीन.

सविता's picture

1 Jan 2011 - 11:43 pm | सविता

खतर्नाक..........

फोटू छान आलेत.
पाकृही चांगली असणार (मी अंडी खात नसल्याने माहित नाही).
फक्त एक शंका अशी की कढीपत्ता बिर्याणीत घालतात काय?
नुकतीच आमच्याकडे व्हेज बिर्याणी झाल्याने सध्या इनो घेण्याची गरज नाही.
सात जानेवारीनंतर लो कॅल पाकृंची अपेक्षा आहे.
मीही दोन पौंड वजन कमी करावे म्हणते.

केशवसुमार's picture

3 Jan 2011 - 12:56 pm | केशवसुमार

मी कढीपत्ता उन्हात वाळवून त्याचा चुरा करुन ठेवतो.. आणि तो चुरा नेहमी वापरतो.. त्यामुळे कढीपत्ता वेगळा दिसत नाही आणि स्वाद ही मस्त येतो..

सन्जोप राव's picture

2 Jan 2011 - 6:49 am | सन्जोप राव

अंडा बिर्याणी माझी आवडती. शाही पाककृती अधिकच आवडली. केसुचा उपास सुटल्याचा वेगळा आनंद.
वजन कमी करणे वगैरे अस्पृष्य विषयांवर काही लिहीत नाही.

मुक्तसुनीत's picture

4 Jan 2011 - 6:36 pm | मुक्तसुनीत

हेच बोल्तो !

पियुशा's picture

2 Jan 2011 - 10:31 am | पियुशा

वोव ,मस्त दिस्तेय्,करुन पाहनार नक्कि !

अवलिया's picture

2 Jan 2011 - 11:35 am | अवलिया

वेलकम बॅक :)

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Jan 2011 - 12:01 pm | बिपिन कार्यकर्ते

डायरेक्ट फोटोच बघितले.. पाकृ वाचणे आम्हाला जमत नाही..

केसुशेठ, डोळे खरंच पाणावले हो...

श्रावण मोडक's picture

2 Jan 2011 - 12:10 pm | श्रावण मोडक

आकडा फुगत चालला आहे. ब्राझीलला होता तेव्हाची वसुली (ली दीर्घ आहे, ऱ्हस्व नाही) बाकी आहे. आता ही जर्मनीची भर टाकतो. यावेळी इथे आलात की, वसुली होईल याची खात्री बाळगा. ;)

केशवसुमार's picture

3 Jan 2011 - 1:00 pm | केशवसुमार

ह्यावेळी आलो की नक्की 'वसुली' च बघू..

श्रावण मोडक's picture

3 Jan 2011 - 1:08 pm | श्रावण मोडक

धागा साठवून ठेवला. नंतर शोधण्यात वेळ नको. कसं? ;)

आऽऽऽऽऽऽऽहाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

नंदन's picture

2 Jan 2011 - 1:02 pm | नंदन

बिर्याणीच्या पाकृबरोबरच ते तळलेले कांदे, बटाट्याची कापं इ. डिटेल्सही कातिलाना!

आजानुकर्ण's picture

2 Jan 2011 - 7:28 pm | आजानुकर्ण

विडंबनसम्राट आदरणीय केशवराव,

व्वा. सुरेख पाककृती!

अंडा बिर्याणी आहे होय ही :) मला वाटलं बिर्याणीचं विडंबण केलंय म्हणुन .. :)
बाकी छाण छाण :) अजुनही शाही अंडाबिर्याणीचा वास दरवळतो आहे म्हणे :)

- शवसुमार

कच्ची कैरी's picture

3 Jan 2011 - 9:16 am | कच्ची कैरी

वाव!!!!!!!!! तोंडाला पाणी सुट्ले ,मी पण करुन बघणार

अरे कोणीतरी ती हैद्राबादी मटण दम बिर्याणी आणि हलीम चे रेसीपी आणि फोटो टाका की प्लीज....
माताय..... हे गुजरात म्हणजे शाकाहारी आणि ड्राय आहे एकदम.
निदान फोटोवर तरी समाधान मानेन

सुनील's picture

4 Jan 2011 - 6:27 pm | सुनील

अरे कोणीतरी ती हैद्राबादी मटण दम बिर्याणी आणि हलीम चे रेसीपी आणि फोटो टाका की प्लीज....

हा घ्या हलीम!

स्वाती दिनेश's picture

3 Jan 2011 - 1:48 pm | स्वाती दिनेश

बिर्याणी कातील,जबर्‍या, खतरा इ. इ. झालेली होती..
दुसर्‍या दिवशीची बासी बिर्याणी तर मसाला आतवर मुरल्याने अजूनच मस्त लागली!
(साक्षीदार) स्वाती

आता हे म्हणजे दुसर्‍यांच्या जखमेवर मसाला चोळण्यासारखं झालं.;)

धमाल मुलगा's picture

3 Jan 2011 - 7:15 pm | धमाल मुलगा

खोलवर मुरलेला मसाला ! :(

केसुकाका, (! आहाहा..काय राक्षसीआनंद झालाय अशी हाक मारताना...)
एकदम बिर्याणी वगैरे? एकदम जंक्षन काम है की.

गणपा, सांभाळ रे बाबा....कांपिटिशन आली रेऽऽ

केशवसुमार's picture

3 Jan 2011 - 8:54 pm | केशवसुमार

हे म्हणजे मॅट्रिकच्या मुलाची केजीतल्या मुलांशी तुलना करण्या सारखे झाले..
(केजी कुक)केशवसुमार
हा गणापाचा अपमान आहे..समस्त गणपा फ्यानक्लब तुला योग्य ती शिक्षा करेलच..
(काडेपेटी)केशवसुमार
स्वगतः ह्या धम्याला काल रस्त्यात कुठल्यातरी पोरीने काका म्हणून हाक मारलेली दिसते..खि..खि..खि..

स्मिता.'s picture

4 Jan 2011 - 5:57 pm | स्मिता.

समस्त जर्मनीकरांचा निषेध!! ;)

पंगा's picture

3 Jan 2011 - 7:44 pm | पंगा

दुसर्‍या दिवशीची बासी बिर्याणी तर...

आपल्या माहितीकरिता: 'बासी' या शब्दाकरिता मराठीत 'शिळी' असाही शब्द आहे.

(नाही म्हणजे, माझी हरकत नाही, पण फुकट 'हिंदी सगळ्या भारतीय भाषांना गिळंकृत करून राहिली आहे'ची बोंब मारायचा कोणाला मौका (मराठीत 'संधी'. स्त्रीलिंगी.) मिळायचा, म्हणून म्हटले.)

सविता's picture

5 Jan 2011 - 9:11 am | सविता

अगदी अगदी!!!

आजानुकर्ण's picture

6 Jan 2011 - 3:00 pm | आजानुकर्ण

पूर्णपणे सहमत

आमोद शिंदे's picture

4 Jan 2011 - 2:06 am | आमोद शिंदे

अंडा बिर्याणी 'शाही' कधीपासून झाली? आता पुढची पाककृती काय 'शाही फोडणीचा भात' का?

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jan 2011 - 11:03 am | परिकथेतील राजकुमार

खत्तरनाक हो !

काही प्रतिक्रीया वाचुन लोकांना किती जळजळ झाली असेल ह्याचा अंदाज आलाच.

केशवसुमार's picture

4 Jan 2011 - 5:26 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार

अजून प्रतीसाद येतील.

आज सकाळी केली होती बिर्याणी. भन्नाट झाली होती.

वरती म्हणल्या प्रमाणे बासी/शिळी/ सकाळची राहीलेली बिर्याणी आत्ता ओरपली.

नेहरिन's picture

5 Jan 2011 - 11:38 am | नेहरिन

केसु भाऊ, पदार्थ एकदम मस्तच. कालच करुन खाऊन झाला . मजा आली.

आहाहा फोटो पाहुनच वास घुमला. छान रेसिपी.

निनाद's picture

5 Jan 2011 - 11:43 am | निनाद

पाककृतीची तात्काळ दखल घेऊन लगेच बिर्याणीचा डाव टाकला.
पण अंडी नव्हती म्हणून चिकन घातले. फ्रिज करून ठेवले असल्याने ते हाताशीच होते ;)
केशर सापडले नाही. दूध बटाटे आणायला हवे आहेत असे विचार गेला महिनाभर चालले आहेत. पण लक्षात रहात नाही त्यामुळे ते कॅन्सल. दही आहे पण ते कधी आणले होते ते लक्षात नाही म्हणून घातले नाही. तमाल वगैरे कागदपत्रांना फाट्यावर मारण्यात आले. तरीही बिर्याणी कम चिकन खिचडी जबरी झाली होती. (ही सगळी त्या एव्हरेस्ट मसाला वाल्यांची कृपा हो!)
मुक्तहस्ते मिरच्यांची उधळण केल्याने दुसर्‍या दिवशीही बिर्याणी 'जाणवली' ;)

भुकेल्यापोटी बिर्याणी केल्याने क्यामेरा शोधून फोटु काढायला वेळ नव्हता - तेव्हा क्षमस्व!

ही 'मोकळी' बिर्याणी कशी करतात हे मला एक न सुटलेले कोडे आहे. मी केली की त्याची छान गच्च खिचडी बनते. तांदुळाची काही भानगड आहे का? मी आपला वुलवर्थ मध्ये मिळणारा जस्मीन राईस वापरला. म्हणजे दावतचा बासमती वापरून केली तरी त्याची खिचडीच झाली होती... :(
या पाककृतीच्या आठवणी बद्दल धन्यवाद.
(आवांतर: दुधाची मिळते तशी दह्याची पावडर मिळते का हो कुठे? आणून ठेवीन म्हणतो थोडी.)

भौ. शिकलास रे भाषा. ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Jan 2011 - 12:07 pm | निनाद मुक्काम प...

पुढच्या वेळी मला अशीच चमचमीत देशी बिर्याणी हवी (शाकाहारी हवी असा आग्रह नाही )
म्युनिकला ला श्रेयस उपहार गृह सुरु झाले आहे असे वाचून आहे .पाहूया
सामानाची बांधाबांध सुरु आहे .